कोडैक्कानल सायकल प्रवास (सोलो) ........(पहिला आणि दुसरा दिवस)

Submitted by jadhavmilind26 on 12 September, 2016 - 11:36

आज मी तुमच्या बरोबर माझ्या आठवणीतला माझा एक सायकल प्रवासवर्णन शेअर करणार आहे. तिन वर्षापूर्वी 2013 ला माझे रूम मेट्स (KODAIKKANAL) कोडैक्कानला बसने गेले होते. कोडै हे सुध्दा एक हिल्स स्टेशनच आहे तमिळ नाडू मध्ये; आपल्या महाबळेश्वर सारखच. पण त्यावेळी मला काही जाता आले नाही. माझ्या रूम मेट्सने खूप चांगले फोटो काढले होते , ते बघून मला फार वाईट वाटल. मी वेळ काढून जायला पाहिजे होते असे मला वाटू लागले. त्या क्षणा पासून मी कोडैला जायची संधीच शोधत होतो पण योग येत नव्हता.

अष्टविनायक सायकलीवरून पूर्ण केल्या पासून माझ्या मनात कोडैला सायकलीवरच जायचा विचार येत होता. पण कोडैची उंची 7000 फुट , मी आजुन येवढे मोठे डोंगर कधीच सायकलवरून पार केले नव्हते. म्हणून मी kolli malai ला सायकलवर सरावासाठी गेलो, ज्याची उंची 4264 फुट आहे.

16 मे या रोजी, तमिळ नाडू मध्ये मतदानाची सुट्टी होती म्हणून सायकलीवर कोडैला जयाचे मनात आले. हाता मध्ये एकच आठवडा होता, विचार केला आठवडाभर सराव करायचा. पण नेमका त्याच दिवशी पाऊस सुरू झाला. सायकल वर सरावाचा मग प्रश्नच कुठे ? मग जिम मध्ये व्यायाम केला. पण काही ही केल तरी जिमचा व्यायाम सायकलच्या सरावाची कमी भरून कढणारा नव्हता. शनिवारी नेट वरून कोडैच हॉटेल बुक केलं.

रविवारी १५ मे ला सायकल त्रिची ते कोडै रोड स्टेशन पर्यंत रेल्वेने पार्सल केली. दुपार नंतर जवळ जवळ 4:30 ला मी कोडै रोडला पोहोचलो.

माझे चारही रूम मेट्स निर्मल, सिंग,आदित्य आणि दीपक आता हरिद्वार ला ट्रान्सफर घेऊन गेले आहेत . चारींचे मूळ गाव हरिद्वारच.. हे चारही कोडैला गेले होते म्हणून मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मी उद्या कोडैला चाललोय आणि उद्या मी एक सप्राईज देणार आहे ! मी सायकलवर चालोय हे मात्र त्याना मुळीच सांगितल नाही.

