मराठी मुलामुलींच्या प्रेमविवाहात येणारया अडचणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 May, 2016 - 18:29

सुरुवात माझ्यापासून करतो

माझ्या प्रेमविवाहात 3 अडथळे / अडचणी आहेत.
माझ्या डोक्यावर अक्षता पडाव्यात असे वाटत असेल तर थोडीफार माहिती आणि जाणकारांचा सल्ला हवाय.

*1) जात*

प्रश्न - धर्मांतराप्रमाणे जात बदलता येते का?

मी ज्या जातीत जन्म घेतला आहे त्या जातीला शोभेसा असा कोणताही गुण माझ्या अंगात नाही. शोभेसा म्हणजे आमच्या जातीतील लोकांना आपल्या ज्या गुणांचा अभिमान आहे ते माझ्यात नाहीत.

तसेच आमच्या जातीतील दुर्गुण म्हणजे जे ईतर जातीतल्या लोकांना आमच्या जातीतील लोकांमध्ये दिसतात त्यापैकीही एकही नाही.

त्यामुळे मला आजवर माझ्या जातीचा ना अभिमान वाटत होता ना लाज वाटत होती.

पण आज अडचण मात्र वाटतेय.

कारण लवकरच ही जात माझ्या लग्नाच्या आड येणार आहे.

जर आमच्या दोघांपैकी कोणी एकाने दुसर्याची जात कागदोपत्री स्विकारली किंवा दोघांनी तिसरीच जात लावली तर ही अडचण सुटण्यास मदत होईल.

समाजमान्यतेनुसार वर असलेल्या जातीतून खाली असलेल्या जातीत जाणे सोपे पडेल की व्हायसे वर्सा सोपे पडेल?

कृपया धर्मांतराचा सल्ला देऊ नका. कारण मी नास्तिक असलो तरी गर्लफ्रेण्ड आस्तिक आहे आणि तिला देव बदलायचा नाहीये.

तळटीप - एखादा सल्ला मस्करीत दिला तर तसे नमूद करा अन्यथा तुमचा एक मजेचा सल्ला आमचा जीव घेऊ शकतो.

*2) पत्रिका*

पत्रिकेत काहीसे 34-36 गुण जुळवायचे असतात. आमचे दहाबाराच की काहीसे बरेचसे कमीच जुळताहेत. याऊपर कसलेसे विघ्नही आहे ज्यानुसार आमचे लग्न झाल्यावर पाच वर्षांच्या आत एकाचा अपघाती मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे तेव्हा समजले जेव्हा आमचे लग्न करायचे नक्की झाल्यावर आम्ही बाहेरच्या बाहेर पत्रिका चेक केली. आमचा दोघांचा यावर विश्वास नसल्याने आम्ही मागे नाही हटणार, पण दोन्ही घरचे लोक पत्रिका बघण्यावर विश्वास ठेवणारे आहेत त्यामुळे ते आम्हाला पुढे जाऊ देणार नाहीत.

हा गुंता कसा सोडवावा. नकली पत्रिका बनवून घरच्यांना अंधारात ठेवावे की त्यांना खरे खरे सांगून आपल्या प्रेमाचे भविष्य अंधार्या खाईत लोटावे..

*3) घर (मुंबईत घर)*

सध्या जे मुंबईत घर आहे ते आईवडिलांचे आहे. लग्नानंतर लवकरच स्वत:चे घ्यायचा विचार आहे. किंबहुना ते बूक करून मगच लग्न करायचे आहे.
सध्याच्या आकडेमोडीनुसार दोघांचे पगार आणि बचत जोडून 55-60 लाखापर्यंत घराचे बजेट जातेय. एखाद्या छोट्या शहरात ही रक्कम मोठी वाटू शकली असती. पण मुंबईत वन बीएचके मिळायचे वांधे झाले आहेत. आणि एकीकडे मराठी माणसांनो मुंबईबाहेर पडू नकाचे नारे लावले जात आहेत.
खरे तर मलाही मुंबई सोडायची नाहीयेच. पण आता पन्नास साठ लाख खर्च करून काय मुंबईच्या वन रूम किचन मध्ये लोअर मिडलक्लास बनून राहायचे का? आणि अश्या पोराला आपली पोरगी द्यायला कोणता बाप तयार होईल? माझ्या गर्लफ्रेंडचे वडील तयार होतील का हा प्रश्नच आहे.

____________________________________

असो....

