बा रा ए. वे. ए. ठि. म्हणजेच दस का दम

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

होणार होणार म्हणून गाजत असलेलं बा. रा. चं ए. वे. ए. ठि. पार पडलं. दर सहा महिन्यानी ए. वे. ए. ठि. होतंच पण ते होणार की नाही यावर 'हो' 'हो', 'नाही', 'नाही' चं ग्यानबा तुकाराम चालू असतं. नेहमीची मंडळी हो म्हणत असते, पण पार दक्षिणेपासून सिंगापूर पर्यंत बरेच लोक, 'चक् चक्' काही होणार नाही असं म्हणत असतात. यावेळी स्थानिकानी 'मला नाही जमणार,' असा सूर लावला तर दक्षिण वारे अगदी यायला तयार. तिकडे सिंगापूरहून, 'कचर्‍याच्या पिशव्या कोण आणणार? आणि Dustbin असणार का अशी प्रेमळ विचारपूस सुरू झाली. एकंदरीत 'जलने वाले जला करें' असं वाटावं एवढ्या लोकांनी ए. वे. ए. ठी. होणार असा संकल्प सोडला. त्यांचं काय जातंय म्हणा. झालं तरी 'वावा' म्हणायचं आणि नाही झालं तरी. तसं मॄ चं तिकीट सोडता फारसं कुणाचंच काही गेलं नाही, हे ही खरंच.

जय्यत तयारी करावी आणि माशी शिंकावी तसं काहीतरी माझं झालं. एक Client त्याच दिवशी परीक्षेला बसायचं म्हणून अडून बसला, आणि त्यामुळे मला 'हाताला हात' म्हणून त्याच्या बरोबर बसून रहावं लागलं. पावभाजी आणणार अशी मी मोठ्ठी जाहिरात करून ठेवली होती. शेवटी ती परीक्षा तो पास झाला आणी पाऊण वाजता माझी सुटका झाली. घरी गेलो, बायकोला गाडीत घेतली (पावभाजी तिनेच केली होती) आणि निघालो. एका वळणावर ब्रेक मारावा लागला, आणि पावभाजीचा Trey गाडीतच आडवा झाला. (गरजूनी हवी तर माझ्या गाडीत पुन्हा एकदा बसून खात्री करावी, पावभाजी किती छान झाली होती ते वासावरून कळेल). मग अर्ध्या वाटेत गाडीतली पडलेली पावभाजी काढणे, शक्य तेवढी गाडी स्वच्छ करणे इत्यादी प्रकार करून झाले. आता एवढी वायफळ बडबड केलेली आहे, तेव्हा परत Veg Biryani ऑर्डर करणे, ती तयार होईपर्यंत वाट बघणे इत्यादी प्रकार करणे आलेच. शेवटी मी पोहोचलो तेव्हा.. जवळपास सगळं जेवण संपलेलं होतं.

भेळ संपलेली, मिसळीच्या Trey मध्ये फारसं काही न उरलेलं, अजून कोणी कोणी काय काय आणलेलं त्याचा पत्ता नाही. फक्त काही समोसे आणि मी आणलेली Veg Biryaani एवढंच शिल्लक होतं. त्यात एक डब्यात लाडू दिसले. मला जुनियर लाडवाक्कांची आठवण होतेय न होतेय, तेवढ्या आद्य लाडवाक्काच समोर दिसल्या. त्या येणार नव्हत्या म्हणे, त्यामूळे मी दोनदा डोळे उघडझाप करून खात्री केली. लाडवाक्का समोरच होत्या. त्याअर्थी लाडू त्यानीच केले हे मान्य करायला पर्यायच नव्हता. मी आता काय बोलू असा विचार करत होतो, पण तेवढ्यात नयनीश नामक माणसाने 'एकदा खाऊन बघा, तुम्हाला बोलायला जागाच उरणार नाही' असं म्हणाला. बेसनाचा लाडू म्हणजे नक्कीच टाळूला चिकटेल त्यामुळे बोलता येणार नाही असं तो म्हणत असावा असं मला वाटलं, पण लाडू खाल्यावर पण 'आलीस का?' असं म्हणून शकलो मी. तेव्हा तो तारीफ करत होता हे लक्षात आलं.

