आधार कार्ड

Submitted by अभि_नव on 16 March, 2016 - 23:28

मला आधार कार्ड, त्यासाठी करावी लागणारी अंमलजबावणी किंवा त्याच्या मागील पायाभुत सुविधा यांबद्दल काहीही माहिती नाही.
या लेखाचा उद्देश ती माहिती करुन घेऊन माझ्या ज्ञानात भर टाकणे असा आहे.
या लेखाचा उद्देश कोणत्याही योजनेवर किंवा कोणत्याही सरकारवर टीका करणे, आरोप करणे, जाब विचारणे किंवा चुकीची माहिती पसरविणे असा नाही याची नोंद घ्यावी.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
युनीक आयडेंटीफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडीया अर्थात आधार कार्ड तत्कालीन काँग्रेस सरकारने २८ जानेवारी २००९ रोजी लागु केले.
या अंतर्गत एक युनिक १२ अंकी क्रमांक प्रत्येक सबस्क्राइबरला देण्यात येतो. याच्या अनेक हेतुंपैकी एक हेतु असा होता की सर्व सरकारी अनुदाने विना भ्रष्टाचार / लिकेज न होता अंतीम लाभार्थीपर्यंत पोहोचावीत.

परंतु,
याच आधार अंतर्गत नागरीकांचा बायोमेट्रीक डेटा ही घेण्याते येत आहे. यात, डोळे, बोटांचे ठसे ई. चा समावेश आहे.

हा डेटा सरकारचा आजवरचा कारभार बघता, त्यांना नीट सुरक्षीतरित्या सांभाळता येणार आहे किंवा कसे, त्यासाठी नक्की काय उपाययोजन केली, याबाबत काही माहिती मिळत नाही.

ही माहिती सरकार स्वत:च दुरुपयोग करण्यापासुन व इतर वाईट हेतु असलेल्या व्यक्ती / संस्थांच्या हातात पडण्यापासुन कसे थांबवणार या बाबतीत काहीही ठोस नियम नव्हते / नाहीत.

त्यात, आत्ताच सद्ध्याच्या भाजप प्रणीत सरकारने, हे बील "मनी बील" या कॅटॅगरीखाली आणुन ज्या पद्धतीने राज्यसभेचा विरोध व त्यांच्या सुचना सरसकट रितीने डावलुन पास करवुन घेतले आहे, ते अतिशय संशयास्पद आहे.

अमेरीका, युरोपात तेथील आंतरजाल व दुरध्वनी सर्विलियंसचा कसा दुरुपयोग केला गेला हे तर आपणास माहिती असेलच.
(आमचे आशास्थान) मा. एडवर्डजी स्नोडेनसाहेबांमुळे आपल्याला हे सर्व अधिकृतपणे अस्तित्वात आहे याची खबर मिळाली.

असाच गैर्वापर, भारतात होणार नाही याची कसलीही ठोस यंत्रण अस्तित्वात नाही.
राज्यसभेने ज्या सुचना केल्या त्यातील एक अशी होती की एखाद्याला यातुन बाहेर पडण्याचा व तसे केल्यानंतर त्याचा सर्व डेटा पुसुन टाकण्याचा पर्याय असावा. जो धुडकावुन लावण्यात आलेला आहे, इतर अनेक सुचनांसोबत.

असे व्हायला नको होते. सर्वांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते.

तसेच याआधीच कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की आधार कार्ड बंधणकारक करु शकत नाही, कारण आधार कार्ड नाही म्हणुन एखाद्याल सरकार सेवा नाकारु शकत नाही.

आधीच पॅन कार्डासारख्या योजना अस्तित्वात असताना त्यांना आणखी मजबुत बनवुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवुनही ते साध्य करता येणार आहे ज्यासाठी आधार कार्ड हवे असे सांगितले जात आहे.

तरी यावर योग्य चर्चा व आपण सरकारला विनंती करुन काही बदल घडवुन आणु शकतो का या वर चर्चा व्हावी.

Shocking: Aadhaar cards have more details than any US surveillance
http://www.businessinsider.in/Shocking-Aadhaar-cards-have-more-details-t...

India's billion-member biometric database raises privacy fears

http://www.reuters.com/article/us-india-biometrics-idUSKCN0WI14E

Aadhaar more intrusive than US surveillance exposed by Snowden, say privacy advocates
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/aadhaar-mor...
----------------------------------------------------------------
Your 10-Point Cheat Sheet On Aadhaar Bill Passed By Lok Sabha
http://www.ndtv.com/cheat-sheet/your-10-point-cheat-sheet-on-aadhaar-bil...

Aadhar Bill passed in Lok Sabha, Opposition fears ‘surveillance’
http://indianexpress.com/article/india/india-news-india/aadhar-card-uid-...

LS passes Aadhar Bill, rejects RS recommendations: All you need to know about the law
http://www.firstpost.com/politics/aadhaar-number-is-not-proof-of-indian-...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>आता पॅन कार्ड सोबत आधारकार्ड जुलै पर्यंत जोडले नाही तर तुमचे पॅन कार्ड वैध धरले जाणार नाही.>>
म्हणजे तुमचे पॅन कार्ड असेल तर ते रद्द होणार का?

