विराट कोहली फॅन क्लब !

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 March, 2016 - 17:27

कोहलीने आज जे काही शेवटच्या चारपाच ओवरमध्ये केले ते निव्वळ निव्वळ निव्वळ... मॅच संपून काही तास लोटले तरी अजूनही शब्द नाहीयेत माझ्याकडे.. आमच्या व्हॉटस्सप ग्रूपवर हजारो लाखो करोडो पोस्टचा नुसता नुसता खच पडला होता या सामन्याच्या दरम्यान.. सर्वांचा एकच विश्वास.. विराट कोहली! किती वेळा त्याची परीक्षा घेतली जाणार आणि किती वेळा तो पहिला नंबर पटकावत पास होणार याची आता गिणती उरली नाही.. प्रत्येक वेळी पेपर पहिल्यापेक्षा कठीण आणि तरीही तो शेवट अगदी सोपा करून येणार.. आपले ईतर कागदावरचे बलाढ्य फलंदाज जणू काही त्याचे हे तेज जगासमोर यावे म्हणून मुद्दाम निस्तेज खेळ करत आहेत की काय अशी शंका यावी असे काही सारे चालू आहे.. आजच्या सामन्यात कॉमेटरी करताना गावस्करच्या अंगात जणू काही रमीज राजा संचारला होता. आपल्या पोराचे कौतुक करताना त्याचे तोंड थकत नव्हते. एकापाठोपाठ एक, धडाधड, सरळ बॅटने मारलेले क्लासिकल चौकार पाहून त्याचीही तबियत खूश झाली होती. एकेकाळी ऑस्ट्रेलियन्स म्हणायचे की आम्ही टीम ईंडियाशी नाही, तर सचिन तेंडुलकर नाव असलेल्या एका माणसाशी हरतो. हा विश्वचषक संपता संपता सारेच देश असे कोहलीबाबत म्हणू लागतील. आताच्या भारतीय संघात सध्या सतराशे साठ समस्या आहेत, कित्येकांचे सूर हरवलेत, आणि तरीही आज या घडीला हा विश्वचषक आपलाच आहे कारण आपल्याकडे विराट कोहली आहे, असे म्हणावेसे वाटतेय, असा विश्वास वाटू लागलाय. यापुढच्या सामन्यात धोनीने बस्स टॉस उडवायला जावे, आणि कसलाही विचार न करता प्रतिस्पर्ध्यांना पहिली फलंदाजी द्यावी. मग जे काही टारगेट मिळेल ते आपली 'चेस मशीन' विराट कोहली बघून घेईन. त्याला जिंकायला आवडते असे म्हणण्यापेक्षा त्याला हरायला आवडत नाही असे म्हणने जास्त समर्पक राहील. ज्या ज्या कोणाला त्याचा हा एटीट्यूड आणि त्याच्या फलंदाजीचा क्लास आवडत असेल त्या त्या सर्वांचे या क्लबमध्ये स्वागत आहे. तसेच क्रिकेटव्यतीरीक्त त्याचे दिसणे, वागणे, बोलणे चालणे, स्टाईलच्याही कोणी प्रेमात असेल तर त्यांचेही स्वागत आहे Happy

आणि हो, हा धागा आजच्या या भारावलेल्या स्थितीतच काढायचे आणखी एक कारण म्हणजे एक कन्फेशन करणे देखील होते.

हा खेळाडू एकेकाळचा माझा अत्यंत नावडता खेळाडू होता. याला कारणीभूत फक्त आणि फक्त त्याचा एटीट्यूड ज्यात मला अहंकारच दिसायचा. पुढे पुढे तो कमी दिसू लागला आणि नावडतेपण मावळू लागले. त्याची फलंदाजी, फटकेबाजी, त्याने मिळवून दिलेले विजय हळूहळू त्याला माझ्या आवडत्यांच्या यादीत घेऊन आले. आणि बघता बघता गेल्या दोनचार मालिका भारतीय क्रिकेट म्हणजे तो, तो, आणि तोच वाटू लागल्याने त्याने माझ्याकडे त्याचा फॅन बनण्याव्यतिरीक्त पर्यायच ठेवला नाही Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल पावसालाही वरून तंबी आली असावी, "अरे मूर्खा, सगळे देव सुद्धां खुर्च्या अडवून विराटचा खेळ बघायला बसलेत आणि तुझा हा काय अचरटपणा चाललाय ?". काय खेळी केली मग विराटने !! कुणाशीही तुलना न करतां अशा दिव्य फॉर्ममधे असलेल्या या असामान्य फलंदाजाच्या आक्रमक, शैलीदार व आदर्श फटकेबाजीचा सध्यां आनंद लुटावा, हें उत्तम !!