स्टेशनपासून 20 km (batlagundu)वतलागुंडूला गेलो. हॉटेल बघितल, पार्किंगची सोय होती म्हणून त्या हॉटेलला रूम घेतली.रूम अगदी साधी होती.उद्या सकाळी सकाळी गडबड नको म्हणून मी बॅग पॅक करून ठेवली. ८:३० ला जेवण केले. उद्यासाठी मी फळ घेण्यासाठी बाजारात गेलो. मला मात्र द्राक्षेच भेटली. माझ्याकडे सेल्फी स्टिक नव्हती म्हणून एका दुकानात गेलो. दुकानदाराने मला सेल्फी स्टिक दाखवली पण होल्डरपाशी तुटलेली होती म्हणून मी ती घेतली नाही. हॉटेलच्या मालकाला सांगितल उद्या मी सकाळी ५:४५ ला चेक आऊट करणार आहे. उद्या मी ७०००फीटचा डोंगर सायकल वर पार करू शकणार का या विचाराने मी झोपी गेलो.
वतलागुंडू ते कोडै 58 km...(दुसरा दिवस)
16/5/2016
सकाळी पहाटे पाच वाजता उठलो, बाहेर बघतोय तर काय, जोरदार पाऊस पडतोय! सहा वाजता निघायचा प्लॅन सुद्धा बेकार गेला. मी पाऊस थांबायची वाट बघत होतो . काही ही केल तरी आज जायचेच मानत येत होते पण पाऊस सुद्धा आपली दमदार ताकत दाखवत होता. मग मी रेन कोट विकत घेण्याचा विचार केला पण मतदान असल्यामुळे जवळपास सारीच दुकाने बंद होती. सायकलसाठी मडगार्ड विकत घेण्यासाठी मी दुकानात गेलो, ते पण बंद होते. आता मञ पाऊस थांबायची वाट बघत बसण्यापलीकडे माझ्याकडे कोणताही उपाय नव्हता. मग एक कप चहा घेतला, चहा पित-पित विचार केला की, मी 150km लांब सायकल पार्सल करून आलो आहे आणि कोडै ला न जाता परत सायकल पार्सल करून घरी जायचे….घरी माघारी जायचं, या विचाराने माझे मन अस्वस्थ झाले. तीन वर्षाचे स्वप्न पूर्ण होणार नाही…अजुन आशा प्रकारचे काही विचार येण्याच्या आतच मी रूम मध्ये गेलो. बॅग(panniers bags) घेतल्या आणि सायकला फिट केल्या. आता मात्र कस जायचे याचाच विचार मन करू लागले . आता घरी जायचा विचार सुद्धा मनात येत नव्हता . फक्त एका अकॅशन ने माझं मन बदलले. आठ वाजले तरी पाऊस काय थांबायचे नाव घेत नव्हता . हॉटेल मधून चेक आऊट केलं. हॉटेलचा मालक त्यातून मला म्हणाला "जाऊ नकोस,हितेच बघ किती पाऊस पडतोय मग कोडैला तर किती पडत असेल". आता माझ्या पुढे दोन रस्ते होते , एक तर घरी माघारी जायचे नाहीतर कोडैला. माघार घेण्यात काय मज्या !!!. नाश्ता केला आणि मारली टांग सायकला आणि निघालो कोडैला …

(Dindgul) ते (theni) हायवे वरून घाट रोड बस स्टॉप पासून उजवीकडे कोडैला रोड जातो . 7 km वर ते वळण होते. शेवटी पाऊसात भिजून त्या वळणापाशी आलो.IMG_20160516_084647_1-600x800.jpgआगदी घाट चालू होण्याच्या आत मी पूर्ण पणे भिजलो. मला मात्र पाऊस पडतोय याचे दुःख नव्हते ते होते पाऊसामुळे मी फोटो काढू शकत नव्हतो त्याचेच जास्त !!! तरी पण आठवण म्हणून मी तिथे फोटो घेतले..

मी जेव्हा माझ्या मित्रांना विचारले घाट रस्ता कसा आहे?? तेव्हा ते म्हणाले होते "रस्ता भरधाव वाहतो, सांभाळून जा". पण आज रोड वर मात्र क्वचितच गाडी दिसत होती. मतदानाचा दिवस असल्यामुळे आणि त्यात पाऊस त्यामुळे गाड्यांची वरदळ कमीच होती.

आजून घाट चालू होण्यासाठी 6km बाकी होते. पण जरी घाट चालू झाला नसला तरी चढ होताच. मध्येच एक गाव लागल kamakkapatti (कामक्कापट्टी). जेव्हा मी kamakkapatti गावाला गूगल मॅप वरून बघायचो ते गाव दुसरे जंगलच !! म्हणजे गावाला चारी बाजूनी झाडेच झाडे .जेव्हा मी त्या गावात गेलो तेव्हा नारळचे झाडेच झाडे होती. घाटाच्या पायथ्याशी ‘THE GHAT ROAD BEGAIN ‘ अशी पटी दिसली. आठवण म्हणून तिथे एक फोटो घेतला.

