Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! 
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेस्ट वे, गॅरीने दोघी सोडुन
बेस्ट वे, गॅरीने दोघी सोडुन तिसरीच शोधावी. पहिल्या दोन अनुभवानंतर तो तिसरी जरा नीट डोळे उघडे ठेवुन शोधेल नक्कीच.म्हणजे आता ह्या क्राय्टेरीयात भक्ती मॅम च बसतील>>> हो पण ती तिसरी गॅरीसारख्या माणसाला जरासुद्दा भाव नाही देणार, अगदी ती भक्ती सुद्दा.
He deserves this.
काल सुद्धा तिने सनायाला
काल सुद्धा तिने सनायाला सांगितलं 'तु कधी कोणाला काही बनवुन खायला घातलं आहेस? कोणासाठी तरी काही शिजवुन खायला घालुन बघ त्यात किती आनंद आहे' तर एकुणात काय, स्वयंपाक येणं म्हणजे उच्च गुण आणि कोणाला खायला घालणं म्हणजे प्रेमाची उच्च कोटी. बुल शीट ! >>> पण ती अस सुद्दा म्हणाली होती ना की, स्वत कष्ट, काम करुन पैसे कमावण्यात जो आनन्द् असतो तो दुसर्यान्च्या पैश्यावर मजा मारण्यात नाही.
बाले, पार बदलून गेलीस तू!
बाले, पार बदलून गेलीस तू! केवढा आत्मविश्वास तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे, त्या मुळे तू अजून सुंदर दिसत आहेस. इति राधिका चा भाऊ.
पण प्रत्यक्षात असं काही नाही दिसत. कधी कधी वाटतं लेखक आकाशवाणी श्रुतिका लिहिणारे आहेत की काय, आणि दिग्दर्शकाला संवाद व पडद्यावरचे वास्तव यातला फरक दिसत नाही.... कंटाळा आला आता....कहर करतात
त्या शनायाला पार लोचट करुन
त्या शनायाला पार लोचट करुन टाकलंय. ती तिला जे सांगायचं आहे ते मेसेज थ्रु पण सांगू शकते की गॅरीला, कालचं मी शेवटी थोडं बघितलं पण शनायाला पार कणाहीन करतायेत. फक्त पैश्याच्या पाठीमागे लागलेली. अर्थात तशीच दाखवली आहे म्हणा ती. पण आता तिला चान्स होता, दुसरीकडे नोकरी करुन प्रुव्ह करुन दाखवायचा.
तो गॅरी काय डोक्यावर पडलाय
तो गॅरी काय डोक्यावर पडलाय काय? शनायला खोटं बोलणे आणि फसवणूक करणारी माणसं आवडत नाही म्हणाला मग हा काय करत होता, मी सुरुवातीला बघितलं तेव्हा हा बायकोची फसवणूक करून आणि तिच्याशी खोटं बोलून शनायाशी अफेअर करत होता की. मग राजरोस पण आधी.
मी सुरुवातीला बघितलं तेव्हा
मी सुरुवातीला बघितलं तेव्हा हा बायकोची फसवणूक करून आणि तिच्याशी खोटं बोलून शनायाशी अफेअर करत होता की. मग राजरोस पण आधी. >> स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही म्हणतात ते हेचं
नाही गं अन्जू शनाया ला माहित
नाही गं अन्जू शनाया ला माहित असतं की गॅरी मॅरिड आहे ते. पण तो सिईओ आहे आणि त्याच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून ती त्याच्याबरोबर असते ना.
हो शनायला माहीती असतं पण
हो शनायला माहीती असतं पण राधिकाची फसवणूक करत असतो ना आणि खोटं बोलत असतो तिच्याशी त्यामुळे तो दुसऱ्याला ह्या गोष्टी सांगतोय पण स्वतः असाच वागला हे विसरला असं म्हणतेय मी.
