सामाजिक उपक्रम २०१६

Submitted by मो on 9 March, 2016 - 21:20


नमस्कार,

१० मार्च २०१६, सावित्रीबाई फुले यांचा ११९ वा स्मृतीदिन. १९व्या शतकातील समाजसुधारक स्त्रियांमध्ये सावित्रीबाईंचे स्थान मानाचे आहे. पतीच्या खांद्याला खांदा लावून, मानसिक, शारीरिक अवहेलनेला सामोरे जाऊन, स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणार्‍या सावित्रीबाईंनी स्त्रियांकरीता केलेले कार्य कालातीत आहे. स्त्रीशिक्षणाच्या बरोबरच स्त्रियांशी संबंधित इतर सामाजिक क्षेत्रातही सावित्रीबाईंचे फार मोठे योगदान आहे. पीडित विधवा स्त्रियांना आत्महत्या किंवा भ्रूणहत्या यांपासून रोखण्याकरता बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, विधवांच्या मुलांचे संगोपन, केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न या आणि इतर अनेक सामाजिक कार्यातून समाजाला आशेचा किरण दाखविणार्‍या सावित्रीबाईंना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रणाम!

सामाजिक उपक्रमाचे हे आपले सातवे वर्ष. या वर्षीचा उपक्रम आपण सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस अर्पण करणार आहोत. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ६ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. स्त्रिया आणि मुलांकरीता कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. यावर्षी महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ पाहता गरजू शेतकरी, त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन मदत करणार्‍या संस्थांचाही आपण उपक्रमात समावेश केला आहे.

या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो. यावर्षी निवडलेल्या संस्थांना गरज असलेल्या गोष्टींची यादी मागवण्यात आली आहे.

गेल्यावेळेप्रमाणेच देणग्या खालील पद्धतीने स्वीकारल्या जातील,

१) ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी स्वयंसेवकांपैकी कोणालाही संपर्क करुन तुम्ही किती देणगी देणार आहात इतकेच कळवावे. यासाठी ३१ मार्च ही मुदत ठेवत आहोत.

२) एप्रिलपासून, किती देणगी मिळत आहे ते पाहून सर्व संस्थांना साधारण समान निधीवाटप करण्यात येईल. त्याचवेळेस त्या निधीतून त्या संस्थेसाठी दिलेल्या यादीतून काय सामान घेता येईल, ते कोठून घेता येईल वगैरे ठरवले जाईल.

३) देणगीदारांचे गट करुन कोणी कोणत्या संस्थेला देणगी पाठवायची, संस्थेच्या अकाउंटची माहिती इत्यादी कळवण्यात येईल. त्यानंतर तुम्ही संस्थेच्या खात्यावर रक्कम जमा करु शकता. संस्थेच्या अधिकृत टॅक्स खात्याची माहिती इथेही लिहिण्यात येईल.

४) देणगीदारांनी देणगी पाठवल्यावर स्वयंसेवकांपैकी कोणालाही त्याबद्दल कळवणे महत्वाचे आहे. त्याप्रमाणे संस्थेला कळवले जाईल.

५) सर्व देणगीदारांनी देणग्या पाठवल्याचे आम्हाला कळवले की प्रत्येक संस्थेकडून खातरजमा केली जाईल.

६) सर्व जुळले की मग वस्तू विकत घेण्यासाठी पाऊल उचलले जाईल.

७) वस्तू खरेदी झाली व संस्थेला पोचली की इथे सांगितले जाईल.

ही पद्धत गुंतागुंतीची वाटेल पण देणगीदारांनी योग्य त्या संस्थेला फक्त योग्यवेळी देणगी पाठवायची आहे. बाकी काम उपक्रमाचे स्वयंसेवक करतील.