खबरदार, तुझं हें नेहमींचं झालंय ! तुला फायरींग करायला आलों कीं विचारायचं,
"सर, तुम्हीं पण विराट फॅन क्लबचे मेंबर आहात ना ? " !
gayle_1.JPG

[* 'आयपीएल-९ २०१६' या धाग्यावरही हें पोस्ट केलं आहे ]

आजचा विव रिचर्ड्स! फरक एव्हडाच आहे की विव शांतपणे कत्तल करायचा... विराट कायम कसायाच्या आवेशातच असतो.
आताशा तर तो बाद झाला तरी वादळी वाटतो... Happy
[भारतातील वा आशियातील खेळपट्ट्यांवर चुका खपून जातात... 'बाहेर' मात्र या कसायाला थोडा संयम दाखवावा लागेल.. तसे सातत्याने करता आले तर विराट हा क्रिकेट जगातील 'सर्वोत्तम' ठरेल यात शंका नाही.]
हा सूर्य तर आताशा वर चढतोय... !

<<फरक एव्हडाच आहे की विव शांतपणे कत्तल करायचा... विराट कायम कसायाच्या आवेशातच असतो. >>विव्हपेक्षां विराट ताकदीऐवजीं टायमींगचा अधिक वापर करतो, हाही एक फरक असावा.

भाऊ,
किंबहुना, विव ची फटकेबाजी ही जास्त करून 'टायमिंग' ची च होती... त्याची देहयष्टी, सर्वात जड बॅट, व राकटपणा यामूळे ते फटके शक्तीशाली वाटत असत.
विराट चे फटके 'चेव' चढल्यागत असतात... हा फरक आहे असे मला वाटते.
निव्वळ ताकदीवर 'हाणामारी' करणारा मला तरी फक्त गेल च दिसतो. तर अ ब ड हा कौशल्यपूर्ण धोबी वाटतो.

योगजी, कृपया गैरसमज नको. मॅथ्यू हेडन, गेलसारखे हाणामारी करणारे व विव्ह यांत जमीन-अस्मानाचा फरक आहेच. पण 'ताकद' हा घटक विव्हकडे विराटच्या तुलनेत अधिक प्रभावी होताच व त्याचा त्याला विराटपेक्षां अधिक उपयोग व्हायचा - विशेषतः शेवटच्या क्षणीं फटका बदलावा लागतो तेंव्हां - व तें स्वाभाविकही होतं असं मला वाटतं इतकंच. ही कमतरता विराट टायमींगने भरून काढतो असं जाणवतं.

सर विव्ह रिचर्डस यांना लाईव्ह खेळताना पाहिले नाही. अर्थात हायलाईटसमधून अंदाज येतोच. पण येस्स तोच गुण.. डॉमिनेटींग बनायला बघणे आणि यशस्वी होणे, नव्हे यशस्वी होणार याची खात्रीच असणे हे कोहलीला लिजेण्ड बनवून जाणार..
लाराच्या काही अश्याच गोलंदाजांवर चढून बसलेल्या कसोटी इनिंग पाहिल्या आहेत.. त्यात तो आपला प्लेअर नसूनही फार एंजॉय व्हायचे.. कोहलीबाबतही जगभरातले क्रिकेटरसिक त्याच्या या असल्या इनिंग एंजॉय करू लागले असतील नक्कीच

ऋन्मेष,
विव्ह, सोबर्स असल्या खेळाडूना 'डॉमिनेटींग बनायला बघणे' हा गुण कितपत लागू होतो याबद्दल मीं तरी साशंक आहे. खेळाचा आनंद लुटणें हीच त्यांची प्रवॄत्ती होती व प्रचंड प्रतिभा असल्याने सहजसुंदर खेळत असूनही ते 'डॉमिनेटींग' वाटत असं म्हणणं अधिक योग्य होईल, विराट जरी 'डॉमिनेटींग' असला तरीही तो त्याच्या भात्यातले फटके मारणं एंजॉय करतो , धांवां जमवणं त्याला आनंद देतं, हेंच त्याला 'लिजेन्ड' बनवण्याची शक्यता अधिक आहे.

