हिरवं चिकन

Submitted by धनि on 17 June, 2016 - 09:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन ब्रेस्ट बोनलेस १
कांदा १ मध्यम
कोथिंबीर मुठभर
पुदीना मुठभर
हिरव्या मिरच्या ३ - ४ (किती तिखट हवे आहे त्यानुसार)
लसूण १ लहान पाकळी
काजू मुठभर
तेल
मीठ
जिरे
तमालपत्र २
दालचिनी १ कांडी
वेलदोडे २
लिंबाचा रस
कसूरी मेथी

क्रमवार पाककृती: 

तर पहा काय झालं ना, फार्मर्स मार्केट परत सुरू झालं. एके दिवशी हे मस्त पुदीन्याची जुडी मिळाली. मग घरी आणून तिची चटणी करून ठेवली. मस्त झाली होती अगदी. २ दिवस आवडीने तोंडी लावायला खाल्ली. मग ती तरी टिकणार किती ना. बाहेर मिळणार्‍या चटणीत ते व्हिनेगर आणि प्रिझर्व्हेटिव घालतात. घरच्या चटणीत असे काहीच नव्हते. मग त्या चटणीचा सदुपयोग कसा करावा असा विचार करत असताना हे चिकन सुचले.

तर पुदीना धुवून आणि निवडून घेतले. देठं टाकून दिली. चटणीत ती चांगली लागत नाहीत. (कोथिंबीरीची देठं मात्र उपयोगी ठरतात. त्यांना खुप सुंदर वास असतो त्यामुळे त्यांचा वापर करा)
एक दोन मिरच्यांचे तुकडे करून घेतले.
लसूण पाकळी सोलून घेतली.
आता हे सगळे चविनुसार मिठ घालून मिक्सर मधून बारीक वाटून घेतले.
अशी तयार झाली एक नंबर चटणी. कंटाळा आला असेल तर हीच चटणी थोडा लिंबू रस घालून पोळीबरोबर खा आणि चिकन उद्या करू असं म्हणा Happy

तर आमच्याकडे चटणी तयार होती. ती चटणी एका भांड्यात घेतली. त्यात लिंबाचा रस टाकला. मग त्यात चिकनचे तुकडे टाकून आर्धा तास मॅरिनेशन करता ठेवले. तेवढ्या वेळात सी आय डी चा आर्धा एपिसोड उरला होता तो पाहून घेतला. चक्क हाताने दरवाजा उघडणारा दया दिसला आणि सुडोमी झालं Wink बरं आपलं चिकन तिकडे फ्रिज मध्ये आहे नाही का.

ते मॅरिनेशन सुरू असताना, सी आय डी संपल्यावर कांदा उभा पातळ कापून घेतला.
त्याच्या बरोबर कोथिंबीर पण थोडी कापली. देठं लक्षात आहेत ना !
मिरची पण घेतली.
मग तेल गरम केलं आणि त्यात थोडे जीरे टाकले. ते परतले की मग कांदा टाकला.
खुप लाल नाही करायचा. थोडा शिजल्या सारखं झालं की काजू टाकले.
कजू आणि कांदा परतला की त्याच्यावर मिरची आणि कोथिंबीर थोडी परतल्यासारखे केले.
हे सगळे परतलेले जिन्नस मिक्सर मध्ये पाणी घालून मस्त वाटून घेतले.
आता पॅन मध्ये परत थोडे तेल गरम केले आणि त्यावर खडा मसाला टाकला. (तमालपत्र, दालचिनी आणि वेलची)
त्याचा वास दरवळल्यावर वाटण टाकले आणि एक उकळी आणली.
मग त्यात मॅरिनेट केलेले चिकन टाकले.
वरून थोडी कसूरी मेथी टाकली.
शेवटी एक उकळी आल्यावर मीठ आणि चिमूटभर साखर टाकली.
सगळे १२ - १५ मिनीटे शिजू दिले. बोनलेस चिकनचे तुकडे किती मोठे आहेत त्यावर तुमचा वेळ अवलंबून असेल. पण खुप जास्ती शिजवू नका नाही तर चिकन कडक व्हायला लागते.