ढगांमुळे डोंगर किती उंच आहे ते मात्र दिसत नव्हते . पायत्यापाशी फॉरेस्ट चेक पोस्ट नावा पुरत होता. गाड्या येत - जात होत्या पण चेकिंग काही कोणी करत नव्हतं . माझे नेक्स्ट टार्गेट होते DUM DUM ROCK VIEW POINT. नऊ वाजता मी घाट चढायला सुरवात केली .

IMG_20160516_095056-640x360.jpgपाऊसामुळे रोड वर शुकशुकाट होता . तस नुसता घाटच चालू झाला नव्हता , जंगल सुद्धा चालू झालं होते. तमिळ मध्ये Kodaikkanal चा आर्थच The Gift Of Forest असा आहे. अगदी घाटाच्या सुरवातीलाच वानरांचे दर्शन झाले .चार किलोमीटर पार केल्यानंतर जोरदार पाऊस पडायला सुरवात झाली. पण माझ्या मनात एकच गोष्ट होती, ‘kodaikkanal’ ते आज मी पूर्ण करणारच . 10 वाजता मी DUM DUM ROCK VIEW POINT ला आलो. तो पॉईंट बघितल्या नंतर माझं मन प्रसन्न झाले. मी नेहमी टूरच्या छोटे छोटे भाग करतो, ह्या टूरचे मी पाच भाग केलं आणि त्यातला पहिला भाग पूर्ण झाला होता. पॉईंट पाशी कॉफीच्या दुकानात दोन कप कॉफी घेतली . अंग पूर्ण पणे भिजले होते . कॉफी पिल्यानंतर थंडी कमी वाटू लागली.IMG_20160516_100530_1-600x800.jpg

DUM DUM ROCK VIEW POINT हे MANJALAR dam आणि Rat Tail या दोन गोष्टींसाठी प्रसिध्द त्यात मला फक्त MANJALAR धरण बघायला मिळालं..RAT TAIL धुक्यांमुळे दिसलं नाही .IMG_20160516_094924-640x360.jpg Manjalar धरणाचे फोटो घेतले. Manjalar धरणाच्या दोनही बाजूने जंगल आणि वरती पांढऱ्या ढगांनी लपेटलेली चादर अस मनमोहक दृश्य बघायला मिळाले.

१० वाजले होते आणि मी फक्त 6km पार केलं होत. शेड्युल प्रमाणे मी 15 मिनिटे मागे होतो. IMG_20160516_100906-600x1067.jpg
पॉईंट पाशी नारळपाणी विकणाऱ्या कडून एक फोटो काढुन घेतला. 10:15 ला मी पुढच्या प्रवासाला सुरवात केली. नेक्स्ट टार्गेट पन्नईकडू (pannaikadu )14km वर होते.

6.5 km नंतर मी कुंबरै (kumbarai) बस स्टँड पाशी आलो. IMG_20160516_110520-640x360.jpg पाऊसाने परत दमदर हजेरी लावली म्हणून मला बस स्टँड मध्ये थांबायला लागले. बॅग मध्ये मी द्राक्षे आणली होती. मग मी ती खात बसलो. द्राक्ष खात असताना माझ्या लक्षात आले की माझ्या शरीरातुन वाफा येत होत्या. घाटाने कस काढली होती पण पाऊसने भिजल्यामुळे घाम दिसून येत नव्हता. पाऊस कमी झालावर मी लगेच निघलो.

12 वाजता मी pannaikadu ला पोहोचलो. टार्गेट वेळेत पूर्ण झाले. स्टँड वर खूप गर्दी होती. Pannaikadu मध्ये जेवण करायचं ठरल होत. पण मतदानामुळे हॉटेल्स सुध्दा बंद होते. फक्त चहा आणि कॉफी चे दुकान चालू होते. पहिलं संकट पाऊस आणि त्यात हॉटेल बंद.. आता मात्र जेवण डायरेक्ट कोडैलाच . माझ्या समोर उपाय नसल्यामुळे एक कप कॉफी आणि दोन वडे खाल्ले.

