क्रीडाक्षेत्राबाबत दोन प्रश्न

Submitted by बेफ़िकीर on 21 August, 2016 - 05:51

विविध खेळांबाबत मनात नेहमी एक संभ्रम निर्माण होतो. आपल्या देशात क्रिकेटचे वेड आहे. हळूहळू इतर खेळही लोकप्रिय होऊ लागलेले आहेत. हॉकीमध्ये आपण दिग्गज होतो / आहोत वगैरे!

रिओ ऑलिंपिकमध्ये दीपा - साक्षी - सिंधू ह्यांनी यशाची चढती कमान दाखवली. सगळा देश भावनिक झाला वगैरे! मग अचानक चर्चा सुरू झाली की ह्या खेळाडूंना शासनाकडून आधी कुठे काय मिळाले वगैरे! म्हणजे प्रोत्साहन, भत्ते, ह्याबाबत एकंदर उदासीनताच होती असे म्हंटले जाते. त्याही परिस्थितीत ह्या खेळाडूंनी अशक्यप्राय कामगिरी करून दाखवल्यामुळे ते हिरोही ठरतात आणि ते रास्तही आहेच. त्या कामगिरीनंतर त्यांना शक्य ते उच्च पुरस्कार देऊन गौरवले जाते. त्यांचे उत्पन्न बेसुमार वाढू लागते. ते अनेक नवीन खेळाडूंसाठी आदर्श ठरतात.

पण मला असा प्रश्न पडतो की एकुणच खेळ आणि देशभावना हे एकमेकांत इतके गुंफलेले असल्याप्रमाणे का वागावे? खेळाकडे खेळ म्हणून का पाहिले जाऊ नये? अर्थात, जो व्यावसायिक खेळाडू आहे त्याला शासनाने सर्व ते सहाय्य करावे, जनतेने शक्य तितके प्रोत्साहन द्यावे, प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान चीअर करावे, विजयाचा जल्लोष मानावा, पराभवाचे वैषम्य मानावे, जय व पराजय दोन्हीचे अ‍ॅनॅलिसीस व्हावे हे सगळे मान्य! पण कुठेतरी हे मान्य होईल का की देशासमोर देशाच्या जन्मापासूनच अनंत महत्वाचे प्रश्न उभे ठाकलेले आहेत. नवीन समस्या निर्माण होत आहेत. अशा अवस्थेत प्रशासनाचे पहिले प्राधान्य नेहमीच महत्वाच्या समस्या सोडवण्याला असणार. कुठेतरी क्रीडा हा विषय मागे पडणार. (हे कोणत्याही पक्षाच्या सरकारचे होणार).

हे मान्य असेल तर खेळाडूंच्या कामगिरीचा भरभरून गौरव करताना सरकारचे वाभाडे काढले जायलाच पाहिजेत ही वृत्ती टाळता येईल का? दहशतवाद, भ्रष्टाचार, सीमाप्रश्न, अंतर्गत कलह, मर्यादीत संसाधने असे कैक प्रश्न जळत आहेत. खेळण्यासाठी अधिकाधिक तरतुदी करणे हे काही प्रमाणात लक्झरीचे लक्षण नाही का? ही लक्झरी आपल्याला परवडते का? आज ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक पदके मिळवणारे पहिले चार, पाच देश भारतापेक्षा सामर्थ्यवान व श्रीमंत देश आहेत. असेही देश असतील जे गरीब असूनही पदके मिळवत असतील, पण मग असेही देश असतात जेथील लोक जेनेटिकलीच एखाद्या क्रीडाप्रकारासाठी आवश्यक असे शरीर बाळगून असतात. अधिक तपशीलात जाण्यापेक्षा मोटामोटी मुद्दा इतकाच की खेळाडूंना सहाय्यभूत ठरतील अश्या तरतुदी करण्यात सरकार कमी पडले ह्याचा उल्लेख तीव्रपणे केला जायलाच पाहिजे का?

