मायबोली मास्टरशेफ - धनि - येडा बटाटा

Submitted by धनि on 13 September, 2016 - 15:55

मित्रांनो आणि मैत्रिणींनो - गणपती बाप्पा मोरया !!

या वेळची मास्टरशेफ स्पर्धा जाहीर झाली. आता संयोजकांनी विकांताला जाहीर केली म्हणून माझ्या बघण्यात आली नाही Wink तरी रमड (rmd) सांगत होती की जाहीर झालेली आहे बरं ! पण मीच आळशी. नेहमी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काही न करण्याची वाईट सवय लागलेली आहे. आता मात्र "डेडलाईन राक्षस" दिसायला लागल्यावर माझ्या खांद्यावरच्या "प्रोक्रॅस्टिनेशन माकडाने" पळ काढला आणि आम्ही ही पाककृती तयार केली. आता इतकं सांगितलं पण खरं म्हणजे मागच्या रविवारपासूनच दोघांच्याही डोक्यात काय करता येईल असे विचार सुरू होतेच. त्यात नेहमीप्रमाणे एक घटक पाहिजे असं काही न सांगता संयोजकांनी स्पर्धा अजून थोडी अवघड करून डोक्याला चालना देण्याचा नविन उपक्रम सुरू केलेला आहे अशी एक शंका येऊन गेली Lol

तर ' म, ब, य, ल ' यापैकी ३ अक्षरांपासून सुरू होणारे महत्त्वाचे घटक पाहिजेत अशी मुख्य अट होती. हळू हळू मुख्य धाग्यावर काय काय साहित्य असू शकते त्याची बाराखडी पण आली. ती वाचली तरीही आम्हा दोघांना आवडत असणारा घटकच बच्चन असणार आपल्या पाककृतीचा हे निश्चित झाले होते. आता बच्चन म्हटले की ' ब' वरून येणारा बटाटा हा हिरो झाला. आपले बॉलिवुड चित्रपट नाही का एक मोठा हिरो आला की दोन लव्ह इंटरेस्ट घेऊन येतात तशा मग दोन हिरॉइनी पण निश्चित झाल्या मिरची आणि लसूण Wink घ्या, नमनालाच घडाभर तेल ओतून झाले पण या तेलात तुम्हाला तीन मुख्य कलाकार मिळाले. त्यांना घेऊन काढायच्या पिक्चरचे नाव डेव्हिड धवन आणि दादा कोंडके यांना वंदन करून येडा बटाटा ठेवण्याचे निश्चित झाले. आता सहाय्यक कलाकार पाहू.

साहित्य
१) टाटे २ मोठे - उकडून
२) मिरच्या (त्या मोठ्या गोड असतात त्या, भज्याच्या) ४ मध्यम - आतल्या बिया साफ करून
३) सूण कितीही घ्या फक्त सोलून घ्या( सगळीकडे बोंबाबोंब मधल्या किंगपाँग बरोबर कुस्ती असेल तर अजूनच जास्त घ्या )
४) हिरवी मिरची - थोडा तिखटपणा पण हवाच ना
५) कोथिंबीर
६) चाट मसाला
७) मीठ , तिखट, जीरा पावडर - चवी नुसार
८) तेल
९) मोझारेला - मुख्य नसले तरी म वरून आहेत
१०) लिंबू - आणि हे ल वरून
११) साखर - थोडी
१२) क्याचे पोहे - बारीक करून

yeda_Sahity_collage.jpgyeda_cheese.jpgकृती

१) वरती दिसतोय तसा बटाटा उकडून मॅशर ने मस्त मॅश करून घेतला. नंतर हाताने नीट उरलेली ढेकळं फोडून मऊसूत करून घेतला.
२) मिरच्या धुवून साफ करून घेतल्या.
३) हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या.
४) सोललेला लसूण किसून घेतला.
५) कोथिंबीर बारीक चिरून घेतली.
६) आता त्या बटाट्याचे दोन भाग केले. एक मोठा आणि एक छोटा
७) मोठ्या भागात कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, तिखट, मीठ, जीरा पावडर आणि चाट मसाला घालून घेतला आणि सगळं नीट एकत्र केलं.

