दुर्लक्षित आंबेडकर

Submitted by घायल on 10 April, 2016 - 04:18

एका खाजगी बैठकीत शरद पवार यांनी एका विद्वानाला भाक्रा नांगलचे नियोजनकर्ते कोण असा प्रश्न विचारला तेव्हां त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू असे उत्तर दिले ( नेहरुंच्या नावावर अनेक प्रकल्प आहेत, त्यात वाद्च नाही). तेव्हां पवारसाहेबांनी मिश्कील हसत डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे उत्तर देऊन त्या विद्वानांना खजील आणि गप्प केले होते. हे विद्वान दलित होते. खरं म्हणजे बाबासाहेबांची पूर्ण माहिती सर्व भारतियांना नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक रुपे आहेत. देशातील सर्वात मोठी कामगार संघटना चालवणारे कामगार नेते, चळवळीच्या निमित्ताने वृत्तपत्रे चालवणारे खंदे पत्रकार, रिझर्व बॅंकेचे संस्थापक , देशाच्या चलनातील धोके समजावून ब्रिटीशांना रुपयाचे अवमूल्यन करायला सांगताना त्यांचे वाभाडे काढून रोषास पात्र होणारे बाबासाहेब, प्रॉब्लेम ऑफ रुपी हा आजही मार्गदर्शक ठरावा असा ग्रंथ लिहीणारे बाबासाहेब, जलसंधारणाचे महत्व ओळखून दामोदर व्हॅलीसहीत इतर चार धरणांचे नियोजन करून चार वर्षात ते प्रकल्प पूर्णत्वास नेणारे बाबासाहेब, भाक्रा - नांगल येथील धरणाचे नियोजनकर्ते आणि जनक बाबासाहेब अशी अनेक रुपे आहेत. ही रुपं दुर्लक्षित राहिलेली आहेत.

भारतातील जातीव्यवस्थेचं सूक्ष्म आकलन असणारे बाबासाहेब आपल्याला माहीत आहेत. पण त्यांच्या या संदर्भातल्या लिखाणाची मोडतोडच खूप झालेली आहे.

तत्कालीन नेत्यांनी बाबासाहेबांच्या अनेक प्रकारच्या कार्याला अनुल्लेखाने मारून फक्त दलितांविषयीचे कार्य यालाच प्रसिद्धी दिली. त्यामुळे ते दलितांचे नेते अशी प्रतिमा तयार झाली, केली गेली. वरतून महापुरुषांना आपण आपल्या जातीत वाटून घेतले असे सोवळे ओवळे दु:ख व्यक्त करायलाही अनुल्लेखक सर्वात पुढे होते आणि आहेत. अनुल्लेख ही अशी कृती आहे जिची जबाबदारी घ्यावी लागत नाही. असे दुर्लक्ष इतरही काही नेत्यांच्या वाट्याला आले , पण इथे तो विषय नाही.

आजच्या लोकसत्तेतला , दि. १० एप्रिल २०१६ चा गिरीश कुबेर यांच अर्थशास्त्री आंबेडकर हा लेख सुद्धा वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकतो. त्याची लिंक वाचकांच्या अवलोकनार्थ खाली देण्यात येत आहे.

http://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-econom...

२००० साली वीजेची किती गरज असेल त्याप्रमाणे वीजनिर्मितीचे बनवलेले धोरण, वीजनिर्मिती, विकासाचे नियोजन याबद्दल बोलताना हरी नरके.
https://www.facebook.com/ps.sachin/videos/1131362003542906/

डॉ. रामचंद्र गुहा यांनी अलिकडेच बाबासाहेबांना आधुनिक भारताचे शिल्पकार असा उल्लेख केला आहे. परदेशी अभ्यासकांनीही बाबासाहेबांच्या या कामाचं आधुनिक भारताच्या पायाभरणीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. दुर्दैवाने देशात याबद्दल बोललं, लिहीलं गेलेलं नाही.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तळटीप :- बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाच्या, कामगिरीच्या वेगवेगळ्या पैलूंचा विचार इथे करून १२५ वी जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करूयात. फक्त अभिवादन हा या धाग्याचा उद्देश नसून आपापल्या परीने वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला जावा ही छोटीशी अपेक्षा आहे.