Aadhaar isn’t progress — it’s dystopian and dangerous

Imagine your government required you to consent to ubiquitous stalking in order to participate in society — to do things such as log into a wifi hotspot, register a SIM card, get your pension, or even obtain a food ration of rice. Imagine your government was doing this in ways your Supreme Court had indicated were illegal.

https://blog.mozilla.org/netpolicy/2017/05/26/aadhaar-isnt-progress/

या लेखाचा उद्देश कोणत्याही योजनेवर किंवा कोणत्याही सरकारवर टीका करणे, आरोप करणे, जाब विचारणे किंवा चुकीची माहिती पसरविणे असा नाही याची नोंद घ्यावी.

>> खालची तुमची विधाने वाचल्यानन्तर या वाक्यावर विश्वास बसत नाही.

"पानी सोडून द्यावे"
देशाकरीता एकीकडे इतके जवान शहीद होत आहे आणि तुम्ही रिटन्स वर पानी सोडू शकत नाही? देशासाठी इतके तर करायला हवे.

अ३,
अनेक तज्ञ लोकांनी व मोठ्या संस्थांनी लिहिलेल्या लेखांचे व बातम्यांचे दुवे वेळोवेळी दिलेले आहेत.
ते तुम्ही वाचले का?
हा धागा माझ्या एकट्याचे मत नाही.

अगदी आत्ता आत्ता आधार कार्डा मागे असणा-या तंत्रज्ञान कंपनी, आयस्पिरीटचे संचालक बेकायदेशीररीत्या, ट्विटरवर असंख्य ड्युआय बनवुन, इतर आधार विरोधकांना असभ्य भाषेत ट्रोल करताना रंगेहाथ पकडले गेले.
एका तंत्रज्ञान कंपनीच्या संचालकाला या पातळीवर उतरुन हे सर्व का करावे लागते, जर आधार चा हेतु स्वच्छ आहे?

Sharad Sharma’s dubious denial

https://medium.com/@jackerhack/sharad-sharmas-dubious-denial-b0b9aa6c6b8f
- Kiran Jonnalagadda

iSPIRT Co-Founder Sharad Sharma Apologises for Trolling Aadhaar Critics
While Nandan Nilekani praised Sharma for his apology, others thought it was far from enough after he had abused those raising serious concerns about Aadhaar.

https://thewire.in/139188/sharad-sharma-aadhaar-trolling/

सामान्या नागरीकाच्या हिताचे असणा-या आधार कार्डासाठी अशा खालच्या पातळीवर जाउन बेकायदेशीर कृती करावी लागने हे काय सुचवते?

रिटर्न्स भरता येणार नाहि, कर (टीडिएस) कापला जातोच, आता तो परत कसा मिळवायचा का त्यावर पाणी सोडायचं हा प्रश्न आहे... >>> NRE Account च्या बाबतीत टीडीएस कापला जात नाही.

>>NRE Account च्या बाबतीत टीडीएस कापला जात नाही.<<

बरोबर आहे पण प्रत्येक एनारि अकाउंटला जोडुन एनारो अकाउंट उघडावे लागते - प्रोसीड्स, भारतातील उत्पन्नाकरता. टिडिएस एनारो अकाउंटमधुन कापला जातो.

आता आधार कार्डाची अट एनाराय करता शिथिल करण्यात आलेली आहे, असं वाचनांत आलं...

Vigilante justice is never a good idea
If you don’t want vigilante justice, you must have true justice

Following my posts and much media coverage, iSPIRT’s Governing Council put together a Guidelines and Compliance Committee (IGCC), which conducted an investigation that concluded on 28 May 2017. We do not have a public statement from IGCC, but instead—curiously enough—have a public statement from Sharad Sharma himself, summarising the decisions of the committee that investigated him.

https://medium.com/@jackerhack/vigilante-justice-is-never-a-good-idea-4e...

माझ्याकडे आधार कार्ड चा प्रिंट आउटआहे जो बर्‍याच ठिकाणी चालतो पण एक अकाउंट मायनर टू मेजर करताना बँक आधार कार्ड कार्डच मागत आहे. अश्या वेळी मी काय करावे? नंबर इ शू झाला आहे. तर तो ग्राह्य का धरला जात नाही. असे कार्ड आता कुठून मिळेल? काही लिंक असली तर द्या. प्रिंट आउट ग्राह्य का धरला जात नाही?