yeda_Saran.jpg

८) आता बटाट्याच्या दुसर्‍या भागात मोझारेला घातलं.
९) त्याचबरोबर लिंबू, साखर आणि थोडे मीठ घातले.
१०) हे सगळे साहित्य चांगलं मळून घेतलं. हे आपलं सारण झालं.
११) हे सारण साफ केलेल्या मिरच्यांमध्ये भरले. अगदी पूर्वीच्या काळी बंदुकीत दारू ठासून भरायचे तसे ठासून भरा!
१२) या मिरच्या थोड्या तेलावर परतून घेतल्या. अशा परतून घेतल्यावर त्या थोड्याशा शिजल्या जातात आणि आतले चीज पण थोडेसे वितळते.

yeda_mirchi.jpg

१३) मिरच्या थोड्या थंड झाल्या की दुसरे बटाट्याचे मिश्रण त्यांच्या चहूबाजूने लावून घेतले. मिरच्या पुर्ण गुडूप झाल्या पाहिजेत.
१४) आता हे गोळे बारीक केलेल्या मक्याच्या पोह्यांमध्ये घोळून घेतले.
१५) हे घोळलेले गोळे अगदी कमी तेलात भाजून घेतले. खुप जास्ती तेल टाकू नका कारण बटाटे लगेच तेल पितात आणि विरघळू शकतात.

yeda_tava.jpg

१६) असे भाजून झाले की मस्त रंग येतो. तो आकार थोडा फार रसेट बटाट्या सारखाच येतो.

काय गार्निशिंग करायचे असेल ते करा. किंवा धीर निघत नसेल तर लगेच सुरीने कापून खायला सुरूवात करा Wink

yeda_final_2.jpg

हा कापल्यावर येडा बटाटा असा दिसतो :

yeda_Final_1.jpgटीपा

१) सारण म्हणून बटाटा आणि मोझारेला वापरले आहे त्याऐवजी तुम्हाला आवडेल ते वापरू शकता. पण येडा बटाटा आहे त्यामुळे दोन ठिकाणी बटाटा असणे बरोबर वाटते.
२) घोळण्याकरता ( बाहेरचे कव्हर) ब्रेड क्रंब्स वापरता येतील.
३) तेल कमीच घ्या आणि गॅस मध्यम ठेवा.

माहितीचा स्रोत

ही पाककृती रमड (rmd) च्या सुपिक डोक्यात तयार झाली आणि मग तिच्यात आम्ही भर टाकली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्लेट वालमार्ट मधल्या का? Proud

बाकी पाकृ भारी आहे. पहिले वाटले की बटाट्याचे पॅटिस पण हे वेगळेच प्रकरण आहे

मस्तच..... चांगले नाव तरी ठेवायचे . येडा बटाटा हे ८०-९० मधल्या मुम्बईच्या गुंडाचे नाव वाटते.

हो ना! एकदम कल्पक ! आणि मूळ आयडिया र्म्द ची तरी शेफ साठी नाव मात्र फक्त धनि चं ये न्यायनैअन्न्यायहै!!

अंदर भी बटाटा, बाहर भी बटाटा.

ह्यात बटाट्याऐवजी, अंडी, खिमा, चिकन, श्रिम्प्स वगैरे च्या वापरावर टीपा नाहीत का? Wink

मस्त रेसिपी. आता बटाटाच ठासून भरल्यामुळे 'ह्यात ...चा ऐवजी बटाटा चालेल का?' असे प्रश्न विचारणार्‍यांची पंचाईत झाली आहे. Wink

भारी पाकृ आणी त्याहून भारी नाव.
ज्यूसच्या ग्लास वर छोटा छत्री ठेवतात कवाकवा तशी येडा बटाटावर पण ठेवा की Happy

