विराट कोहली फॅन क्लब !

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 March, 2016 - 17:27

कोहलीने आज जे काही शेवटच्या चारपाच ओवरमध्ये केले ते निव्वळ निव्वळ निव्वळ... मॅच संपून काही तास लोटले तरी अजूनही शब्द नाहीयेत माझ्याकडे.. आमच्या व्हॉटस्सप ग्रूपवर हजारो लाखो करोडो पोस्टचा नुसता नुसता खच पडला होता या सामन्याच्या दरम्यान.. सर्वांचा एकच विश्वास.. विराट कोहली! किती वेळा त्याची परीक्षा घेतली जाणार आणि किती वेळा तो पहिला नंबर पटकावत पास होणार याची आता गिणती उरली नाही.. प्रत्येक वेळी पेपर पहिल्यापेक्षा कठीण आणि तरीही तो शेवट अगदी सोपा करून येणार.. आपले ईतर कागदावरचे बलाढ्य फलंदाज जणू काही त्याचे हे तेज जगासमोर यावे म्हणून मुद्दाम निस्तेज खेळ करत आहेत की काय अशी शंका यावी असे काही सारे चालू आहे.. आजच्या सामन्यात कॉमेटरी करताना गावस्करच्या अंगात जणू काही रमीज राजा संचारला होता. आपल्या पोराचे कौतुक करताना त्याचे तोंड थकत नव्हते. एकापाठोपाठ एक, धडाधड, सरळ बॅटने मारलेले क्लासिकल चौकार पाहून त्याचीही तबियत खूश झाली होती. एकेकाळी ऑस्ट्रेलियन्स म्हणायचे की आम्ही टीम ईंडियाशी नाही, तर सचिन तेंडुलकर नाव असलेल्या एका माणसाशी हरतो. हा विश्वचषक संपता संपता सारेच देश असे कोहलीबाबत म्हणू लागतील. आताच्या भारतीय संघात सध्या सतराशे साठ समस्या आहेत, कित्येकांचे सूर हरवलेत, आणि तरीही आज या घडीला हा विश्वचषक आपलाच आहे कारण आपल्याकडे विराट कोहली आहे, असे म्हणावेसे वाटतेय, असा विश्वास वाटू लागलाय. यापुढच्या सामन्यात धोनीने बस्स टॉस उडवायला जावे, आणि कसलाही विचार न करता प्रतिस्पर्ध्यांना पहिली फलंदाजी द्यावी. मग जे काही टारगेट मिळेल ते आपली 'चेस मशीन' विराट कोहली बघून घेईन. त्याला जिंकायला आवडते असे म्हणण्यापेक्षा त्याला हरायला आवडत नाही असे म्हणने जास्त समर्पक राहील. ज्या ज्या कोणाला त्याचा हा एटीट्यूड आणि त्याच्या फलंदाजीचा क्लास आवडत असेल त्या त्या सर्वांचे या क्लबमध्ये स्वागत आहे. तसेच क्रिकेटव्यतीरीक्त त्याचे दिसणे, वागणे, बोलणे चालणे, स्टाईलच्याही कोणी प्रेमात असेल तर त्यांचेही स्वागत आहे Happy

आणि हो, हा धागा आजच्या या भारावलेल्या स्थितीतच काढायचे आणखी एक कारण म्हणजे एक कन्फेशन करणे देखील होते.

