खुलता कळी खुलेना - 2 (कळ्या)

Submitted by Nidhii on 8 May, 2017 - 11:01

पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट पुर्ण झाल्या. आता इथे या चर्चा करुया. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते....
१. मा successfully MS करुन... सगळ as usual neat सम्भलुन परत येणार्... आदर्श मुलगी तर आहेच..
२. वि.. जो depression मधे गेलाय. ( मा च्या दुराव्याने.. hospital /operation room मधल्या कुथ्ल्याश्या चुकी मुळॅ... etc etc) तो मा ला परत बघुन normal व्हायला लागेल.....
घरच्याना त्याच्यात्ला. हा positive change दिसेल... आणी त्याच कारण ही लाक्षात येइल.
३. इशा न वि ची meanwhile बाहेरच coincidentally. भेट होइल.. आणी छान bondingजामाय्ला लागेल.. ( माहिती .. ओळाख नसताना)...
४. मो मधून मधून काही कुरापती करतराहणाआर... वि न मा त्या successfully handle करणार..
५. शेवटी एकत्र येणार....
आता।हे अस किती. दिवस चालेल... don't know.. Happy

हो, एकून संवादावरून असा निष्कर्ष काढला की मा दिल्लि ला गेल्यावर आजी-आजोबा गावी जाउन राहिले आणि म्हणून त्यांनी सई ला पेईंग गेस्ट ( आणि घर छान ठेवायला - असचं म्हणाले आजोबा ) म्हणून ठेवलं आहे. मो गायब.

वि डिप्रेशन मधे का गेला ते मला कळलं नाही. वरच्या पोस्ट मधे कळलं की हॉस्पिटल मधल्या चुकीमुळे.

संजय मोने , आजी, ते दुसरे काका सगळे गायब होते. वि अगदि विचारवंत दिसायला लागलायं.

रच्याकने, आजच्या भागात मा म्हणते - मला दळवींशी संबंध ठेवायचा नाहिये, ज्यांनी लग्न ठरवताना मदत केली, सापु चा खर्च केला त्यांच्याशी संबंध का बरं नको हिला ? ईशा ला ठेवून घेतलं नाही म्हणून ?

>>> आता।हे अस किती. दिवस चालेल... don't know.. <<< हे सगळ्यात महान सत्य Lol
बाकी तपशीलाबद्दल धन्यवाद. काल नेमके काय चालले ते आधी कळलेच नव्हते... मग अंदाज बांधला होता !
हल्ली मालिका बघायला फारसा वेळ मिळत नाही...

बाकी ते आजोबा अगदीच गरीब बिचारे वाटतात हं !
कधी कधी मात्र मला त्यांच्यात (कर्तव्य कठोर) अडवानींचाही भास होतो...... तस्सेच दिसतात, नै?
आज्जी टिपिकल आहेत.... अगदी अशीच अमुची आजी असती म्हणण्याइतपत.....

बाप रे कैच्याकैच उलथापालथ केलेली दिसतेय शिरेल.
मी इतक्यात पाहिलिच नाहिये.
आणि हे सगळं वाचून पाहू की नको असा प्रश्न पडलाय मला.

ह्या सिरिअलमध्ये अगबाई मला जामच आवडतेय. माझी आई अशीच आहे, हे खा, ते खा करत गोल गोल आमच्या भोवती फिरते (आम्ही मनोरुग्ण नाही तरी). खुप मायाळु आणी हळवी व्यक्तिरेखा आहे अगबाईची.

उषा नाडकर्णी परलोक सिधारलेली दाखवलीय का? गीता का बदलली? लोकेशला घालवलेल नसल म्हणजे मिळवल, तो एकच आखों की ठंडक आहे त्यात

उषा नाडकर्णी >> गावी गेल्ये असा उल्लेख आला बहुतेक काल.

मा ने दळवींशी सम्पर्क न ठेवण्याच कारण अगदीच गुळमुळीत दिलं. मो चं खर्‍या आयुष्यात लग्न झालयम म्हणून ती गायब आहे का कोण जाणे. पण तिचा उल्लेखही येउ नये हे जरा अती आहे.

शर्वाणी पिल्ले (नवीन गीताकाकी) आणि ती दोन्ही नवीन मुलं मला अज्जिबात आवडली नाहीत. मेंगळट आणि आजारी दिसतात. लोकेश च्या जागी कोण येईल काय माहित?

शर्वाणी पिल्ले (नवीन गीताकाकी) आणि ती दोन्ही नवीन मुलं मला अज्जिबात आवडली नाहीत. मेंगळट आणि आजारी दिसतात. लोकेश च्या जागी कोण येईल काय माहित? + १०००० .

ती शर्वाणी ईतकी हळूहळू का बोलते ? दब्या आवाजात किन्वा आजारी असल्यासारखी ?

ओहो.... खरंच की मुग्धा..........!!!! तिचं नाव सानिका असतं........त्याही वेळेस मला ते फार मॉडर्न वाटलेलं.......!! म्हणजे अवंतिकाचा काळ बघता.....

शर्वाणी पिल्ले (नवीन गीताकाकी) आणि ती दोन्ही नवीन मुलं मला अज्जिबात आवडली नाहीत. मेंगळट आणि आजारी दिसतात. लोकेश च्या जागी कोण येईल काय माहित?>>> लोकेश कोण ? मोहन काका का ? आणि खरच आधीची गीताकाकी फार चपखल होती त्या भूमिकेत आणि गोड दिसायची.

लोकेश जुयेरेगा मधे आवडला होता. या मालिकेत त्याला विशेष स्कोपच नाही.

मालिका तर तूर्त गडबडल्यासारखी वाटतेय. क्लूलेस झाल्यासारखं वाटतं.

ही मालिका पाहत नाही आता...मोनिका असेल तरच थोडी फार पुढे जाते मालिका... नाहीतर आठवड्याच्या सुरुवातीलाच 3 वर्ष लीप मग इशा ,मांशी परत आले आणि विकर्या मनोरुग्ण यापुढे गेलेलीच नाहीये अजून... एक दाखवलं की तेच तेच दळण .... प्रोमो वरूनच कळले हे...

पण या तीन वर्षात मोनिका कुठे गेली, हे अजून सांगितलंच नाही????

मो त्रास द्यायला नसल्यामुळे क्रांत मनोरुग्ण झाला का ???????? Happy

अरूण Lol

मो चा साधा उल्लेखही नाहीये. अज्जीअजोबांकडूनही Happy घर सोडून गेली की डायरेक्ट वर गेली? डिव्होर्स झाला की नाही? तिने छळल्यामुळे वि मनोरूग्ण झाला का? बिचारा वि! दोन्ही बहिणींनी त्याच्या आयुष्याची वाट लावली पार!!

मो चा साधा उल्लेखही नाहीये. अज्जीअजोबांकडूनही Happy घर सोडून गेली की डायरेक्ट वर गेली? डिव्होर्स झाला की नाही? तिने छळल्यामुळे वि मनोरूग्ण झाला का? बिचारा वि! दोन्ही बहिणींनी त्याच्या आयुष्याची वाट लावली पार!! >> हेच सगळे प्रश्न लेखकूला पडले असतील, म्हणून डायरेक्ट ३ वर्षाची लिप... रिकाम्या जागा नंतर भरणार असेल.
(आपण असे बाफ लिहिणं बंद केलं पाहिजे, उगिच आपण तर्क लढवतो आणि लेखकूला त्यातून आयड्या मिळतात, पेमेंट मात्र त्याला मिळते आणि आपल्याला मनःस्ताप :फिदी:)

Pages