12:10 ला मी (pannaikadu) पन्नईकडू सोडले. अजून 24km चा प्रवास बाकी होता. माझ नेक्स्ट टार्गेट होते पेरूमल मलै (Perumal Malai) . पाऊस पूर्णपणे थांबला होता पण ढग अजून तसेच होते. एक professional बाईक रायडर आला. कदाचित 1000cc ची बाईक होती. Moto GP मध्ये रायडर असतात ना तसेच. मला त्याने (pannaikadu) पन्नईकडूला ओव्हर टेक करून गेला आणि जवळ जवळ एक दीड तासाने तो परत सुद्धा आला. मग मी विचार केला की , त्याने निसर्ग जवळून पाहिला कि मी ?? Of course मीच !!! यात काही शंकाच नाही .. कारण मी त्या घाटात जादा टाईम स्पेंड केला. आणि जादा वेळ मी निसर्गाला जवळून निरखून बघितलं. हां मी मानतो कि बाईक राईड ची वेगळीच मज्या आहे पण बाईक चालवताना आपण खूप स्पीड मध्ये चालवतो. नुसतं एक एक गाडी ओव्हर टेक करायच्या नादात आपण नकळत एक दुसऱ्यांशी रेस लावतो आणि आपण निसर्ग एन्जॉय करायचं विसरतो.

कोडै घाट निसर्ग प्रेमींसाठी एक वरदानच आहे. आपण डिस्कवरीवर किंवा नॅशनल geography वर अमेरिका किंवा आफ्रिकेतील जंगल बघतो. त्यांच्या पेक्ष्याही, जर घन दाट जंगल बघायचे असेल तर एकदा तरी कोडै घाटला जावे. जंगला मध्ये सुद्धा जायची गरज नाही. घाटच आसा आहे कि अस वाटत की आपण जंगल राईड लाच चाललोय. अगदी रोड सोडलं तर थोडी सुद्धा जागा रिकामी दिसणार नाही. IMG_20160516_124725-640x360.jpgThe Gift Of Forest हा कोडैचा तामिळ मध्ये अर्थ शोभून वाटतो.

माकडे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारीत एकमेकांना आवाज देत जात होती. एक चार चाकी गाडी भरधाव घाट उतरत होती आणि माकड रस्त्यावर काहीतरी खात बसले होते.मला वाटल आता गाडीचा आणि मकडाचा अपघात होणार पण माकडाने चतुराई ने झटपटी ने रोड क्रॉस केला. तसा त्यांचा हा रोजचाच कार्यक्रम असणार म्हणा!!! पण ती एकदम एक्स्पर्ट झाली आहेत रोड क्रॉससिंग मध्ये!!!!

मी पेरूमल मलै (Perumal malai) मध्ये जवळ जवळ 2 वाजता पोहोचलो. मला वाटत होत की माझ शेवटी शेवटी स्पीड कमी होईल. पण नशिबाने तस काही झाल नाही . स्पीड आजून तरी constant होत.

नेक्स्ट टार्गेट होत Silver cascad falls. ते 7km वर होते. म्हणजे कमीत कमी आजून एक तास प्रवास होता. आता मी घाट तसा 90% पार केला होता. रोड आता अरुंद झाला होता. जर दोन्ही बाजूनी गाडी आली तर एका गाडीला थांबून दुसरी गाडी जात होती. डाव्या बाजूला खोल दरी होती. फक्त सेफ्टी कंपाऊंड होत माझ्या आणि खोल दरीच्या मध्ये आणि एका पाटोपात एक असे असंख्ये डोंगर लपलेले दिसत होते.

