० ते ५० मजली अपार्टमेन्टमधे राहणार्‍यांच्या घराची दिशा अपार्टमेन्टचे गेट की घराचा मुख्य दरवाजा?

Submitted by हर्ट on 26 July, 2016 - 06:53

मी खूप अंधश्रद्धाळू आहे की माहिती नाही पण घर निवडताना घराची दिशा मीही बघतोचं. पुर्वेकडून घरात उन्ह येत असेल किंवा मावळतीचा सुर्य घरातून दिसत असेल तर घर छान वाटते. पण ह्या निसर्गप्रेमाखेरीज दक्षिण दिशेला घर नसावे म्हणतात. पण हल्लीच्या शहरांमधे स्व:ताचे स्वतंत्र्य घर असणे ही फार अनमोल आणि महागडी गोष्ट झाली आहे. इतके पैसे आपल्याकडे नसतात. शहरात जागाही उरली नाही. मग आपण फक्त एका फ्लॅटचा विचार करतो. तो घेताना आपल्या घराच्या मुख्य दरवाजाची दिशा आपण बघतो. हल्ली तर फोनमधेच ही सुविधा असते. घरात शिरत नाहीत अर दारासमोर होकायंत्र उघडून आपण दिशा बघतो.

अशा वेळी मला नेहमी एक प्रश्न पडतो की अपार्टमेन्टलासुद्धा मुख्य दरवाजा आहेच की. मग त्या गेटची दिशा आपण धरावी की आपल्या घराच्या मुख्य घराची?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही रांगोळी कुठे काढणार, दिवाळीत पणत्या कुठे लावणार, दसरा पाडव्याला आंब्याची पानं कुठे लावणार, बाहेर जाताना कुठल्या दरवाजाला कुलूप लावणार, झोपताना कडी कोणत्या दाराला लावणार, नावाची पाटी कुठे लावणार इ वर तुमचं घर नक्की कुठून सुरू होतं आणि कुठे संपतं ते ओळखता येईल.

आशुडी, कसले अचूक उत्तर दिले आहेस.... Happy
तरीही प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. वैयक्तिक घराबाबत आशुडी म्हणते ते खर आहे.
पण सामाजिक/राज्यकर्ते म्हणून विचाराल, तर "डोंगर/पर्वताच्या" टोकावर घर/ठिकाणा/राजवाडा असू नये, किंवा दुसर्‍या शब्दात घरास चारी बाजुनी उतार असू नये असेही म्हणतात, अन ते बघता, स्वराज्याचे सर्व किल्ले, त्यांची उर्जितावस्थेचे उतारचढाव, पूर्वीचे महत्व अन आजची स्थिती लक्षात घेता हे पटतेही.
याचप्रमाणे, त्या त्या बिल्डिंग/अपार्टमेंट मधे रहाणार्‍या एकुण समाजाकरता अपार्टमेंटचा दरवाजा कुठे हे देखिल तितकेच महत्वाचे ठरेल असे वाटते, यावर अजुन विचार/निरीक्षण व्हायला हवाय.

खिडक्या योग्य दिशेना हव्यात. वारा सुर्यप्रकाश कोणत्या वेळी कोणत्या दिशेने आणि स्वयंपाकघर, बेडरूम या महत्वाच्या खोल्यांमध्ये कसा येतो हे जास्त महत्वाचे. अर्थात मला त्याचे ज्ञान नाही पण लॉजिकल विचार करता हे पटते. उगाच देवाधर्माच्या नावावर विचार करण्यात अर्थ नाही.

दक्षिण दिशेला पाय की डोके करून झोपू नये त्यामुळे चुंबकीय शक्ती कार्यरत होते असेही काहीसे असते ना..

या दिशा वगैरे कशाला पाळताय राव तुम्ही ......

पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते म्हणजे तुमचा फ्लॅटही फिरतोच कि मग त्याचा दरवाजाचे तोंडही दिवसभर दिशा बदलणार ..........................

बाकी सर्व थोतांड आहे हो, भोळ्याभाबड्या लोकांकडून पैसे उकळण्यासाठी जे नाना प्रकार होते त्यातलाच एक म्हणजे हे दिशांचे अकलेचे तारे.

धागा ५० मजल्यांपर्यंतच मर्यादित ठेवला आहे ह्याला काही ज्योतिष्याचा आधार वगैरे आहे का?

तुम्ही घरात शिरताना दक्षिण दिशेकडे तोंड करून शिरता , याचा अर्थ , दक्षिणी दरवाजा का?

तसे असेल तर आमचाही तसाच आहे . नविन घरात आल्यापासून आजारपण झाली , पण भरभराट म्हणाल तर अगदी उत्कर्ष म्हणावा तसा काही नाही झाला .पण कुठे कुठली काम अडली नाहीत.
पण भरपूर उजेड , वारा , प्रशस्त घर यामुळे पॉजिटिव वाईब्ज नक्की मिळतात
कीचनमधला ओटा ही दक्षिणे कडे आहे . आमच्या खालच्या मजल्यावरती बर्याच जणानी , गॅसची जागा बदलली पण आम्ही मात्र तसेच आहोत. उगाचच खर्च करून नाही फळला तर????

बिल्डिन्ग ला दोन गेट्स आहेत , एक दक्शिणेकडे आणि एक पूर्वेकडे . दोन्ही वापरात आहेत .

