आधार कार्ड

Submitted by अभि_नव on 16 March, 2016 - 23:28

मला आधार कार्ड, त्यासाठी करावी लागणारी अंमलजबावणी किंवा त्याच्या मागील पायाभुत सुविधा यांबद्दल काहीही माहिती नाही.
या लेखाचा उद्देश ती माहिती करुन घेऊन माझ्या ज्ञानात भर टाकणे असा आहे.
या लेखाचा उद्देश कोणत्याही योजनेवर किंवा कोणत्याही सरकारवर टीका करणे, आरोप करणे, जाब विचारणे किंवा चुकीची माहिती पसरविणे असा नाही याची नोंद घ्यावी.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
युनीक आयडेंटीफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडीया अर्थात आधार कार्ड तत्कालीन काँग्रेस सरकारने २८ जानेवारी २००९ रोजी लागु केले.
या अंतर्गत एक युनिक १२ अंकी क्रमांक प्रत्येक सबस्क्राइबरला देण्यात येतो. याच्या अनेक हेतुंपैकी एक हेतु असा होता की सर्व सरकारी अनुदाने विना भ्रष्टाचार / लिकेज न होता अंतीम लाभार्थीपर्यंत पोहोचावीत.

परंतु,
याच आधार अंतर्गत नागरीकांचा बायोमेट्रीक डेटा ही घेण्याते येत आहे. यात, डोळे, बोटांचे ठसे ई. चा समावेश आहे.

हा डेटा सरकारचा आजवरचा कारभार बघता, त्यांना नीट सुरक्षीतरित्या सांभाळता येणार आहे किंवा कसे, त्यासाठी नक्की काय उपाययोजन केली, याबाबत काही माहिती मिळत नाही.

ही माहिती सरकार स्वत:च दुरुपयोग करण्यापासुन व इतर वाईट हेतु असलेल्या व्यक्ती / संस्थांच्या हातात पडण्यापासुन कसे थांबवणार या बाबतीत काहीही ठोस नियम नव्हते / नाहीत.

त्यात, आत्ताच सद्ध्याच्या भाजप प्रणीत सरकारने, हे बील "मनी बील" या कॅटॅगरीखाली आणुन ज्या पद्धतीने राज्यसभेचा विरोध व त्यांच्या सुचना सरसकट रितीने डावलुन पास करवुन घेतले आहे, ते अतिशय संशयास्पद आहे.

अमेरीका, युरोपात तेथील आंतरजाल व दुरध्वनी सर्विलियंसचा कसा दुरुपयोग केला गेला हे तर आपणास माहिती असेलच.
(आमचे आशास्थान) मा. एडवर्डजी स्नोडेनसाहेबांमुळे आपल्याला हे सर्व अधिकृतपणे अस्तित्वात आहे याची खबर मिळाली.

असाच गैर्वापर, भारतात होणार नाही याची कसलीही ठोस यंत्रण अस्तित्वात नाही.
राज्यसभेने ज्या सुचना केल्या त्यातील एक अशी होती की एखाद्याला यातुन बाहेर पडण्याचा व तसे केल्यानंतर त्याचा सर्व डेटा पुसुन टाकण्याचा पर्याय असावा. जो धुडकावुन लावण्यात आलेला आहे, इतर अनेक सुचनांसोबत.

असे व्हायला नको होते. सर्वांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते.

तसेच याआधीच कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की आधार कार्ड बंधणकारक करु शकत नाही, कारण आधार कार्ड नाही म्हणुन एखाद्याल सरकार सेवा नाकारु शकत नाही.

आधीच पॅन कार्डासारख्या योजना अस्तित्वात असताना त्यांना आणखी मजबुत बनवुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवुनही ते साध्य करता येणार आहे ज्यासाठी आधार कार्ड हवे असे सांगितले जात आहे.

तरी यावर योग्य चर्चा व आपण सरकारला विनंती करुन काही बदल घडवुन आणु शकतो का या वर चर्चा व्हावी.