काही संस्था अभारतीय चलन पण स्वीकारतात. ज्यांना वेगळ्या चलनामधे देणगी द्यायची आहे त्यांनी संपर्क किंवा विपुद्वारे स्वयंसेवकांशी संपर्क साधावा. जे मायबोलीचे सभासद नाहीत परंतु मदत करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी सुनिधीशी lataismusic@yahoo.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

या वर्षीच्या उपक्रमाद्वारे मदत केल्या जाणार्‍या संस्था खालीलप्रमाणे आहेत.
(सर्व संस्थांची माहिती पहिल्या काही प्रतिसादांमध्ये टाकली आहे. तसेच खालील संस्थांच्या नावांवर टिचकी मारल्यास तुम्हाला ती माहिती दिसू शकते)

१. भगीरथ ग्रामविकास संस्था, कुडाळ, सिंधुदुर्ग
२. सुमति बालवन, कात्रज, पुणे
३. अनामप्रेम, अहमदनगर
४. शबरी सेवा समिती, कर्जत, रायगड
५. दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळी, यवतमाळ
६. माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला, सोलापूर
७. परिवर्तन संस्था, डोंबिवली, मुंबई

सामाजिक उपक्रम स्वयंसेवक चमू -
अरुंधती कुलकर्णी, मो, सुनिधी, अतरंगी, कविन, महेंद्र ढवाण, पूर्वा, निशदे, गायत्री१३

मागील काही वर्षी केल्या गेलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल खाली वाचता येईल - -
सामाजिक उपक्रम २०१५
सामाजिक उपक्रम २०१४
सामाजिक उपक्रम २०१३
सामाजिक उपक्रम २०१२
सामाजिक उपक्रम २०११
सामाजिक उपक्रम २०१०

आतापर्यंत खालील संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे वस्तुरुपी मदत केली गेली आहे - -

शबरी सेवा समिती, भगीरथ ग्रामविकास संस्था, सुमती बालवन, अपंग निवासी कल्याण केंद्र सटाणा, सावली सेवा ट्रस्ट, मैत्री, गुरुकुल, कोथरुड येथील मुलींची अंधशाळा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तनिष्का मार्च अंकामध्ये मी माताबालक प्रतिष्ठानच्या डॉ. संजीवनी केळ्कर यांची घेतलेली मुलाखत आली आहे.
लिंक असली तर कृपया इथे द्याल का ?

लातूर मध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई उद्भवली आहे. तिथे पाण्याची काही सोय करणार्‍या संस्था आहेत काय?

मागील वर्षी एक बातमी वाचली होती ज्यात अमहाराष्ट्रीयन युवकाने स्वखर्चातून काही टंचाईग्रस्त गावांना स्वखर्चाने १-२ दिवसाचे पाणी पुरवले होते टँकरने.

यंदा त्या भागात राहणार्‍या कुणाला काही माहिती आहे का? कदाचित टँकर लॉबी गब्बर झाली असेल पण लोकांना पाणी मिळणार असेल तर मी थोडासा भार सोसायला तयार आहे.

कृपया माहिती द्यावी. मी आणखी ठिकाणी चौकशी करतोय.

पाण्याच्या टंचाई संदर्भात हा लेख वाचला होता. इतके सोपे उपाय का केले जात नाहीत?

http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31808&articlexml=A-M...

काही अजून लिंका :

http://www.sswm.info/content/soak-pits

http://tspri.cgg.gov.in/GJWebFiles/33/21.pdf

http://www.thehindu.com/news/national/telangana/ibrahimpur-becomes-first...

http://www.indiawaterportal.org/articles/village-creates-magicand-river

खूप छान उपक्रम आहे हा. मलाहि माझे दोन शब्द मांडावेसे वाटत आहेत इथे. माझं गाव माणगाव (उमरोली - खरवली). तिथली परिस्थितीही फार काही चांगली नाही आहे. निम्म्याहून अधिक लोक अशिक्षित आहेत. रोजगाराच्या संधी अजिबातच नाहीत. शेतीचा सीजन असेल तेव्हा शेतीची कामं करायची, लोकांच्या मजुऱ्या करायच्या आणि घर चालवायच. आई वडिलांचं लक्ष नाही म्हणून मुलं शिक्षण घेत नाहीत. पाण्याची सोय नाही. उन्हाळ्यात अगदी दुष्काळी परिस्थिती असते. दारिद्रयाने अगदी ग्रासलेली स्थिती आहे तिकडे. त्यांच्यासाठी खरच काही तरी कारावस वाटत. त्यांना एखादा कायम स्वरूपी रोजगार जरी मिळाला तरी त्यांचे अर्ध्याहून अधिक प्रश्न सुटतील पण इथे लिहिलेलाच आहे एकटा थेंब एखाद्याची तहान भागवायला अपुरा आहे. तर तिथेही काही चांगल करता आल तर बघा.

