मिस बुम्बुम - ब्राझील मधील अनोखी सौंदर्य स्पर्धा

Submitted by Darshana१५ on 23 March, 2016 - 19:59

शरीराकडे संकोचूनच पाहण्याची सवय/संस्कार असलेल्या भारतीय मनाला न पेलवणारा ‘ब्राझीलियन’ आविष्कार.
रिओमध्ये ‘सिनोरिता’ हा शब्द इतक्या वेळेस माङया कानावर पडला की मीसुद्धा अनोळखी स्त्रीला संबोधताना ‘सिनोरिता पोर फावर (प्लीज)’ म्हणायला लागले.
सिनोरिता म्हटले की उगीच झग्यासारखे सुळसुळीत पायघोळ फ्रॉक घालून कतरिनासारखे दिसण्याची गरज नसते हेसुद्धा इथेच समजले.
म्हणजे बाईला हाक मारताना आपण जसे बाई, ताई किंवा मॅडम म्हणतो तसेच इथे ‘सिनोरिता’ म्हणतात. दुसरा एक लोकप्रिय शब्द म्हणजे ‘दोन्ना’. म्हणजे दोन्ना करोलिना, दोन्ना इझाबेला, दोन्ना सुलक्षणा. अर्थात माझ्या अवघड नावाचे इथे दोन्ना सुला हे सोपे रूपांतर होते. मीही मनातल्या मनात हे नाव नाशिकच्या जगप्रसिद्ध वाइनच्या गावाशी नाते जोडते म्हणून खूश असते.
लग्न झालेल्या मध्यमवयीन स्त्रियांना त्यांच्या नावापुढे दोन्ना हे प्रिफिक्स लावले जाते. ते अतिशय प्रचलित आहे. एकदा एका ब्राझीलियन मैत्रिणीच्या घरी गेले असता तिच्या किचनमध्ये हातरु मालांवर सात वारांची नावे भरतकाम केलेली दिसली. अगदी पायपुसणोसुद्धा हाताने बनवलेले.
शाळेत स्पोर्ट्स टीचर असलेली ही मैत्रीण तशी टॉम बॉय. तिच्याकडे तिच्या चार मुलांना सांभाळण्यासाठी पूर्णवेळ सेविका. ही मैत्रीण एकतर शाळेत किंवा जिममध्ये जास्त. घरी असली की मुलांना, नव:याला आणि कुत्र्याला बरोबर घेऊन समुद्रकिना:यावर. तिला हे सर्व करायला वेळ कधी मिळतो, माहीत नाही.
मी आश्चर्य व्यक्त करीत तिला तसे म्हटले. त्यावर ती म्हणाली, तिची आई ‘मुल्हेर प्रिन्दादा’ होती. म्हणजे आपण मराठीत जिला गृहकृत्यदक्ष म्हणतो अशी. घराची, नव:याची, मुलांची काळजी करणारी, घर सजविणारी, गिफ्टेड वूमन.
अशा स्त्रिया बायको म्हणून चांगल्या असतात. आजच्या काळात मात्र त्या थोडय़ा दुर्मीळ आहेत. या देशात अशा बाईचा शोध घेणो वनवासाला निघण्यासारखे आहे. वाटेत तिच्या वाटय़ाला काय काय भोग येतील त्यावरून तिची परीक्षा ठरते आणि विशेषणसुद्धा. ब्राझीलच्या नावामध्ये ब्रा हा शब्द आहे. इथे स्त्रिया अत्यंत सेक्सी कपडे घालतात. पण म्हणून त्यावरून या स्त्रियांना लेबल्स लावण्याची गरज नाही. त्यांचेही काही सामाजिक प्रश्न आहेतच. इथल्या स्त्रियांचे जगासमोर आलेले रूप खूप दर्शनी आहे, हे मात्र खरे!
फक्त आणि फक्त बिकिनीमध्ये समुद्रकिना:यावर फिरणा:या सुडौल बांध्याच्या भरगच्च देहाच्या स्त्रिया थेट खजुराहोच्या शिल्पातून उतरून आपल्यासमोर उभ्या राहिल्यासारख्या दिसतात. म्हणजे हे चित्र शुक्र वारी संध्याकाळपासून ते रविवारी संध्याकाळर्पयत समुद्रकिनारी दिसतेच. कधीकधी तीच बिकिनी घालून यच्चयावत वयोगटातील स्त्रिया रस्त्याने फिरताना दिसतात. पाहणा:याला त्याचे काही वाटत नाही. एखादा चुकला माकला भारतीय जो त्याच्या बायकोला ‘थ्री फोर्थ’ घालण्यास मोठय़ा मनाने परवानगी देतो, त्याची टिप्पणी सोडली तर बाकी सगळे ठीक असते. कुणी नैतिकतेचा बाऊ करीत नाही, की बलात्काराच्या घटना होताना दिसत नाहीत. समुद्रकिनारी खा:या शेंगदाण्याच्या जोडीला बिकिनी विकणारा, फुगेवाल्यासारख्या काठीवर तां ना पि हि रंगाच्या तलम बिकिन्या घेऊन मुक्त विहार करीत असतो. घेणारेसुद्धा रंग, पोत, फिटिंग, फील तिथल्या तिथे तपासून घेतात. खरंतर एक वरचा भाग किमान 5क् सेमी कपडय़ामध्ये बसतो परंतु खालचा भाग तर चिंधीपासूनच बनवला जात असावा यात शंका नाही.
