Submitted by आदू on 27 May, 2016 - 13:05
सध्याच हर्णे-दापोली इथून मी वाकड्या आकाराचे(थोडेफार C आकाराचे) सोडे घेतले आहेत पण सासरच्या मंडळींचे म्हणणे आहे की लाल सरळ सोडेच उत्तम तर माहेरच्या मंडळींचे म्हणणे आहे की पांढरे सरळ सोडेच चांगले.दोन्ही कडची मंडळींमधे रंगावरुन confusion असले तरी सरळच सोडे चांगले नि आपली लेक/सुन उल्लू बनवली गेली या बाबतीत पक्के एकमत आहे(असो या मुळे का होईना दोन्ही कडे एकदा तरी एकमत झाले)
पण मला अजूनही नक्की कळत नाहिये की अस्सल सोडे कोणते नि कसे ओळखावे.कृपया आपण मार्गदर्शन कराल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किश२४, माहितीपर आणि तोंपासु
किश२४, माहितीपर आणि तोंपासु ब्लॉग.
खुप छान माहिती
खुप छान माहिती
आताच दोन आठवड्यापुर्वी
आताच दोन आठवड्यापुर्वी पोयनाडच्या बाजारातुन,
सोडे, अंबाडी सुकट, खाडे, जवळा, खारवलेली सुरमयी आणी माकुल(सुकवलेले ऑक्टोपस (बेबी)) आणण्यात आलेले आहेत.
ह्यावेळेस वाकट्या काय इतक्या चांगल्या नाय दिसल्या बाजाराला नी बोंबीलपण.
सोडे ओळखायची मोठी खुण म्हणजे वाळुन सी आकार झालेले किंवा सरळ असणार्या सोड्यांच्या पाठीवर कोलंबीचा लाल धागा तुटक तुटक पहावयास मिळतो. शक्यतो ओळखीच्या मासळीवाल्यांकडुनच घ्यावे नाहीतर रावसाचे तुकडे सोडे म्हणुन गळ्यात पडायची शक्यता जास्त.
भाव काय वाढलाय राव सोड्यांचा !!!
१०० रुपये ५० ग्रम कालच
१०० रुपये ५० ग्रम कालच बोरिवलि मच्चि मार्केत मधे विचारला.
आभार किश२४.. हे असे फोटोत
आभार किश२४.. हे असे फोटोत बघणेच मला शक्य आहे !
पूर्वाच्या ब्लॉगवर जे सोडे
पूर्वाच्या ब्लॉगवर जे सोडे आहेत त्यात पहा लालसर छटा किंवा रेष आहे. म्हणजे ते सोडे ओरिजनल.
सोडे घरी करता येतात पण ती वेळेत म्हणजे उन जायच्या आत काढली गेली पाहीजे नाहीतर मुंग्या जमा होतात.
<< जे सोडे आहेत त्यात पहा
<< जे सोडे आहेत त्यात पहा लालसर छटा किंवा रेष आहे. म्हणजे ते सोडे ओरिजनल. >> 'मी आदि'जी, 'मासे' या विषयावरच्या माबोवरच्या सर्वोच्च ऑथॉरिटीने दिलेला हा सल्ला शिरसावंद्य मानावा !
किश ! ब्लॉगच्या लिन्कसाठी
किश ! ब्लॉगच्या लिन्कसाठी धन्यवाद
खुप खुप धन्स ....< जे सोडे
खुप खुप धन्स ....< जे सोडे आहेत त्यात पहा लालसर छटा किंवा रेष आहे. म्हणजे ते सोडे ओरिजनल. >> 'मी आदि'जी, 'मासे' या विषयावरच्या माबोवरच्या सर्वोच्च ऑथॉरिटीने दिलेला हा सल्ला शिरसावंद्य मानावा !>>>>>
म्हणजे मी अजिबात उल्लू बनवली गेली नाहिये कारण मी आणलेल्या C आकाराच्या सोडयांत अशी रेष दिसतिये व्यवस्थित
आणि हो चव पण खुप छान आहे.. घाबरत घाबरत कालच बनवले होते
Pages