IMG_20160516_124714-640x360.jpg घाटा मध्ये चारचाकी गाडी चालवायला अवघड असते हे मी फक्त ऐकून होतो पण इथे ते प्रत्येक्षात मला बघायला मिळाले 2 गाड्यांचा अपघात झालेला मला बघायला मिळाला , तरी रोडच्या बाजुनी प्रत्येक 200 ते 300 मीटर वर स्पीड लिमिट आणि धोक्याच्या पाट्या लावल्या आहेत. पण गाडी फास्ट चालवण्याच्या नादात त्या पाट्यांकडे कोणाच लक्ष जाणार म्हणा !!!

IMG_20160516_152050-640x360.jpg मी 3:15 ला silver cascade falls पाशी पोहोचलो पाऊसाने परत एकदा दमदार हजेरी लावली. आणि आता मात्र कोडैने त्याचे खर रूप दाखवायला सुरवात केली, ते म्हणजे 15°C तापमान. Falls तसा भरून वाहत नव्हता पण एकदम साफ पाणी होत. पाऊस पडूनही पाण्याचा रंग अजून कसा पांढरै शुभ्र होता. जाऊन ते साफ पाणी प्यावे अस वाटल पण सेफ्टी साठी falls फक्त पुलावरूनच बघू शकत होतो. Falls पर्यंत जायला वाट नव्हती.IMG_20160516_152224_1-600x800.jpg मग मी पुलावरुन दोन तीन सेल्फी घेतल्या.
IMG_20160516_151850-640x360.jpgआणि एक सायकलचा falls बरोबर फोटो घेतला . मला आता जादा वेळ वाया घालवून चालणार नव्हत. मी लगेच निघालो. हा माझा शेवटचा टपा होता.

हॉटेल शोधण्यासाठी मी आधीच GPS चालू करून ठेवल होत. कोडै लेक पासून ते हॉटेल अर्धा किलोमीटर अलीकडे होते. वरती गेल्यावर तापमान आजून कमी झाल . पाऊस सुद्धा वाढला आणि अजून वाढायची शक्यता होती.

शेवटी शेवटी माझा कॉन्फिडन्स खूप कमी झाला. जेवण केल नव्हत त्यामुळे माझ Mind Setup बिघडल. कोडै ने माझा दम काढला होता. IMG_20160516_094951-640x360.jpgउगीच कोडै ला Princess of Hill Stations म्हणत नाहीत. आता अस झाल, हत्ती गेला आणि शेपूट राहिल!!! मग मी झाडा खाली बसलो. त्यात निर्मल ने फोन केला आणि म्हटला “ काय सप्राईज देणार आहे ते सांग?” मी म्हटलं “आजून सप्राईज पूर्ण झाले नाही तुला मी 5 वाजता फोन करतो”. 5 मिनिटा नंतर मी GPS मध्ये बघितले तर 1.5 km वर spring valley hotel होत. तेंव्हा कुठे जिवात जीव आला आणि परत फुल टू कॉन्फिडन्स ने सायकल चालवली . IMG_20160516_124346_1-600x800.jpgशेवटी मी एका चौका मध्ये पोहोचलो, जीतून मी right turn घेऊन मी हॉटेलवर 4:30 ला पोहोचलो. हॉटेलच्या ground floor ला सायकल पार्क केली, panniers बॅग (सायकल बॅग) काढल्या आणि आत चेक इन साठी गेलो.

हॉटेल मॅनेजर दिड शाहणा आधी म्हटला रूम्स खाली नाहीत म्हणून. मला त्याचा राग आला कारण मी त्याला सांगितल ऑनलाइन बुक केल आहे तरी सुद्धा रूम्स नाहीत म्हणत होता.. शेवटी त्याला मी मेल दाखवला. मग तो त्यांच्या सिस्टिम वर मेल शोधत बसला… खूप वेळ झाल तरी त्याला एक मेल सापडत नव्हता …आणि मी तर पाऊसाने पूर्ण पणे भिजलो होतो. मला अस झाल होत की मी कधी रूम मध्ये जाऊन कपडे बदलतोय आणि हा दिड शहाणा अजून मेलच शोधत होता..शेवटी देवाची कृपा मेल सापडला. मी त्याला म्हटल की सही कुठे करायची ते सांग . त्याने बरोबर ओळखल की मला आता ठंडी सहन होत नाही ते . त्याने पण वेळ न घालवता सगळ्या प्रोसेस केल्या आणि मला रूम दिली. त्याला विचारले गरम पाणी आंघोळीसाठी मिळेल का? तो म्हटला फक्त सकाळी 6 ते 9 लाच गरम पाणी मिळेल. मग त्याला गरम गरम कॉफी आणायला सांगितली . तोपर्यंत मी कपडे बदलले. आणि गरमा गरम कॉफी घेतली.