थोडी बिर्याणी घेऊन मी मायबोलीकरांकडे मोर्चा वळवला. त्यात नयनीश मला 'काका' म्हणेल की काय अशी भीती वाटावी एवढ्या वेळा 'अहो देसाई', 'अहो देसाई' म्हणाला. शेजारी बघतो तर लालू. मला एक क्षण हेच कळेना की माझा मोरू करायला हे सगळे जमले होते की काय? लालू तर दरवाजा उघडण्यापासून हजर होती म्हणे. कालपर्यंत 'मला वेळ नाही रे, एवढी कामं आहेत' असं म्हणत होती आणि आज एकदम मुहुर्तावर हजर. मी इकडे तिकडे शोधून 'मॄ' आल्याची खात्री करून घेतली. ती आली नसती तर सगळे मिळून 'April Fool' असं Fedbruary' मधेच ओरडणार असं मला वाटायला लागलं. मॄ होतीच पण ती 'बालगीत' वगैरे काही म्हणताना दिसली नाही. पण कुणितरी लांबून 'ती मॄ' असं मला सांगितलं. तिकडे अजून एक चेहरा. मी ओळख दाखवावी म्हणून 'हसलो' तर ती ढीम्म. मी या मुलीला ओळखतो. नुसता ओळखतोच असं नाही तर पुण्याला गेलो तर तिला भेटल्याशिवाय मी परत येत नाही. ज्यानी ज्यानी मला 'परदेसाई' मधे मदत केली त्यात आरतीचा नंबर पहिला. ती अचानक 'बा. रा. ए. वे. ए. ठि.' ला आणि मला ओळख पण दाखवत नाही. हे सगळे विचार माझ्या डोक्यात आले. मी परत अस्पष्ट असं हसून पाहिलं पण तरी ती ढीम्म. मग कोणीतरी मला ती 'सिंडरेला' आहे असं सांगितलं. माझ्याकडे एका दोघानी विचित्र नजरेने पाहिल्याचा भास झाला. ही सिंडरेला? मी गेली दोन वर्ष तिच्याशी गप्पा मारतो ती सिंडरेला? मी चक्रावलोच. मग मी तिला तिचं जन्मगाव, आडनाव आणि 'आरती' बद्दल विचारलं तर ती तिची बहीण निघाली. या दोघी बहिणी माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत पण त्या एकामेकाच्या Mirror Image आहेत हे मला माहीत नव्हतं. या कानाची त्या कानाला खबर न लागू देणे म्हणजे काय ते कळलं. त्या जुळ्या असाव्यात असा माझा संशय आहे. कपाळावरच्या आठ्या पण Same आहेत असं ती म्हणाल्याचं मला आठवतं.

तसं मला सगळंच आठवतं, कारण मी अजून 'करोना प्यार है' कडे वळलो नव्हतो. खरं तर झक्की सोडता कुणीच ते अग्निहोत्र सुरू केलेलं मी पाहीलं नाही. पण आल्या आल्या 'रुणी' ने ग्लू वाईन केल्याचं आणि त्याचा परीणाम बर्‍याच लोकांवर झाल्याचं दिसत होतं. झक्की मात्र होमात समिधा टाकल्यागत करोनाच्या प्रेमात पडले होते. आणि हो, मैत्रेयीने वेळेवर येऊन तिचा आतापर्यंतचा विक्रम मोडला म्हणे. खरं तर सर्वात आधी कोण आलं हा अजुनही वादग्रस्त मुद्दा आहे. लालू, रुणी (की रुनि?) हे दरवाजा उघडायच्या वेळी हजर होते म्हणे. पण त्याआधी त्याना संदीप दिसला असं ते म्हणाले. संदीपनेही वेळेआधी येऊन त्याचाही आधीचा विक्रम मोडला होता. पण चावी मैत्रेयीकडे असल्यामुळे दरवाजा दुसरा कोणी उघडणार नव्हते. पण ग्लू वाईन पोटात गेल्यावर बहुतेक मंडळी मी आधी मी आधी करत असावी.