- ज्या पैलूंवर खूप बोललं, लिहीलं गेलं आहे ते टाळले जावेत ही नम्र विनंती आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती मिळतेय..

आंबेडकरांच्या नावाचा राजकीय उपयोग व्हायला लागल्यापासून, त्यांची एकच बाजू सातत्याने समोर मांडली गेली आणि त्यांचे रचनात्मक कार्य दुर्लक्षित राहिले. आता तरी ते समोर यावे.

कापोचे फार सुरेख लेख इथे दिलात, धन्यवाद! आणी व्यन्गचित्र पुरेसे बोलकेच आहे.

पूर्वी संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. यु म पठाण यानी एका प्रवचनात सांगीतले होते की संताना जाती मध्ये वाटु नका. जसे ज्ञानेश्वर ब्राह्मणांचे, चोखामेळा महारांचे, नरहरी सोनांरांचे, नामदेव शिंप्यांचे वगैरे. पण तशाच पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले माळ्यांचे, डॉ बाबासाहेब दलितांचे अशी सोयीस्कर वाटणी आपण सर्वांनीच केली आहे. या जडण घडणी मुळे प्रत्येक समाज ( जात-धर्म ) संकुचीत विचारांचा बनत चाललाय.

लाहनपणी हा अभंग ऐकला की मला कळायचेच नाही की असे शब्द का आहेत? मी आई-बाबानाही कधी विचारले नाही पण मोठे झाल्यावर अर्थ कळला.

अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

उंबरठ्यासी कैसे शिवु, आम्ही जाती हीन, रुप तुझे कैसे पाहु
त्यात आम्ही लीन, वाळवंटी गाऊ आम्ही.......

मला त्या वेळी आईला विचारावेसे वाटले नाही कारण ते वय पण नव्हते पण ज्या बुद्ध विहारात मला मुक्त प्रवेश होता, त्याच वेळी माझ्या बौद्ध बांधवाना ( मी रहात होते तिथे नव्हे तर इतर गावात, शहरात वगैरे) मात्र कुठल्याही मंदिरात मात्र प्रवेश नव्हता असे का? माझ्या घरी/ गावात कुठल्याही जाती-धर्माच्या लोकाना हीन दर्जाची वागणूक नव्हती, मात्र तशी वागणूक इतर खेड्या पाड्यात इतराना का मिळावी? हा अजूनही मला पडलेला प्रश्न आहे. कुठला अहंकार, द्वेष माणसा माणसात भरलाय? आणी कधी जाणार?

कापोचे, लेख आवडला मात्र पचायला बराच जड आहे. पुन्हा पुन्हा वाचावा लागेल. लेख वाचून एवढे नक्की जाणवले की आंबेडकर यांचे विचार कळलेले लोक फारच कमी आहेत. आणि आजच्या राजकीय नेतृत्वामध्ये तर कोणीच नाही (म्हणूनच तर वरील व्यंगचित्र).

ज्या बुद्ध विहारात मला मुक्त प्रवेश होता, त्याच वेळी माझ्या बौद्ध बांधवाना ( मी रहात होते तिथे नव्हे तर इतर गावात, शहरात वगैरे) मात्र कुठल्याही मंदिरात मात्र प्रवेश नव्हता असे का? माझ्या घरी/ गावात कुठल्याही जाती-धर्माच्या लोकाना हीन दर्जाची वागणूक नव्हती, मात्र तशी वागणूक इतर खेड्या पाड्यात इतराना का मिळावी? हा अजूनही मला पडलेला प्रश्न आहे. कुठला अहंकार, द्वेष माणसा माणसात भरलाय? आणी कधी जाणार? <<<< + रश्मी ताई, जेव्हा माणूस माणसाला माणूस म्हणून वागवेल तेव्हाच हे सगळ थांबेल.

इथे प्रतिसाद, प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभारी.
भिन्न विचार असून अनेकांनी या धान्याला हातभार लावला. सलाम या भावनेला!
अजून ही आपण लिहू शकता.

