ओट्स चॉकलेट क्विक मग केक

Submitted by मंजूडी on 27 April, 2016 - 00:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मैदा कणकेतले कार्ब नाहीत, तुपातेलाची फॅट नाही आणि झटपट होणारा हा 'चॉकलेट केक' मला कुठेतरी इंटरनेटवर सापडला होता. तो एका स्टिकनोटवर लिहून ठेवला होता. एका फायलीत ही स्टिकनोट काल सापडली, लग्गेच घरी गेल्यावर रात्रीच्या (माझ्या) जेवणासाठी हा केक केला, खाल्ला. लई भारी लागला. आता वरचेवर करता येईल आणि बरीच व्हेरीएशन्सही करता येतील.

ओट्स - १/३ मेजरींग कप
केळं - १ वेलची केळं किंवा हिरव्या सालीचं असेल तर अर्ध केळं पुरेल
साखर किंवा मध - चवीप्रमाणे
कोको पावडर - एक टेबलस्पून
बेकिंग पावडर - १/४ टिस्पून
चिमूटभर मीठ
व्हॅनिला किंवा चॉकलेट इसेंस
दूध - २ किंवा ३ टिस्पून

क्रमवार पाककृती: 

१. ओट्स मिक्सरमधे बारीक करून घ्या. भाजायची गरज नाही.
२. केळं चांगलं कुस्करून घ्या.
३. कुस्करलेल्या केळ्यात आता दूध सोडून बाकीचं सगळं साहित्य छान मिसळून घ्या.
४. आता त्यात हळूहळू दूध घालून ढवळा. ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. ३ टिस्पूनच्या वर दूध लागणार नाही.
५. आता एका मगमधे हे मिश्रण घालून मायक्रोवेवमधे हाय पॉवरवर दीड मिनिट ठेवा.
६. दोन मिनिटे स्टँडिंग टाईम, मग मग केक आणि आपणच!

oats choco cake.jpg
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिस्पून - पोहे खायचा चमचा.
तसंही हे प्रमाण अंदाजेच आहे. म्हणजे लागेल तसं दूध घालायचं आहे.

मी करून पाह्यल हे ...
केळ ची चव जरा overpowering लागली...
झट्पट झालं न कॅलरचि काळजी न करता काहीतरी ग्रमगरम चह सोबत खायला करता आलं.
रेसिपी बद्दल धन्यवाद.

मायक्रोवेव्ह मध्ये केल्याने कोरडा होत नाही का केक? (मी मधी मायक्रोवेव्ह मध्ये बेक केला नाही म्हणून विचारत आहे.)

अर्थात हे मिक्स्चर मफिन पॅन मध्ये घालूनही करता येईल. तसं करून बघते.

कोरडा नाही झाला..पण केक सारखा वाटला नाही...
नवीन प्रकरच कोको न केळाच्या चवीच ओट्मील खाल्यासारख वाटलं ( मला)
व्हेरिअशन्स करणं शक्या आहे...
झट्पट न गरमगरम ( आणि हेल्थी इन्ग्रेडियंट्स).... मी परत नक्की करून बघेन.

अरे किती वेळ मी ते मग मराठीत मग = "नंतर" याअर्थी वाचत होते. अचानक साक्षात्कार झाला Wink

हेल्दी दिसतेय. कधीतरी करून पाहिन.

सशल, हा मग केक 'बेक' नाही करायचा आहे, 'मायक्रोवेव' मोडवर करायचा आहे. हा मोड जनरली 'शिजवणे' या क्रियेसाठी वापरला जातो. त्यामुळे, आणि ह्यात केळं घातलेलं असल्याने केक कोरडा होत नाहीये. मॉइस्ट होतोय छान. तसंही मग केक हा लगेच खायचा असतो, करून ठेऊन काही काळाने खाल्ला तर कोरडा लागू शकेल.

ओट्स + अळशीची पावडर घालून करायच्या अजून एका केकची मला कृती मिळाली आहे, नीट लिहून ठेवली आहे कुठेतरी Happy
ती स्टीक नोट सापडली की करून बघेन आणि चांगला (यशस्वी) झाला तर इथे लिहीन. तो केक कदाचित 'करून ठेऊन काही काळाने खाणे' यासाठी योग्य असेल.

बीनू, केळं जास्त झालं का?
माझ्याकडची कोको पावडर स्ट्राँग आहे बहुतेक, त्यामुळे मला ओट्सची चव नाही लागली. लेकीने तर मागून मागून जवळजवळ अर्धा मग केक खाल्ला, वर एकच का केला म्हणून तु.क. टाकत होती.

एक केळं घेतलं होतं...अमेरिकन साईझ चं ...
आता परत वाचलं वरती.. वेलची केळं किंवा अर्ध केळं घ्यायचय म्हणून...
पुन्हा करतान अर्ध केळं घेवून करून बघेन ...म्हणजे खावून बघेन Happy