थोडं फार खाऊन झाल्यावर मग मी Amplifier, Microphone, Speakers वगैरे लावले. यात मला 'अहो' म्हटल्याबद्दल नयनीशला शिक्षा म्हणून भला मोठ्ठा Amplifier उचलायला लावला. श्री फु़जीसान (म्हणजेच सायोनारा यांचे उत्तमांग (Better Half)) Laptop घेऊन काराओकी करायला सज्ज होते. मी माझा मोरू होणार या भीतीने ओळख म्हणून सगळ्यांची नांव आणि ID विचारून घेतले. त्यात काही लोकांनी आपले किती Duplicate ID आहेत, आणि ते आपण कोणकोणत्या कामासाठी वापरतो हे जाहीर केलं (नाही). चि. आदित्यने आपलं नाव सांगितलं पण आईचं नांव सांगायला लाजला. श्री. अजयकुमार 'मासे' नसल्यामुळे थोडे नाराज वाटले. सँटिनो 'अनुराधा' असं काही तरी म्हणणार होता पण त्याला 'गूरू अनुराधा नहीं, बिंदू... बिंदू' अशी समज कुणीतरी दिली. झक्कीनी नवीन बाटली उघडली. नयनीश तरूण असला तरी त्याला बियरची बाटली दातानी उघडता आली नाही तेव्हा त्याचे प्रशिक्षण द्यावं लागलं. बायकोसमोर आणि शिंडेसमोर मी बाटली त्याला देऊ नये अशी त्याने कळकळीची विनंती केली. काराओकीवर गाणी कोण म्हणणार असा प्रश्न निघताच स्वाती सोडता कोणीच हो म्हणेना. शेवटी मी एक गाणं म्हटलं. ते काराओकीपेक्षा नुसतच 'ओकी' झालं. त्यामुळे विनय गाऊ शकतो तर मी का नाही असं विचार करून अजून काही लोक तयार झाले. सँटीनो, श्री. फु़जीसान, आणि मग नयनीश यानी गाणी म्हटली. नयनीश गातोय म्हटल्यावर सौ. नयनीश उठून फेर्‍या मारायला लागल्या, का ते कळलं नाही. गृहिणी (हा आयडी आहे) स्वतः म्हणून गायला तयार झाली. तिचं गाणं Prompting मध्ये पूर्ण करावं लागलं. म्हणजे एक ओळ ती म्हणाली, मग ऊठून जायला लागली, मग मी पुढची ओळ सांगितली, मग ती ती ओळ म्हणाली, मग उठून जायला लागली, मग मी अजून दोन शब्द असा प्रकार बराच वेळ झाला. खरं तर अश्यावेळी लोक, 'तूच ते गाणं पूर्ण का करत नाहीस?' असं म्हणतात पण माझ्या गाण्याची Quality आधीच लक्षात आल्याने लोकाना 'Prompting चालेल पण विनय नको' असं झालं होतं. अश्यावेळी लोक खरं बोलत नाहीत आपण ओळखावं लागतं. फक्त झक्की तेव्हा खरं बोलत होते म्हणे.

मग स्वातीने माईकचा ताबा घेतला (माईक हा आयडी नाही, आणि माबोकर पण नाही). ती गायला लागल्यावर मात्र समोर काहीतरी चांगलं घडतंय म्हणून ऐकू लागले. तिचं गाणं आणि ग्लू वाईन यांच्या एकत्रिक परीणामामुळे लोक इतर गाणी विसरले असावेत (विशेषतः माझं) असा अंदाज आहे. मध्येच संदीपच्या जावयबापुनी 'तुझे देखके मेरी मधुबाला' म्हणून करमणूक केली. संदीप 'सपनोकी रानी' म्हणणार होता, पण बायको समोर असल्यामुळे त्याच्या विचार रद्द झाला. मग भाईनी Closing म्हणून GTG गाणं म्हणून दाखवलं. ते हिमेशपेक्षा चांगलं पण हिमेशच्या चालीत गात होते. त्यात ए. वे. ए. ठि. न म्हणता GTG म्हटल्यामुळे झक्कीनी हरकत घेतली असं ऐकिवात आलं. पण ती हरकत नसून नुसताच घोट होता हे कळलं. मध्येच शोनू उठून Parol संपला म्हणुन निघाली. मला वाटलं Petrol संपलं म्हणाली का काय? झक्की पेट्रोल टाकत होते.

मग Stand up Comedy ची वेळ होती. संदीपने सुरुवात केली. सगळे हसले. विनोद पुण्यावर होते. त्यामुळे पुणेकर जरा जपून जपून हसत होते. संपल्यावर 'त्यात काय, सगळं खरं आहे पुण्याबद्दल, त्यात हसायचं काय?' असं म्हणून झक्कीनी पुणेकरांची बाजू घेतली. हा करोनाचा परीणाम असावा. कारण झक्की आणि पुणेकर यांच्यातून 'पोस्ट' (विस्तवासारखे ) जात नाही हे सगळ्यांना माहीती.

मी पुणेकरान्ना 'तुमच्यावर विनोद नाही' असं आश्वासन दिलं म्हणून मग ते हसायला तयार झाले. काही लोक 'पुणेकरांवर विनोद नाही, तर हसणार कशावर म्हणून नाराज दिसत होते', विशेषत: बायको पुण्याची आणि नवरा पुण्याचा नाही असे लोक. त्यानी नंतर मला भेटून त्यांची नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केली आणि ते संदीपची पाठ थोपटायला गेले.

