हाँगकाँग मध्ये २ रात्रीच्या वास्तव्यासाठी हॉटेलबद्दल शिफारशी

Submitted by रेव्यु on 16 March, 2016 - 04:49

मी सपत्नीक २९ एप्रिल ला सायंकाळी हाँगकाँगला पोहोचत आहे ( शांघाय हून).
हॉम्ग्काँग मध्ये ३ ते ४००० रुपयाच्या रेंजमध्ये ( पर नाईट) चांगले हॉटेल सुचवाल का? ते एअरपोर्टहून किती दूर आहे? आमचा हेतु केवळ साईट सीइंग आहे, आम्ही १ मे रोजी सायंकाळी ६ वाजता भारतात परत येत आहोत.
आण्खी काही प्र्श्न असे.
-- हॉम्गकॉम्ग मध्ये व्हिस्सा ऑन अरायव्हल आहे का?
--- इतर साईट सीइंग काय आहे ? कंड्क्टेड टूर्स वगैरे आहेत का? इतर काही सावधानी घ्यावी लागेल का?

उत्तराबद्दल आधीच धन्यवाद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा पुतण्या सध्या हाँग काँग मधे आहे. तो याच बिझिनेस मधे आहे. हवा तर त्याचा काँटॅक्ट देऊ शकेन. प्लीज मला विपु करा.

हॉम्गकॉम्ग मध्ये व्हिस्सा ऑन अरायव्हल आहे का?>>> हो.

डिस्नेलॅन्ड, ओशन पार्क मध्ये आवड असेल तर यापैकी एक, विक्टोरिया पिक - दिवसा आणि संध्याकाळी Tsim Sha Tsui Promenade एवढेच जमेल दोन दिवसांत.

Tsim Sha Tsui मेट्रो स्टेशनजवळ wing-on plaza mall मध्ये दोन चांगले भारतीय रेस्टॉरन्ट्स पण आहेत.

makemytrip, tripadvisor var हॉटेल मिळतील. मेट्रो स्टेशनजवळचे हॉटेल पाहिलेत तर बस, टॅक्सी ची गरज पडायला नको.