तर अशा या मुक्त देशात बाईचा पाश्र्वभाग म्हणजे सौंदर्याचा निकष मानला जातो. इथे रिओत काही समुद्रकिनारे फक्त दिगंबर अवस्थेत फिरण्यासाठीच आहेत. देहाचे सगुण साकार रूप सजवून मिरवण्यापेक्षा जसे आहे तसे दाखवणो इथे महत्त्वाचे मानले जाते. यात कोणतीही दांभिकता नाही. ताकाला जाऊन भांडे लपविणो नाही.
‘साडीतच बाई सुंदर दिसते’ असे मानणारे आणि त्यातून समाधान शोधणारे माङो भारतीय मराठी मन ब्राझील देशी येऊन बरेचसे हलून गेलेय. सतत काही ना काही इथे घडत असते, इतके धक्के बसतात. चिंधीपासून बनविलेल्या बिकीनीज कमी की काय म्हणून आता ही मिस बुम्बुम स्पर्धा. म्हणजे आज नाही सुरू झाली ही. अर्थात माङया ब्राझीलियन मैत्रिणी मला त्याबद्दल माहिती देत असतात. 27 परगण्यातील 27 सुंदर बुम्बुम असणा:या ललनांचा नामघोष केला जातो. यात एक पोर्नस्टारसुद्धा होती जी तिच्या भरभक्कम उरोजांसाठी प्रसिद्ध आहे. आणि इतरजणी त्यांच्या जन्मजात हत्त्यारांबद्दल खात्री बाळगून आहेत. प्रमोशनचा भाग म्हणून साओ पावलोमधील रस्त्यावर भर ट्रॅफिकमध्ये या बुम्बुम्स सिग्नल नियंत्रणाचे काम करीत होत्या, म्हणजे पाहा!
सौंदर्य स्पर्धा म्हटले की आपल्याला चेहरा दिसतो, फिगर दिसते. फार फार तर रंग. इथे स्पर्धेचे निकष अजून ठाशीव आहेत. म्हणजे या सर्वाबरोबर पाश्र्वभाग गोलाकार, मोठ्ठा, भरीव आणि शिल्पाप्रमाणो असला पाहिजे. असाध्य ते साध्य असा. याच्या जोडीला उरोजही तसेच असतील तर जिंकण्याची संधी मिळणारच.
साधारण सहा वर्षापूर्वी ही स्पर्धा सुरू झाली. खूप गाजावाजा झाला. अनेक कारणांसाठी स्पर्धा गाजली. कधी परीक्षकांना लाच दिल्याचा आरोप झाला. कधी कुणी कौमार्य टिकविण्यासाठी सर्जरी केल्याचा दावा केला.
39 वर्षीय स्पर्धक ही इथे विजेती ठरली आहे.
अन्द्रेसा नावाच्या एका स्पर्धक तरुणीची शोकांतिका इथे फार प्रसिद्ध आहे. अन्द्रेसाचे बुम्बुम दुस:या क्रमांकावर आले होते. 27 वर्षाची ही तरु णी एक महिनाभर आयसीयूमध्ये होती. कारण तिने तिच्या मांडय़ांमध्ये कॉस्मेटिक जेल फिलर्स इंजेक्ट केले होते. त्यामुळे तिच्या स्नायूवर त्याचा परिणाम झाला. हे हायड्रोजेल फिलर्स बाहेर काढल्यावर तिला सेप्टिक झाले. विशिष्ट अवयवांना उठाव देण्यासाठी टोक्जलेल्या कृत्रीम रसायनांचा तिच्या शरीराने स्वीकार केला नाही आणि तिचा पाय कापून काढावा लागेल अशी वेळ आली.
सुदैवाने थोडक्यात निभावले.
ब्राझीलला जगाची कॉस्मेटिक राजधानी म्हणतात. इथे सर्वात जास्त ब्रेस्ट इम्प्लांट आणि बटक ऑगमेन्टेशन्स केली जातात. कलिंगडाला इथे ‘मेलन्सिया’ म्हणतात आणि अशा स्त्रियांनासुद्धा. यावर एक गाणेसुद्धा प्रसिद्ध आहे.
सांगण्याचा उद्देश, एकीकडे माङया मायदेशात पोर्नवर बंदी येत आहे आणि मी ज्या देशात राहतेय तिथे कित्ती काही घडतेय.
जगाच्या शाळेत शिकणे काय असते हे असे समजते आहे मला.
सौंदर्याचे आकार ऊकार जपणाऱ्या ह्या देशात माझी समज थोडी उपरीच ठरतेय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला लेख.
ब्राझील म्हणजे फूटबॉल आणि वेश्याव्यवसाय या दोन गोष्टींसाठी फेमस असे ऐकून होतो. वेंगाबॉईज ब्राझील गाण्यातून ब्राझील, ब्राझीलचे बिचेस, आणि तेथील ललना काय चीज आहे हे माहीत होतेच. पण ते असे मायबोलीवरच्या लेखातून वाचणे आवडले.
त्यांच्यात आणि आपल्यात संस्कृतीचा फरक आहेच. पण तसेच भारतीय महिलांमध्ये अशी शरीरयष्टी अभावानेच आढळते. आढळली तरी त्याला सौंदर्य म्हणून बघितले न जाता आंबटशौकिन नजरेनेच त्याचे मूल्यमापन केले जाते. त्यामुळे अशी उठावदार शरीरयष्टी काही जणींना अडचणीचीही वाटते. काही मैत्रीणींच्या गप्पातून हे समजले.

