शृंगार ८

Submitted by अनाहुत on 16 March, 2016 - 09:54

सकाळी बराच उशीरपर्यंत झोपलो होतो . जाग आली आणि पाहिल तर मंजू अजूनही झोपली होती . ती इतका वेळ कधी झोपत नाही म्हणून पाहिले तर तिने डोळे उघडले आणि तिला बराच त्रास असल्याच जाणवल . ऑफिसला सुट्टी असल्यामुळे फार घाई नव्हती पण तिचा त्रास जरा जास्त वाटला त्यामुळे नुसता आराम न करता डॉक्टरांकडे जाण्याबद्दल तिला सुचवल . ती सुरूवातीला नाही म्हणाली पण तिला जास्त त्रास होत असावा ज्यामुळे ती तयार झाली डॉक्टरांकडे यायला .डॉक्टरांकडे पोहोचल्यावर पटकन नंबर मिळाला . त्यांनी मंजूला तपासले , थोडे प्रश्न विचारले , तिथेच काही टेस्ट केल्या आणि काही टेस्ट लिहून दिल्या सोबत तिला इतके दिवस का आणले नाही आणि त्रास वाढण्याची वाट पहात होतो का ? असे प्रश्नही झाले . या प्रश्नाचे काही उत्तर नव्हते माझ्याकडे . टेस्टचे रिपोर्ट घेऊन लवकरच दाखवायला सांगितले . सोबत काळजी घ्या म्हणून सांगितले . यानंतर टेस्ट करून आम्ही घर गाठले .जेवण बाहेरूनच मागवले . तिच्यासाठी दाल फ्रायच मागविल होत . आज जरा हलकच जेवण केल तिनं . गोळ्या घेतल्या . संध्याकाळपर्यंत तिला जरा आराम मिळाला .

दुसऱ्या दिवशी सकाळी माझ मी उरकून ऑफिस गाठल . तिला जाताना जास्त काम न करण्याच , हलकच जेवण करायला व गोळ्या आठवणीने घ्यायला सांगितलं होत .रात्री येताना रिपोर्ट घेतला तसाच डॉक्टरांना दाखवायला गेलो .

त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी नाही लक्षात आल्या माझ्या त्यातील टेक्निकल टर्म्समुळे .

" थोडक्यात सांगायच तर थोडा problem आहे त्यांना . म्हणजे अगदी फार काही serious नाही . पण इथे यायला बराच वेळ घेतल्यामुळे थोडा problem राहील . त्यांना शारिरीक आणि मानसिक या दोन्ही पातळ्यांवर मेहनत घ्यावी लागेल . औषधांसोबत खरी गरज आहे ती मानसिक आधाराची . तुम्हा दोघांना एकमेकांना मानसिक आधार देत पुढे जावे लागेल . सद्ध्या शारिरीक संबंध पुर्णपणे बंद ठेवा . "

" म्हणजे परत कधीच ... "

" नाही अगदी अस नाही . औषध उपचार आणि मानसिक आधार यांच्या आधारे पुढे जा . पुढे तुम्ही शारिरीक संबंध ठेऊ शकता . पण थोडा त्रास कायमस्वरूपी राहील पण तो सुसह्य राहील within limit राहील . त्यामुळ फार काळजीच कारण नाही पण थोडे efforts घ्यावे लागतील . आणि मिसेसना आणा पुढच्या वेळी मी त्यांनाही सांगेन हे सविस्तर . हे सुरूवातीला समजण गरजेच आहे . फीज रिसेप्शनिस्ट कडे जमा करा आणि आजच पुढची appointment घ्या उद्या किंवा परवाची फार उशिर नको . तेव्हा तुमच्या मिसेसशी बोलते तुम्ही आता त्यांना काही सांगू नका . मी सांगेन त्यांना . ok या . "

" मुग्धा किती पेशंट आहेत अजून ? ठिक आहे dr आदितींना आत पाठव . "

जवळपास मला हाकलूनच काढल होत , काही शंका होत्या त्याही विचारायच्या राहील्या होत्या पण मंजू नसताना त्यात काही अर्थ नव्हताच . तीच्या बरोबर आल्यावरही हे प्रश्न येणार असल्यामुळे डॉक्टरांनी यात वेळ घालवला नव्हता . ठीक आहे तेव्हा विचारता येतील हे प्रश्न पण मी आता गडबडीत आलो होतो ते डोक्यावरचे टेन्शन थोडे कमी करण्यासाठी . पण ते इथ येऊन वाढलच .जाऊदे येऊ पटकन मंजूसोबत आणि मग विचारू सविस्तर सगळं . उद्याच येऊ असा विचार करत बाहेर पडत होतो तेव्हा त्या डॉक्टर माझ्याशेजारून पटकन आत गेल्या .