मृ बालगीतं म्हणणार होती, सँटीनो मुलं संभाळणार होता, पण हजर असलेली मुलं आपल्यापेक्षा खूप लहान आहेत हे त्याच्या लक्षात आलं. मग ते दोघे चहा कॉफी आणायला निराकारला घेऊन गेले. 'निराकार' हा जुना Original ID आहे पण हल्ली त्याची बायको तो Duplicate म्हणून वापरते असं कळलं. भाईंचे Duplicate Id कोणते यावर चर्चा झाली. Garbage Can बघून 'तुम्ही 'बी' च्या सगळ्या सूचनांचा मान राखलात' असंही कोणीतरी म्हणालं.

लालूने काहीतरी पदान्यास करून दाखवले. पण Plainsboro मध्ये भुकंप नको म्हणून ती थांबली. त्याला हिलेरी क्लिंटन Steps म्हणतात असं म्हणाली. One small step for a woman, one giant step for womankind असं हिलेरीचं भाषण तिने लिहून आणलं होतं. सिंडरेला चारचौघात सावासारखी असते, पण अंदरसे मामला निराला है, हे तिनेही मान्य केलं. नयनीश 'तरी मी तुम्हाला रोज ओरडून ओरडून हेच सांगत असतो,' असं म्हणाला. त्यावर त्याच्या सौंनी डोळे वटारले म्हणे. प्राजक्ता हल्ली 'तुका म्हणे आता उरले ए. वे. ए. ठि पुरती' म्हणणार होती, पण भजनाची कारओकी नव्हती. 'बर्‍याच दिवसानी दिसलीस' असं मी म्हटल्यावर 'काय करणार तुम्ही Busy ना' असा पुणेकरी खाक्या दाखवून मोकळी झाली.

मग कॉफी आली. त्यात Who's line is this Anyway' या भाईंकॄत गेमात लाडवाक्कानी बाटली लाटली. शेवटच्या क्षणी यायचं ठरल्यामुळे त्या सगळ्यांची मुक्ताफळे वाचून आल्या होत्या. रुनि यांचे यजमान आणि रुनि यानी पण बरीच उत्तरे बरोबर दिली म्हणे, पण Cheating केले असणार नाही तर मायबोलीकर नग बरोब्बर कसे ओळखता येईल असा त्यांच्यावर संशय घेण्यात आला म्हणून त्यांचे बक्षिस रद्द झाले. लाडवाक्क्काना 'Mayabo Liquor' ची बाटली मिळाल्यावर चि. आदित्यने ती प्राणपणाने जपली. मी शेजारचा भाताचा डबा ढापायचा प्रयत्न केला तेव्हा 'Hey that is ours' असं भीमपलासीत म्हणाला.

पुढंचं ए. वे. ए. ठि. झक्कींच्या बागेत, पुन्हा एकाद्या हॉल मध्ये, किंवा माझ्या घरी करावे असं लोक म्हणायला लागल्यावर मी काढत पाय घेतला. मला पावभाजी साफ करायची होती. लोकानी आपला मोरू करायच्या आधी सटकले म्हणजे बरे नाही का?

समाप्त... (आणि सगळ्यांना एक भला मोठ्ठा दिवा). Lol

तळटीप:
१. लालू (हजर रहाणे), संदीप आणि मैत्रेयी (वेळेवर हजर रहाणे) आणि झक्की (करोना प्यार) यानी बरेच विक्रम मोडल्यामुळे हल्ली वेताल एकटाच फिरतो म्हणे.
२. सँटीनोने सगळ्यांना भेटल्यावर आपल्या आयडीत 'बी' असावा असा निर्णय घेतला.
३. वॄत्तांत वाचायला मिळत नाही त्यामुळे नाईलाजाने नयनीश सध्या परदेसाई वाचतोय अशी बातमी आहे.
४. वॄत्तांताचा घाऊक ठेका मी घेतला आहे का? या प्रश्नाला 'हो' असे उत्तर देऊन 'मधुरिमा' यानी 'हम भी कुछ कम नहीं' हे सिध्द केलंय.
५. यात कुणाचा अनुल्लेख झाला असेल तर मी जबाबदार नाही. बियर बाटल्या दाताने उघडल्यामुळे होते असे कधी कधी.
६. भाईंनी बंगाली StandUp करून दाखवले. पण हा बिक्रोम लोक्षात ठेबता ऑलॉ नॉही.
७. पुढच्या ए. वे. ए. ठि. ला सूचनांपेक्षा हजेरीकडे जास्त लक्ष देण्यात येईल असा ठराव मी पास केला आहे.
८. 'अजून येऊ द्या' म्हणणार्‍या आणि 'ए. वे. ए. ठि' च्या आधी वॄत्तांत मागणार्‍या मंडळीना पुढच्या वेळी 'उरलेली पावभाजी' साफ करायच्या कामावर नियुक्त करण्यात येईल.