छान लिहिलयं.
बायदवे ते बमबम असावं , बुमबुम म्हणजे काहीतरी भलताच अर्थ होईल Proud
ब्राझीलविषयी आणखी वाचायला आवडेल.
प्रमोशनचा भाग म्हणून साओ पावलोमधील रस्त्यावर भर ट्रॅफिकमध्ये या बुम्बुम्स सिग्नल नियंत्रणाचे काम करीत होत्या, म्हणजे पाहा!>>> ह्यामुळे अ‍ॅक्सिडंटचं प्रमाण वाढत की कमी होतं ? Lol

बुम बुम म्हटलं की सध्या तरी आफ्रिदीच आठवतो.. टी-२० फिवर दुसरं काय !
>>

खरा आद्य बूम बूम म्हणजे जर्मनीचा बोरिस बेकर.. आफ्रिदी आता आला हो !

श्री ...... तो शब्द " बुम्बुम "च आहे. पोर्तुगिज भाषेत सर्व स्वर जसे आहे तसे उच्चारतात . म्हणजे क्लब ला ते क्लुबे म्हणतात. हि bums चीच स्पर्धा आहे . म्हणून थेट नाव आहे . बुम्बुम ..ह्या स्पर्धेत Bums ची चाचणी असते ...

वेश्याव्यवसाय हा शब्द ब्राझील साठी खूप मोठा होतो .
खूप सहज असते इथे तात्पुरते माधुर्य टिकवणे .
होकार असेल तर पैसे न देता धागे जुळतात . नाही म्हटले कि लोक दुसरीकडे जातात . ह्या कृती ला देहाच्या पातळीवर च ठेवले जाते ..
आशिया खंडातील काही देशंमध्ये ज्या पद्धतीने हा व्यवसाय चालतो तसा इथे दिसत नाही .