Shocking: Aadhaar cards have more details than any US surveillance
http://www.businessinsider.in/Shocking-Aadhaar-cards-have-more-details-t...

India's billion-member biometric database raises privacy fears

http://www.reuters.com/article/us-india-biometrics-idUSKCN0WI14E

Aadhaar more intrusive than US surveillance exposed by Snowden, say privacy advocates
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/aadhaar-mor...
----------------------------------------------------------------
Your 10-Point Cheat Sheet On Aadhaar Bill Passed By Lok Sabha
http://www.ndtv.com/cheat-sheet/your-10-point-cheat-sheet-on-aadhaar-bil...

Aadhar Bill passed in Lok Sabha, Opposition fears ‘surveillance’
http://indianexpress.com/article/india/india-news-india/aadhar-card-uid-...

LS passes Aadhar Bill, rejects RS recommendations: All you need to know about the law
http://www.firstpost.com/politics/aadhaar-number-is-not-proof-of-indian-...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

To generate the password they used a random number with 123456789 as seed and a hardcoded string db_password_123

हसा हसा के मार ही डालोगे... Rofl Rofl

तुम्ही आम्ही आणि आधार

दि ट्रिब्युनच्या पत्रकार रिचा खैरा, यांनी "अवघ्या 500 रुपयात आधार चा डेटा विकला जातोय", ही बातमी केली,आणि आधार कार्डचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.संबंधित बातमीची चौकशी करून दोषींना शासन करण्याऐवजी UIDIA ने या पत्रकारांवरच केस केली.हा प्रकार म्हणजे "shoot the messenger" असाच झाला. यावर भारतातील काही डोकं ठिकाणावर असणाऱ्या पत्रकारांनी आपला आवाज उठवला.तर एडवर्ड स्नोडेन ने देखील या प्रकरणावर ट्विट करत UIDIA चुकीची पावलं उचलत असल्याचं निक्षून सांगितलं.
एकूणच आधार कार्ड आणि त्याची सुरक्षितता,आणि गोपनीयता यावर देशभरातील अनेक माध्यमांमध्ये चर्चा सूरी झाली.आपण देखील "आधार नेमके काय आहे? त्याची उपयुक्तता काय आहे? त्याची गरज नेमकी काय आहे? आधार चा गैरवापर सरकार करू शकते का? आधार अनिवार्य आहे का? आधार संबंधी तज्ज्ञांची मत नेमकी काय आहेत? असे अनेक विषय जे आधारशी संबंधीत आहेत ते समजून घेतलं पाहिजे.

आधार नेमकं काय आहे..?
28 जानेवारी 2009 रोजी भारत सरकार तर्फे Unique Identification Authority Of India (UIDIA) नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली.देशातील प्रत्येक नागरिकाला एक बहुउद्देशिय अस राष्ट्रीय ओळखपत्र देणे, हा संस्थेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे.
‎इन्फोसिसचे सह संस्थापक श्री.नंदन निलकेनी यांना, या UIDIA चे पाहिले अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले.
‎या संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या ओळखपत्रांना "आधारकार्ड" असे म्हटले जाते.बेसिकली आधार कार्ड हा एक 12 अंकी विशिष्ट असा नंबर आहे.जो देशातील नागरिकाला त्याची ओळख म्हणून दिला जातो.एका व्यक्तीला एकच आधार नंबर देण्यात येतो.या ओळखपत्रासाठी संबंधित व्यक्ती भारताची नागरिक असणे,ही प्रमुख अट आहे.
आधार कार्ड बनवताना बोटांचे ठसे,आणि बुबळांच स्कॅन करन्यात येत.याला बायोमेट्रिक डेटा कलेक्ट करणं अस म्हणतात.थोडक्यात ही एक तुमची बायोमेट्रिक ओळख देखील आहे.आज घडीला भारताचा बायोमेट्रिक डेटाबेस हा जगातला सगळ्यात मोठा डेटाबेस म्हणून ओळखला जातोय.आणि हा बायोमेट्रिक डेटाच "आधार संबंधी" सुरू असलेल्या एकूणच कोलाहलाच प्रमुख केंद्रबिंदू आहे.त्यासंबंधी आपण पुढे पाहुयात.

