पेपर क्विलिंग - एक प्रयत्न!

Submitted by मधुरा मकरंद on 12 June, 2016 - 04:48

पेपर क्विलिंग बद्दल बरिच उत्सुकता होती. सहप्रवासी, ऑफिसमधल्या मैत्रिणी पेपर क्विलिंगचे दागिने घालीत तेव्हा तर पेपर क्विलिंग शिकायची फारच ओढ लागली.

मागचा आठवडा सुटी घेतली. काही घरगुती कामांमुळे माझा घरी बसून बैठा सत्याग्रह होता. सर्वात प्रथम पेपर क्विलिंगचे सामान आणले.... रंगीत पट्ट्या आणि सुई. मग गुगलून पाहिले, यु-ट्युबवर शिकवणी घेतली.
पहीला धडा गिरवला...
1_0.jpg3_0.jpg

मग लक्षात आले, अजुन काही गोष्टी हव्यात. शाळेत वापरले ते प्रो-सर्कल, मणी, कड्या, हूक.....
सगळे आणले. तोपर्यंत दहावीचा निकाल लागला. दोन विद्यार्थिनिंचे कौतुक करताना हे दिले..
4_0.jpg5.jpg

जरा जमते आहे असे वाटल्यावर---- प्रयत्न कि प्रयोग??
6.jpg7.jpg

पुन्हा खुमखुमी.. पुन्हा गुगल... पुन्हा यु-ट्युब.... पुन्हा नविन प्रयत्न....
8.jpg9.jpgIMG_20160611_161045520.jpg13.jpgIMG_20160611_161525538.jpgIMG_20160611_161214127_0.jpg

अजुन बरेच काही शिकायचे आहे. रोज थोडा वेळ देईन म्हणते. ज्या दिवशी झुमका.. लटकन... छत्री... भोकरं ... अशा प्रकारचे कानातले करता येतील तो दिवस माझा. तो पर्यंत ईतकेच..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानचं जमलयं Happy
नक्की वेगवेगळे प्रयोग करत राहा.. एकदा हात बसला कि सार काही सुरळीत होत.. ऑनलाईन साईटस वर भरपूर सामान मिळेल क्विलींगचे.. प्रो सर्कल मीपन ट्राय केला होता पन करताना त्रास होतो.. आणि प्रत्येकाचा सरकंफरंस वेगळा असल्याने कधीकधी इकडलं तिकडं झाल कि माप चुकतात..
कानातले खरचं छान केले आहेत..
स्वतं बनवलेली वस्तु भेट देण्यात एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळते.. पोरी खुष झाल्या असतिल ना Happy

अप्रतिम,
प्रयत्नांना आणि चिकाटीला पुन्हा एकदा सलाम ………… !!!!
या दिवशी झुमका.. लटकन... छत्री... भोकरं ... अशा प्रकारचे कानातले करता येतील तो दिवस माझा.>>>>>>>>> ज्या दिवशी तुमची कला भेट म्हणून माझ्या हातात पडेल तो दिवस माझा .

कलेच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा ……. ……

सगळ्यांना धन्यवाद.
>> सातत्य ठेवा. हातात सफाई येत जाईल., दा नक्कीच प्रयत्न चालू आहेत.

ईथे मिळणारे प्रोत्साहन खुपच मोलाचे आहे.

हे असंलं बघुन बिनकामाची खुमखुमी येते. Happy
क्विलींग पेपर, मणी, बीड्स, सोनेरी चेन्स, सुई, इइ सगळं आहे घरी. डब्यात भरुन ठेवलेत. Happy

रच्याकने भोकरं छत्री म्हणजे काय>>>> ज्याला सध्या झुमका म्हणतात त्यालाच मागच्या पिढित छत्री आणि त्या आधी भोकरं म्हणत.

हे असंलं बघुन बिनकामाची खुमखुमी येते. >>>>सस्मित, अशी खुमखुमी मला नेहमीच येते. काहीना काही चालूच असते.

सगळ्यांचे धन्यवाद.

ओके हे बघा..

क्विलींग हेअरक्लीप्स - http://www.maayboli.com/node/50236

क्विलींग आणि बरच काही - http://www.maayboli.com/node/54395

कानी कुंडल - कृतीसह (पाकृ नव्हे) - http://www.maayboli.com/node/56931

मधुरा,
तुला यातुन बर्‍याच कल्पना सुचतिल आणि गाईडन्स मिळेल अशी आशा करते..
तस मला काही खुप खास जमत नाही पण ठिक ठाक आहे Wink Happy

टीना, तुमचे प्रकार छानच. या आधीही पाहिले होते.
तस मला काही खुप खास जमत नाही >>> हा तुझा साधेपणा.

सिंडरेला, बर्‍याच जणांना हे मोती लावलेले केशरी कानातले आवडले

धन्यवाद.