यु आर राईट दर्शना . थायलंडमध्ये बुमबुम वेगळ्या संदर्भात वापरतात म्हणुन माझा गैरसमज झाला होता.

तुमच्याकडून ब्राझीलच्या फुटबॉल आणि इतर खेळांबद्दल तसेच तिथल्या जीवनमान, अर्थव्यवस्थेबद्दल वाचायला आवडेल.

सध्या ब्राझील मध्ये आहात का? तिथे सरकार विरोधात फार मोठे आंदोलन सुरू आहे ना? लाखो लोक रस्त्यावरउतरले होते परवा. त्याविषयी पण वाचायला आवडेल.

दर्शना, खूप अनोखी माहिती सांगितलीस.
दुसर्‍या देशांतील कल्चर बद्दल तुझी उत्सुकता , त्यांच्या संस्कृती ला नांव न ठेवता तटस्थतेने त्यांच्या कडे पाहण्याची वृत्ती खूप आवडली..>>>>> +१११

छान लेख.ब्राझील,ब्राझील मधल्या परेड विषयी,अजुन वाचायला आवडेल.मीना प्रभु च्या प्रवासवर्णानात ही ह्या स्पर्धेचा उल्लेख आहे अस आठवतय.
मागे धुम - २ आलेला,तेव्हा ब्राझील म्हटल की मला लगेच बिप्स बसुबाई आठवायच्या. Happy

सगळ्यांनाच >> ++ १

लेख आवडला. अगदी सहजसुंदर लिहीला आहे. असेच पुढेही वाचायला आवडेल. मराठी पेपर ऑला मिळत असला तरी कधी कधी वाचायचा कंटाळा येतो, तेव्हा इथे लिहीलेत तर खूप आवडेल. Happy

छान लेख. आधी ब्लॉगवर वाचला होताच.

शिवाय प्रतिसादांतही बोलता बोलता अचानक काहीतरी छान निरिक्षण नोंदवून जातेस ते वाचायलाही छान वाटतं.
लिहीत राहा.

रिओ ऑलिंपिकच्या अनुभवांची वाट पाहते आहे. Happy

प्रत्येक देशाची आपली अशी संस्कृती असते तिचा मान राखावा. भारतात हे सगळ नक्कीच स्विकारलं जाणार नाही. आपल्या भारतात तर मुली जाऊ देत पण मुल सुद्धा बरमुडा आणि टी- शर्टवर पोहतात. इथेही परदेशात भारतीय पुरुष कधी स्पीडो वर पोहत नाही.

मस्तं लेख.
मुख्य म्हणजे या नव्या देशातली ही वेगळी संस्कृती नावे न ठेवता समजून घेण्याचा तुमचा प्रयत्न दिसतोय.
त्याबद्दल अभिनंदन.>+१००

आपल्या भारतात तर मुली जाऊ देत पण मुल सुद्धा बरमुडा आणि टी- शर्टवर पोहतात. इथेही परदेशात भारतीय पुरुष कधी स्पीडो वर पोहत नाही.>>>> कुठे पोहतात हे ही तितकेच महत्त्वाचे नाहीये का ह्याच्यात..
नदीत, समुद्रात, विहीरीत, टँक मधे, गावाकडे, शहरात, एखाद्या रिसॉर्टच्या स्विमींग पूलमध्ये.. नक्की कुठे.. उगाच जनरलाईज्ड स्टेटमेंट कशाबद्दल करायचं..

गोव्यामधे पाहिले आहे कुणी स्पीडो वगैरे घालून पोहताना दिसत नव्हते. अभारतीय मात्र पोहत होते.
इथल्या सिंगापुरच्या पुलमधेही भारतीय पुरुष हे बहुतेकवेळी शॉर्ट घालूनच पोहतात. टी शर्ट काढतात.
इथे समुद्राच्या बीचेवरसुद्धा पाहिले आहे भारतीय पुरुष असेच पोहतात.
खरे तर भारतीय लोकांना खूपसे पोहणे येत नाही. निदान शहरातून आलेल्या लोकांना तरी येत नाही. काहींनाच येते.
मी माबोच्या गटगमधेही पाहिले आहे बरेच पुरुष बरमुडा आणि टी शर्ट घालूनच पोहत होते.