आधाराची उपयुक्तता -
देशातली खूप मोठी लोकसंख्या ही या आधार सिस्टमच्या आधी वाऱ्यावरच सोडलेली होती.आजच्या घडीला 6.5 कोटी लोकांकडेच पासपोर्ट आहे.20 करोड लोक हे ड्रायव्हिंग लायसन्स बाळगतात. इलेक्शन कमिशन कडून देखील देण्यात येणारे मतदान कार्ड हे देशातल्या प्रत्येक नागरिकांकडे आहे अस नाही.शिवाय 18 वर्षांखालील एक मोठी लोकसंख्या या मतदान कार्डशी संलग्न नसते. थोडक्यात देशातील जनतेला एक सिस्टममध्ये बांधू शकेल,एकसारखी ओळख प्रदान करू शकेल,अशी कोणतीच व्यवस्था आधार आधी अस्तित्वात नव्हती.अश्या परिस्थितीत एक हक्काचं ओळखपत्र प्रदान करायचं काम आधारने केल आहे.
सध्या हे आधारकार्ड सरकारच्या आदेशानुसार अनेक ठिकाणी वापरण्यात येत आहे. यामध्ये, बँक खाते,टॅक्स फायलिंग,विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप्स,पेन्शन,नवीन मोबाईल क्रमांक,तसेच रेशन कार्ड, विविध आरोग्य संबंधित योजना सारख्यांच्या समावेश आहे.
सरकार जरी अनेक ठिकाणी आधारच कम्पलशन करत असल तरी, आधारकार्ड अनिवार्य आहे का हे देखील समजून घेणं आवश्यक आहे.

आधार अनिवार्य आहे का..?
हा टॉपिक समजावून घेताना आपल्याला आधार संदर्भात मा.सुप्रीम कोर्टाच वेळोवेळी काय म्हणणे आहे, हे समजावून घ्यावे लागेल.

1). 23 सप्टेंबर 2013 -
"सरकारच्या काही विभागांनी,आधारला अनिवार्य बनवलेले आहे.हे जरी खरे असले तरी,"आधार" न बनविणाऱ्या लोकांना या गोष्टींमुळे कोणतेही नुकसान होता कामा नये,कारण आधारकार्ड अनिवाय नाही आहे.

2). 24 मार्च 2014 -
देशाच्या नागरिकांना, आधारकार्ड नसल्याच्या परिस्थितित त्कोणत्याही सुविधांपासून वंचित ठेवता येणार नाहीये,ज्यांचे ते हक्कदार आहेत,कारण आधारकार्ड हे अनिवार्य नाही आहे.

3). 16 मार्च 2015 -
"सुप्रीम कोर्ट आशा करते की ,23 सप्टेंबर 2013 रोजी "आधार अनिवार्य नसल्याच्या" आदेशाचा,केंद्र आणि राज्य सरकार पालन करतील.

4). 11 ऑगस्ट 2015 -
> भारत सरकारला, या नागरिकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी,देशातील प्रसारमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर करून,हे सांगितलं पाहिजे की,"आधार अनिवार्य नाही आहे."
> सामान्य परिस्थितीत देशातील कोणताही नागरिक,हा आधारकार्ड नसल्याच्या परिस्थितीत त्याला मिळणाऱ्या कोणत्याही सुविधांपासून वंचित राहता कामा नये,ज्यावर त्याचा हक्क आहे.

5). 15 ऑक्टोबर 2015
सुप्रीम कोर्ट इथे स्पष्ट करते की,"आधार कार्ड ही योजना पूर्णतः ऐच्छिक आहे.जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय या प्रश्नावर कोणताही अंतिम तोडगा काढत नाही,तोवर आधार कार्ड ला अनिवार्य नाही बनवता येऊ शकत.

