दहशतवादी पाहुणे

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

स्वयंपाकघराच्या लहानश्या गच्चीत जमिनीवर साखरेसारखे पातळ काचेचे स्फटीक विखुरलेले दिसले. एक-दोनदा तिथे फिरकून दुर्लक्षही केले. पण थोड्या वेळात प्रमाण जरा जास्त दिसायला लागले. खाली वाकून, निरखून, तर्क करूनपण ते कशाचे असावेत, हे कळेना. ते कुठून पडले असावेत म्हणून वर उठता उठता छताच्या दिशेला मान वळवली आणि एकदम त-त-प-प झाले.

श्याम मनोहरांच्या एका पुस्तकात एक वाक्य होते- आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राक्षसी गुंड राहतोय हे समजलेय. मग आपली मनस्थिती नेमकी काय ठेवायची?

आणि इथे तर अवघ्या फुटाच्या अंतरावर लहानश्या गच्चीत झुंडीने हे दहशतवादी तळ ठोकून बसलेले. फक्त पाच-सहा तासातच. अनपेक्षित गनिमीकावा. एकेकाचा पवित्रा तर असा की बोलती बंद झाली पाहिजे.

.
.

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

तो काचसदृश्य चुरा म्हणजे मेण असावे. आज चिमटीत घेऊन बघितले तर स्पर्श मेणकट लागला.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(०४-जून-२०१६)

९.
काल पोळे काढले. त्या माणसांनी पोळ्याच्या खाली धूर केला. त्याने बहुतांश मधमाश्या उठल्या.

१०. मग त्याने सरळ हातानेच उरलेल्या मधमाश्यांची मूठ मूठ भरून त्यांना पोळ्यापासून वेगळे केले. आतमध्ये सुरेख असा षटकोनी घरे असलेला अर्धचंद्र होता. ते पाच दिवसांचे पोळे वरच्या दिशेने थोडे मधाने भरलेले दिसत होते.

११. अर्धचंद्राखाली खालून एका डबा धरून हाताने ते छतापासून खरवडून डब्यात धरले. अर्थातच आजूबाजूला मधमाश्या घोंघावत होत्या.

१२.

१३.

१४.
अर्ध्या-एक तासात त्या मोकळ्या जागेत त्या सगळ्या मधमाश्या पुन्हा लोंबू लागल्या.

१५.

मग दुसरा एक झाकणाच्या डबा खालून अश्या प्रकारे छताला लावला की सगळ्या माश्या डब्यात कैद झाल्या. त्यावर पटकन झाकण लावून त्यांनी दूर नेऊन सोडून दिल्या.

त्यातून सुटलेल्या थोड्याश्या बराच वेळ तिथे रेंगाळल्या आणि आता जवळजवळ सगळ्या दुसरीकडे पांगल्या आहेत. स्वयंपाकघराची खिडकी पूर्णवेळासाठी एकदाची उघडली. हुश्श्य!

१६. दरम्यान इकडे पाच-सहाजणी खिडकीच्या वरच्या पत्र्याच्या कडेला केवळ आपल्या पायांच्या टोकाच्या साहाय्याने लटकलेल्या होत्या. आणि बाकीच्या काही त्यांना खाली लटकत होत्या. त्या वरच्या बाजूच्या मधमाश्यांची कसली ताकदवान पकड असेल!

१७.

१८.

१९.
चमचाभर मध पाण्याने भरलेल्या ग्लासात सोडल्यास शुद्ध मध पाण्यात न विरघळता तळाशी बसतो. भेसळयुक्त असेल तर पाण्यात पसरतो / विरघळतो.

२०.

हुश्श! सुटलात गजानन तुम्ही एकदाचे. घरात लहान मूल असल्याने तुमची काळजी रास्तच होती. पण सिंडरेलाच्या म्हणण्याप्रमाणे शेवट गोड झाला यातच देवाचे आभार.

page no. 2 मधमाश्या षटकोनीच कप्पे का बांधतात?>> ची लिन्क भारी आहे. काल झोपेवर मात करुन करुन वाचली.

तुम्हा सर्व हितचिंतकांचे मनापासून आभार.

सायो, काही फोटो काढले आहेत. थोडा वेळ मिळाल्यावर टाकतो.

प्राजक्ता, मधाची वेगळीच स्टोरी / हातचलाखी! सांगतो.

बाप रे, डेंजरच आहे ! शेवट गोड झाला हे वाचून बरे वाटले.