ह्यात गैर काही नाही. माहिती आहे की आपण भारतीय स्त्रियांसमोर इतके कमी कपडे घालत नाही. तो कदाचित एक मुद्दा असेल पण स्त्रिया समोर नसतानाही भारतीय लोक अगदी आतल्या कपडयावर येऊन पोहत नाही.
हे विधान सगळ्याच देशात राहणार्‍या भारतीयांसाठी आहे.

माझा मुद्दा इतकाच आहे की कल्चरचा परिणात असतोच आपण जिथे जातो तिथे. अगदी भारताबाहेर जाऊनही आपल्याला संकोच वाटतो ज्या गोष्टी अपाण कधी केल्या नाहीत त्या करायला.

भारतीय पुरुष स्वतःच्या तब्येतीची राखण सहसा करत नाही ते ढेरपोटे, फुगलेले शरीर घेऊन कसे काय उघड्यावर जातील. ? Wink व्यवस्थित बॉडी राखली की व्यवस्थित प्रमाणात दाखवायला सुध्दा लोक लाजत नाही.
भारतात टक्कल पडलेले लोक सुध्दा न्युनगंड बाळगून असतात. उलट बाहेर बिन्धास्त फिरतात. हिरो होतात.

>>>> मी माबोच्या गटगमधेही पाहिले आहे बरेच पुरुष बरमुडा आणि टी शर्ट घालूनच पोहत होते. <<<
ए मी तर बोवा पाण्यात उतरलोच नव्हतो.... उगा कशाला कपडे काढायचे, उघडे व्हायचे? ते नक्कोच,,
नैतर काही काही नतद्रष्ट नावे ठेवायला तयारच असतात ना की बघा "दंडाच्या बेटकुळ्या काढून दाखिवतोय..." Proud
तर असो. कृपया विषयांतर नको.
तिकडचि परिस्थिती तिकडच्या सारखी, इकडे इकडच्यासारखी.... ! आपल्याला जे झेपेल, ते करावं.

स्त्रीयांच्या बुम्बुम स्पर्धेवरुन ढेरपोट्या पुरुषांच्या दंडाच्या बेटकुळ्यावर धागा गेला Lol

मस्त लेख.
कॉलेजमधे असताना एका तंदुरुस्त(जाड्या) आफ्रिकी तरुणीने,ती किती सेक्सी समजली जाते याबाबत सांगितले होते.पण एकूणच अनुभव तोकडे असल्यामुळे ते सारे कळलेही नव्हते.या लेखामुळे परत तिची आठवण आली.अशाच मस्त लिहित जा.

जिज्ञासा .. ब्राझील मध्ये रस्त्यवर उतरून नागरिकांनी सरकार विरोधात आपला निषेध नोंदवला होता . त्याला "माग्निफिकासव " असे म्हटले जाते . ह्या खेपेस तो मेगा स्वरूपातील होता .
ज्या सुट्टीच्या दिवशी तो होणार होता त्या आधी नागरिकांना you tube वरून ह्या साठी असणारे एक गाणे आणि त्यावर कशा पद्धतीने समूह नृत्य करायचे आहेत त्याची कोरियोग्राफी सांगण्यात आली होती .
घोषणांच्या जोडीला , लुला आणि द्युमा चे पुतळे सुद्धा होते .. देशाच्या राष्ट्रीय झेंड्याच्या रंगाचे कपडे सगळीकडे विकले गेले होते. तो एक अलिखित ड्रेसकोड होता . म्हणजे असतो ..
ब्राझील मध्ये प्रमुख १८ शहरांमध्ये निश्चित ठिकणी लोकांचा जमाव एकत्र आला होता . ठराविक वेळेत घोषणा देवून , सामुहिक नृत्य करून मग सगळीकडे बियर पिवून तो दिवस साजरा केला गेला.
इथे ह्या देशात एक छुपा रंगभेद आहे . वर्णभेद . सक्तीचे मतदान आहे . विद्यमान सरकार गरिबांचे पर्यायाने श्रमिकांचे . त्यांचा ह्या आंदोलनाला पाठींबा नव्हता . उच्चवर्गीय , श्वेत वर्णीय ह्यात होते .
ब्राझील ला आज जिथे आहे त्या स्थानावर नेणाऱ्या लुला ह्यांना अटक व्हावी ह्यासाठी लोक रस्त्यावर आले होते.
ह्या आंदोलना नंतर लुला ह्यांची सद्याच्या मंत्री मंडळात मोठ्या पदावर नेमणूक झाली .