ज्या खेळाडूंनी यश मिळवले त्यांच्यासाठी भरपूर जल्लोष व्हावा. त्यांनी विपरीत परिस्थितीत यश मिळवले ह्याचा उदंड गौरव व्हावा. पण सरकारने काहीच केले नाही असे म्हणणे पटत नाही. तसेच, खेळातील यश आणि अपयश हे थेट देशभक्ती, देशभावना ह्याच्याशी जोडणेही पटत नाही. देशाच्या वतीने खेळणारा खेळाडू देशासाठीच खेळत असतो हे अगदी मान्य, पण सैनिक, समाजसुधारक, काही स्वच्छ नेते ह्यांच्या मनातील देशप्रेमाची सर त्याला असावी का? किंवा असे म्हणतो की एखादा खेळाडू हरला तर देशाचे काही थेट नुकसान होणार आहे का? जिंकला तर देशाचाही गौरव होतोच हे ठीक, पण देश त्या गौरवाशिवायही आहे त्याच परिस्थितीत राहणार असतो आणि गौरव झाला तरी आहे त्याच परिस्थितीत राहणार असतो.

खेळाडू आणि खेळाकडे खिलाडू वृत्तीने पाहणे बहुधा आपल्या लोकांना जमत तरी नाही किंवा भावना फारच गुंतवल्या जातात. त्या उलट सिंधू आणि तिची स्पॅनिश व सुपिरिअर प्रतिस्पर्धी ह्या दोघींनी अत्यंत जीवन-मरणासारख्या सामन्यातही एकमेकांप्रती आदर आणि खिलाडूवृत्ती दाखवली आणि सामनाही उत्कंठावर्धक करून दाखवला हे किती सुखद वाटते!

क्रिकेटचेही असेच आहे. ऋन्मेषच्या एका धाग्यातही हा मुद्दा आलेला आहे की पाकिस्तानने विश्वचषक सोडला तर शेकडोवेळा आपली धूळधाण केलेली आहे. अधिक चांगले खेळाडू सातत्याने निर्माण केलेले आहेत. पण पाकिस्तानशी खेळताना मनात शतृत्वाची भावना घेऊन प्रेक्षक का गुंतावेत? आपल्याला खेळाकडे पाहण्याचा निखळ दृष्टिकोन अंगी बाणणे नाहीच जमत का? अगदी तिर्‍हाईत संघाने पाकला हरवले तरी आपण आनंद मानतो हे किती विचित्र आहे.

१. सरकारपुढे असलेल्या महत्वाच्या समस्या बघता क्रीडाप्रकारांबाबत सरकारला नेहमी दोष देणे योग्य आहे का?
२. खेळामध्ये देशभावना गुंतवणे योग्य आहे का? त्याशिवाय खेळ एन्जॉय करता येणार नाही का?

असे दोन संभ्रम म्हणा किंवा प्रश्न म्हणा!

=============================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या, लिंकमध्ये जी बातमी दिलीय तिचा अर्थ काय होतो असा प्रश्न आहे.
मला खेळातलं काय कळत नाही.
ऑलिंपिक मी पाहिलेलं नाही.
पण बर बेफिकीर यांनी दिलेली बातमी पूर्ण वाचली.

अमेरिकेत आयोजित केल्या जाणार्‍या ऑलिंपिक्ससाठी अमेरिकन सरकार अर्थसहाय्य देते, >>>> मयेकर, तुम्हांला नक्की काय म्हणायचं आहे कळलं नाही. आपल्या देशात होणार्‍या ऑलिंपीक सारख्या प्रचंड पसार्‍याच्या स्पर्धेसाठी सरकार अर्थसहाय्य करणारच ना? स्पॉन्सरर्स असतात पण जागेपासून इतर पायाभुत सुविधांपर्यंत सगळ्या गोष्टी त्य त्या देशांची सरकारच करतात ना? अमेरिकेने असं नक्की वेगळं काय केलं ते कळलं नाही (इनफॅक्ट अमेरिकेत झालेलल्या लेटेस्ट ऑलिंपिकमध्ये म्हणजे अटलांटाला सरकार तसच अटलांटा सिटीने सगळ्यात कमी पैसा घातला. जवळजवळ प्रत्येक गोष्ट स्पॉनसर्ड होती.)

सुनटून्या, मी नेहेरू मैदानाबद्दल म्हणत होतो.