आमच्या सोसायटीच्या स्विमिंगपूलजवळ खूप वॉस्प्स फिरतात. गेल्यावर्षी माझा मुलगा स्विमिंगच्या आधी शॉवरखाली उभा असताना एक वॉस्प तिथे घोंगावायला लागला आणि एका क्षणात त्याच्या मनगटाला चावलाही. तो पाण्याखाली असल्याने तो डंख पूर्ण शक्तीनिशी बसला नाही, खूपच थोडक्यात निभावलं !

प्राजक्ता, ती माणसे घरात येण्यापूर्वीच त्यांनी दोन वेगवेगळे डबे खालच्या जिन्यातल्या कोपर्‍यात ठेवले होते. (आमचे एवढे लक्ष नव्हते त्याकडे.)

या पोळ्यातून निघेल तो मध आम्ही घेऊ असे त्याला सांगितले होते (विकत). पोळे काढल्यावर चलाखीने त्यांनी तो मधाचा ताजा कांदा एका भांड्यात लपवून ठेवला. आणि आम्ही तिकडे जाईपर्यंत दुसरे भांडे उघडून आमच्यासमोर ठेवले, ज्यात आधीपासूनच मध आणि आधी काढलेली काही पोळी होती. नुकताच काढलेला ताजा कांदा त्या डब्यात कुठेच दिसेना. आम्हाला त्यांनी त्यातला मध चांगला टोपभरून दिला (जेवढा देतील तेवढा त्यांचा फायदाच होता.) तोही मध घ्यायला आमची हरकत नव्हती. पण तो मध अतिशय पातळ आणि चवीला पांचट होता. अर्थात डायल्युटेड होता. मग वाद घालून त्याला ते दुसरे भांडे उघडायला लावले आणि त्यातला मध घेतला.

@केदारः धुराचे प्रात्यक्षिक पाहिल्यावर आता पुढच्या वेळी पुरेशी काळजी घेतली तर असे मोठे पोळे आपण स्वत:ही काढू शकतो असे वाटले खरे!

अजून एक, काही बायॉलॉजिकल घड्याळ असेल का माहीत नाही पण आज संध्याकाळी पुन्हा त्या मधमाश्या येऊन त्याच ठिकाणी चांगला आकार धरून बसायला लागल्या. आता म्हटले पुन्हा आल्या की काय! पण थोड्या वेळाने गेल्या.

वरचा मध छान सोनेरी दिसतोय! चलाखच होता की पोळे काढणारा
(वाचताना की कान्द्यापाशी दोनदा अडखळले म्हटल मधात कान्दा कुठुन आला आता? मग तु पोळ्याला कान्दा(!?) म्हणत असावा असा अन्दाज लावलाय)

बाप रे !
हनी बी...दंश इतका जहरी असतो कि हर्ट झालेला मनुष्य रामनाम सत्य पण होउ शकतो. पुन्हा बी तुमच्या घराकडे फिरकणार नाहीत याची काळजी घ्यावी.

हुश्श्य झालं अगदी!!! Happy

घरात चुकून एक जरी शिरली हनी बी तर तिला बाहेर काढताना मेटाकुटीला येतो जीव..

मधाच्या बाबतीत लबाडी.. अगदी तिथल्या तिथेच..ऊफ...किती बेईमानी भरलेलीये मनांत.. Angry

मागच्या वर्षी सोसायटीतील जांभळाच्या झाडाला लागलेले पोळे काढून त्यातील मध तिथेच विकत होते.. वॉचमन

त्यांच्या डोक्यावरच उभा असल्याने आम्हाला प्युअर फॉर्म मधे मिळाला मध.. तरी त्या माणसाच्या समोरच पाण्यात, मधाचा एक टपका वगैरे टाकून परीक्षा घेतलीच Proud

<< ... त्याला ते दुसरे भांडे उघडायला लावले आणि त्यातला मध घेतला.>> भयानक अनुभवाचा शेवट तर प्युअर गोड झाला !! Wink

गजानन, तुमच्या लेखावरुन बी मूव्ही नावाचा अ‍ॅनिमेटेड सिनेमा आठवला. त्यातला बॅरी नावाचा हिरो (मधमाशी) एका सुपरमार्केटमध्ये विकायला ठेवलेला मध पहिल्यांदाच बघुन विचार करतो कि माणसं मधमाश्यांकडून हजारो वर्षे मध चोरत आहेत आणि सुन्न होतो, नंतर धुराने हटवलेले पोळे पाहून खूपच चिडतो आणि संपुर्ण मनुष्यजातीवर कोर्टकेस करतो (अमेरिकन मधमाशी!).. सुंदर चित्रपट आहे. ह्या सगळ्या प्रकारावर उतारा म्हणुन नक्की बघा Happy

शेवट गोड झाला हे मस्त!!

Pages