थोडक्यात मा. सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी हे स्पष्ट केले आहे की,"आधार कार्ड" हे अनिवार्य नसून ऐच्छिक आहे.तरीदेखील सध्याच सरकार,या आधार कार्ड संबंधी योग्य ती जनजागृती न करता,अनेक ठिकाणी हे कार्ड वापरण्यास जनतेला प्रवृत्त करत आहे. अश्या परिस्थितीत, आधार कार्ड खरेच सुरक्षित आहे का? हा प्रश्न देखील देशातील जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो.

आधार सुरक्षित आहे का.? -
भारत सरकार आणि UIDIA ही संस्था वेळोवेळी,"आधारकार्ड सुरक्षित आहे का?"या प्रश्नाचं उत्तर देताना, अस प्रतिपादन करतात की,"आधारसाठी जमविण्यात आलेला बायोमेट्रिक डेटा हा, अतिशय सूरक्षित पद्धतीने एनक्रिप्टड स्वरूपात संग्रहित आहे. अश्या परिस्थितीत हा डेटा लीक होणे, हे संभवत: अशक्य आहे."
पण,
या आधार कार्ड डेटा लीक होण्या संबंधीची वस्तुस्थिती काय आहे? हे देखील पाहणे गरजेचे आहे. कारण दर 2-3 महिन्याला हजार -पाचशे रुपयात हा डेटा विकला जातोय,अश्या बातम्या देशभरात ठिकठिकाणी उजेडात येताहेत.
29 मार्च 2017 ला, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी,ची आधार संदर्भातील माहिती एका उत्तेजित कंपनीने चक्क ट्विटरवर सार्वजनिक केली होती.धोनीच्या पत्नीने नंतर डायरेक्ट माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांना टॅग करून जाब विचारला होता.

विद्यार्थी, पेंशनधारी, आणि अनेक जनकल्याण योजनांचा लाभ घेणाऱ्या करोडो लोकांची यादी देशातल्या अनेक वेबसाईट्स वर उपलब्ध असल्याच्या अनेक बातम्या अनेक पेपर,न्यूजचॅनेल वाल्यांनी वेळोवेळी दाखवल्या आहेत.

या सर्वांवर कडी म्हणजे,
Center for Internet & Society (CIS) च्या एका रिपोर्टनुसार, भारत सरकारच्या 4 महत्वाच्या जनकल्याणकारी योजनांमधून 13.5 करोड आधार नंबर,तसेच पेंशन आणि मनरेगा सारख्या योजनांमधून 10 करोड बँक खात्यांची माहिती लीक झाली आहे.आणि यातील सर्वात इंटरेस्टिंग आणि दुर्दैवी फॅक्ट म्हणजे आजमितीला देशातील 23 करोड जनतेला आधारद्वारे सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय,आणि लीक होणारे आकडे पण जवळपास तितकेच आहेत.
याचा परिपाक म्हणून,
34 हजार सर्व्हिस प्रोव्हायडर UIDIA ने ब्लॅकलिस्टड केले आहेत.शिवाय, आत्तापर्यंत 85 लाख नकली आधारकार्ड देखील रद्द करण्यात आलेले आहेत.