रैना, यादीत नाव घातले आहे. धन्यवाद.

स्वरा, त्या गावात एखादी संस्था जी अधिकृत आहे, अशी आधीच गावासाठी काम करत असेल तर संस्थेशी संपर्क करुन काहीतरी करु शकतो. या उपक्रमात स्वयंसेवक त्या त्या संस्थेशी संपर्क करुन संस्थेच्या व्यक्तीबरोबर काम करतात. स्वतःहुन एखाद्या गावात कोणता उपक्रम करायला इथे मनुष्यबळ नाही. अथवा तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन काही करु पहायचा विचार करणार असाल तरी कळवा, इथले सर्वच मदतीला येतील.

ज्या संस्थेला वस्तुरुपात मदत हवी असेल त्याबद्दल खालीलपैकी शक्य तितकी माहिती द्यावी.

१. संस्थेचे नाव. (मायबोली धोरणानुसार संस्था नोंदणीकृत असावी), संस्था कोणासाठी व कशा प्रकारचे काम करते याबद्दल थोडक्यात माहिती.
२. वेबसाइट असेल तर त्याचा दुवा
३. संस्थेला सरकारी वा बाहेरुन अतिशय कमी मदत मिळत असावी. आपण अशाच संस्था निवडतो.
४. संस्थेला सध्या ज्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे त्याची यादी व प्रमाण. तसेच त्या वस्तू विकत घेण्यासाठी किती पैसे लागू शकतील ते लिहावे.
५. आयकरात सूट मिळू शकत असेल तर तेही लिहा. पण बहुतेकवेळा ती सूट संस्थेला पैशाची मदत केली तरच मिळू शकते, वस्तुरुपात केली तर नाही.
६. संस्थेत या संदर्भात कोणाला संपर्क करायचा त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा, संपर्क क्रमांक, वेळ, ईमेल इ. तपशील द्यावेत.
तुमच्या मनात एखादी कल्पना घोळत असेल तर आम्हाला जरूर संपर्कातुन लिहा किंवा इथे लिहिलेत तरी चालेल.

धनश्री, मला संपर्क करु शकाल म्हणजे अजुन माहिती देता येईल. मायबोलीच्या धोरणात राहुन आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील म्हणुन संपर्कातुन बोलुच.

आतापर्यंत संपर्क केलेल्या सर्वांचे आभार.

सध्या ज्या देणगीदारांनी आपला प्रेफरन्स कळवला नाही आहे त्यांची देणगी आणि संस्था यांचा मेळ लावणे सुरु आहे. लवकरच सर्व देणगीदारांना इमेलद्वारे पुढील माहिती कळवण्यात येईल.

डेडलाईन नंतरही कोणाला देणगी देण्याची इच्छा असेल तर कृपया स्वयंसेवकांशी संपर्क साधा.

दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळी कडून चालविण्यात येणाऱ्या "विवेकानंद छात्रावास" मधल्या विद्यार्थ्यांनी दहावीत मिळविलेल्या यशाची बातमी आजच्या तरुण भारत मध्ये आली आहे.

http://epaper.tarunbharat.net/epaper.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2016-06-...

"विवेकानंद छात्रावासातील प्रद्युम्नचे धवल यश"

दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळी कडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या तेजस्विनी छात्रावासातील विद्यार्थिनीला दहावीत 80% मिळाले आहेत.

http://epaper.tarunbharat.net/epaper.aspx?lang=3&spage=Ypage&NB=2016-06-...

धन्यवाद अतरंगी, बातमी शेअर केल्याबद्दल!

सुमति बालवनच्या मुलामुलींना दहावीच्या परीक्षेत यश मिळाले असल्याचीही बातमी कळाली. अनेकजण स्कूल ड्रॉप आऊट्स होते.

दरवर्षी मायबोलीकर आवर्जून मदत करतात त्या सावली सेवा ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनाही दहावीत घवघवीत यश मिळाले आहे. एका विद्यार्थिनीला ९२% मिळाले व अनेकांना ८०% चे पुढे गुण मिळाले आहेत. सर्व मुले परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत.

Pages