तर या माझ्या प्रेमविवाहात असलेल्या तीन अडचणी आहेत. कमी अधिक प्रमाणात या तीन किंवा ईतर अडचणी (आपापल्या परीने भर टाका) मराठी मुलांच्या प्रेमविवाहात असतात. त्या सर्वांची सांगोपांग चर्चा करायला हा धागा. इथे तुम्ही एका मराठी मुलाचे किंवा मुलीचे पालक म्हणूनही चर्चेत भाग घेऊ शकता. चर्चेचा फायदा सर्वांनाच.

आपला नम्र,
नवतरुण ऋन्मेष

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रि, चांगली एंटरटेनमेण्ट होतेय.. अळी मिळी गुप चिळी...

जाऊ दे धागा पुढे.

ऋन्म्या तू काढ रे धागे.. आम्ही वाचतोय.

हायला इथे सुपरक्लासवनची पोस्ट असून बरोबरीचे एक स्थळ मिळत नाही धडाचे लग्नाला अन झोपडपट्टीवाल्या दादांना किती सुगीचे दिवस आलेत. नशीब घेऊन येतो भो एकेक जण Proud

जिद्दू धन्यवाद धागा वर काढल्याबद्दल. त्यामुळे हे लक्षात आले की आज पाच वर्षांनीही मध्यमवर्गीय मराठी मुलांची परीस्थिती बदलली नाही आणि कदाचित पुढची ५० वर्षेही बदलणार नाही.
त्यातल्या त्यात माझे लग्न माझ्याच गर्लफ्रेंडशी झाले हिच समाधानाची बाब Happy

जिद्दू मध्यमवर्गीय? Happy >>> त्यांना मध्यमवर्गीय म्हटलेले नाहीये, गैरसमज नसावा. आजूबाजूच्या मध्यमवर्गीय वा उच्चमध्यमवर्गीय मराठी मुलांबाबत म्हणत आहे. आजही त्यांच्या लग्नाची परीस्थिती तशीच वाटत आहे असे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे. सर्वात वाईट तर माझ्या मंगळ असलेल्या मित्रमैत्रीणींबद्दल वाटत आहे. पण तो एक वेगळाच विषय आहे. मनुष्य मंगळावर पोहोचला तरी तो कायम राहणार..

हो खरे आहे. मुलामुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षांचा अंत नसल्याने अशी बरीच मंडळी सभोवताली दिसतात.

ऋन्मेषजी सहज एक बाळबोध शंका(कृपया हलके घ्या, खुप पर्सनल वाटलं तर सोडून द्या,वाईट वाटलं तर क्षमस्व)
May 2016 ला हा धागा आणि आज एका धाग्यावर मुलगी दुसरीत असं वाचलं
मुलीला इतक्या लवकर शाळेत का घातलंत..?

छे हो, पर्सनल कसले. तुम्ही जुन्या सभासद नसाव्यात म्हणून ही शंका.

ऋन्मेष हा खरे तर माझा डुप्लिकेट आयडी आहे. मूळ आयडी तुमचा अभिषेक. पाच सहा वर्षांपूर्वी तो वापरणे मी सोडले आणि ऋन्मेष नावाचा नवीन आयडी काढून त्यामधून धागे काढू लागलो.
त्यामुळे प्रत्यक्षात मी विवाहीत आणि एक मुलीचा बाप असलो तरी ऋन्मेष नावाच्या प्रोफाईलमधून जे लिखाण करायचो ते बॅचलर म्हणून करायचो ज्याला बायको नसून एक गर्लफ्रेंड होती. पण याचा अर्थ यातून लिहिलेले लेख वा माहिती खोटी होती असे नाही तर लिहिलेले सारे डिटेल्स माझेच होते. फक्त काही वर्षे जुने, म्हणजेच भूतकाळातले होते. जसे यातही लिहिलेय ते आंतरजातीय विवाह. पत्रिकेतला मृत्युयोग वगैरे सारे खरे होते. फक्त आयुष्यात आधीच घडले होते.

काहींना हे तेव्हाही माहीत होते तर बहुतेकांना नाही. वर्ष दोन वर्षापूर्वी ऋन्मेष आणि अभिषेक एकच आहेत हे मी ऑफिशिअली उघड केले आणि ऋन्मेष याच आयडीतून लिखाण करायचे ठरवले.

ऋन्मेष हा खरे तर माझा डुप्लिकेट आयडी आहे. मूळ आयडी तुमचा अभिषेक.
>>> खतरनाक कन्फेशन.. आज ही गोष्ट कळाली...

Pages