धांवां जमवणं त्याला आनंद देतं, हेंच त्याला 'लिजेन्ड' बनवण्याची शक्यता अधिक आहे.>> +! अपयशाबद्द्ल घृणा वाटणे हा गुण त्याला फार पुढे नेईल. 'अमका तमयासारखा खेळतो' असे म्हटले कि हि तुलना त्यांच्या खेळाव्यतिरिक्त इतर बाबतींमधे ओसंडत जाते म्हणून कुठल्याही माजी फलंदाजाबरोबर तुलना न करता, "तो स्वतःची नवीन जागा निर्माण करत आहे" असे म्हटले तर अधिक उचित नि त्याला अधिक न्याय देणारे ठरेल असे मला वाटते.

खेळाडूंची अशी अ‍ॅक्रॉस द टाईम्स तुलना नाही करता येत असं मला वाटतं. परिस्थिती, नियम (ज्यात ३० यार्ड वर्तुळ, पॉवर-प्ले, सुपर-सब, फ्री-हीट, कमरेच्या वरचा फुलटॉस, खांद्याच्या वरचा बाऊन्सर, क्रीझ च्या वापराचे नियम, थर्ड अंपायर, बॅट्स चा आकार / जाडी, सीमारेषांचं अंतर ई.), खेळाडूंची मानसिकता, खेळातल्या क्लृप्त्या वगैरे गोष्टी ईतक्या बदलतात की अशी तुलना खुप मर्यादीत होते. त्यापेक्षा त्या त्या कालखंडातल्या खेळाडूंच्या खेळाचा आनंद लुटावा.

अपयशाबद्द्ल घृणा वाटणे हा गुण त्याला फार पुढे नेईल...
>>>>>
प्लस वन.. बहुतेक मी हे वर हेडरमधेही लिहिले आहे, त्याला हरायला आवडत नाही.
डॉमिनेट बोलाल तर तो समोरच्या संघातील बॉलर्सनाच नाही तर त्या संघालाच मात द्यायला बघतोय. निदान सध्या तरी तसेच खेळतोय. चेसिंगला म्हणूनच तो आणखी घातक भासतो कारण त्याला जिंकायला काय किती करायचे हे माहीत असते.
या आयपीएलला पहिल्या फलण्दाजीला जेव्हा त्याचे क्लासिकल शतक आणि संघाच्या 180-190 धावाही कमी पडतात हे त्याने बघितले तेव्हा त्याने स्वताची हिटींग क्षमता यशस्वीपणे वाढवली आणि पॉवरहिटरशी स्पर्धा करू लागला.. एका क्लासिकल फलंदाजाने 20-20 फॉर्मेटला दिलेली मात आहे ही..

मला वाटतं तुझ्या शेवटच्या प्यारेग्राफ मध्ये घोळ आहे.

कोहली पॉवरहिटरशी कधीही स्पर्धा करणार नाही. तो ना तर युसुफ आहे, ना ही गेल. ही दोघेही कधीतरीच चालतात. आणि विराट नेहमी खेळतो. विराटच्य शॉट्स ह्या क्रिकेटिंग शॉटस असतात, ३६० मध्ये मारलेल्या नाही. त्याच्या इनसाईड आउट मध्ये एक कविता असते आणि फ्लिक मध्ये एक देखना अंदाज.