आधार कार्डच्या सुरक्षेतविषयी काम करणाऱ्या अनेक तज्ज्ञांच,खुद्द प्रशासनमधीलच अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे याविषयीचे मत जाणून घेणे देखील आवश्यक आहे.
आधारकार्ड सुरक्षतेविषयी एका रिपोर्टवर काम करणारे श्रीनिवास कोडोली म्हणतात," आधार कार्ड द्वारे गोळा करण्यात आलेली माहिती ही एक प्रकारे तुमच्या खाजगीपणावर घाला आहे.हे ओळखपत्र एक प्रकारे तुमच्या अनेक संविधानिक अधिकारांवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देखील धोकादायक आहे.परंतु या सिस्टमचा सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे,भविष्यात सरकारला तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवायला आधार मदत करू शकेल.हे कसं शक्य आहे? हे आपण खालील उदाहरणावरून समजावून घेऊयात.
जून ‎2014 पासून चीनने त्यांच्या देशामध्ये Social Credit System (SCS) नावाची योजना प्रायोगिक तत्वावर लागू केली आहे.जी 2020 पासून प्रत्येक नागरिकांसाठी अनिवार्य करण्यात येणार आहे. तर या योजनेनुसार, देशातील प्रत्येक नागरिकाला एक विशिष्ट मेरिट त्याच्या एकूणच वागणुकीनुसार देण्यात येईल. म्हणजे तो काय करतो,कुठे फिरतो,सोशल मीडियावर काय लिहितो,काय खरेदी करतो,कुठला पिक्चर बघतो, या आणि अश्या सर्व ऍक्टिव्हिटी वर सरकारचे नियंत्रण असेल.आणि यासाठी मदत करेल तो त्यांचा एक विशिष्ट नंबर जो आपल्या आधार कार्ड सारखा आहे. आणि या सर्व गोष्टींच अन्यालिसिस करून मग चीन सरकार त्या नागरिकाच मूल्यमापन करेल.त्यानुसार त्याला मार्क देईल सोप्या भाषेत. म्हणजे,समजा हा पेपर 10 मार्कंचा आहे तर, जो नागरिक सरकारच्या ध्येयधोरणासोबत असेल तर त्याला 10 पैकी 10 किंवा 9 मार्क.जे तळ्यात मळ्यात आहेत त्यांना 5 किंवा 6 मार्क.आणि जे विरोधात असतील त्यांना 2 किंवा 3 मार्क.आता यापुढचा जो सिन आहे तो खूप घातक आणि डेंजर आहे.आता या मार्कांनुसार चिनी सरकार त्या देशातल्या नागरिकांना सुविधा देईल.म्हणजे सरकारला अनुकूल असणाऱ्या लोकांना सर्व सुविधा आरामात मिळतील.आणि विरोधात असणाऱ्या लोकांना मात्र प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागेल.जे की खुपच वाईट आहे.ही एक प्रकारची "डिजिटल अस्पृश्यताच" झाली.असा प्रकार आपल्या देशात देखील घडू शकतो का..? तर हो घडू शकतो.सध्याच्या सरकारच्या एकूणच स्टँडवरून ही शक्यता अगदीच दुरापास्त आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल.
असो.
तर आधार कार्डच्या सुरक्षतेविषयी शंका निर्माण करणारे अनेक पत्र याच सरकारच्या प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी देखील वेळोवेळी लिहिली आहेत.यामध्ये वित्त आयोगाचे माजी प्रमुख एम.के.बेझबारूआ,उत्तराखंडचे माजी मुख्य सचिव सूरज किशोर दास,केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचे माजी प्रमुख कमलकांत जयस्वाल, इत्यादीचा त्यात समावेश आहे.

