Submitted by हर्ट on 26 July, 2016 - 06:53
मी खूप अंधश्रद्धाळू आहे की माहिती नाही पण घर निवडताना घराची दिशा मीही बघतोचं. पुर्वेकडून घरात उन्ह येत असेल किंवा मावळतीचा सुर्य घरातून दिसत असेल तर घर छान वाटते. पण ह्या निसर्गप्रेमाखेरीज दक्षिण दिशेला घर नसावे म्हणतात. पण हल्लीच्या शहरांमधे स्व:ताचे स्वतंत्र्य घर असणे ही फार अनमोल आणि महागडी गोष्ट झाली आहे. इतके पैसे आपल्याकडे नसतात. शहरात जागाही उरली नाही. मग आपण फक्त एका फ्लॅटचा विचार करतो. तो घेताना आपल्या घराच्या मुख्य दरवाजाची दिशा आपण बघतो. हल्ली तर फोनमधेच ही सुविधा असते. घरात शिरत नाहीत अर दारासमोर होकायंत्र उघडून आपण दिशा बघतो.
अशा वेळी मला नेहमी एक प्रश्न पडतो की अपार्टमेन्टलासुद्धा मुख्य दरवाजा आहेच की. मग त्या गेटची दिशा आपण धरावी की आपल्या घराच्या मुख्य घराची?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सकाळची कोवळी किरणे> अरे हो ते
सकाळची कोवळी किरणे> अरे हो ते पुण्यात असेल. इथे मुंबईत तसले काही नाही. भिकार मेणचट पहाटी असतात. धुरकटलेला ग्रे रंग नाहीतर मग भगभगीत प्रकाश. त्यात तो घाम आणणारा उकाडा. समोर
बघायला काय तर टॉवर्स नाहीतर झोपड्पट्टी. नैतर स्टेशन. म्हणजे मनातून अस्वस्थ होत राहते . टॉवर परवडत नाही म्हणून आणि झोपड पट्टीत कसे राहात असतील ह्या जाणीवेने. दक्षिण मुखी का नको तर मेल्यावर प्रेताचे पाय दक्षिणे कडे ठेवतात. पण एक दिशाच अशूभ असेल हे पटतच नाही. सर्वात् ब्येस्ट मी म्हणेल ती पूर्वदिशा. तीच शुभ.
ह्या घराच्या एकदम जवळ मुलुंडाचा डोंगर आहे. व पावसाळ्यात एकदम चोक्कस राजस दिसतो हिरवा गार. व टोकाला धुके. वस्ती जवळ जवळ अर्धा डोंगर परेन्त वर गेली आहे. तिथे सोयी सुविधा काय असतील कोण जाणे. पण खेड्यासारखा नजारा दिसतो छान.
हे वास्तू चे लोण हैद्राबादेत खूप आहे. खूप अमीर लोक्स कायम दरवाजे पाडत तोडत असतात. फ्लॅटच्या किंमतीचे त्यांचे बाह्य दरवाजे असतात. रोड नंबर वन बंजारा हिल्स ला टी सुबारामी रेड्डी ह्यांचा बंगला आहे. त्याचे दरवाजे काय जंक्षन आहेत. म्हाइते?! ये वास्तू वगैरे सब अमीरोंके कामां है.
>>> ये वास्तू वगैरे सब
>>> ये वास्तू वगैरे सब अमीरोंके कामां है. <<<
अगदी अगदी अमा....
फ्लॅट नामक आपापल्या "वैश्विक गुहेत" रहाणार्यांना गरजच काय गुहेचा दरवाजा कुठल्या दिशेला उघडतो त्याची?
झालच तर शेजारच्या गुहेत कोण रहातो याची माहिति असायची गरज काय? वगैरे वगैरे...
सुर्य देखील दक्षिणायन आणि
सुर्य देखील दक्षिणायन आणि उत्तरायण करत असतोच की. त्याचीही दिशा बदलत असते.
धागाकर्त्यास ...... मी खूप
धागाकर्त्यास ......