माझे नेहमीचा आवडात शब्द "अ‍ॅडॉप्ट" - तो प्रत्यक्षात उतरवतो. परिस्थितीला जुळवून घेत खेळतो. सचिन देखील हेच करायचा. त्याला कोणावर, कुठे आणि कसा हल्ला चढवायचा हे माहिती असायचे. विराटला देखील ते माहिती असते म्हणून तो ग्रेट आहे. कारण तो कुठल्याही फॉर्मॅटला न्याय देऊ शकतो. त्याचे सिक्सेस हे धोणीच्या सिक्ससारखे पावरफुल नसतात, पण त्यात एक रोहितच्या सिक्स सारखी 'गेयता' असते.

तो कोणाशीही स्पर्धा करत नाही. तो स्वतःशी स्पर्धा करतो. दोन्ही मध्ये खूप फरक आहे.

या आयपीएलला पहिल्या फलण्दाजीला जेव्हा त्याचे क्लासिकल शतक आणि संघाच्या 180-190 धावाही कमी पडतात हे त्याने बघितले तेव्हा त्याने स्वताची हिटींग क्षमता यशस्वीपणे वाढवली >> हे पटले पण केदार म्हणतोय तसे तो पॉवर हिटर शी स्पर्धा करतोय असे वाटले नाही. ह्या उलट तो समोरचा कसा खेळतोय हे बघून त्याप्रमाणे स्वतःचा खेळ अ‍ॅडजस्ट करतोय. त्या दिवशी अ‍ॅबे सुसाट सुटला असताना कोहलीने फक्त strike rotate केला. शेवटच्या overs येइतो तो सुटला नव्हता. काल गेल सुरू व्ह्यायच्या आधी initiative घेतला. अ‍ॅबे पटकन बाद झाल्यावर सगळी सूत्रे स्वतःकडे घेतली.

त्याला कोणावर, कुठे आणि कसा हल्ला चढवायचा हे माहिती असायचे. विराटला देखील ते माहिती असते >> त्याला माहिती असते पेक्षा कधितरी त्याला सगळ्या inning ची blue print समोर दिसते कि काय हल्ली समोर असे वाटतेय. Wink If chasing was an art before, Virat has converted it to science now.

कोहलीला आत्ताच्या आयपीएल मधे पाहिलेले नाही, पण वर्ल्ड २०-२० मधला गेम व आधीचे डाव पाहून मलाही कायम तो प्रॉपर शॉट्स मारूनच बराचसा खेळतो असे जाणवले. त्या दृष्टीने तो क्लासिकल आहे. त्याची २०-२० वर्ल्ड कप मधली ऑस्ट्रेलियाविरूद्धची खेळी मी पाहिलेल्या लिमिटेड ओव्हर्स इनिन्ग्ज पैकी सर्वोत्तम ३-४ मधे असेल.

त्याला माहिती असते पेक्षा कधितरी त्याला सगळ्या inning ची blue print समोर दिसते कि काय हल्ली समोर असे वाटतेय. >> टोटली.

कदाचित माझं हें मत हा दुराग्रह वाटण्याची शक्यता आहे पण तें विचारपूर्वक झालेलं माझं ठाम मत आहे -
उच्च्तम स्तरावर कोणताही खेळ खेळताना 'डॉमिनेट' करण्याची वॄत्ती ही तुमच्या खेळाची मुख्य प्रेरणा असणं हा अवगुणच ठरतो; कारण, त्या स्तरावर इतर स्पर्धकही उच्च दर्जाचे कसलेले खेळाडूच असतात व त्यांच्याविरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांचा आदर बाळगूनच स्वतःचं कसब अत्युच्च पातळीवर नेण्यावर लक्ष केंद्रीत करण अत्यावश्यक असतं. 'डॉमिनेट करण्याची' वृत्ती त्यांत अडसर बनण्याचीच शक्यता अधिक असते. [ सचिन व कांबळी हें मला वाटतं याचं बोलकं उदाहरण असावं]. << तो कोणाशीही स्पर्धा करत नाही. तो स्वतःशी स्पर्धा करतो >> हेंच त्यातलं मर्म आहे व केवळ हीच स्पर्धा कोणत्याही खेळाडूला अत्युच्च शिखराकडे नेवूं शकते व तीच त्याला खेळाचा खरा अविरत आनंद देवूं शकते. . विराटलाही हें उमगलेलं आहे, हें ज्या तर्‍हेने तो परिस्थिती व समोरचे स्पर्धक लक्षांत घेवून आपला खेळ खुलवतो यावरून लक्षांत येतं.