प्रकार: 

बघतो तर दोन मुलं झक्कींच्या खुर्चीच्या खाली आडवी पडून त्यांना खालून काहीतरी टोचत होती.
>> Biggrin यात नक्की माझी लेक असणार्! तिला खुर्चीखालून लोळताना पाहिलं होतं मी पण लक्ष द्यायला वेळ नव्हता Happy

आलोच मी जरा पुन्हा एकदा नीट वाचतो म्हन्जे झालं! Happy

तुमचा कार्यक्रमही छान झाला. << शेवटी कुणीतरी म्हणालं नशीब... मला वाटलं 'बरा होता कार्यक्रम, Jerry Seinfield चे विनोद होते का ते?' असं विचारलं जाईल.. Lol

तरी आता ज्यानी ज्यानी झलक पाहिली आहे, त्यानी त्यानी 'तेंच्या मराठीमंडळातर्फे आमाला आवताण द्यायचं आहे, काय....(दरडावून)' Happy

लाडू फ्लोट, आणि लाडू सॅण्डवीच पुढच्यावेळी मेन्यू वर असतील.. खात्री असावी.

आई (चांगलं) खायला देत नाही वाटते घरी <<<<<

मायबोलीची टोपी घातल्याबद्दल सुज्ञ माणसांचे आभार.. Happy

तुम्ही (म्हणजे देसाई) दोन मुलीं असूनही फार्फार तरुण दिसता असे त्यांचे म्हणणे आहे.<<<<
त्याना योग्य ती समज आणि पुस्तक वाचायला दिले आहे. Happy
माझ्या छोट्याश्या मुली १५,११ असून जुळ्या नाहीत. वेगळ्या दिसतात.. Happy

"तुम्ही रेडिओवर का गात नाही ?""<< आभार.. पुस्तक वाचायला सुरूवात केल्याबद्दल...

विनय

विनय मस्त वृत्तांत. परत एकदा सगळ्यांना भेटल्यासारखं वाटलं.
प्राजक्ता

>>मुलं झक्कींच्या खुर्चीच्या खाली आडवी पडून त्यांना खालून काहीतरी टोचत होती.
बघीतलंत, मायबोलीकरांच्या एकचतुर्थांगांनी (स्वातीकडून साभार) आपलं मनोरंजन कशाकशाप्रकारे करून घेतलं ते?
पोरांच्या हातात पेन, मोटार गाड्या, विमानं असलं कायकाय होतं! बिचारे झक्की!

सिंडे, तुझा लेकात भविष्यातल्या आयर्न शेफचे गुण आहेत हे तुला जाणवलं नाही का? तो लालुला ब्रेड आणि लाडूची नवी पाककृती सांगणार होता. पण तीनं संधी हातची घालवली! Happy

>>मायबोलीची टोपी घातल्याबद्दल सुज्ञ माणसांचे आभार..
तर माटोसूमा तुनळीवर व्हिडिओ लोड करणार आहेत का?

विनय Lol सही लिहिलंय Happy

    ***
    "If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away." - हेन्री डेव्हिड थोरो

    दोनदा वाचून आता काहीच प्रश्न उरले नाहीत Happy बाकी जे काही ठराव मांडले आहेत त्यांची अंमलबजावणी होईल नं? Happy अन् जे काही आहेत ते प्रत्यक्ष भेटल्यावर विचारीन काय?

    आज बर्‍याच दिवसांनी माबोवर आलो आणि हा वृत्तांत पाहिला.
    मस्त जमलाय रे विनय.
    तेवढं 'दरवाजा कुणी उघडला?' या प्रश्नाचं उत्तर राहिलंच के अजून !
    ------
    सँटिनो -- आता आम्ही आदित्यला सांगू -- बेटा सो जा, नहीं तो सचिनकाका आ जाएगा (और तुम्हारा जंगल बुकवाला शर्ट मांगेगा Happy )

    Pages