सीताफळ रबडी

Submitted by सुलेखा on 29 July, 2016 - 02:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ लिटर दूध
पाव वाटी साखर
१/२ चमचा दूध मसाला
किंवा
वेलची-जायफळ पूड
१ किलो /४ नग सीताफळांचा गर

क्रमवार पाककृती: 

१ लिटर दूध जाड बुडाचे पातेले/कढई//लहान कूकर किंवा नॉन स्टीक पॅन मधे एकदा चांगले उकळवा.आता त्या पातेल्यात एक उलथने किंवा झारा दुध ढवळण्यासाठी ठेवा.गॅस मंद आचेवर ठेवा. अधुन मधुन दूध झार्‍याने ढवळत रहा. साधारण ३० मिनिटाने दू धात साखर व दूध मसाला घाला व छान ढवळुन घ्या. १० मिनिटाने गॅस बंद करा.दुसर्‍या एखाद्या पातेल्यात हे आटवलेले दुध काढुन घ्या.हे दूध थंड होण्यासाठी ठेवा.
.जर लौकर थंड करुन हवे असेल तर , आकाराने मोठ्या पातेल्यात थोडे पाणी घेवुन त्यात हे आटवलेले दूध असलेले पातेले ठेवा व १० -१० मिनिटानी गरम झालेले पाणी बदलुन तितकेच दुसरे थंड पाणी घाला.दुधाची रबडी तयार झाली.
ही रबडी घट्ट सर हवी असेल तर अर्धी वाटी मिल्क पावडर थोड्या दुधात मिसळुन घालावी. .
सीताफळाच्या बीया वगळुन गर काढुन घ्या.
थंड झालेल्या रबडीत सीताफळा चा गर मिसळुन छान ढवळुन घ्या.
फ्रीज मधे ठेवुन गार करा.
मस्त सीताफळ रबडी चा आस्वाद घ्या.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users