देव मोठा की राजा...?

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 3 September, 2016 - 07:02

या राजाचे आगमन, त्या राजाचे आगमन... एक कळेना... देव मोठा की राजा...? अरे प्रेम येतंय ना दाटून? मग प्रेमाने बाप्पा हाक मारा की ... त्यालाही आवडेल ... स्पर्धेत न उतरवल्याचं समाधान त्या वक्रतुंडाच्या चेहऱ्यावरही झळकेल...

बाकी शहाण्याला शब्दांचा मार...

देव हा भावाचा भुकेला... आता त्याचा 'भाव' नका करू ओ...

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छे छे तसंकसं चालेल, तसे बाप्पा तर गल्लोगल्ली आहेत.
तो राजाच असला पहिजे, त्यातून नवसाला पावणारा, त्या शिवाय भक्तांची झुंबड कशी होणार, झुंबड नाही झाली तर दानपेट्या कशा भरणार.

आता वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला गल्लोगल्लीपण राजे यायला लागलेत ही गोष्ट सोडा.

जोपर्यंत निमूटपणे डोकं न वापरता फक्त वाकवणारी प्रजा आहे तोपर्यंत राजे येतच राहणार

आताच कस्कायवर फॉर्वर्ड बातमी वाचली.
अहमदनगरमध्ये वर्गणी दिली नाही म्हणुन जोडप्याला मारहाण.
Sad
http://abpmajha.abplive.in/maharashtra/attacked-for-ganpati-donation-in-...