क्षितिजपार अंबर आहे

Submitted by वैवकु रीटर्न्स on 17 May, 2016 - 06:16

क्षितिजपार अंबर आहे
हा प्रवास खडतर आहे

दु:खावरती फुंकर फ्री
ही नवीच ऑफर आहे

दुनिया हसते माझ्यावर
मी बहुधा जोकर आहे

इमले आठवणींसाठी
स्वप्नांना तळघर आहे

बेफिकीरही नाही मी
मी कुठला कणखर आहे

खोल बुडाल्यावर कळते
जे आहे वरवर आहे

जग-बिग मायावी असते
हा विचार सुखकर आहे

तू असणे अन तू नसणे
केवळ शब्दांतर आहे

~वैवकु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल मस्तच

प्रतिसाद अर्धाच उमटला :

कणखर वरून माझा एक शेर आठवला

बेफिकीरची श्रीमंती बघ जय
तुझ्याकडे ते वैभव आहे का

धन्यवाद दोघांचे

दोनच जणांच्या प्रतिक्रिया आल्याचे पाहून अपेक्षाभंग झाला

लोक मुद्दम प्रतिक्रिया देत नाहीयेत की ही गझल तितकी चांगली नाही हे समजत नाही आहे

पूर्वी मायबोलीवर गझलकारांना चांगले दिवस होते. खूप आठवत राहतात ते दिवस

असो

धन्यवाद बेफिजी
मायबोलीवर मी हल्ली पुन्हा गझल प्रकाशित करत आहे त्याचे एकमेव कारण हेच की इथे सादर केले की आपल्या नजरेखालून नक्कीच ते लेखन जाईल याची खात्री असते
आणि आपला प्रतीसादही आला तर मग केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटते

अशीच कृपादृष्टी असूद्यावीत प्लीज Happy
_/\_

दु:खावरती फुंकर फ्री
ही नवीच ऑफर आहे

नाविन्य आहे शेरात.

इमले आठवणींसाठी
स्वप्नांना तळघर आहे

सुरेख…

एकूणात गझल मस्त आहे.