दिवस भर माझ डोक ओलच होत . मला तापाची भीती वाटत होती. पण सुदैवानी ताप पूर्ण tour मध्ये काही आला नाही .

आज मी पहिल्यांदा 7000 फुट उंचीच डोंगर सायकल वर पार केल. माझे मित्र मला म्हणत होते बाईक वर जाण्यासाठी कंटाळा येतो आणि तू सायकलीवर जाऊच शकत नाहीस. पण माझ्या इच्छाशक्ती पुढे माझ्या पायांनी सुद्धा हार मानली!!!

मग मी निर्मल ला फोन केला आणि सांगितल की मी कोडैला सायकल वर आलोय. त्याला तर आधी जोक वाटला. नंतर मी त्याला whatsapp वर फोटो सेंड केले. तेंव्हा कुठे त्याला विश्वास बसला त्याने शुभेच्छा दिल्या. लगेच दीपक आणि सिंग ने मला फोन केला आणि शुभेच्छा दिल्या…

म्हटलं हि गोष्ट घरी सांगावी …पण मी घरी कोणाला सांगितल नव्हत की मी कोडै ला सायकलीवर एकटाच चाललोय म्हणून . दुःख येवडच होत की मी येवढ मोठ टार्गेट पार केल आणि मी घरी सांगू शकत नव्हतो . मी ठरवल होत कि जो पर्यंत टूर पूर्ण होत नाही तो पर्यंत घरी सांगायच नाही. म्हणजे माझी ही टूर आजून पूर्णपणे successful झाली नव्हती. मी जो पर्यंत त्रिचीला पोहोचत नाही तो पर्यंत ही टूर successful पूर्ण होणार नव्हती…

क्रमश.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे जबरीच. मस्तच झालाय की. कोडाईकॅनाल ला सायकलने तेही धोधो पावसात एकट्याने....मानलं पहिजे....

फोटो टाका की राव

आशिष सर मी मोबाइल वरून पोस्ट केले आहे त्यामुळे फोटो नीट बसत नव्हते, म्हणून फोटो पोस्ट केले नाहीत ....उद्या करतो पोस्ट ....
आणि सर मी तुमचे पुणे ते कन्याकुमारी चे सारे पोस्ट वाचलेले आहेत.... मस्त वाटलं वाचून .....

थँक्स 'limbutimbu'... ईच्छाशक्ती मुळेच जमले नाही तर वतलागुंडू पासूनच माघारी आलो असतो ......☺☺☺

झकास, फोटोमुळे।मज्जा आली वाचायला आता. पण हेल्मेट नाही????

माझी कळकळीची विनंती कि पहिल्यादा हेल्मेट घ्या आणि वापरा

वा खूपच छान , ट्रिप आणि लेखन दोन्ही भारी
पुढचा भाग लवकर टाका , तुम्ही घरी सांगितल्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती हे वाचण्याची उत्सुकता आहे

झकास, फोटोमुळे।मज्जा आली वाचायला आता. पण हेल्मेट नाही????
माझी कळकळीची विनंती कि पहिल्यादा हेल्मेट घ्या आणि वापरा
>>> +१

भर पावसात सायकलने कोड्डईकनाल , ज ब र द स्त !
माझी कळकळीची विनंती कि पहिल्यादा हेल्मेट घ्या आणि वापरा >>> आशुचँप +१ , खरचं हेल्मेट वापर.