>>>>National record holder Jaisha+ had alleged that Athletics Federation of India officials did not arrange for water and energy drinks during the race under scorching heat and due to which she nearly died while running, a claim denied by the AFI. <<<<

>>>>Belarusian Nikolai said he had told the Indian athletics officials after "clarifying" from her that she will not need personalised refreshment during the race. <<<<

=============

आणि हो, कविता राऊतही खोटेच बोलत असणार Wink

म, म, म तज्ञ,

संपूर्ण बातमी वाचली. प्रत्यक्षात काय झाले हे मी सांगू शकत नाही ह्याच विधानावर तुम्हाला लक्ष केंद्रीत करायचे आहे ना? आणि इतरांना काय मिळाले ह्याच्या फीडबॅकवरही? मग आता असे करा, आधी तुम्ही ह्या बातमीच्या आरंभाचा अर्थ काय होतो हे मनाशी ठरवा. बातमी आहे कसली ते आधी तपासा! बरं, हे झाले टाईम्सचे! सकाळनेही ही बातमी अश्याच अर्थाने दिलेली आहे की जैशाने खोटा कांगावा केला. आता तुम्हाला हवे तेच आणि तेवढेच बघून बोलायचे त्याला मायबोलीकर काय करणार, नाही का? Wink

A day before the race, Radhakrishnan Nair (deputy chief coach) asked me whether she (Jaisha) would need individual refreshment or drinks for the race. I asked Jaisha whether she will use personalised drinks or normal water provided by organisers. She said she will use normal water only. Then I told Nair that she will not need personalised refreshment and she would prefer pure water. That is it," Nikolai told PTI from the SAI Centre in Bangalore where he is currently based.

Jaisha had never used individual drinks during competitions from the beginning of her Olympics preparations and she had run with only normal water. She used only normal water provided by organisers during the World Championships in Beijing in August last year. The whole of 2016, Jaisha did not use personalised drinks during competitions," he added.

"But for clarity, as I wanted to clarify from Jaisha, I asked her whether she will need individual drinks or run with normal water in Rio. She said she will run only with normal water provided by the organisers," said the experienced coach.

I had spoken to some runners who took part in the race, who finished around 70th and below out of the 157 runners and who ran behind the leading pack, and their coaches. They said water was there but after the 25 to 30km mark, it was not sufficient. That is what these runners and coaches said. I have no means to verify what they said," he added.

म्हणजे पर्सनलाइज्ड ड्रिंक नको, साधं पाणीच हवं असं जैशा म्हणालेली. कविता राऊतही हेच म्हणालेली. पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हतं असं अन्य देशांचे धावकही म्हणाले.
आता जैशाचं म्हणणं कोचने ए एफ आयला नीट पोचवलं नाही आणि तिला काहीच नको असा त्यांचा समज झाला, साधं पाणी द्यायची सोय ए एफ आयने करायची की रियोवाल्यांनी असे काही उपप्रश्न उरतात.
पण मॅरॅथॉन धावताना पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हतं याबद्दल शंकेला वाव दिसत नाही.

अहो भम, शिक्षक झालात म्हणून काय झालं?
इतकी पण सुलभ आणि घरपोच उत्तरे विद्यार्थ्याना देत जाऊ नका.
लेट देम यूज देअर ओन ब्रेन्स!

पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हतं असं अन्य देशांचे धावकही म्हणाले.>>>>>> हे इतर देशाचे धावपटू भारतीय बोर्डाच्या संदर्भात म्हणाले की त्यांच्या आपपल्या बोर्डाच्या संदर्भात? वर इंग्रजीत जे दिलेय त्याच्या शेवटच्या परिच्छेदावरून एकूणच पाणी पुरेसे नव्हते असे वाटतेय.

भरत - माहीतीपूर्ण प्रतिसाद.

फक्त आपण ब्रिटन, जर्मनी, जपान , कोरीया शी ह्या बाबतीत स्पर्धा करायला नको. आधी खुप काही बाकीचे करायचे आहे. त्यांचे ते करुन झालय.

पाण्याशिवाय जैशाला काहीही नको होते

http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31835&articlexml=260...

या बातमीतून खालील बाबी ध्वनित होतात.

  1. जैशा कधीच कुठल्याही स्पर्धेत एनर्जी ड्रिंक्स घेत नाही.
  2. तरीही तिला तशी आवश्यकता आहे का? असे विचारण्यात आले होते.
  3. तिने आपणांस एनर्जी ड्रि़ंकची गरज नसून आपण केवळ आयोजकांतर्फे पुरविण्यात येणारे पाणीच घेऊ असे तिने सांगितले.
  4. आयोजकांनी पुरेशा पाण्याची व्यवस्था मात्र केली नव्हती.

