राजीव साने यांची प्रकट मुलाखत

Submitted by प्रकाश घाटपांडे on 23 May, 2016 - 11:27
ठिकाण/पत्ता: 
निवारा सभागृह, नवी पेठ, एसेम जोशी फाउंडेशन समोर पुणे

अनेक इझम कोसळत वा भरकटत असताना नव्याने विचारव्यूह बांधण्याचा ध्यास घेणारे आणि कोणत्याही विषयात खोलवर शिरकाव करणारे राजीव साने एक व्यक्तिमत्व राजीव साने यांच्या गल्लत गफलत गहजब या पुस्तकाला नुकताच महारष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल त्या निमित्त
अजय ब्रहमनाळकार
प्रा. संतोष शेलार
पत्रकार निरंजन आगाशे
हे राजीव साने यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहेत. ही एक वैचारिक मेजवानीच आहे असे समजायला हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
राजीव साने मित्रमंडळ
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 4, 2016 - 08:00 to 10:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद! शीर्षकात बदल केला आहे.
पुस्तकाबद्दल मला काय वाटले!

आपल्याच प्रतिमेमधे आपण इतके गुरफटत जातो की कधी कधी गुदमरायला होत.आत्मपरिक्षण करुन तुम्हाला तुमच्या भूमिकेत काही छोटे मोठे बदल करावेसे वाटले तर तुम्हाला दुतोंडी ढोंगी गद्दार अशा दूषणांना सामोरे जावे लागते. कुठल्याही कल्ट मधे एखादा जर असा विचार करु लागला तर बूर्झ्वा बूर्झ्वा असे म्हणून त्याला कळापाबाहेर फेकले जाते.कट्टरतेत कमी पडला म्हणून कच्च मडकं आहे,कुंपणावरचे असे हिणवले जाते.
मी या समाजधुरीण कट्टर लोकांना प्रश्न विचारतो कि विज्ञान तंत्रज्ञान बदलते आहे समाज बदलतो आहे मग तुम्हाला तुमच्यात बदल करावासा वाटत नसेल तर तुमच्यात व दगडात फरक काय?
काही झाल तरी भूमिकेला चिकटून राहणे म्हणजे तत्वनिष्ठ असणे मग भले जग बदलल तरी चालेल असे असेल तर तुमच्यात व सनातन्यात फरक काय राहिला?
एखादा राजकीय पक्ष, संघटना, कल्ट, बिरादरी वगैरे यात तुम्ही जरा काही वेगळे बोललात की तुम्ही नेमके कोणाच्या बाजूचे? असा प्रश्न तुम्हाला त्या समूहातून प्रत्यक्श अप्रत्यक्षपणे विचारला जातो. अशा या आपण आणि ते या कृष्ण धवल द्वैतात विचार करणार्‍या लोकांना मधाला ग्रे एरिया दिसत नाही. किंवा असही म्हणता येईल कि त्यांना रंगीत दिसत नाही फक्त कृष्ण धवल दिसते. समूह विचार वर्तनाच्या उन्मादात त्यांचा मेंदु स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. गल्लत गफलत गहजब या राजीव सान्यांच्या पुस्तकात अशा अनेक सामाजिक दृष्टीकोनांचा विचार केलेला आहे. त्यावर भाष्यही केले आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. कार्यक्रमा निमित्ताने काही विचारांचा उहापोह होईल. आपल्याही विचरांना चालना मिळेल. तेव्हा जरुर या!

प्रकट म्हणजे प्रत्यक्ष हजर राहून दिलेली मुलाखत. व्ह्डीओ किंवा ऑडियो नव्हे. पुणेरी भाषेत नसती मुलाखत म्ह्णुन चालत नाही प्रकट म्हणावे लागते. Happy

रोचक !
राजीव साने यांच्याबद्दल अजूनही काही माहिती द्या ना !
प्रकट मुलाखत म्हणजे सर्वांसमक्ष घेतलेली जाहीर मुलाखत ना?

प्रकाश, किती सुंदर ब्लॉग आहे आणि पहिलाच लेख दिसला तो स्वरांवर. मी वाचतच राहिलो Happy धन्यवाद.

प्रकट प्रगट एकच आहे पण असे 'क' ऐवजी 'ग' का? किंवा 'ग' ऐवजी 'क' का असे प्रश्न पडतातच!!!

हो. अर्थातच.
महेश,
तुम्हांलाही येईल की शब्दकोश बघता. 'प्रगट' हा शब्द चूक, हे तुम्ही कशाच्या आधारावर सांगितलं?

प्रगट pragaṭa :

प्रख्यापनम् prakhyāpanamप्रख्यापनम् 1 Publishing, making public.-2 Com- municating.-3 Information.

प्रगट pragaṭaप्रगट Wrong reading for प्रकट.

प्रकट prakaṭaप्रकट a. 1 Evident, plain, clear, apparent, manifest.-2 Undisguised, public; अप्रकटीकृतशक्तिः शक्तो$पि जनस्तिर- स्क्रियां लभते Pt.1.31.-3 Visible.-टम्

>>प्रगट Wrong reading for प्रकट
खरेतर मी हे लिहिणारच होतो, की मुळ शब्द प्रकट असणार, पण त्यापेक्शा प्रगट म्हणायला सोपा जातो म्हणुन जास्त प्रचलित झाला असणार.
असो, चिनुक्षा, धन्यवाद माहितीबद्दल. !

मी प्रगट मुलाखत हा शब्दसमूह ऐकलेला तेव्हाच वाटलेले कि देवासारखे प्रगट होऊन दिलेली मुलाखत म्हणजेच प्रगट मुलाखत Happy

शब्दांच्या अर्थाविषयी आग्रही असणे हा राजीव सान्यांचा गुणधर्म आजचा म.टा पहा चॅटरुम मधे त्यांची मुलाखत आहे

शब्दांच्या अर्थाविषयी आग्रही असणे हा राजीव सान्यांचा गुणधर्म आजचा म.टा पहा चॅटरुम मधे त्यांची मुलाखत आहे

कार्यक्रम युट्युबवर उपलब्ध आहे. जिज्ञासा व वेळ पाहिजे ही एक वैचारिक मेजवानी आहे
राजीव साने मुलाखत भाग १

राजीव साने मुलाखत भाग २