मायबोली टीशर्ट २०१६

Submitted by टीशर्ट_समिती on 29 June, 2016 - 07:16

खूशखबर ! खूशखबर !! खूशखबर !!!

यंदा परत एकदा सादर करीत आहोत नव्या ढंगात नव्या रंगात 'मायबोली टीशर्ट'

यंदा टीशर्टचा रंग आहे काळा, पण त्यावर दोन वेगळ्या प्रकारच्या रंगात मायबोलीचे सुलेखन केलेले असेल.

१. पुरुषांसाठी राउंड नेक आणि निळ्या रंगात सुलेखन
Balck male Sky Blue.jpg

२. स्त्रियांसाठी व्ही-नेक आणि हिरव्या रंगात सुलेखन
Balck female Green.jpg

आणि लहानग्यांसाठी राऊंडनेक टीशर्ट

लहान मुलांसाठी काळ्या रंगाचे टीशर्ट युनिसेक्स प्रकारात असतील. परंतु मुलांसाठी निळ्या रंगात व मुलींसाठी हिरव्या रंगात छपाई केलेली असेल.

टीशर्ट साईज चार्ट

size chart 1.jpg

(हे कोष्टक शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मूल प्रत्यक्षात जसं आहे त्यानुसारच त्याचे माप घेऊन ऑर्डर नोंदवावी.)

Meassure.jpg

लेडीज आणि युनिसेक्स दोन्ही प्रकारच्या टीशर्टसाठी ही मापे आहेत.

टीशर्टच्या उजव्या बाहीवर आपल्या मायबोलीचा लोगो आणि टीशर्टच्या पाठीवर URL Address : www.maayboli.com असेल.

यंदा मायबोलीच्या टीशर्टची संकल्पना आणि सुलेखन केले आहे सिद्धहस्त चित्रकार मायबोलीकर पल्ली हीने.... तिच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला विसरू नका Happy

टीशर्टची किंमत आहे : रूपये २२०/- + रूपये ५०/-(देणगी) = एकूण रूपये २७०/-फक्त आणि लहान मुलांच्या टीशर्टची किंमत आहे रूपये १७०/- + रूपये ५०/-(देणगी) = एकूण रूपये २२०/- फक्त

मायबोली टीशर्ट उपक्रमातून उभी होणारी देणगीची रक्कम आपण ह्यावर्षी 'निसर्ग जागर प्रतिष्ठान' ह्या संस्थेला देणार आहोत. संस्थेबद्दल अधिक माहिती www.nisargjagar.com इथे मिळू शकेल.

मग चला तर, आपली ऑर्डर maayboli.tshirts2016@gmail.com ह्या पत्त्यावर खालील स्वरूपात लवकरात लवकर पाठवा Happy

१. नाव (अनिवार्य)
२. मायबोली id (अनिवार्य)
३. पत्ता आणि भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक (अनिवार्य)
४. टी- शर्ट चा प्रकार - लेडिज्/जेण्ट्स/किड्स (अनिवार्य)
५. टी- शर्ट चा साईझ (अनिवार्य)
६. टी- शर्टची संख्या (अनिवार्य)
७. पैसे कुठे भरणार - पुणे/मुंबई/ऑनलाईन

(ज्यांनी ऑनलाईन हा ऑप्शन दिला आहे त्यांना पैसे ट्रान्स्फर करण्यासाठीचे
बँक डिटेल्स पोचपावतीसोबत मेलमध्ये देण्यात येतील.)

मेलच्या subject मध्ये Maayboli T-shirt order असे लिहावे.

आपण पाठवलेल्या मेलची पोचपावती देण्यात येईल.

आपली ऑर्डर दिनांक ०९ जुलै २०१६ पर्यंत नोंदवावी. त्या नंतर कुठलीही ऑर्डर स्विकारली जाणार नाही.

टीशर्टचे पैसे भरण्यासाठी दिनांक १० जुलै २०१६ रोजी आपण पुणे व मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी मेळावा आयोजित करणार आहोत.

पुणेकर मायबोलीकरांसाठी:
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील वटवृक्षाखाली
वेळ: सं. ५.३० ते ८.००

मुंबईकर मायबोलीकरांसाठी:
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ७.३०

दिनांक १० जुलै २०१६ पर्यंत ज्यांचे पैसे जमा होतील त्यांचीच ऑर्डर नक्की करण्यात येइल ह्याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.

ह्यादिवशी आपल्याला प्रत्यक्ष हजर राहून पैसे भरणे शक्य नसल्यास किंवा टिशर्टसंदर्भात इतर काही शंका असल्यास आमच्या संयोजकांशी संपर्क साधावा, ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील.

टीशर्ट वाटप होईल दिनांक २४ जुलै २०१६ रोजी पुढील ठिकाणी, ह्या दिवशी आपण वर्षविहार २०१६ ची वर्गणी गोळा करण्यासाठी भेटणार आहोतच.

पुणे:
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील वटवृक्षाखाली
वेळ: सं. ५.३० ते ८.००

मुंबई:
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ७.३०

टीशर्ट वाटपाच्या दिवशी जे मायबोलीकर हजर राहू शकणार नाहीत ते वर्षाविहाराच्या दिवशी टीशर्ट घेऊ शकतील. जे मायबोलीकर टीशर्ट वाटपाच्या दिवशी अथवा वर्षाविहाराच्या दिवशीही आपले टीशर्ट घेऊ शकणार नाहीत त्यांनी संयोजकांशी संपर्क साधून टीशर्ट घेण्याची व्यवस्था करावी.

मुंबई - पुण्याबाहेर तसेच भारताबाहेर राहणारे मायबोलीकर मुंबई - पुण्यातील मायबोलीकर मित्रमंडळी अथवा नातेवाईकांमार्फत टीशर्टचे पैसे भरू शकतात तसेच टीशर्ट घेऊही शकतात. मात्र ऑर्डर नोंदवताना त्यांनी कोणामार्फत पैसे भरणार व टीशर्ट घेणार तसेच त्या मायबोलीकराचे/ नातेवाईकाचे पूर्ण नाव व भ्रमणध्वनी क्रमांक देणे अनिवार्य आहे.

तेव्हा, दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोली टीशर्ट उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या.... आपली ऑर्डर त्वरीत नोंदवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! सिम्पल आणि स्वीट. नक्की घेणार.

मागे एकदा लाइट ब्लु व्ही नेक आणि ग्रे राउंड नेक असे टीशर्ट्स एकदम मस्त होते. फक्त मायबोली लोगो असलेला भाग आतल्या अस्तरामुळे भयंकर टोचरा झाला होता. त्याचं काही करता येइल का?

मस्त टीशर्ट्स आणि सुलेखन.
पुरुषांच्या टीशर्टाचा फोटो दिसत नाहीये (मला).

वर्गणी आणि वाटपासाठी यंदा ठाणे ठिकाण नाही का?>>>>>> नाही, यावर्षी मुंबई आणि ठाणेकरांसाठी शिवाजी पार्कच

Pages