"सात्वीक" अंडा पुलाव

Submitted by स्वप्नाली on 8 July, 2016 - 12:32

---"सात्वीक" अंडा पुलाव---

जागू तै च्या अंड्याचा पुलाव

सामोर ही पा. क्रू. "सात्वीक" च वाटेल..

साहित्य: ४-६ अंडी (उकडून, साले काढून आणि प्रत्येकाचे ८ काप करून, त्यावर हलकेसे तिखट-मीठ पसरून..(मोह टाळा..काप तसेच खाण्याचा Happy ) )
-बासमती तांदुळ २ वाटी
-दोन कांदे उभे चिरुन
-३ मध्यम टोमॅटो बारीक चिरून
-कोथीम्बीर बारीक चिरून
-तूप -४ टी. स्पू.
- तेल (कान्दे परतण्यास)
-चविनुसार मिठ
-खड़ा मसाला (दालचीनी, तमाल पत्र, ३-४ लवंगा, मोठी वेलची, ३-४ मीरे, जीरे, मोहोरी)
-तिखट हवे असेल तर, ३-४ ही. मी. उभ्या चिरुन

क्रूती:
१. एका जाड बूडाच्या / नॉन्न्-स्टीक भान्ड्यामध्ये थोड़े तूप घालूंन खड़ा मसाला + ही. मी. परतून घ्या
२. त्यात धूतलेले तान्दूळ परतून घ्या
३. सधारण ४.५ वाट्या गरम पाणी, मीठ टाका. (भात शीजताना पुदीना -पाने घलू शकता बारीक चिरून.)
४. १०-१२ मी. मोठ्या आचेवर झाकण ठेवून भात शीजवा
५. मोठ्या पसरट ताटा मध्ये काढून थन्ड होऊ दया.
६. एका पसरट पॅन मध्ये कान्दे परता, आणि बाहेर काढ़ा
७. थोड़े तूप टाका
८. त्यावर भाताचा एक थर दया, त्यावर एक थर परतलेले कान्दे + टोमॅटो+ अन्डे असा दया
९. परत असे थर रीपीट करा
१०. झाकण ठेवून एक वाफ़ येऊ दया.
११. वरून कोथीम्बीर बारीक चिरून घाला, लिम्बू पिळा

फोटो:
आत्ता नाहीए.. पुन्हा केला की टाकेन..

माहितीचा स्रोत:
आई

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users