केदार, असामी माझ्या वाक्याचा अर्थ काढण्यात गल्लत होतेय.
पॉवर हिटरशी स्पर्धा म्हणजे त्यांच्या हिटिंग स्टाईलशी नाही तर त्यांच्या मारण्याच्या क्षमतेशी, सोप्या भाषेत स्ट्राईकरेटशी.
50-50 पेक्षा 20-20 या फॉर्मेटमध्ये पॉवरहिटर आणखी ईफेक्टीव्ह किंवा घातक होतात. त्यामुळे जर समोरच्या संघातील असा एखादा फलंदाज चालला तर तुमची क्लासिकल खेळी सुद्धा व्यर्थ आहे. कोहलीला आता हे सुद्धा होऊ द्यायचे नाहीये, त्याला कुठलाच चान्स घ्यायचा नाहीये असे ठरवून खेळतोय तो. डिविलीअर्स बरोबरच नाही तर गेल समोर असताना सुद्धा हा तोडीस तोड 25-30 रन्सची ओवर ठोकतोय. मॅक्सिमम रन वसूल करायला बघतोय.
आणि हे तो आपल्या क्लासिकल शैलीशी कुठेही कॉम्प्रोमाईज न करता खेळतोय म्हणून मी म्हणालो की ही एका क्लासिकल फलंदाजाने 20-20 फॉर्मेटला दिलेली मात आहे.

हॅपी बड्डे वि रा ट को ह ली !

B'day Special - दिग्गजांनी केले 'विराट'चे कौतुक

भारताचा आघाडीचा फलंदाज आणि कसोटी कर्णधार विराट कोहली याचा आज वाढदिवस. ५ नोव्हेंबर १९८८ साली राजधानी दिल्लीत जन्मलेला विराट हा सध्याचा सर्वात यशस्वी खेळाडू गणला जातो. त्याची क्रिकेटमधील आतापर्यंतची कारर्कीद त्याच्या नावाप्रमाणेच विराट अशी आहे. त्याच्या या भन्नाट खेळीवर क्रिकेट जगतातील दिग्गजही फिदा असून सर्वांनीच त्याची 'विराट' स्तुती केली आहे.

सुनील गावस्कर - एक चांगला खेळाडू होण्यासाठी तुमच्यामध्ये विशेष कौशल्य असणं गरजेचं असते, मात्र एक महान खेळाडू बनण्यासाठी कोहलीसारखा अॅटीट्यूड (दृष्टिकोन)असणेही गरजचे असते.

सर विवियन रिचर्ड्स - मला विराटला खेळताना खूप चांगले वाटते. त्याला खेळताना पाहून मला स्वतःच्या खेळाची आठवण येते.

सौरव गांगुली - सध्याच्या काळात विराट कोहली जगातला सर्वात महान फलंदाज आहे.

इयान चॅपेल - ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांच्या मतानुसार, भारताचा हा युवा खेळाडू म्हणजे क्रिकेटमधील 'प्रिन्स' आहे.

भारताचा अनुभवी गोलंदाज आणि विराटचा संघ सहकारी हरभजन सिंगनेही विराटचे कौतुक केले आहे. ' दबावाखाली विराटचा खेळ अजून उंचावतो. जगात असे फार कमी खेळाडू आहेत, ज्यांना मोठ्या (धावांच्या) आव्हानाचा पाठलाग करायला आवडतं, विराट हा त्यांच्यापैकीच एक आहे' असेही भज्जी म्हणतो.

विराटला खेळताना पाहून मला सचिन तेंडुलकरची आठवण येते
अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने विराटवर स्तुतीसुमने उधळली.

'विराट सारख्या खेळाडूला मिळालेले यश पाहून आपण आश्चर्यचकित होणार नाही, पण जर तो अपयशी ठरला तरच आपल्याला धक्का बसेल' अशा शब्दांत संजय मांजरेकरने त्याचे कौतुक केले.