अलापिनो पॉपर टाइप दिसतय पण त्यात फार चिझ असत त्यापेक्षा हे मस्त दिसतय, (*टाटा असल्याने पौस्तीक पण म्हणता येत नाहिये)
फोटो मस्त आलेत...(चटणी ,सॉस्,केचप याची रेघ नाही ओढली का प्लेटीत)

>> (*टाटा असल्याने पौस्तीक पण म्हणता येत नाहिये>> तुम्ही ते पौष्टिक बोगातु किंवा किन्वा वगैरे ठासा म्हणजे बॅलन्स साधला जाईल.

तुम्ही ते पौष्टिक बोगातु किंवा किन्वा वगैरे ठासा म्हणजे बॅलन्स साधला जाईल.>> हो नेहमिचा बॅड्वर्ड ला हिरो केल्याने नेहमिचे प्र्श्न बदलुन विचारावे लागणार..

हायला कसलं सह्ही दिसतंय
हॅलॅपिनो पॉपर चं हेल्दी वर्जन आहे हे, तरीही टेस्टी असेल. कोण ते बटाट्याला हेल्दी नाही म्हणतय. बचकभर डीप फ्राईड चीज पेक्षा कित्ती चांगला असेल बटाटा. चार वेळा वरती स्क्रोल करून तो कापलेला फोटो परत बघून आलो.

अरे मोझरेला आणि लिंबू या चिल्लर घटकाला बोल्ड केलंय, सो पळवाट काढली का काय वाटतंय. त्या मेन घटकांना ठळक कर की.

मस्तं , गणपतीत गोड पदार्थांच्या रेसिपी जास्तं येतात, त्यात ही झणझणीत रेसिपी भारी वाटतेय.
मेरा वोट पक्का.

मस्तच...#१६ मधील फोटु झकास...! नाव मात्र बदला. मित्र-मंडळींना खास तुमच्यासाठी 'येडा बटाटा' केलाय असे कसे म्हणायचे ? Wink

ग्रेट माइंड्स की कायसंस. स्पर्धा डिक्लेअर झाल्यावर माझ्या डोस्क्यातही अशीच काहीशी आयडिया आलेली. पण सामग्री आणायला कालचा मुहूर्त मिळाला आणि तोवर तुमची एन्ट्री आली. माझ्या आणि तुमच्या रेसिपीत काही सूक्ष्म आणि काही ढोबळ फरक आहेत. तुमचा चित्रपट नायकप्रधान आहे. माझा नायिकाप्रधान असेल. त्यामुळे बहुतेक टाकेन.

भारी वाटयोत तुमचा येडा बटाटा.

आवडलाच येडा बटाटा.
कार्ब लोडिंग करता लाड करवून घ्यायला उपयुक्त आहे, फ्राय न करता ओव्हन मधून काढला की झालं.

मस्त पाकृ आहे. आणि लिहलंही. शेवटचा फोटो भारीच..

आणि हो, खरेच पिक्चर काढलात तर येडा बटाट्याच्या भुमिकेत सुनिल शेट्टीला घ्या.. मिरची आपली कतरीना.. आणि लसूण म्हणून सनी लिओन घ्या, पण का ते विचारू नका. तो जरा चावट जोक आहे Wink

मायबोली मास्टरशेफ -
धनि - येडा
बटाटा>>
माझ्याकडे हे नाव अशा पद्धतीने दिसतंय. Happy पाकृ वाचल्यावर कळलं ते 'धनि येडा' नसून 'येडा बटाटा' आहे. Happy

पाकृ जबरदस्त. भरलेली मिरची पण तिखट घेतली तर भारी झणझणीत होईल.

येडा बटाटा बस नाम ही काफी है... Wink

बटाटा ऑल टाईम फेव्हरेट. भारी दिसतेय पाककृती. लवकरच करून खाण्यात येईल.

स्पर्धेसाठी शुभेच्छा!!!

Pages