शनायला अति उथळ दाखवतायेत,
शनायाला अति उथळ दाखवतायेत, त्यामुळे नवीन प्रोमोज दिसले की ही सिरीयल संपणार असं समजायचं.
शनायाला अति उथळ दाखवतायेत>>
शनायाला अति उथळ दाखवतायेत>>>हो, त्याशिवाय गॅरी राधाक्काकडे कसा जाईल.
नाही बघितलं आज, कंटाळा आला.
नाही बघितलं आज, कंटाळा आला.
ओह अन्जू आता कळलं.
ओह अन्जू आता कळलं.
ते पानवलकर राधिकाला
ते पानवलकर राधिकाला "राधिकावहिनी' म्हणतात ते खटकत. गुरुला ते office मध्ये गुरुसर किवा शनायाला शनाया mam बोलतात ते ठिक आहे. पण पर्सनली कामाव्यक्तिरिक्त ते गुरुला गुरु आणि शनायाला शनायाच म्हणतात. राधिकाला मात्र राधिकावहिनीच. तो आनन्द, श्रेयस तिला वहिनी म्हणतात ते बरोबर आहे. जेनी तिला राधिका mam म्हणते ते सुद्दा चुकीच नाही. पण वडिलान्च्या वयाच्या माणसाने आपल्या मुलीच्या वयाच्या बाईला वहीनी म्हणताना ऐकल कि कसतरीच वाटते ते ऐकताना.
पानवलकरान्नी राधिकाचा एकेरी नावाने उल्लेख केल्यास काय problem आहे?
परवा गुरुची आई त्याला म्हणते
परवा गुरुची आई त्याला म्हणते , या जगात तीन व्यक्ती आपल्या सगळ्या चुका माफ करतात . आई , वडील आणि बायको .

हाणा , मारा, कुटा या लोकांना !!!!!!!
स्वस्ति अर्रर्र, असा डायलॉग
स्वस्ति अर्रर्र, असा डायलॉग होता. धन्य आहेत सर्वच. आता गॅरीला मखरात बसवून ओवाळायचंच काय ते बाकी आहे.
परवा गुरुची आई त्याला म्हणते
परवा गुरुची आई त्याला म्हणते , या जगात तीन व्यक्ती आपल्या सगळ्या चुका माफ करतात . आई , वडील आणि बायको .
हाणा , मारा, कुटा या लोकांना !!!!!!! Angry Angry Angry
>>>>>
एकदा बायकोचा किंवा सासूचा वाढदिवस विसरुन बघा... मग कळेल बायको सगळ्या चुका माफ करते का ते...
११ वर्षांचा स्वानुभवस्वा, बाप जन्मात करत नाही!
आणि त्या गुरूला जोड्याने
आणि त्या गुरूला जोड्याने मारण्या ऐवजी त्याची कित्ती काळजी करतायत ते आई बाप
आणि ही इशा गुरूच्या हापिसात
आणि ही इशा गुरूच्या हापिसात काय करतेय?
आयला सगळ्या सिरियल मधली
आयला सगळ्या सिरियल मधली पात्रं १ मे च्या दरम्यान जन्मलीत का काय?
इथे राधिका वैनी, तिकडे आम्ही दोघं राजाराणी मध्ये पण पार्थ च्या बायकोचा (मी ही सिरियल पहात नाही, चूकून जराशी येता जाता डोळ्यावर पडली)
आणि शिव चा पण आहे...
सगळे एकमेकांची कथा चोरतात की काय?
एकदा बायकोचा किंवा सासूचा
एकदा बायकोचा किंवा सासूचा वाढदिवस विसरुन बघा... मग कळेल बायको सगळ्या चुका माफ करते का ते...>>> करतात हो बायका माफ, रादर मी तर अपेक्षाच करत नाही, कारण माझ्या नव-याच्या अजिबात लक्षात रहात नाही माझा वाढदिवस, आमच्या लग्नाचा वाढदिवस, आता सवय झाली पण माझ्या भावा बहीणीचे मेसेज येतात ग्रुपवर आमच्या, त्यामुळे लाजेकाजेने माझ्या वाढदिवसाचं हल्ली मोबाईलमधे रीमांइंडर लावून ठेवलाय त्याने म्हणून येतो लक्षात त्याच्या. लग्नाचा विसरतो, ती डेट नाही टाकली मोबल्यामधे.