ब्राझील मध्ये निषेध नोंदविण्याची अजून एक पद्धत आहे. जी दक्षिण अमेरिकेत प्रसिद्ध आहे . पनेलासो .. panelaço

नवीन नवीन ब्राझिल मध्ये राहायला आले तेव्हा संध्याकाळच्या वेळेस अचानक भांडी एकमेकांवर आपटल्याचा आवाज यायचा . म्हणजे चहाचे भांडे , तवा , त्यांच्या झाकणासह एकमेकांवर आपटला तर कसा आवाज येतो तसा आवाज . म्हणजे तुम्ही चर्च मध्ये असा , बागेत असा , बस stop वर असा , हा आवाज येणारच ..
सगळीकडे अंधार होत असे . उंच उंच इमारती मध्ये अंधार करून , कधी दिवे विझवून , लावून , बंद चालू करुन तर कधी हॉर्न वाजवून खूप गोंगाट कानावर पडायचा . एरव्ही इथे रस्त्यावर कुणी हॉर्न वाजवत नाही परंतु काही ठराविक वेळेस असा आवाज हमखास कानी येत असे .
हा काय प्रकार आहे ह्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला तेव्हा त्यामागील सामाजिक कारण समजले .
पनेलासो असे नाव असणाऱ्या ह्या कृती चा खरा अर्थ होतो स्वयंपाकाची भांडी . सार्वजनिक निदर्शन करण्याच्या पद्धतीला पनेलासो हे नाव दिलेय . मेटल ची भांडी एकमेकांवर आपटून निषेध नोंदवण्याची हि पद्धत दक्षिण अमेरिकेतील म्हणायला हवी .
मी ह्याचे काही शुटिंग सुद्धा केले आहे.
ह्या बद्दल एक पोस्ट मी ब्लोग वर लिहिली आहे. अजून काही मुद्दे त्यात आहेत . परंतु एका रविवार पुरवणी साठी मी ते लिहिलेय म्हणून लगेच काही इथे देता येणार नाही .

संजीव ..... कार्निवल आणि हि स्पर्धा भिन्न आहेत.
kapoche ... अर्थ कारणांवर मला कितपत लिहिता येईल माहित नाही. कारण मी सामाजिक आणि सांस्कृतिक अंगाने ब्राझील बद्दल अभ्यास करतेय .
तुमच्यासाठी एक निरक्षण इथे देते .
ब्राझिल बद्दल काही वाचत असताना "बेलिन्ज्या " " हा शब्द समोर आला . म्हणजे ब्राझिल मध्ये बेल्जियम प्रमाणे विकास होवू शकतो / तिथल्या अर्थव्यवस्थे प्रमाणे ब्राझिल हि पुढे जावू शकतो . परंतु ब्राझिल पुढे भारताप्रमाणे काही सामाजिक समस्या , प्रश्न आहेत . त्यामुळे विकासाला अडथळा येत आहे .
ब्राझिल मध्ये आपल्या प्रमाणेच गरीब श्रीमंत दरी फार मोठी आहे .. आपल्याकडे जात आडवी येते तर त्यांच्याकडे आडून आडून रंग . कुणी उघड पणे बोलणार नाही परंतु प्रेमात यशस्वी होण्यापासून ते मोठ्या हुद्द्यावर जाण्यासाठी रंग खूप महत्वाचा भाग आहे .

In 1974 Edmar Bacha, an economist, described Brazil s economy as “Belindia”, a Belgium-sized island of prosperity in a sea of India-like poverty. Since then Brazil has done far better than India in alleviating poverty, but in business terms it still has a Belindia problem: a handful of world-class enterprises in a sea of poorly run ones.

Pages