चिकन तयार होत असताना मस्त जिरा पराठे भाजले. ते भाजून लगेच ताटात आणि चिकन व पराठे पोटात Wink

करून पहा आणि आवडलं तर सांगा !

green_Chicken_1.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांकरता
अधिक टिपा: 

१) हिरवं चिकन ही पाककृती आहे तिचा हिरवं कुंकू या चित्रपटाशी काहीही संबंध नाही, असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
२) सगळे जिन्नस अंदाजे आहेत, तुम्हाला आवडेल तशा प्रमाणात घ्यावेत Wink
३) ही चिकनची पाककृती आहे पण हीच कृती वापरून हिरवं पनीर, हिरवा बटाटा करता येईल. (बटाट्याकरता तो थोडा उकडून आणि परतून घेतला तर जास्ती चांगला लागेल )

माहितीचा स्रोत: 
असेच आपले स्वयंपाकघरातले प्रयोग
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सी आय डी संपल्यावर कांदा उभा पातळ कापून घेतला. >>>> सी आय डी सोडून दुसरं काही चालेल का? त्याए कृतीत काय फरक करावा लागेल? Wink

रेस्पि इंटरेस्टींग आहे. करून बघण्यात येईल.

मस्तच आहे झटपट रेसिपी (फार्मर्स मार्केट, पुदिना निवडणे, कोथींबीर देठासकट निवडून घेणे हे ह्यात धरलेलं नाही)

>> २ माणसांकरता

Lol

भूक अनावर झाली असेल म्हणून मग फोटो राहून गेले.

नशीब काढलं हो मुलीने. फार्मर्स मार्केटात जाऊन पुदिना आणून निवडून, धुवून (लिहिलं नसलं तरी गृहित धरलं आहे) चटणी करणारा नवरा मिळाला. Proud

अरे मस्त जमलंय की! र्म्द, मज्जाय बॉ तुझी. आमच्या धनींनी केलेला वरण भात पण अवघड असतो खायला तेव्हा धनिया चिकन स्वतःच करना पडेगा!

>> पुदीन्याची चटणी ही आमच्या बायकोनीच केली होती आहो डोळा मारा बाकी पाककृतीत पण बरीच मदत आहे हाहा

नुसतंच फार्मर्स मार्केट मध्ये जाऊन पुदिना आणून निवडून धुवून रेसिपी करणारा नव्हे तर प्रेमाने जी काही मदत केली त्याचं क्रेडिट ही देणारा. Lol

ऐसा नय करनेका फिर धनी. क्रेडिट देनेका ना?
आमचे (स्वयंपाकघरातले) लवीडवी प्रयोग म्हटलं असतं तरी आम्ही चालवून घेतलंच असतं की. Wink

मस्त रेसिपी. Happy
(पण मेथी किंवा अंबाडीच्या भाजीचा फोटो चिकन म्हणून खपवायचा प्रयत्न केलेला दिसतोय. :P)

'धनिया चिकन' भारी नाव! Happy

अरे फोटु आला की. भारी दिसतंय चिकन. पाककृतीत खुद्द शेफनेच ब्याडवर्डटाटे घालून करा लिहिल्यानं करणं भाग आहे Proud

फोटोतल्या बोलखालचे मॅट सुंदर आहे. ते कुठे मिळेल? Happy
चिकन ऐवजी बटाटा आणि पुदिन्याऐवजी पालक वापरला तर जास्तच हिरवी होईल नाही.

बाईंना चिकन पण आंबाडीची भाजी वाटायला लागलं दिसतंय सध्या Lol

सिंडी, जे वाटेल ते घालून कर Wink

म्याट बेबाबी मध्ये मिळेल - आणि पालक विथ ब** केला तर तो आलू पालक नाही का होणार Lol

मस्त आहे.
चिकन ग्रेवीत असला हिरवा रंग मला आवडतो..
चिकनचे पुदिना कबाब सुद्धा आवडतात.. शिळे जास्त चांगले लागतात

बादवे हे सुडोमी झालं काय आह? फुलफॉर्म्

Pages