'ती' आणि 'प्रेम'

Submitted by अनमोलप्रित on 25 April, 2016 - 03:47

मार्च २०१६ सुरु झाला आहे, उन्हाची झळ चांगलीच भासू लागली आहे; परंतु आज संध्याकाळी अचानक ढगाळ वातावरण तयार झाले व काही वेळातच पावसाच्या सारी बरसू लागल्या. ऑफिसिमध्ये बसून तेच- ते रटाळवाणे काम करत होतो. पण या एकाएकी झालेल्या निसर्गातील बदलाने शरीर ऑफिसिमध्ये असूनदेखील मन मात्र त्या पावसामध्ये जाऊन चिंब भिजू लागलं.

कलाकाराचा मन असूनही आज एका आय. टी. कंपनीमध्ये नौकरी करतो आहे; नौकरी कसली करतोय, दिवस काढतोय फक्त!

अचानक झालेल्या या निसर्गातील बदलामुळे, मिलिंद इंगळे यांचा "गारवा" आठवला. माझ्यामते प्रेमात पडणार, अथवा पडलेलं अस एकाही मराठी मन नसेल ज्यांना मिलिंद इंगळे यांचा गारवा ठाऊक नाही. रानावनात पावसाच्या सरी बरसत असताना एखाद्या मोर पक्ष्याला पिंजऱ्यात ठेवल्यानंतर त्याच्या मनाचा होणारा कासावीसपणा मी अनुभवत होतो. विचार केला, मग उशीर कशाला, मोबईल हातात घेतला व डेस्कच्या ड्रोवर मधून हेडफोन बाहेर काढले आणि कॉफी मग घेऊन ऑफिसच्या बाहेर धाव घेतली. मोबाईलच्या आवडत्या गाण्यामधला पहिलच म्हणजे "सांज-गारवा" हो तेच ऐकत होतो.

गाणं सुरूच होता, मग कॉफिमग मध्ये कॉफी घेतली आणि कॅन्टीन समोरच्या बाकावर जाऊन बसलो.

गिटारच्या तारा छेडत "सांज-गारवा"पुढे-पुढे सरकत होता आणि कॉफीचा एकामागून दुसरा असा सिप घेत होतो. आता वातावरण रोम्यांटिक झाल होत, कमी होती ती फक्त "ती" ची.

काही क्षणात "सांज-गारवा" पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरु झाला आणि समोर पाहतो तर कोफीकप घेऊन "ती " अलगत पावलांनी माझ्याच दिशेने येत होती. तिला पाहताना आजदेखील, इतक्या वर्षानंतरही तीच भावना तितक्याच आवेगाने जाणवत होती. ऑगस्ट २००४ मध्ये कॉलेज च्या एट्रांसपाशी असलेल्या नोटीस बोर्ड जवळ मी "ती" ला पहिल्यांदा पहिला होता. आणी हृदयाचे ठोके काही क्षणासाठी थांबल्याचा भास झाला होता. हृद्याच नाही तर जणूकाही सगळा जग काही क्षणासाठी थांबला होता.

मी कॉफी चा पुढचा सीप घेतला व गाण्याचा आवाज थोडा कमी केला, कुणीतरी शेजारी येउन बसल्याचा मला जाणवल.
होय !! "ती" च होती.
माझ्याकडे पाहून कुत्सित हास्य करत होति… माझा पूर्ण लक्ष् तिच्या चेहऱ्याकडे होत.

"ती" ने काहीतरी विचारला मला, पण कानात हेडफोन असल्यामुळे मला ऐकायेला नाही आल.

"ती" च्या ओठांच्या हालचाली वरून 'कोणत गाणं ऐकतोयेस ??' असा विचारल असावा कदाचित "ती" ने. काहीही न बोलता, माझ्या डाव्या कानातला हेडफोन मी तिच्या उजव्या कानात ठेवला.

तिच्या कानात हेडफोन ठेवताना, पावसाचे दोन थेंब अलगतच माझ्या बोटांवर उतरले होते, कारण नुकत्याच सुरु झालेल्या पावसात भिजल्याने "ती" चे केस ओले झाले होते. "ती"च्या कडे बघितल्यावर, केसांमधले ते थेंब 'दवबिंदू' प्रमाणे भासत होते.

"ती" न काहीही न बोलता तो हेडफोन जरा नीट एडजस्ट करून बसवला व एक स्मित हास्य दिले. चेहऱ्याच्या उजव्या बाजूला व ओठाच्या अगदीच थोडासा वरती असणारा तो छोटासा तीळ मला नेहमीप्रमाणे आजही हिणवत होताच.

पुढे १०-१५ मिनिटे तोच "सांज-गारवा" आम्ही पुन्हा-पुन्हा ऐकत होतो. बोलण्याची गरजच भासत न्हवती; इतक्या वर्षांची साथ आहे म्हणून "ती" ला माझी व मला "ती" ची प्रत्येक गोष्ट ठाऊक आहे.
सुमधुर गाणं, पाऊस पडून गेल्यावर हवेत जाणवणारा तो "गारवा" व अधून-मधून हलकेच "ती" च्या केसांची लट हवेत उडवणारं ते गार-बोचंर वार … …. …. या सर्व गोष्टींमुळे आज तीच नेहमीची कॉफी जरा जास्तच चवदार झाली होती.

पाऊस कमी झाल्यावर थोड्या वेळाने, पुन्हा डेस्क वर गेलो, उरलेला काम संपवला व ऑफिस संपल्यावर नेहमीप्रमाणे घरी जाण्याऐवजी शहराबाहेरच्या डोंगराकडे प्रस्थान केला.

डोंगरमाथ्यावरून संध्याकाळच्या वेळी पुणे शहर अगदीच शांत भासत होते. मावळता सुर्य, विस्तीर्ण असे पसरलेलं शहर व कसलाच अंत नसणारे आभाळ. त्या क्षितिजाकडे पाहून मला "ती" ची खूप आठवण येत होती. हे वातावरण आता मला उदास असं भासत होता कारण "ती" सध्या माझ्याबरोबर नाहीये.

आई-वडील, बहिण-भाऊ हि नाती कितीही महत्वाची असली तरी सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यामधली "ती" सुद्धा तितकीच, कदाचित त्यांच्यापेक्षा थोडीशी जास्त महत्वाची असते.

म्हणूनच, तुमच्या आयुष्यातल्या "ती" ला शोधा व "प्रेम" करा …… भरपूर "प्रेम" करा !!!!!!!!!!!

--अनमोलप्रीत…….(amol1dhawale@gmail.com)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय ..आटोपशिर ... फक्त मधे मधे ते पाहिला, संपवला , केला हे शब्द टाळा.
पु.ले.शु Happy

Hey Preeti, This is my first article …… Thanks for your suggestion. It is definitely helpful.

khupch chan लिहिलय ahe...writer la je feel karun dych ahe readers la te perfectly jamal ahe....
as mala vatat ahe...Very Good.....