आता या बातमीतील आयोजकांकडून घडलेल्या चूकीबद्दल क्रीडा मंत्रालय, भारत सरकार जबाबदार आहे असे ज्यांना वाटत असेल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जर आयोजकांकडून पाण्याची पुरेशी व्यवस्था केली नव्हती तर त्याबद्दल आय ओ ए , क्रीडा मंत्रालय इ.नी आयोजकांकडे विचारणा करायची की जैशाला खोटे ठरवायचे?

{{{ आय ओ ए , क्रीडा मंत्रालय इ.नी आयोजकांकडे विचारणा करायची की जैशाला खोटे ठरवायचे? }}}

आय ओ ए , क्रीडा मंत्रालय इ.नी जैशाला खोटे ठरवले???

ही माहिती कुठे आहे?

बाकी वेगवेगळ्या बातम्यांतून तिला वर्तमानपत्राचे वाचक खोटे ठरवू शकतात

http://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/marathoner-kavita-raut-s...

इथे ती म्हणतेय -

रिओ ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन शर्यतीवेळी भारतीय धावपटूंना पाणी देण्यासाठी भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचा(एएफआय) एकही अधिकारी उपस्थित नव्हता, असा आरोप धावपटू ओपी जैशा हिने केला

तर http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31835&articlexml=260...

या बातमीत तिचे कोच म्हणतायत -

तिने आपणांस एनर्जी ड्रि़ंकची गरज नसून आपण केवळ आयोजकांतर्फे पुरविण्यात येणारे पाणीच घेऊ असे तिने सांगितले.

आयोकांतर्फे पुरविले जाणारे पाणी देण्याकरिता एएफआयचे अधिकारी उभे असावे लागतात का?

[तळटीप - इतकं सोपं करुन लिहिण्याच्या नादात -

साती | 26 August, 2016 - 12:40

अहो भम, शिक्षक झालात म्हणून काय झालं?
इतकी पण सुलभ आणि घरपोच उत्तरे विद्यार्थ्याना देत जाऊ नका.
लेट देम यूज देअर ओन ब्रेन्स!

डॉ. साती यांनी भम यांना दिलेला सल्ला मी इथे पाळलेला नाहीय, त्याबद्दल क्षमस्व.]

जर आयोजकांकडून पाण्याची पुरेशी व्यवस्था केली नव्हती तर त्याबद्दल आय ओ ए , क्रीडा मंत्रालय इ.नी आयोजकांकडे विचारणा करायची की जैशाला खोटे ठरवायचे?
>>>
ओ पी जैशा आंतरराष्ट्रीय स्तरावर या पुर्वी भाग घेतलेली खेळाडू आहे असे समजून पुढचे लिहित आहे.
तिने ऑलिम्पिक संपल्यावर आरोप केला की भारतीय ऑलिम्पिक समिती/बरोबर गेलेले पदाधिकारी यांनी तिच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली नाही.
एकूण बातमी बघता भारतीय अधिकार्‍यांनी व भारताच्या दीर्घ पल्ल्याच्या प्रशिक्षकांनी तिला स्पर्धेपुर्वी स्पेशल ड्रिन्क्सबदल विचारले होते हे स्पष्ट आहे.
तिने ते नाकारून आयोजक जे पाणी उपलब्ध करतील ते वापरण्याची तयारी दाखवल्याचेही दिसते. आता तिला हे पाणी आयोजक उपलब्ध करून देणार आहेत हे माहिती नव्हते व ती भारतीय अधिकारी हे पाणी देणार आहेत अशा समजात होती असे समजण्यास फारच कमी वाव आहे. कारण जर असे असते तर जैशा, तिचे प्रशिक्षक व भारतीय पदाधिकारी यांच्यात बैठक होवून ते पाणी कुठल्या अंतरावर द्यायचे आहे हे ठरले असते. तसे झालेले नाही व जैशा काही नवखी खेळाडू नाही.
जैशाला इस्पितळात नेल्यावर निकोलाय यांना आत घुसल्याबद्दल काही काळासाठी स्थानबद्ध केले होते. निकोलाय हे भारतीय धावपटूंबरोबर खूप मेहनत घेत आहेत असे एकूण इतर बातम्यातून दिसत आहे (ललिता बाबर व निकोलाय यांनी केलेल्या तयारीबद्दल वाचा). त्यांनी इस्पितळात घुसणे हे पण जैशाबद्दलच्या काळज्जीतून केले होते असे म्हटले आहे. असे असताना जैशाने तिला पाणी हवे आहे हे निकोलायला सांगणे व त्यांनी ते भारतीय पदाधिकार्‍यांना न सांगणे हे अशक्यच दिसते. पुन्हा एकदा जर जैशाला तिच्या प्रशिक्षकांकडून / भारतीय अधिकार्‍यांपडून पाणि अपेक्षित होते तर ते कुठे, किती अंतरावर वगैरेबद्दल चर्चा होवूनच मग झाले असते.