आधारकार्डच्या सुरक्षतेविषयी इतक्या शंका खुद्द प्रशासकीय अधिकारी,पत्रकार,या क्षेत्रातील तज्ञ मंडळी जाहीर करत असताना,या प्रकल्पाचे पाय रचणारे नंदन निलकेनी यांचं देखील मत आपण समजावून घेतले पाहिजे. ते म्हणतात की,
"आधार विरोधातला सर्व बातम्या या मीठ मसाला लावून जनतेसमोर मांडण्यात येत आहेत."
पुढे निलकेनी साहेब अस देखील म्हणतायत की,"आधारमुळे समाजाला शिस्त लागेल,हा देश नियमानुसार चालेल. या सिस्टममुळे डुप्लिकेट लोकांना ओळखता येईल,भ्रष्टाचारावर अंकुश ठेवता येईल.सध्या आपण बदलाच्या फेजमध्ये आहोत.तसेच आधार पूर्णतः सुरक्षित आणि एनक्रिप्टड आहे."
सोबतच या सर्व दाव्यांच समर्थन करण्यासाठी निलकेनी साहेब हे देखील निक्षून सांगतात की,"जगभरातील 60 देशांनी, बायोमेट्रिक डेटा सिस्टम वापरात आणली आहे.
पण जेव्हा आपण निलकेनी साहेबांच्या या दाव्याची वस्तुस्थिती जाणून घेतली तर काय दिसतंय आपल्याला?
उदा - तुर्की या देशाची लोकसंख्या 7.5 करोड आहे.तिथे 2015 मध्ये जवळपास 5 करोड लोकांचा बायोमेट्रिक डेटा लीक झाला होता.
असाच प्रकार 2015 मधेच अमेरिकेत देखील घडला आहे.अमेरिकन सरकारच्या नेटवर्कवरून (जे जगातला सर्वात सुरक्षित नेटवर्क समजलं जातं) 50 लाख लोकांचा बायोमेट्रिक डेटा काही ह्याकर्सने चोरला होता.
तसेच,2011 साली इस्त्राईल मध्ये लाखो लोकांच्या बायोमेट्रिक डेटाची चोरी फ्रान्सच्या इथिकल ह्याकर्सने पकडली होती.
आता जेंव्हा अश्या बायोमेट्रिक डेटा चोरीच्या घटना घडतात किंवा घडू शकतात तेंव्हा त्या आपसूकच आपल्या "राईट टू प्रायव्हसी"च्या अधिकारावर हल्ला असतो.कारण या सर्व गोळा केलेल्या डेटाची काळजी घेणे,त्याची सुरक्षितता तपासणे हे सरकारचे काम आणि कर्तव्य आहे.
24 ऑगस्ट 2017 च्या एका निर्णयात मा. सुप्रीम कोर्ट अस म्हणत की, "राईट टू प्रायव्हसी" हा तुमच्या मौलिक अधिकाराचा एक हिस्सा आहे." याचाच अर्थ असा होतो की,आता तुमची खाजगी माहिती ही सार्वजनिक नाही होणार.सोबतच सुप्रीम कोर्टाने हे देखील तेंव्हा स्पष्ट केले आहे की, "आधारकार्ड ला विविध योजनांना जोडण्याच्या संबंधी 5 न्यायाधीशांचा विशेष गठीत करण्यात आलेला "आधार बेंच" निर्णय घेईल. यानंतर या "आधार बेंच" ने 9 न्यायाधीशांच्या विशेष संविधान पिठाकडे या प्रकरणाला वर्ग केले.
याच संबंधी पूढे सुप्रीम कोर्टाने सरकारला हे देखील विचारले होते की,"आम्ही हे जाणतो की देशातील सर्वसामान्य नागरिकांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून सरकार आधार द्वारे डेटा गोळा करत आहे. पण म्हणूनच हा प्रश्न महत्वाचा आहे की,गोळा करण्यात येत असलेला डेटा हा पूर्णतः सुरक्षित आहे का? जर तो सुरक्षित नसेल तर तो "राईट टू प्रायव्हसी" वर घाला असेल.त्याचवेळी याच डेटा प्रोटेक्शन संबंधी कायदा आणायचा अधिकार मात्र सरकारला आहे.पण हा डेटा इतरत्र विकायचा,किंवा त्याचा इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापर करायचा अधिकार मात्र सरकारला नाही आहे. थोडक्यात या सर्व दोलायमान परिस्थितीत सरकारकडे हा बायोमेट्रिक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काही मजबुत, ठोस उपाय योजना सरकारकडे आहे का? असा सरळ प्रश्न देखील सन्माननीय न्यायालयाने उपस्थित केला होता.
यावर सरकारने उत्तर देताना अस म्हटलं आहे की,"आधार संबंधित सर्व डेटाची काळजी घेण्यासाठी सरकार नवीन प्रणाली डेव्हलप करत आहे.पण या प्रकरणावर पी.चिदंबरम यांनी एक ट्विट करून सरकारच्या या दाव्याची हवाच काढून टाकली.ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की ,"सरकार आता नवीन प्रणाली आणू पाहतय,पण या प्रणालीच्या आधी जो काही करोडो लोकांचा डेटा ऑलरेडी लीक झालाय त्याच काय? हे म्हणजे घोडे पळून गेल्यानंतर त्यांना बांधून ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यासारखं आहे.