======================================
" अग काय आज आमची आठवण कशी काढली ? "

" म्हटलं तुला फोन करून काही फायदा नाही तर एकदा स्वतःच जाऊया . अग एवढी कसली आली आहेस बिझी ? "

" अग तुमचं बर आहे हॉस्पिटल आहे त्यामुळे कधीमधे दुस-यावर सोपवता येत आणि सुट्टी घेता येते . आमचं तस नाही आपण नसले की क्लीनिक बंदच . ते राहूदे गं पण मला सांग काय काम काढलस . "

" अग काम अस नाही एकदा भेटूया म्हटलं , नाही तर तू कुठे येणार आहेस . थोड भेटूया ना सगळे एकत्र थोडासा चेंज वाटेल . "

" ठीक आहे ना मी विचारते अश्विनला आणि लगेच तुला सांगते . "

" ए त्या नव-याला राहू दे , त्यालाही मिळूदे की थोडा मोकळा वेळ . त्याच नाही म्हणत मी . Girls only ."

" Girls ? "

" अग मग काय तू काय लगेच काकूबाई झालीस का ? अग अजून मुल नाहीत तोपर्यंत थोड स्वातंत्र्य उपभोगूया ना . नंतर कुठे मिळणार आहे . "

" बर बाई येते तू सांग वेळ त्या वेळी येते . "

" आणि काय ग Gynaec कडे पुरूष पेशंट कधीपासून यायला लागले ? "

" अग तस नाही ग काही लोकांना अजिबात धीर धरवत नाही . लगेच रिपोर्ट दाखवायला आला . बायकोला सोबत घेऊन यायला सांगितल आहे . बाकी त्याचही फार काही चुकल नाही . त्याची बायको आहेच थोडी विचित्र आधीतर किती दिवस येत नव्हती आणि मग खूपच त्रास व्हायला लागल्यावर आली . "

" काय त्रास आहे तिला ?

"....."

" ohh that , अग मग यात काय मोठी गोष्ट आहे दर दुस-या-तिस-या बाईला हा त्रास होतो कधीना कधी . "

" हो पण तिच्या बाबतीत हे बहुधा फार जूनं आहे आणि त्यामुळे problem बराच वाढला आहे . मी history जाणून घेत होते पण ती काही सांगतच नव्हती clear त्यामुळे अवघड जात आहे . "

" अग असतात काही तू लक्ष देऊ नको आणि डॉक्टरांनी पेशंटमधे इतकही involve होऊ नये त्याने त्रासच होतो आपल्याला आणि उपचार करायचही अवघड होऊन बसत . "

" छे ग इतकही काही नाही तू विचारल म्हणून मी सांगितल . बाकी तुमचा कसा चाललाय दात पाडण्याचा व्यवसाय ? "

" अग छे ग दात पाडायच कितीही मनात असल तरी आम्हाला ' आपण तुमचा दात वाचवण्याचा प्रयत्न करू ' असच बोलाव लागत ."

" अस का येत तुझ्या मनात ? "

" अग का काय , चांगले सुशिक्षित लोकही oral care च्या बाबतीत फारच horrible असतात . असा वास येतो ना तोंड उघडल की काय बोलायला नको . आपण चक्कर वगेरे येऊन पडलो तर म्हणून दोघींना माझ्या मागे उभ रहायला सांगते . आणि कधी जर उलटी झाली तर मास्कमुळे ती आपल्याच नाकात जाण्याची आणि गुदमरून आपला जीव जाण्याचीही शक्यता असते . अशा तर परिस्थितीत काम करतो आम्ही तुला काय माहीत . "

" बर बाई "

" बर ते राहूदे मी निघते आता . बाहेर तुझे पेशंट वाट बघत असतील आणि मला लाखोली वाहतील . चल बाय आणि फोन करून वेळ कळवते तेव्हा ये . "

========================================
" या आत्ता आत गेल्या त्या कोण ? "

" त्यापण डॉक्टर आहेत "

" डॉक्टर .."

" हो . डेंटिस्ट आहेत त्या "

" नाव काय आहे त्यांच ? "

" डॉ . आदिती "

" डॉ . आदिती.."

" का काय झालं ? "

" नाही . काही नाही . बर मला उद्याची अपॉइंटमेंट हवी होती ."

" उद्याच्या सगळ्या अपॉइंटमेंट फुल आहेत , परवाची मिळेल . चालेल ? "

" हो ठीक आहे ."

" ९.३० , ठीक आहे ? "

( थोडी धावपळ होईल पण ठीक आहे करू अडजेस्ट . मंजूला इथेच बोलावून घेऊन मी डायरेक्ट इथे आलो तर जमेल . )
" हो ठीक आहे करा फिक्स ."

" परवा ९.३०. ओके ."

"ओके "

तिथून निघालो डोक्यात होत परवा पर्यत हा विचार काही पिच्छा सोडणार नाही . पाहू परवा काय आहे ते कळेल .

..... क्रमशः

भाग १ www.maayboli.com/node/55229
भाग २ www.maayboli.com/node/55239
भाग ३ www.maayboli.com/node/55264
भाग ४ www.maayboli.com/node/55293
भाग ५ www.maayboli.com/node/55354
भाग ६ www.maayboli.com/node/55545
भाग ७ www.maayboli.com/node/55591

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

...