असे असताना जैशाने मला भारतीय अधिकार्‍यांनी पाणीच दिले नाही हा आरोप करणे व त्याला भारतीय ऑलिम्पिक समितीने 'हे खोटे आहे' असे म्हणणे प्रायमा फेसी योग्य दिसते.

रिओ संयोजकांनी पुरेसे पाणी उपलब्ध केले होते की नाही हा विषय वेगळा आहे. जैशाचा आरोप तो नव्हता.

http://indianexpress.com/sports/rio-2016-olympics/kavita-raut-indias-sec...

http://indianexpress.com/article/sports/sport-others/op-jaisha-marathon-...

http://indianexpress.com/article/explained/rio-olympics-o-p-jaisha-treat...

मध्यममार्गी डाव्यांना एकदम भारतीय खेळाडूची का इतकी काळज्जी वाटू लागली?

भारताच्या अधिकार्‍यांची सहल मानसिकता, खेळाडूंबद्दल असणारा निष्काळजीपणा ह्या खर्‍या घटना आहेत. पण त्याचबरोबरीने निकोलाय सारखे प्रशिक्षक व काही अधिकारी आपले काम करत असतील असे मानण्यास वाव आहे.

Sorry for typing in English!

१. सरकारपुढे असलेल्या महत्वाच्या समस्या बघता क्रीडाप्रकारांबाबत सरकारला नेहमी दोष देणे योग्य आहे का?

Athletes not winning Top Medals in a Global Tournament is a serious issue. Govt has a lot of responsibility to ensure that the Athletes get what they need to perform at the Top level.

२. खेळामध्ये देशभावना गुंतवणे योग्य आहे का? त्याशिवाय खेळ एन्जॉय करता येणार नाही का?
In Olympics ? No way! Athletes walk behind a Country's flag, not their Sport's Flag!

प्रकाश पदुकोण चा नुकताच एक लेख वाचला त्यात त्यांनी सरकार व, ऑ. समिती व वैयक्तिक sponsors यांनी या खेळाडुंवर (चुकुन खेळावर असे आधी लिहीले होते) भरपुर खर्च केलाय असे लिहिले आहे.

एक साधासा प्रश्न :-

भारतात क्रीडाक्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधींच्या नावाने का दिला जातो?

जागतिक किंवा राष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेल्या कोणत्या खेळात त्यांनी देशाचं / राज्याचं प्रतिनिधित्वं केलं होतं?

(राजकारण हा खेळ गणला जात असल्यास क्षमस्वं).

भम, छान लिंक.
बरं झालं बै बेफिकीरांना पडलेले प्रश्न मोदीकाकांना पडले नाहीत.

१. मोदीकाकांना ऑलिंपिकमध्ये देशाची कामगिरी ही देशासमोरिल इतर प्रश्नांइतकीच महत्त्वाची समस्या वाटतेय.
२. देशाने एवढे टास्क फोर्स काढून ऑलिंपिकची तयारी केल्यावर देशाच्या भावना त्यात गुंतणे योग्यच!

थ्री चीअर्स फॉर मोदीकाका!

टण्याभाऊ,
डाव्यांना खेळात इंटरेस्ट वाटू नये असं कुठल्या पोथीत लिहिलंय?
उलट ऑलिंपीकचा इतिहास पाहता कम्यिनिस्ट देशांनीच अधिकाधिक चांगली कामगिरी केलेली आहे.
उगा उचलली बोटं आणि फिरवली की बोर्डवर कशाला?

रिव्हर्स स्वीप,

बाकीच्यांचे जाऊदेत, ते बेताल वागणार ह्यात शंका नाही. पण तुमच्याकडून तुम्ही तरी हा धागा राजकीय होऊ देऊ नका अशी विनंती!

मला वाटते, देशाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या व्यक्तीने बेफिकीर यांच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नि:संदिग्धपणे दिली आहेत, (भले ती उत्तरे धागाकरत्यास अभिप्रेत नव्हती)
तेव्हा या विषयावर नव्याने लिहिण्यासारखे काही उरले नाही आहे.

Pages