>>> तुम्ही घरात शिरताना दक्षिण दिशेकडे तोंड करून शिरता , याचा अर्थ , दक्षिणी दरवाजा का? <<<
नाही, याचा अर्थ दरवाजाचे तोंड (घराबाहेर जायची दिशा) उत्तर आहे.

तुम्ही घरात शिरताना दक्षिण दिशेकडे तोंड करून शिरता , याचा अर्थ , दक्षिणी दरवाजा का >> बहुदा नाही.. ह्या उलट..

पण दक्षिणे(दिशा , आय डी नाही) कडच्या दारावर उत्तर असं बोल्ड मधे लिहिलं तर जमेल काय?

बिल गेटसचा दरवाजा दक्षिणमुखी आहे (म्हणे. त्यानं अजून बोलावलं नाही त्यामुळे मी काही स्वतःहून गेले नाही त्याच्या घरी). पण हे खरंच असेल तर वास्तुशास्त्र बदलून घराचे दरवाजे दक्षिण दिशेला बदलून घ्यायला हरकत नाही.

दक्षिण दिशेला दरवाजा असेल तर वर एक वीर मारूतीचे चित्र लावून टाकले की मॅटर सेटल होते म्हणतात. दक्षिण ध्रुवावर एक दक्षिणमुखी मारूतीचे मंदिर झालेच पाहिजे. पृथ्वीवर येणारे कोणतेही संकट.. फटक्यात फुर्र.
बिल गेटसच्या दरवाजाला कोण विचारतंय, 'विंडोज' कुठल्या दिशेला उघडतायत ते बघा. Proud

बिल्डींगचा गेट कोणत्या दिशेला आहे हे रस्ता कुठे आहे यावर अवलंबून असावे. त्यामागे काही लॉजिक नसावे. अन्यथा आमच्या मुंबईचा गेट वे ऑफ ईंडिया सुद्धा समुद्र बघून नाही तर दिशा बघून बांधावा लागला असता.

तर वर एक वीर मारूतीचे चित्र लावून टाकले की मॅटर सेटल होते म्हणतात.>>>> Rofl
ह्या धाग्यावर एक से एक सिक्सर बसणार आहेत आता.

दक्षिण ध्रुवावर एक दक्षिणमुखी मारूतीचे मंदिर झालेच पाहिजे. पृथ्वीवर येणारे कोणतेही संकट.. फटक्यात फुर्र.
>>>

आशु, दक्षिण ध्रुवावर दक्षिणमुखी असणं अशक्य आहे. कारण ध्रुवावरून कुठेही पाहिलं तरी दिशा उत्तरच असणार आहे.

त्यामुळे दक्षिण ऐवजी ते मंदिर उत्तर ध्रुवावर हलव. अन मारुतीचं तोंड कुठेही कर, ते दक्षिणमुखीच होईल.

आता मला सांगा, उत्तर ध्रुवावर इग्लू बांधताना एस्किमो लोक दरवाजाची दिशा पहायला लागले तर रहायची पंचाईत यायची. अन दक्षिणेकडे पाय करून झोपायचं नसल्यास शीर्षासनात झोपण्याशिवाय पर्याय उरणार नाही...

द. ध्रुव जर पृथ्वीचे दार मानले तर मारूती तिथेच पाहिजे अँक्या. उ.ध्रु वरून द.ध्रु वरची संकटं दूर करण्याइतकी त्याची रेंज असेल तर दारादारावर तो कशाला जाऊन बसेल?

हा दक्षिणमुखी नियम फक्त घरालाच असतो की दुकानाला पण?

लक्ष्मी रस्त्यावर पु.ना. गाडगीळ दक्षिणमुखी आहे. त्यांच्या पण दुकानात आहे का वीर मारुती ?

घरास चारी बाजुनी उतार असू नये असेही म्हणतात, अन ते बघता, स्वराज्याचे सर्व किल्ले, त्यांची उर्जितावस्थेचे उतारचढाव, पूर्वीचे महत्व अन आजची स्थिती लक्षात घेता हे पटतेही

सहमत लिंब्या !

१९४७ ला पहिला तिरंगा आमच्या मुसुलमानाने बांधलेल्या लाल किल्ल्यावर फडकला.

भारत देशंच मुळात दक्षिण आशियात आहे त्यात महाराष्ट्र ऊरलेल्या ५०% राज्यांपेक्षा दक्षिणेला आहे, त्यात पुणे नाशिक, मुंबईच्या मानाने दक्षिणेला, घरही अजून दक्षिण पुण्यातंच घेतलं असेल तर मग सगळंच 'गोईंग साऊथ' म्हणतात त्याप्रमाणं अधोगती व्हायला पाहिजे. बंगळूर, चेन्नई मध्ये तर रहाणंच वर्ज्य असायला हवं.
दक्षिणेत राहून सुद्धा श्रीलंकेने क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला. Wink
साऊथ बॉम्बे मधे घर किती जणांना हवं आहे इथे???

Home work

Biल्डरने दोन ऑप्शन दिलेत..

खालापूरला डोंगरौतारावर मोठा रिसॉर्ट होमचा प्रोजेक्ट आहे. भvya दिव्य .

खोपोलिला साधाच पण सुंदर प्रोजेक्ट आहे. सपाटीवर नदीकाठी

क्या करु?

Pages