हा खेळाडू एकेकाळचा माझा अत्यंत नावडता खेळाडू होता. याला कारणीभूत फक्त आणि फक्त त्याचा एटीट्यूड ज्यात मला अहंकारच दिसायचा. पुढे पुढे तो कमी दिसू लागला आणि नावडतेपण मावळू लागले. त्याची फलंदाजी, फटकेबाजी, त्याने मिळवून दिलेले विजय हळूहळू त्याला माझ्या आवडत्यांच्या यादीत घेऊन आले. आणि बघता बघता गेल्या दोनचार मालिका भारतीय क्रिकेट म्हणजे तो, तो, आणि तोच वाटू लागल्याने त्याने माझ्याकडे त्याचा फॅन बनण्याव्यतिरीक्त पर्यायच ठेवला नाही Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कप्तान कोहली सुद्धा फॉर्मला आहे Happy

Longest unbeaten run as captain

Tests Captains
26 CliveLloyd
22 Ricky Ponting
19 R Illingworth
19* Virat Kohli (नाबाद)
18 Sunil Gavaskar

तसेच अजून एक सांघिक रेकॉर्ड या बांग्लादेश सामन्यानंतर झाला
India became the first team to score 600-plus in three consecutive innings. They made 631 in Mumbai and 759 in Chennai, in the last two Tests against England before putting up 687 in this match, their fifth-highest total.

जबरी! Form of his life! २००३-०४ च्या आसपासचा रिकी पॉण्टिंग आठवला. दिसेल त्याची धुलाई.
>>>
त्यांचाच स्मिथ सुद्धा गेले काही काळ असाच फॉर्म घेऊन खेळतोय. बहुतेक आयसीसी कसोटी रॅंकिंगमध्ये तोच अजून नम्बर वन आहे. चेक करायला हवे. पण लॉंग रन मध्ये कोहली सरस ठरेल असे वाटतेय. स्मिथचा बराच खेळ हॅन्ड आय कॉर्डिनेशनवर आहे. वयोमानानुसार रिफ्लेक्सेस मंदावल्यावर जसा सेहवागचा प्रभाव ओसरला तसे त्याबाबत होण्याची शक्यता जास्त आहे. पण कोहलीचा क्लास त्याला शेवटपर्यंत तारून नेणार.

यस. कोहली जास्त टिकाऊ वाटतो. स्मिथ बद्दल बरोबर आहे, पण आत्ता मधेच तो बर्‍यापैकी फेल गेला ना?

कोहलीला मधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे. सतत संघाचे प्रेशर घेउन खेळल्यामुळे फिटनेस प्रॉब्लेम्स यायला नको. बांगला बिंगला "ऑर्डिनरी टीम्स" (कर्टसी वीरू) विरूद्ध बसवायला पाहिजे.

पाकिस्तान विरुद्ध वनडेमध्ये त्याचे काहीतरी लागोपाठ दोन डक होते. पण त्याने कमबॅक करत सेंच्युरी सुद्धा मारलेली.
पण आधीही त्यांच्यासोबत कसोटी मालिकेत त्याची दोनेक मोठी शतके होती.
आणि येस्स, कसोटी रॅंकिंगमध्ये तो नंबर वन आहे आणि कोहली दुसरा.
मी आधीही ती रॅंकिंग फॉलो केलेली तेव्हा विल्यमसन, जो रूट, आणि स्मिथ अशी तीन नावे कोहलीच्या पुढे होती.
मग न्यूझीलंड आणि ईंग्लंड आपल्याकडे हरून गेले तसे अनुक्रमे विल्यमसन आणि जो रूट त्याच्या मागे गेले.
आता ऑस्ट्रेलिया येतेय तर स्मिथची पाळी Happy
तसे झाल्यास कसोटीत सर्वोत्तम संघ, फलंदाज, गोलंदाज आणि ऑलराऊंडर चारही जागा आपणच पटकावल्या असतील. आजवर कधी असे घडले नसेल Happy
होम सीजन लॉंग असल्याने हे चित्र दिसत असेल, आणि परदेशी पण आपण विंडीज लंका अश्या फुसक्या जागीच गेलोय. खरी कसोटी ईंग्लंड ऑस्ट्रेलिया आफ्रिकेतच लागेल. पण घरात असे धडाक्याने जिंकत नंबर वन होणे हे तरी कुठे सगळ्यांना जमते.

