संगीतक हे नवे - रिक्षावाला आणि मी

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 September, 2016 - 12:56

मजा घेत वाचा Happy

कामावर जायलाऽऽऽऽ...
उशीर व्हायलाऽऽऽऽ...
कामावर जायला, उशीर व्हायला.,
लावतोय रिक्षावालाऽऽ
ग्ग वाट माझी लावतोय रिक्षावाला..

साडेआठ वाजताऽऽऽऽ...
आलेय नाक्यालाऽऽऽऽ...
साडेआठ वाजता, आलेय नाक्याला,.
वाजले की आता बाराऽऽ
ग्ग वाट माझी लावतोय रिक्षावाला..

...

तर लोकहो,
दुपार तशी मस्त होती, पण गर्लफ्रेंड आपली, (रुनम्याची हो) त्रस्त होती
पोहोचायचे होते टायमावर, पण सारी लाईने व्यस्त होती

रिक्षा काही मिळत नव्हती, वेळ नुसती पळत होती
दिसत होती लांबून लांबून, पण येत नव्हती थांबून थांबून

जायचे होते तिला जिथे,
रिटर्न भाडे नव्हते तिथे

डबल भाडे द्यावे लागेल,
शेअरींगवाला घ्यावा लागेल

तीन गुणा लगान सारखा,
टोल चौपट द्यावा लागेल

अर्ध्या रस्त्यावर सोडेन तुला,
तिथून चालत जावे लागेल

पैसे सुट्टे आधीच काढा,
नसल्यास ताई रस्ता सोडा

रिक्षा पिवळी, पोर सावळी
उन्हात थांबून पडली काळी

दया कोणाला येत नव्हती
माया तर एक मेमसाब होती

याडं लावलंऽऽ याड लावलं रेऽऽ
रिक्षावाल्यांनी या याड लावलं रे ....

अन फायनली .......

गर्लफ्रेंड अखेर वैतागली, आणि लावला तिने फोन..
म्हणजे आपल्या रुनम्यालाच हो, आणखी आहे कोण?

लाईट कॅमेरा अ‍ॅक्शन मुजिक ..

नात्याला काही नाव नसावेऽऽ तू ही रे मेरा रुनम्याऽऽ
नाक्याला तुझी वाट बघतेऽऽ लौकर ये रे रुनम्याऽऽ

तर लोकहो,
पाऊस आला जोरात, आणि मडके गेले वाहून
अर्धी मुंबई तुंबली, तरी रुनम्या आला धावून

आला तर आला, वर बोलतो कसा ..

लाईट कॅमेरा अ‍ॅक्शन नाचो ..

उरात होतेय धडधड लाली गालावर आली
रिक्षा नाही सापडली आन आठवण माझी झाली
लई दुरून आलोया, गाव फिरून आलोया
आनं तुझ्याचसाठी रिक्षावाली घेऊन आलोया ..

तर लोकहो,
रिक्षा आली, रिक्षावालीही आली
महिला शक्ती, इथेही सरस झाली

पण स्टोरी ईथेच, दि एण्ड नाही झाली

संगीतिका अभी.... बाकी है मेरे दोस्त !

लाईट कॅमेरा अ‍ॅक्शन, धरा ताल

हे मीटर धावे तुरूतुरू
आता झाले नाही सुरू
तरी बत्तीस कसे दाखवते हे..

रुनम्याला समजेना
गर्लफ्रेंडला उमजेना
तरी द्यावे लागणार होतील तितके

आईचा घो Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !

आज पहिल्यांदा असे घडलेय. मी माझ्या गर्लफ्रेंडबद्दल लिहिलेय आणि चांगले प्रतिसाद येत आहेत. भरून आलंय. आता लग्न करायला हरकत नाही !

लई दुरून आलोया, गाव फिरून आलोया
आनं तुझ्याचसाठी रिक्षावाली घेऊन आलोया >> भारीच!!
मस्त लिहिलंय Lol

धन्यवाद Happy

आता ही स्पर्धा असल्याने वोट अपील करायला हरकत नाही Wink

मत देणार्‍या मायबोलीकरांसमोर दोन ऑफर ठेवतो,

ऑफर क्रमांक एक -
१) जर मी पहिला आलो, तर एका आठवड्यात मायबोली सोडून जाईन
२) जर दुसरा आलो, तर दोन महिन्यांनी मायबोली सोडून जाईन
३) जर तिसरा आलो तर तीन वर्षांनी मायबोली सोडून जाईल.
यापैकी काहीच न झाल्यास ............ झेला आयुष्यभर Happy

ऑफर क्रमांक दोन -
१) जर मी पहिला आलो, तर वर्षाला एकच धागा
२) जर मी दुसरा आलो, तर महिन्याला दोनच धागे
३) जर मी तिसरा आलो तर आठवड्याला तीनच धागे
यापैकी काहीच न झाल्यास ............ दिवसाला एक धागा... आणि रात्रीला आणखी एक धागा Happy

तळटीप - स्पर्धेचा निकाल माझ्या बाजूने लागल्यावर तुम्हाला कोणती ऑफर हवीय यासाठी स्वतंत्र पोल काढण्यात येईल Happy

बस् कर पगले, अब रूलायेगा क्या? >>> Rofl
ऋन्मेष, देव करो, आणि तुमचा पहिल्या तीनांत क्रमांक येवो. आम्हांस तुमच्या विरहाची कल्पनाहि करवत नाही.

Pages