एकदा बायकोचा किंवा सासूचा
एकदा बायकोचा किंवा सासूचा वाढदिवस विसरुन बघा... मग कळेल बायको सगळ्या चुका माफ करते का ते...>>> आज राधिकाचा वाढदिवस विसरण्याचे सगळे नाटक करतील आणि तिला सन्द्ययाकाळी सरप्राईज देणार आहेत अस आज दाखवणार आहेत हे. हे वाढदिवस मुद्दामहून विसरण्याची नाटके हल्ली सगळयाच सिरियलमध्ये दाखवतात. जानूबाई च्या सिरियलमध्ये पण हेच दाखवल होत. यान्ना नविन काही दाखवताच येत नाही.
आणि शिव चा पण आहे...>>> बनारस
आणि शिव चा पण आहे...>>> बनारस च्या शिवचा वाढदिवस १ मेला! Interesting!!!
मोबल्यामधे.:हहगलो:
आता गॅरीला मखरात बसवून
आता गॅरीला मखरात बसवून ओवाळायचंच काय ते बाकी आहे. >>>> मखरात तर राधिकाला बसवल जातय हल्ली.
सगळे एकमेकांची कथा चोरतात की
सगळे एकमेकांची कथा चोरतात की काय? Uhoh >>> मला नेहमीच असे वाटते बघाना एखाद्य शिरेल मधुन एकजण घर सोडुन गेला तर बाकी दुसरी कडे पण तयारी सुरु असते घर सोडण्याची किंवा असेच काहीतरी
Kyun na bole mo se mohan kyun
Kyun na bole mo se mohan kyun :-
शनाया घरी येणार बहुतेक रहायला
शनाया घरी येणार बहुतेक रहायला राधिकाच्या परवानगीने. आणि मग दोघींची काहीतरी यडचाप पैज गुरूला मिळवण्यासाठी! पाखी नावाच्या एका हिंदी सिरीयल मधे (त्यात्ला बंगला काय सुरेख लोकेशनला होता!!) असाच प्लॉट होता.
आणि मग दोघींची काहीतरी यडचाप
आणि मग दोघींची काहीतरी यडचाप पैज गुरूला मिळवण्यासाठी! >>
किंवा मग 'सवत माझी लाडकी' टाईप वळवतील आणि मग साक्षात्कार. मग मध्यच मनिष वैगेरे..
पण ओव्हर ऑल गंडलेली सिरेल!
का$$$य? शनाया गुरू च्या घर्री
का$$$य? शनाया गुरू च्या घर्री रहायला येणार आहे?

अरे कोण मुर्ख लेखक आहे या शिरेल चा?
रादर मी तर अपेक्षाच करत नाही,
रादर मी तर अपेक्षाच करत नाही, कारण माझ्या नव-याच्या अजिबात लक्षात रहात नाही माझा वाढदिवस, आमच्या लग्नाचा वाढदिवस, आता सवय झाली पण माझ्या भावा बहीणीचे मेसेज येतात ग्रुपवर आमच्या, त्यामुळे लाजेकाजेने माझ्या वाढदिवसाचं हल्ली मोबाईलमधे रीमांइंडर लावून ठेवलाय त्याने म्हणून येतो लक्षात त्याच्या. लग्नाचा विसरतो, ती डेट नाही टाकली मोबल्यामधे>>same pinch :खिखि:
रेवती मस्त दिसत होती काल
रेवती मस्त दिसत होती काल साडीमधे.
Pages