अस्सल सोडे कसे ओळखावे

Submitted by आदू on 27 May, 2016 - 13:05

सध्याच हर्णे-दापोली इथून मी वाकड्या आकाराचे(थोडेफार C आकाराचे) सोडे घेतले आहेत पण सासरच्या मंडळींचे म्हणणे आहे की लाल सरळ सोडेच उत्तम तर माहेरच्या मंडळींचे म्हणणे आहे की पांढरे सरळ सोडेच चांगले.दोन्ही कडची मंडळींमधे रंगावरुन confusion असले तरी सरळच सोडे चांगले नि आपली लेक/सुन उल्लू बनवली गेली या बाबतीत पक्के एकमत आहे(असो या मुळे का होईना दोन्ही कडे एकदा तरी एकमत झाले)
पण मला अजूनही नक्की कळत नाहिये की अस्सल सोडे कोणते नि कसे ओळखावे.कृपया आपण मार्गदर्शन कराल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक झिंग्या कसा व किती वेळ आणि कुठला झिंगा वापरला ह्यावर आहे.

काळी कोलंबी, तसेच पांढरी सुद्धा असते.
लाल सुद्धा असते.
मीठाच प्रमाण व उन देण्याची पद्धत सुद्धा असते.

( इति एक कोळीण जिच्याकडून मी सुका बाजार घ्यायची. )

काही जणं लाल रंग लावून सुद्धा विकतात. हे सुद्धा आहे. तेव्हा माहितगर कोळणीकडूनच घ्यायचे.

अमित... कोळणी माहीतगार असतात, पण प्रत्येक मासे खाणार्‍याची एकादी पेशल नेहमीची कोळीण असते. जी स्वतः मासे विकत असली तरी 'आज .... .मासा घेऊ नको' असं हळूच सुचवते. आमच्याकडे तिठ्यावर एक लीलामावशी कोळीण होती. मी लहान असताना नेहमी मासे आणायला जायचो. पैसे विचारले की 'तुका काय करूचा हा?.. पिशवेत घाल आणि घराक घेवान जा...', किंवा 'आज तू बांगडो खाव नको, मी सांगतंय म्हणान' असे सांगायची.

ती मला कधीही पैसे सांगत नसे, आणि माझे वडिल कधीतरी नंतर जे पैसे देतील ते घेत असे.
तिने एकादा मासा दिला नाही, की तो मासा आज एवढा ताजा नसणार हे आपोआप कळायचे..
.. अजूनही कुडाळच्या बाजारात अश्या नेहमीच्या कोळणी असतात. (माय, मावशी, बाय.. अशी लाडाची नावे असतात).
ती आपली कोळीण..

मी अस्सल सोडे कसे ओळखावे च्या जागी `हे असले कोडे कसे सोडवावे' वाचले आणि आत आलो ... आता जातो परत.. ओळखून झाल्यावर बनवाल तेव्हा हाक मारा

अस्सल सोडे कसे ओळखावे यासाठी नकली सोडे म्हणजे काय हें समजून घ्यावे. कोणतेही स्वस्त असे मोठे मासे कापून त्याच्या मांसल भागाचे बारीक तुकडे सुकवून सोडे म्हणून बेमालूनपणे विकता येतात. प्रत्यक्ष शिजवल्यावरच येणार्‍या वासावरून व चवीवरूनच आपण फसलो कीं नाहीं तें कळतं. आपल्या नेहमीच्या, ओळखीच्या कोळणी याबाबत फारशी मदत नाहीं करुं शकत कारण सुकी मासळी हा एक वेगळाच प्रांत असतो [हा माझा अनुभव ]. मुंबईच्या 'सिटी लाईट' मार्केटमधल्या व इतर कांहीं सुकी मासळी स्पेशॅलीस्ट्ना मीं हा प्रश्न विचारला होता पण त्यानाही निश्चित निकष नाही सांगता आले. एकाने तर मला " महेंगा होगा तो असली होनेका चान्स है, सस्ता होगा तो समझो नकलीही है !" , असा बहुमोल सल्ला दिला होता ! माझ्या मते, जिथें सोडे सुकवतात [ विशेषतः रायगड जिल्हा] तिथून ओळखीने आणलेले सोडे अस्सल असण्याची कमाल शक्यता. 'सस्ता होगा तो समझो नकलीही है ', हेंही महत्वाचं !

मी अस्सल सोडे कसे ओळखावे च्या जागी `हे असले कोडे कसे सोडवावे' वाचले आणि आत आलो ... आता जातो परत.. ओळखून झाल्यावर बनवाल तेव्हा हाक मारा................. हि हि हि हि ........म्यापन........