आधाराची प्रिंट व्हॅलिड आहे. सरकारने तसा आदेश दिला आहे. गुगल करुन त्या आदेशाची प्रिंट काढून त्यांना दाखवा आणि तरी ऐकले नाही तर "लिहून द्या" असे सांगा.
मी सगळीकडे आधार कार्डची प्रिंटआउट दिली आहे अगदी पासपोर्ट करीता सुध्दा.
आधारकार्डचा नंबर हीच आपली ओळख आहे कुठल्याही शासकिय कार्यालयत माहीती विभागात तो नंबर दिला तर त्यावरुन सदर व्यक्तीची माहीती लगेच मिळते आणि ती पडताळणी होऊ शकते. त्यामुळे घरी आलेले आधारकार्डच हवे अशी मागणी कुठलाही विभाग करू शकत नाही.

अमा, https://uidai.gov.in/ या ऑफिशिअल वेबपेज वर जा. तुमच्या घराजवळचं सेंटर शोधा, लिस्ट्मध्ये फोन नंबर्सही दिलेले आहेत. फोन करून विचारा सगळ्या सिस्टीम्स चालू आहेत ना म्हणून (मला पुण्यात २/३ ठिकाणी सांगीत्लेल की अमूक सिस्टीम बंद आहे वगरे) आणि मग तिथे जाऊन नाममात्र किंमत देऊन आधार कार्डाची प्रिंट किंवा क्रेडिट्/डेबिट कार्ड सारखे आधार कार्ड करून घ्या. (हे नुसतं कार्ड आहे, स्मार्ट-आधार कार्ड नाही. सॉर्ट ऑफ आयकार्ड टाईप)

या असल्या कारडांची रंगीत झेरॉक्स काडून लॅमिनेट करून ठवावीत . माझ्याकडे तीन चार आ.कार्डे आहेत त्यातले मूळचे कोणते आहे मलाच कळत नाही Happy

Aadhaar in the hand of spies
Big Data, global surveillance state and the identity project.

An investigation by Fountain Ink shows that the companies contracted by UIDAI to process the information are connected to both Cambridge Analytica and Palantir Technologies through business dealings and individuals involved in their affairs during the period of the contract. L-1 Identity Solutions, Morpho-Safran and Accenture have scores of business contracts with American, French and British intelligence and defence agencies through direct contracting of services or services provided by parent corporations and sister companies. Several individuals who worked at these companies have held top positions in the CIA, the Department of Homeland Security (DHS), the Federal Bureau of Investigation (FBI) and the US military before making the switch.

Fountain Ink has reviewed the contract between the BSPs and UIDAI and found that they had access to unencrypted biometric data as part of their job, contrary to UIDAI’s public stand that the data is always encrypted and inaccessible. A set of written questions sent to UIDAI and its top officials didn’t receive any response.

http://series.fountainink.in/aadhaar-in-the-hand-of-spies/

आयटी कडुन ईमेल आलेला आहे, त्यात म्हटले आहे,
As per section 139AA of the Income Tax Act, 1961, it is mandatory for taxpayers to link their Aadhaar with PAN for filing Income Tax Return from 1-July-2017.

हे कुणी समजावुन सांगेल का? म्हणजे एकसष्ठ साली आधार कार्डच नसताना त्या कायद्यान्वये मी ते कसे काय लिंक करावे?

Aadhar card should be attached to pan no just like it should be linked to bank act and gas etc.

Jio users’ names, email addresses & more leaked online, but it is in denial

Last night, a website called Magicapk.com went online, allowing anyone to search for user identification data (Know Your Customer; KYC) of Reliance Jio customers. It had the following kyc information: Name, Mobile Number, Email address, Date of activation, Circle and Aadhaar number, but thankfully, the Aadhaar information was redacted.

http://www.medianama.com/2017/07/223-reliance-jio-data-leak/

१९६१ च्या कायद्यात बदल करता येतात हे तुम्हाला खरंच माहीत नाही?Even the rates of income tax are also ammended in the income tax act 1961. Else we would have been paying taxes at 1961 rates.

१३९ अअ हे कलमच आहे. तुम्ही एखादे बजेटचे भाषण वाचा. त्यात आयकर व अन्य कायद्यांत बदल करण्याबद्दल म्हटलेलं असतं.
फक्त चटनांतल्या बदलांना क्रमांक दिले जातात. बाकी कायद्यांत कधी बदल केला ते नोंदवतात. (बहुतेक)
काही कायदे ब्रिटिश राजवटीतले आहेत.

आधार कार्डाचा फोटो काळानुसार अपडेट करुन नवीन आधार घ्यावे का? मी दहा वर्षानी नवीन पॅनसाठी घेतले . ( पण नव्या पॅनवरच मी जास्त तरुण वाटतो. Proud ) आधारचे फोटो मात्र काळे बिंद्रेच येतात .. जरा 'आपला'सा वाटेल असा फोटो अजुन का येत नाही? ट्रॅफिकचे नियम मोडले तर क्यामेरा फोटो काढतो त्यात नंबर नीट दिसतो आणि आधारवर तोंदावर क्यामेरा नीट धरुनही फोटो नीट का येत नाही?

फोन अप्डेट करणे सोपे आहे. पण २०० रु घेतात. प्रत्येक बदलाला २०० रु

http://www.ibtimes.co.in/baahubali-star-prabhas-aadhar-card-details-leak...

Pages