नासिर हुसैन - इंग्लंडचा माजी कप्तान नासिर हुसैनच्या सांगण्यानुसार, 'सध्याच्या क्रिकेटजगतात सर्वात उमद्या खेळाडूची निवड करायची असले तर मी विराट आणि एबी.डी.व्हिलियर्स या दोघांचे नाव घेईन.'

सचिनचा वारसदार ईथेही Happy

क्रिकेट ऑस्ट्रेलिया कोणालाही असा मानसन्मान देत नाही उगाच ..

Enemy No. 1 Virat Kohli is Australia’s ODI captain, not Steve Smith. Believe it

http://www.hindustantimes.com/cricket/australia-name-virat-kohli-odi-cap...

मस्त. मी त्याचे यावर्षीचे अनेक डाव पाहिलेले नाहीत, पण मी जे पाहिलेत त्यात २०-२० वर्ल्ड कप मधे ऑस्ट्रेलियाविरूद्ध ची त्याची इनिंग या वर्षातील बेस्ट होती. धोनीबरोबर भागीदारी करून मॅच जिंकून दिलेली.

इज्जत देत नाही = मानसन्मान देत नाही... असा बदल केलाय खरा.. पण असाच तर अर्थ होतो ना त्याचा

@ फारेण्ड, २०-२० वर्ल्ड कप मधे ऑस्ट्रेलियाविरूद्ध ची त्याची इनिंग.... म्हणजे हा धागा काढायला कारणीभूत ठरलेलीच की रे..

असाम्या इज्जत देत नाही मी खूप ऐकलाय पूर्वी, याच अर्थाने. बर्‍याच दिवसांनंतर ऐकला इथे.

ऋन्मेष - :). ते लक्षातच आले नाही.

फारेण्ड येस्स, ईज्जत देणे हा तर आमच्याईथे फार प्रचलित वाक्यप्रचार आहे. खास करून क्रिकेटबाबत सर्रास वापरला जायचा. जसे की शेन वॉर्नला (म्हणजे त्याच्या बॉलिंगला) आपल्याकडे कोणी ईज्जत देत नाही. जो तो पुढे येऊन मारतो. मॅकग्राथ आज भारी बॉलिंग करतोय (तो कधी नाही करायचा) तर आज त्याला ईज्जत द्यायला हवी. किंवा असेही बोलू शकतो की त्याच्यासमोर ईज्जतमध्ये राहायला हवे. म्हणजे जास्त हुशारी न करता. जसे की एखादे एक्सिडंट झाले असता, अरे हाच राँग साईडने जात होता, तो बिचारा समोरून ईज्जतमध्ये येत होता. म्हणजे शिस्तीचे पालन करत .. तर असे हे ईज्जत पुराण. पण जर हे पुस्तकी व्याकरणात बसत नसेल किंवा मुंबईबाहेर प्रचलित नसेल तर एखाद्याला खटकू शकते. म्हणून असामी यांच्या सूचनेला ईज्जत अका सन्मान देत बदल केला Happy

List of records for Kohli in 2016
-

- Fastest to 25 ODI tons

- Fastest to 7,500 ODI runs

- Equals Sachin Tendulkar's (14) record of most hundreds in successful run chases

- Most runs in IPL in a single season

- Most hundreds in IPL in a year

- Only Indian Test captain to score three double hundreds

- Third player to score three double hundreds in a calendar year after Don Bradman and Ricky Ponting

- First Indian captain to register nine Test wins in a calendar year

- First Indian captain to register five successive Test series wins

- First Indian to aggregate over 1000 Test runs in a calendar year since Rahul Dravid, who made 1145 runs in 2011

आणि हाच जलवा २०१७ ला कंटिन्यू,.....

4 Number of consecutive series in which Virat Kohli has scored a double-century. This is the longest such sequence, going past Don Bradman and Rahul Dravid who had done it in three successive series.

डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड.... तसेच लारा पाँटींग वगैरे मंडळींचे रेकॉर्ड तुटत आहेत यापुढे काय बोलावे __/\__

जबरी! Form of his life! २००३-०४ च्या आसपासचा रिकी पॉण्टिंग आठवला. दिसेल त्याची धुलाई.

Pages