सोडे सरळही असतात आणि सी आकाराचेही.
कोलंबी सोलून जशीच्या तशी वाळत घातली की ती सी आकारात सुकते. पण मोठ्या कोलंब्या पायाच्या बाजूने वाळत घातल्या की त्या सरळ राहतात व तशाच सरळ सुकतात.

हल्ली कोलंबीच्या आकाराचे साचे निघालेत अस म्हणतात. त्यात काही माशांचे मास घातले की कोलंबीचा आकार येतो व ते सुकवतात व बनावट सोडे विकतात.

पण खरे सोडे ओळखायचे असतील तर त्यात थोडी लालसर छटा, लालसर रेषा मोठ्या सोड्यांना दिसते.

पूर्वी सोड्यांच्या सुकवलेल्या गोल चकत्या मिळायच्या त्यांची चव अप्रतिम असायची. हल्ली त्या चकत्या दिसत नाहीत.

भाऊ... हिंदीत बोलणारी / बोलणारा मुळात कोळीण्/कोळी नव्हे... तेव्हा त्यांच्याकडे सोड्यावर सल्ले विचारू नयेत.. Proud

पर्देसाई, तो/ती महाराष्ट्रातील कोळी/कोळीण नव्हे असं म्हणुन शकता. Wink

<< भाऊ... हिंदीत बोलणारी / बोलणारा मुळात कोळीण्/कोळी नव्हे... तेव्हा त्यांच्याकडे सोड्यावर सल्ले विचारू नयेत..>> सुक्या मासळीचं प्रचंड मोठं मार्केट आहे व तें परंपरागत बव्हंशीं मुसलमान व्यापार्‍यांच्याच [ घावूक व किरकोळ ] हातांत आहे असं मला वाटतं. 'सिटीलाईट' मार्केटमधेही ताजे मासे विकणार्‍या कोळणी मराठी भाषिक असल्या तरीही तिथले सुकी मच्छी विक्रेते हिंदी/उर्दू भाषिकच आहेत. शिवाय, कोकणच्या किनारपट्टीवरचे बरेच मच्छीमार व विक्रेते हे मुसलमानच असून ते 'टिपीकल' उर्दूमिश्रित मराठी/हिंदी बोलतात. तिसरं, आपण ज्या कोळणीना ओळखतों, त्या बव्हंशीं विक्रेत्या असतात; प्रत्यक्ष मच्छीमारीशी त्यांचा संबंध असतोच असं नाही.
तात्पर्य - सोडे अस्सल आहेत का हें ओळखण्यासाठीची माहिती रात्रंदिवस व पिढ्यानपिढ्या तोच धंदा करणार्‍या कोणत्याही भाषिकाकडून मिळवण्यात हरकत नसावी, असं मला वाटतं.

माझा प्र्श्न अतिशय हास्यास्पद वाटु शकतो हे माहितिय पण, जस वर्शभरासाठी आपण पापड,लोणची घालुन ठेवतो तस घरी कोलबी आ़णुन सुकवणे शक्य नाही का?तसाही भारतात उन्हाळा कडकच असर्‍श, हे सगळ वासाच्या बाबतीत किती बेअरबेल असेल ते खरच अनुभवल नाहीये
इथे मिळणारे प्रॉन्स्,सॅमन्,तिलापिया आम्ही फ्रोजनच आणतो ज्याला काहीही वास नसतो. कुक करताना बारिकसा आला तर येतो.
सोडे कधी खाल्ले नाहियेत पण एकुन आहे.
लहानपणि आमचे सक्खे शेजारी सिकेपीच होते पण ते लोकही मटण्,चिकन प्रेमी होते, मासेही बनायचे पण वास-बिस सुटायचा का ते काही फारस आठव्त नाहि,घरी सगले शाकाहारी असल्याने फक्त तेवढ्याचीच आदान-प्रदान व्हाय्ची नाही.

प्राजक्ता,

सोडे सुकवण्यासाठी, कोलंब्या मोठ्या प्रमाणात लागतील. शिवाय सुकवून त्याची क्वांटीटी फारच कमी होणार, म्हणजे आणताना त्या खुप मोठ्या प्रमाणात आणाव्या लागणार. त्या बाजारातून आणायच्या तर त्यात आधीच वाहतुकीचा वगैरे खर्च जमा झालेला असणार, म्हणजे ग्राहकासाठी ते काही कॉस्ट इफेक्टीव्ह होणार नाही.