मी खूप अंधश्रद्धाळू आहे
मग काळा चष्मा लावून सर्व कामे करत जा ... श्रद्दा वाढेल
अवांतर
तुम्ही घरात कोणत्या दिशेने प्रवेश करता यापेक्षा काय घेवून प्रवेश करता ते जास्त महत्वाचे आहे. दिशा कोणतीही असे वातावरणाशी फारसा फरक नसतो,
हे घर चूकीचे बांधले आहे असे जोवर डोक्यात ठेवाल तोवर तूमची प्रगती शक्य नाही कारण आलेल्या दिवसाचा फार मोठा अमुल्य वेळ तुम्ही अशा फालतू विचारांमध्ये वाया घालवाल .
फ्रेश आणो पॉझीटीव्ह मनाने घरात शिरा ( मग पोहे वगैरे) अच्छे दिन जरुर आएंगे
>>>> फ्रेश आणो पॉझीटीव्ह
>>>> फ्रेश आणो पॉझीटीव्ह मनाने घरात शिरा ( मग पोहे वगैरे) अच्छे दिन जरुर आएंगे <<<
तसे केले की दिशादोष नाहीसा होतो का? अच्छे दिन येतात का?
ओह, सोप्पा उपाय आहे.... घरात, शिरा आणि मग पोहे वगैरे करायचा अन हादडायचा...
शीरा करणे म्हणजे सत्यनारायण
शीरा करणे म्हणजे सत्यनारायण आला. तो वास्तु दोष दूर करण्याचा सत्यनारायण असू शकतो, लिंबुजी.
आपली सगळी प्रगती वा अधोगती
आपली सगळी प्रगती वा अधोगती तसेच आपली सगळी सुखदु:खे ही आपल्यावरच अवलंबून असतात असे नाही. नियतीचे वार असतात आणि परिस्थिती आपल्या वाटा बंद करते. अशावेळी, आपण फार असे काहीच करु शकत नाही. जे काही आपल्या वाटयाला येते ते आपलयाला सहन करावेच लागते. कधीकधी हे अपयश आणि दु:ख ह्याची तीव्रता कमी जाणवते जर आपल्याला कुणी आधार देणार असेल आणि आपल्या आर्थिक आणि शारिरिक परिस्थिती बरी असेल तर. पण बर्याच वेळा हा घाला आर्थिक आणि शारिरिक गोष्टींवरच झालेला असतो. तेंव्हा त्यातून आपले मार्ग फार बिकट होतात.
माझ्या बाबतीत मला बरेच यश मिळाले. मी बर्यापैकी शिकलो, पैसे कमावले आणि बरेच वर्ष परदेशात नोकरी करुन आहे. तरीसुद्धा माझी काही दु:ख मी आजही टाळू शकत नाही असे आहेत. मलाही पुर्वी तुम्ही म्हणतात तसेच वाटायचे.
आपले ग्रहमान साडेसाती वगैरे प्र्कार मला तरी खरे वाटायला लागले आहेत. पुर्वी खोटे वाटायचे हे सर्व पण एकाएकी जे काही झाले घडले भोगले आणि भोगत आहे ते बघता मी कुठे चुकले.. कमी पडलो असे वाटत नाही.
अच्छे दिन येतात का? >>> अजून
अच्छे दिन येतात का? >>> अजून यायचेत का?
सगळे प्रतिसाद वाचले, काही
सगळे प्रतिसाद वाचले, काही सोडले तर वाटले नाही एव्हढे फाल्तु प्रतिसाद येतील,,
खर सान्गु, आजकाल घर घ्यायची
खर सान्गु, आजकाल घर घ्यायची मारामार कुथे दिशा बघणार,आवडलेले घर दिशे नुसार नसले तर सोयीचे असुन सोडणार का?
