एक नवीन सैराट धागा

Submitted by कंसराज on 29 June, 2016 - 15:18

सैराट चित्रपटावर बरेच धागे आले. त्या धाग्यांच्या गर्दीत हाही एक धागा. आणखी चित्र काढायचा विचार आहे. ईतर चित्रे ही ह्याच ठिकाणी पोस्ट करीन.

वैद्यबुवांनी काढलेल्या सैराट धाग्यावर हे चित्र पोस्ट केले होते. तेथे बर्‍याच जणांनी सजेस्ट केल्यामूळे हे चित्र येथे पोस्ट करतो आहे. चित्र आवडल्यास जरूर सान्गा

प्रदिप (बाळ्या)

From Vultures

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमलय एक लंबर
आता सल्या येऊ द्या .. मग हवं तर प्रिन्स .. आर्चे आन परश्याचे पत्ती लवकर ओपन करण्यात मजा नाय

सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

आजकाल सगळीकडे चोरांचा सुळसुळाट झालाय.. तुमची सिग्नेचर लिलया मिटवून स्वतःच्या नावाने खपवतील >>> खपवू दे, ओरिजीनल माझ्याकडे आहे.

आधी आर्चि!! का इंग्लिश मध्ये सांगू? >> नको मराठीतच सांग डबल, आपल इंग्लीश कच्च आहे.

आता सल्या येऊ द्या .. मग हवं तर प्रिन्स .. आर्चे आन परश्याचे पत्ती लवकर ओपन करण्यात मजा नाय>>> अरे माझा विचार सल्ल्या, परश्या आणी आर्ची असा होता. पण नेटवर सल्ल्याचे हाय रिजोल्युशन फोटो नाहित रे.

अबे कंसराजा मी सजेस्ट केलं हुतं , नाव घ्यायला लाजतोस हुय रं ? >>> श्री, अरे सैराटवर आणखी एक धागा काढायला सांगितला म्हणून मायबोलीकर तुला मारतील अस वाटल म्हणून तूझ नाव गूपित ठेवल होत.

कंसराज,
सही !
तुमची सिग्नेचर टाकून ट्विट करा.
टॅग सैराट मुव्ही आणि तानाजीचं अकाउंट असेल तर त्यालाही, योग्यं व्यक्ती पर्यंत पोचलं तर छान होईल.

परशा आणि अर्ची एकत्रित काढा. मी परशाची fan असले तरी मध्यममार्ग सांगते.>> गप अन्जुटले...
दोघ वेगवेगळे काढा पण टाकताना एकाच्वेळी टाका..

माझी नॉन माबोकरीण रुममेट ने खुप सुपर्ब असं कॉम्प्लीमेंट दिलय तुम्हाला >> टिना, धन्यवाद सांग तूझ्या रुममेटला

Pages