१६ सप्टेंबर, १९९६पासून ...

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

१६ सप्टेंबर, १९९६पासून गेली २० वर्षं तुमची आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास संपादन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याबद्दल ऋणी आहोत.

याच आपुलकीच्या आधारानं आणि जिव्हाळ्याच्या सोबतीनं एकविसाव्या वर्षात पदार्पण करतो आहोत.

भाषा मराठमोळी
हर अंतरी फुलावी,
घेऊन ध्यास आली
उदयास मायबोली !

FB-20years-sm.jpg

विषय: 
प्रकार: 

मायबोली संस्थापक / निर्मात्यांचे व सहयोगी चमुचे अभिनंदन.

बीस साल के बाद......
वीस वर्षे खूप मोठा काळ आहे. तेव्हा ऐन पंचविशी-तिशीमधे असलेले आता पन्नाशी गाठू लागलेले असतील.

तेव्हांचे कोण कोण सभासद अजुनही इथे उपस्थित असतात? तेव्हांच्या काही आठवणी?

हार्दिक अभिनंदन.
इतकी जुनी सोशल नेटवर्क साईट जी अजून टिकून तर आहेच पण मस्त धावतेय, अशी माझ्या पहाण्यात मायबोली हीच एकमेव साईट आहे. इतर असल्याच तरी अशा फारच थोडया असतील.
पुन्हा एकदा अभिनंदन.

२१ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

गेल्या २० वर्षात मराठी साहित्यात अन जालसाहित्यात मायबोलीचे योगदान अतिशय मोलाचे आहे ...

मायबोलीच्या ५० व्या .... ७५ व्या अन १०० व्या वाढदिवसाला देखील आम्ही असावे अशी जगन्नियन्त्याकडे प्रार्थना

Wink

अभिमान आहे मी "मायबोली" ची सभासद असल्याचा..
अनेक लेख,कथा वाचणे यापलिकडे जाऊन कधी ववि संयोजनात सहभागी होऊ लागले कळलंच नाही. आता मायबोली आयुष्याची अविभाज्य घटक बनली हे मात्र नक्की. ऑअफिस मधे आल्या आल्या आउटलुक बरोबर मायबोली सुद्धा ओपन होते.
धन्यवाद.. आणि पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा..

मायबोली परिवाराचे हार्दिक अभिनंदन

वीस वर्षांच्या वाटचालीतील अ‍ॅट्लिस्ट अर्ध्या प्रवासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

हार्दिक अभिनंदन मायबोली, अ‍ॅडमीन, वेमा, आजी माजी अ‍ॅडमीन टीम.

मायबोलीचा सदस्य झाल्यापासून माझ्या आयुष्यात एक नवाच आनंद येऊ लागला आहे. इथले सर्व हुषार, ज्ञानी लेखक यांनी लिहिलेले वाचून संतोष होतो.

सर्वांचे आभार.

पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.

अभिनंदन! ती प्रत्येक पानाच्या तळाशी दिसणारी तारीख पाहून गेले काही दिवस हेच डोक्यात येत होते (२० वर्षे होत आली) Happy

अभिनंदन!! Happy

यंदा दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षभराचा आढावा नाही का ?

Pages