वास्तु वगैरे वर फार विश्वास नाही, घर घेतले ते उत्तर दक्षिण असलेले. प्रत्येक घरात कमी अधिक चान्ग्ल्या किन्वा वाइट घटना घडतात, त्यात घराचा दोश नाही.घामाच्या पैशयाने घेतलेल्या घराचे मोल वाइट कसे?
>>> घामाच्या पैशयाने
>>> घामाच्या पैशयाने घेतलेल्या घराचे मोल वाइट कसे? <<<<

ही एक अंधश्रद्धाच आहे की "माझ्या घामाच्या पैशाने घेतलेल्या वस्तुचे मोल मला योग्यच मिळेल" . तसे नसते तर घामाच्या पैशाच्या व्यवहारात फसवणूका देखिल झाल्या नसत्या...
घामाच्या पैशाने घेतलेली /प्यालेली दारू "चढली" नसती....
घामाच्या पैशाने घेतलेली प्रत्येक "लॉटरीला" बक्षिसच लागले असते.....
(ऋ. मोड ऑन) घामाच्या पैशाने घेतलेले गुलाबाचे फुल प्रेयसी/ग.फे. ला दिल्यावर तिने न खाली कुस्करुन न टाकता केसात माळले असते.... (ऋ. मोड ऑफ)
>>> पुर्वी खोटे वाटायचे हे सर्व पण एकाएकी जे काही झाले घडले भोगले आणि भोगत आहे ते बघता मी कुठे चुकले.. कमी पडलो असे वाटत नाही. <<< बरोबर आहे तुमचे. अर्थात असे प्रश्न पडायलाही माणुस बुद्धिवान, तार्किक विचारी असावा लागतो. सगळ्यांनाच ते जमते असे नाही, बहुतेक जण "यशाच्या धुंदीत/मस्तीत" स्वतःच्याच कर्तुत्वाच्या(?) अहंकारात मश्गुल असतात, जोवर काहि अनाकलनीय प्रतिकुल घडु लागत नाही. असो.
आपली सगळी प्रगती वा अधोगती
आपली सगळी प्रगती वा अधोगती तसेच आपली सगळी सुखदु:खे ही आपल्यावरच अवलंबून असतात असे नाही. नियतीचे वार असतात आणि परिस्थिती आपल्या वाटा बंद करते. अशावेळी, आपण फार असे काहीच करु शकत नाही. जे काही आपल्या वाटयाला येते ते आपलयाला सहन करावेच लागते. कधीकधी हे अपयश आणि दु:ख ह्याची तीव्रता कमी जाणवते जर आपल्याला कुणी आधार देणार असेल आणि आपल्या आर्थिक आणि शारिरिक परिस्थिती बरी असेल तर. पण बर्याच वेळा हा घाला आर्थिक आणि शारिरिक गोष्टींवरच झालेला असतो. तेंव्हा त्यातून आपले मार्ग फार बिकट होतात. >> अनुमोदन आणि त्या परिस्थितीतून गेल्या शिवाय ते कळतही नाही. पण ज्यांनी आपल्या दु:ख त्रास दिलेला आहे त्यात आपण अजून होरपळत राहायचं आणि त्यांनी आपल्यावर झालेले/केलेले आघात विसरून एकदम वेगळेच जीवन जगायचे. असे झाले तर वाइट वाटते. म्हणून काही अनुभवांच्या मेंटल फाइल्स डिलीट करायच्या. स्वतःला रिइन्व्हेंट करायचे. आनंदात राहायचे. हे सोपे आजिबात नाही. पण मी बाजी दुसृयांच्या हातात देउन व्हिक्टिम म्हणून जगणार नाही. दरवाजा कुठे का असेना काय फरक पडतो?
सकाळची कोवळी किरणे> अरे हो ते
सकाळची कोवळी किरणे> अरे हो ते पुण्यात असेल. इथे मुंबईत तसले काही नाही. भिकार मेणचट पहाटी असतात. धुरकटलेला ग्रे रंग नाहीतर मग भगभगीत प्रकाश. त्यात तो घाम आणणारा उकाडा. समोर
बघायला काय तर टॉवर्स नाहीतर झोपड्पट्टी. नैतर स्टेशन.