म्हणून हे मासे वाळवण्याचे प्रकरण, जिथे वाहतूक खर्च शून्य ( किनार्‍यापर्यंत मासे आणण्याचा खर्च हा तसाही झालेलाच असतो ) अश्या समुद्रकिनार्‍यावरील गावातच करतात. शिवाय तिथे जो सतत वारा वहात असतो आणि खारी हवा असते त्यानेही मासे सुकायला मदत होते. एकदा ते सुकले कि ते नाशवंत नसतात, त्यामूळे साठवून ठेवता येतात आणि वर्षभरात कधीही बाजारात पाठवता येतात.

सोड्याचे माहित नाही, पण बोंबिल वाळवताना एका खास पद्धतीने ते टांगून ठेवतात.

परदेशात जिथे उन नसते तिथे मासे ( व मटणही ) धूरावर वाळवतात. आपल्याकडे निदान वेरावळ पासून दक्षिणेकडे तशी पद्धत नाही ( गरजही नाही ) कदाचित पूर्वाचलात ती असेल.

सुक्या माश्याच्या वाहतुकीबद्दल सांगायचे म्हणजे जवळा, गोलिम हे , देशावर पूर्वापार कोकणातून आणले जातात. अनेक घरात ते पावसाळ्याची बेगमी म्हणून ठेवलेले असतात.

आणि सुकवताना येणारा वास..निदान मला तरी असह्य होतो. माझ्या लहानपणी मालवणच्या राजकोटात मी आनंदाने जायचो. आता तिथे खतासाठी मासळी सुकवतात, म्हणून मला क्षणभर देखील थांबवत नाही.

सिकेपी पद्धतीने सोडे करताना हिरवे वाटण, कांदा सवताळणे, नारळाचा आपरस यामूळे फारसा वास सुटत नाही ( किंवा तो मारला जातो. )

पण म्हणजे सोडे चांगले वाईट ओळखण्याचे 100%ग्यारंटी वाले स्पेशल तंत्र नाहिये केवळ अनुभव प्रमाण मानावा असेच न
बापरे म्हणजे मला चांगले सोडे ओळखयाला शिकायला किती वर्षे लागतील Uhoh

<< म्हणून हे मासे वाळवण्याचे प्रकरण,......अश्या समुद्रकिनार्‍यावरील गावातच करतात.>> खरंय. मुंबईच्या कोळीवाड्यांत मासे सुकवण्यासाठी खास राखीव सारवलेल्या जागा असत. पण आतां वस्ती वाढल्याने हा प्रकार मुंबईत फारसा होत नाही. वांद्र्याच्या अशा कांहीं राखीव जागांवर आतां कोळ्यांचीं रितसर घरें झालीं आहेत.
मासे सुकवताना त्यांत वाळू किंवा मातीचे कण रहाणं हानीकारक असतं. म्हणून अर्नाळ्यासारख्या गांवीं काठ्या/बांबूंचे 'रॅक्स ' बांधून त्यावर सुकवलेले बोंबिल व समुद्रानजीकच्या मोठ्या खडकांवर वाळवलेले सुके मासे घेणं हितावह.

त्या बाजारातून आणायच्या तर त्यात आधीच वाहतुकीचा वगैरे खर्च जमा झालेला असणार, म्हणजे ग्राहकासाठी ते काही कॉस्ट इफेक्टीव्ह होणार नाही.
>> क्या शेफके भेसमे एक सी. ए. बोल रहा है? Wink

दिनेशदा, सोडे टोपलीच्या मागच्या भागावर किंव्हा फळीवर चिकटवून वाळवतात. वर अंजलीने माझ्या ब्लॉगची लिंक दिलीच आहे, त्यात ते फोटो पाहायला मिळतील.

चांगले सोडे कडक असतात. माझ्या ब्लॉग वर जे फोटो दिलाय त्यात आमच्या अगदी खात्रीशीर व्यक्तीकडून घेतलेले सोडे आहेत. ते अगदी ताजे आणि अस्सल सोडे आहेत. कोलंबीच्या शिरा त्यात दिसतात.

ब्लॉग वर मी सुकी मासळी कशी सुकवतात याची सचित्र माहिती दिली आहे तसेच सुकी मासळी कशी साठवावी याचीही माहिती लिहिली आहे. तसेच सोबत सोडे, सुकट, अंबाडीची सुकट यांच्या काही रेसिपी सुद्धा दिल्या आहेत.

http://purvasfoodfunda.blogspot.in/2013/10/types-of-dried-dry-fish-and-r...

Pages