थोडक्यात, आधार संबंधित कायद्यात जनतेसाठी सुस्पष्ट आणि सहमती असणाऱ्या आराखड्याचीच कमकरता आहे. सोबतच या नियमांमध्ये ज्या काही सूचना आहेत, त्यासंबंधी पण काहीच परदर्शीपणा नाहीये.शिवाय आधार कार्डच्या अनुषंगाने तुमच्या "राईट टू प्रायव्हसी"च्या अधिकाराच प्रोटेक्शन करणाऱ्या कायद्यांची देखील काही तरतूद नाही आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे,जनतेकडून गोळा करण्यात आलेल्या या सर्व आधार बायोमेट्रिक डेटाचा जर सरकारनेच गैरवापर केला,त्याच्याशी छेडछाड केली, तर काय.? यावर देखील आश्वासक अस उत्तर सरकारकडे नाहीये.थोडक्यात या योजनेत म्हणावी तितकी सुसूत्रता, सरळता अशी नाहीच आहे.अमेरिकेत या आधार कार्ड सारखीच एक सिस्टम आहे.तीच नाव आहे सोशल नंबर सिस्टम(SNS).या योजनेअंतर्गत सर्व काही प्लॅनड आहे. म्हणजे हा सोशल नंबर कुठे आणि कोणत्या योजनेअंतर्गत वापरता येणार,त्याची ऑथोरिटी कोणाकडे असणार?या आणि अनेक गोष्टी व्यवस्थित ठरवलेल्या आहेत.पण आधार बाबतीत अस काहीच नाहीये.सगळा भोंगळा कारभारच चालू असल्यागत वाटतोय.

शेवटी,आधाराची उपयुक्तता आणि गोळा करण्यात आलेला बायोमेट्रिक डेटा आणि त्याची सुरक्षितता या गोष्टींचा विचार केल्यास, आधार ऐच्छिक असावं.त्याला अनिवार्य करणे ही देशातील जनतेसाठी घोडचूक ठरेल हे मात्र नक्की.

FACEBOOK

The Supreme Court on Tuesday said apprehensions of profiling of citizens on the basis of Aadhaar data is a serious issue that needs examination
https://m.economictimes.com/news/politics-and-nation/aadhaar-based-profi...

आधार कार्ड चे सगळे फायदे मान्य करून सुद्धा Sc ने हे स्टेटमेंट जेल आहे, आणि सरकारकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा केली आहे

Happy

Supreme Court says mandatory #Aadhaar linking with bank accounts and mobile phones will stand extended indefinitely till the judgement is pronounced
https://twitter.com/ANI/status/973512942611255296

Supreme Court extends deadline for linking #Aadhaar with services till Court delivers verdict on validity
https://twitter.com/DDNewsLive/status/973519993135648768

The five-judge Constitution bench of the Supreme Court, headed by Chief Justice of India Dipak Misra, said the government cannot insist for mandatory #Aadhaar
https://twitter.com/ANI/status/973513440978448384

न्यायालयाचे अभिनंदन.

न्यायालयाचे अभिनंदन.
<<
सरकारचा निषेध कधी करणार? कारण मागील दाराने हे लिंकिंग करत, कोर्टाचा बिनदिक्कित अपमान करणे तुमच्या लाडक्या भाजपाने चालवलेले आहेच.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाने माझ्यासारख्या अनेकान्ना आधार मिळाला. खुप गोन्धळाची परिस्थिती निर्माण करुन कुणाचे हित साधल्या जाते?

खुप गोन्धळाची परिस्थिती निर्माण करुन कुणाचे हित साधल्या जाते? >>> कुबेरांनी एक लेख लिहिला आहे तो वाचा

Pages