>>>>
अमा हे आपण गंमतीने लिहिलेय, उपरोधाने कि आणखी कसल्या हेतूने माहीत नाही. पण सिरीअस मोड असेल तर अमान्य. मुंबईचे असे 'सरसकटीकरण' करता येणे अशक्य आहे एवढा आवाका आणि विस्तार आहे मुंबईचा. ज्याला जशी दिसली त्याने तशी रंगवली. तुर्तास एवढेच म्हणेन कारण एका प्रतिसादात मावणारा विषय नाहीये हा
>>>> तुर्तास एवढेच म्हणेन
>>>> तुर्तास एवढेच म्हणेन कारण एका प्रतिसादात मावणारा विषय नाहीये हा <<<
)
हो हो, दोनचार धागे निघावेत इत्का मोठा विषय आहे हा.... (धागे तूच काढशीलच..
मी मात्र अमाशी सहमत. बाकीची ठिकाणे अन त्यांचे वर्णन तू मांड... त्याचीही पिसेच निघतील याची खात्री आहे.
हर्ट | 27 July, 2016 - 10:08
हर्ट | 27 July, 2016 - 10:08 >>
हर्ट | 27 July, 2016 - 14:55 >>बी तुझ्यामधे वरच्या एक दोन पोष्ट बघता मला एक सकारात्मक बदल दिसतो आहे.
पण सिरीअस मोड असेल तर >>
पण सिरीअस मोड असेल तर >> सिरीअसच आहे. आम्ही कमी लिहितो पण विचार करून लिहीतो. संदर्भाला धरून वाचले तर नक्की लक्षात येइल. आमच्या मनातले व आम्ही राहिलेले पुणे ह्यापेक्षा सुंदर त्रिभुवनात काही नाही. मुंबई म्हणजे एक घामट काँप्रमाइज आहे. ह्या बाफचा तो विषय नाही. दार शोधावे.
धन्यवाद.
आम्ही कमी लिहितो पण विचार
आम्ही कमी लिहितो पण विचार करून लिहीतो.

>>
ज्जे बात अमा!
आम्ही कमी लिहितो पण विचार
आम्ही कमी लिहितो पण विचार करून लिहीतो. संदर्भाला धरून वाचले तर नक्की लक्षात येइल. >>>> + १
हो हो, दोनचार धागे निघावेत
हो हो, दोनचार धागे निघावेत इत्का मोठा विषय आहे हा.... (धागे तूच काढशीलच.. ) >>> खरच..
तसेही त्याला काही काम धंदे नाहियेत
घरात शिरत नाहीत अर दारासमोर
घरात शिरत नाहीत अर दारासमोर होकायंत्र उघडून आपण दिशा बघतो
घर हे होका यंत्रासाठी घ्यायचेच नसते मूळी
ते xकायंत्रासाठी घ्यायचे असते.
दिवे घ्या
डोंगर घरासम्मोर असणे शुभ
डोंगर घरासम्मोर असणे शुभ मानल्या जाते >>> वास्तुशास्त्र काय सांगते ते माहीत नाही पण पर्सनली मला असा घरासमोर डोंगर असलेला अजिबात आवडत नाही. त्या डोंगराच्या भिंतीमुळे घुसमटल्यासारखे वाटते. घराच्या खिडकीतून लांबवरचे दृश्य दिसले पाहिजे, मोकळे वाटले पाहिजे. त्या लांबवरच्या दृष्यांत पिक्चर पोस्टकार्डसारखा डोंगर दिसला तर नक्कीच आवडेल. समुद्राचा असीम व्ह्यू बेस्ट पण नाहीतर शेतं, माळरानं किंवा शांतता भंग करत नसेल तर लांबवर रस्ता दिसलेलाही मला आवडतो.