अजून एक लक्षात आलेले आधी लिहायचे राहिले. एखाद्या अन्यायग्रस्त गटाला, समाजाला संघटित करताना, स्वतःवरच्या अन्यायाविरूद्ध लढा द्यायला प्रवृत्त करताना बहुतांश नेते एक समोर बागुलबुवा उभा करतात. "ते लोक" - कधी दुसर्‍या जातीचे, धर्माचे, वंशाचे- "ते सगळ्याला कारणीभूत आहेत, त्यांच्याबद्दल काहीतरी केले पाहिजे" असला प्रकार असतो. मग नंतर त्यांचे चेले व अनेक लोक मुख्य संदेश विसरून तो "द्वेष" फक्त वापरून आपली सत्ता शाबूत ठेवतात. कारण द्वेष/भीती लोकांना संघटित करून आपल्या मागे यायला लावायला सोपी असते.

इतक्या वर्षांच्या व (मिळालेल्या) इतक्या वाईट वागणुकीनंतर सुद्धा आंबेडकरांनी लोकांना "तुम्ही स्वतः शिका व प्रबळ व्हा" हाच मुख्य मंत्र दिला. त्यासाठी कोणताही बागुलबुवा उभा करण्याची गरज त्यांना वाटली नाही. गांधी व आंबेडकरांच्यात इतर अनेक बाबतीत कितीही फरक व मतभेद असले तरी या एका बाबतीत खूप साम्य होते.

द्वेष कशाला म्हणायचं यावर वेगळ्या धाग्यावर चर्चा करता येईल. महात्मा फुले यांचे लिखाण द्वेषपूर्ण आहे असा एक बाफ मायबोलीवर असल्याचे स्मरण आहे.

फारएण्ड, तुमच्या कडे आंबेडकरांविषयी चांगली माहिती असेल तर जरुर लिया..किंवा एखदा लेख वैगरे.

डॉ. आंबेडकरांचे लिखाण परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे: http://www.mea.gov.in/books-writings-of-ambedkar.htm

बहिष्कृत भारत या पत्रिकेचे मूळ आकारातले म्हणजे वर्तमानपत्राच्या आकारातले पुस्तक उपलब्ध होते. मी २००८ च्या आसपास ते विकत घेतले होते. त्यातले लेख वाचणे आजही उद्ब्बोधन होते.

महात्मा फुल्यांचे पुस्तकांचे काही दुवे मिळाले. प्रताधिकार वगैरे माहिती नाही पण बहुतेक ही पुस्तके प्रताधिकारमुक्त असावीत.

गुलामगिरी
https://drive.google.com/open?id=0B1Gxsf49RWuIVE1fMUtYc1N5OU0
सार्वजनिक सत्यधर्म
https://drive.google.com/file/d/0B1Gxsf49RWuITUV2WjRMNjNiTWc/view?usp=sh...
ब्राह्मणांचे कसब
https://drive.google.com/file/d/0B1Gxsf49RWuIMGVuMTJxeWRjY1U/view?usp=sh...
शेतक-याचा आसूड
https://drive.google.com/file/d/0B1Gxsf49RWuIMVlaTDF1LUdWRmM/view?usp=sh...
सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्ककासह, विधी आणि पूजा
https://drive.google.com/file/d/0B1Gxsf49RWuIMzZaZ2FlTE5JY0U/view?usp=sh...

इंग्लंड वरून भारतात डॉ.वेलबी चे एक कमिशन आले होते.या कमिशनने रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थ शास्त्रज्ञाना निमंत्रीत केले होते आणि त्यांची या विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली, शेवटचे मत डाॅ.बाबासाहेब मांडणार होते, इतक्यात डॉ.वेलबी बाबासाहेबांना म्हणाले, डॉ.आंबेडकर,मी जगातील प्रसिध्द विद्वान अर्थ शास्त्रज्ञांची मते व संदर्भ ऐकली आहेत तेंव्हा आपले मत मला ऐकण्याची अवश्यकता आता वाटत नाही!

यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले, डॉ.वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञानी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकांचा मी लेखक आहे.
त्या पुस्तकांतील काही भाग लिहिणे अजुन बाकी आहे. तो मीच पुर्ण करू शकतो !

हे ऐकुन डॉ. वेलबी खाली उतरले बाबा साहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले.
http://note.taable.com/post/1D4E50/Aniruddha/2b3908-T694T809501-04485348...

Pages