दंश केला काळजावर अन म्हणाली

Submitted by Prashant Pore on 9 March, 2016 - 12:21

दंश केला काळजावर अन म्हणाली
वेदना आहे तुझी बाहेरख्याली

दोन भावांच्यातला संवाद सांगे
केवढी मरगळ इथे नात्यात आली

काय झाले त्या कळ्यांचे अन फुलांचे ?
जन्मल्यापासून ज्यांचा देव वाली

वेदना नांदायला आली विचारत
दुःख हे आहे कुणाचे भाग्यशाली ?

कोवळ्या पाठीवरी वेताळ दप्तर
विक्रमाची ही पिढी बर्बाद झाली

प्रशांत पोरे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>काय झाले त्या कळ्यांचे अन फुलांचे ?जन्मल्यापासून ज्यांचा देव वाली>>>क्या बात!सर्वाधिक आवडला!

मतलाही मस्त!भाग्यशाली...खास!
गझल आवडली!

छान