घराच्या खूप जवळ मोठे वृक्ष असतील तर घरात फार अंधार येतो आणि उदास वाटते. झाडं हवीत पण ती काही अंतर सोडून हवीत ( डेरेदार वृक्ष म्हणतेय मी, छोटी झाडं नाही ! )
पूर्वेचं ऊन छान वाटते पण पश्चिम फेसिंग घर अजिबात नको. भयंकर तापते !
अगो, डोंगर काही अगदीच
अगो, डोंगर काही अगदीच नाकासमोर नसतो. तो खूप दुरवर आणि धिप्पाड असतो म्हणून कुठुनही दिसततो. माझ्या आणि डोंगराच्यामधे केवढी तरी गॅप आहे.
डोंगर काही अगदीच नाकासमोर
डोंगर काही अगदीच नाकासमोर नसतो >> पुण्यात काही घरे आहेत अशी टेकडी वर..
आम्ही कमी लिहितो पण विचार
आम्ही कमी लिहितो पण विचार करून लिहीतो.
>>>
विचार करून मला जगता येत नाही, लिहिणे तर दूरची गोष्ट ..
बस्स आपली आपली जगण्याची स्टाईल
आमच्या मनातले व आम्ही राहिलेले पुणे ह्यापेक्षा सुंदर त्रिभुवनात काही नाही.
मुंबई म्हणजे एक घामट काँप्रमाइज आहे.
>>>
ईथे पुणे कुठे आले? मला मुंबईची तुलना कोणाशी करायला आवडत नाही. किंबहुना कुठल्याच शहराची एकमेकांशी करू नये. मी फक्त मुंबईला ज्या निकषांवर आपण हलके लेखले आहे त्याला असहमती दर्शवली आहे ईतकेच. आणि त्यातही तलवार उपसून भांडायचा आव नाही तर हा समज बरेच जणांचा मुंबईबाबत असतो जो गैरसमज आहे ईतकेच म्हणायचे आहे.
याऊपर इथे पुणे आणण्यात ईतर काही संदर्भ असेल तर कल्पना नाही.
ह्या बाफचा तो विषय नाही. दार शोधावे.
>>>>
हो, कल्पना आहे. पण आधी आपण केलेले मुंबईचे वर्णन देखील बाफचा विषय नव्हताच. एकदा रामायणात द्रौपदीला आणले तर कुंतीला प्रवेश नाकारून तिच्यावर अन्याय तर नाही ना करू शकत
दार शोधावे? हे नाही समजले..
>>> दार शोधावे? हे नाही
>>> दार शोधावे? हे नाही समजले.. <<<< सोप्पय, का नै समजले?
(आता किमान इतका तरी विचार करता यायलाच हवा हं...
नै, तशी सक्ति नाहीये... पण आपल...! )
धाग्याच्या विषयात दार कुठे असावे असा प्रश्न आहे, ते दार शोधावे....
लिंबू काका.. _/\_
लिंबू काका.. _/\_
<<हो, कल्पना आहे. पण आधी आपण
<<हो, कल्पना आहे. पण आधी आपण केलेले मुंबईचे वर्णन देखील बाफचा विषय नव्हताच.>> +१
. एकदा रामायणात द्रौपदीला
. एकदा रामायणात द्रौपदीला आणले तर कुंतीला प्रवेश नाकारून तिच्यावर अन्याय तर नाही ना करू शकत >>> LOL!!!
आमचे घर उत्तर दक्षिण आहे व ते
आमचे घर उत्तर दक्षिण आहे व ते फार सोयीचे होते कारण इथल्या भयंकर उन्हाळ्यात सुर्याचे उन फार जास्त शिरत नाही घरात.
>>कल्पना आहे. पण आधी आपण
>>कल्पना आहे. पण आधी आपण केलेले मुंबईचे वर्णन देखील बाफचा विषय नव्हताच. एकदा रामायणात द्रौपदीला आणले तर कुंतीला प्रवेश नाकारून तिच्यावर अन्याय तर नाही ना करू शकत स्मित<<
क्या बात! एकदम खळ्ळखट्याक!!
Pages