व्हेज बिर्याणी (विदाऊट लेयर)

Submitted by Swara@1 on 30 March, 2016 - 05:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लो हम फिर हाजिर हो गये एक और रेसिपी लेके.

खूप दिवसांपासून घरी बिर्याणी/ पुलाव बनवला नव्हता म्हणून धुलीवंदनाच्या दिवशी मुहूर्त काढला आणि आत्ता त्याची रेसिपी इथे टाकते आहे.

तर त्यासाठी आपल्याला लागेल :
१. आधीच तयार केलेला भात
२. फरसबी चिरून (भाज्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मला त्या दिवशी ज्या मिळाल्या त्या मी वापरल्यात )
३. फ्लॉवरचे तुकडे
४. मटार १ वाटी
५. १ कांदा बारीक चिरून
६. १.टोमाटो बारीक चिरून
७. १ ते २ तमालपत्र
८. ६ ते ७ काळीमिरी दाणे
९. आलं -लसूण पेस्ट १ ते दीड चमचा
१०. लाल तिखट १ चमचा
११. १ ते दीड चमचा बिर्याणी मसाला (मी सुहाना चा वापरला )
१२. तेल
१३. हळद १/२ चमचा
१४. मीठ चवीनुसार
१५. थोडंस हिंग
१६. १ चमचा दही

क्रमवार पाककृती: 

चला तर मग करूया सुरुवात.
प्रथम एका जाड बुडाच्या भांड्यात तेल घ्या. तेल गरम झाल कि त्यात तमालपत्र आणि कालीमिरीचे दाणे घाला. ते थोडेसे तडकले कि मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परता. कांदा थोडा गुलाबीसर झाल कि मग त्यात टोमाटो परतून घ्या. आता त्यात आवडीप्रमाणे लाल तिखट, हळद, थोडस हिंग आणि आलं - लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या. आता त्यात सगळ्या भाज्या परतून घेऊया. भाज्या शिजतील इतपत पाणी घालून मग त्यात बिर्याणी मसाला घाला आणि झाकण ठेऊन भाज्या शिजू द्यात. पाणी पूर्ण आटवु नका. भाज्या शिजल्या कि त्यात १ चमचा दही आणि चवीनुसार मीठ घालून परतून घ्या. आता तयार भात मिक्स करा आणि परता. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

माहितीचा स्रोत: 
मी स्वतः
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

आधीचे फोटो काढून टाकून त्याच नावाने नवे फोटो अपलोड केलेले दिसतायेत.

swara,
तुमच्या खाजगी जागेत साठवेलेले फोटो डीलीट केले की ते धाग्यावरूनसुद्धा नाहीसे होतात. त्यामुळे फोटो न उडवता नवे फोटो नव्या नावाने कृपया सेव्ह करा.

Ok chinuks... udya punha navyane save karen.. photos officechya pc mdhye save kelet..