कोहली आल्यापासून जसा खेळतोय ते पाहून तो आज शतक नाही तर त्रिशतकाची संधी साधायला आला आहे असे वाटतेय. अफाट आहे हे.
त्याचे अर्धशतक झाले असतानाच आता मला त्याचे त्रिशतक होते का याची उत्सुकता लागलीय.
रन मशीन ! विराट कोहली !

लग्नाच्या शुभेच्छा रे कोहली Happy

अवांतर - वरच्या पोस्टमध्ये त्याची अर्धशतकी सुरुवात बघून तो जसा खेळत होता ते पाहून मी त्रिशतकाची शंका व्यक्त केलेली. श्रीलंकेने केलेल्या नाटकामुळे ते अवघ्या पन्नासेक धावांसाठी हुकले मात्र तरीही त्याने त्याचा आजवरचा सर्वाधिक स्कोअर मारलाच Happy

कभी कभी लगता है कोहली ही भगवान है _/\_

ऑस्ट्रेलियाशी पहिला सामना हरल्यावर मला, माझ्या क्रिकेटप्रेमी मित्रांना, अखंड भारतवर्षाला, आणि खुद्द प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियालाही खात्री होती की कोहली उरलेल्या दोन सामन्यात स्वत: लीड करत पलटवार करणार. आणि ही खात्री नुसते आपले कोहलीचा आदर करायला म्हणायचे म्हणून नव्हते, तर ती शंभर टक्के खात्री होती. आणि आज अंतिम सामन्यात जेव्हा तो खेळायला ऊतरला तेव्हाही ही शंभर टक्केच खात्री होती की आता तो हा गेम संपवूनच परतेल. आणि तसेच झाले. विशेष म्हणजे यात काही विशेषही वाटले नाही.

म्हणजे कसे आहे ना की एखादा चांगला फलंदाज असतो जो त्याच्या चांगल्या दिवसाला खेळतो, एखादा ग्रेट फलंदाज असतो ज्याच्या आयुष्यात असे चांगले दिवस वरचेवर येतात, एखादा लिजंड असतो जो अश्या दिवसांना एकहाती जिंकवूनच येतो.. आणि मग एक कोहली येतो ! जो आपला चांगला दिवस कधी असावा हे स्वत:च ठरवतो ! म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, कभी कभी लगता है कोहली ही भगवान है _/\_

आपल्या फलंदाजीवर असलेला ईतका अदभुत कंट्रोल मी आजवर कुठल्या खेळाडूचा पाहिला नाही. जो खोरयाने धावा करतो त्याला रनमशीन म्हटले जाते. ती केवळ एक ऊपमा असते. पण कोहली खरोखरच एक रन मशीन आहे जो आज किती धावा करायच्या आहेत हे आपल्या सिस्टमम्ध्ये फीड करून येतो आणि तेच डिलिव्हर करतो. ह्युमन एरर होण्यास वावच नाही.

मी स्वत: त्या पिढीचा आहे ज्यांनी सचिनमध्ये क्रिकेटचा देव बघितला आहे. कारण सचिनने जो आनंद दिलाय त्याला तोड नाही. पण निव्वळ खेळाच्या प्रतिभेचा विचार केला तर कोहली हा मी पाहिलेला आजवरचा सर्वोत्तम खेळाडू आहे. सचिनला हृदयात दिलेले स्थान अढळ आहे. पण तरीही दर सामन्यागणिक माझ्यातला एक क्रिकेटप्रेनी कोहलीसमोर पुन्हा पुन्हा आदराने नतमस्तक होत आहे.

परवाच आमच्या कंपनीच्या मालकाने नवीन गाडी घेतली आणि कंपनीत पेढे वाटले त्याची आठवण झाली.

कोहली खरोखरच एक रन मशीन आहे जो आज किती धावा करायच्या आहेत हे आपल्या सिस्टमम्ध्ये फीड करून येतो आणि तेच डिलिव्हर करतो. ह्युमन एरर होण्यास वावच नाही. >> बरोबर

Pages