Submitted by Prashant Pore on 9 March, 2016 - 12:21
दंश केला काळजावर अन म्हणाली
वेदना आहे तुझी बाहेरख्याली
दोन भावांच्यातला संवाद सांगे
केवढी मरगळ इथे नात्यात आली
काय झाले त्या कळ्यांचे अन फुलांचे ?
जन्मल्यापासून ज्यांचा देव वाली
वेदना नांदायला आली विचारत
दुःख हे आहे कुणाचे भाग्यशाली ?
कोवळ्या पाठीवरी वेताळ दप्तर
विक्रमाची ही पिढी बर्बाद झाली
प्रशांत पोरे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>काय झाले त्या कळ्यांचे अन
>>>काय झाले त्या कळ्यांचे अन फुलांचे ?जन्मल्यापासून ज्यांचा देव वाली>>>क्या बात!सर्वाधिक आवडला!
मतलाही मस्त!भाग्यशाली...खास!
गझल आवडली!
छान
छान
आवडली. काय झाले त्या कळ्यांचे
आवडली.
काय झाले त्या कळ्यांचे अन फुलांचे ?जन्मल्यापासून ज्यांचा देव वाली>>>क्या बात!सर्वाधिक आवडला! +१
सुर्रेखच !!
सुर्रेखच !!
आवडली गझल !
आवडली गझल !
वा मस्त.. कोवळ्या पाठीवरी
वा मस्त..
कोवळ्या पाठीवरी वेताळ दप्तर
विक्रमाची ही पिढी बर्बाद झाली>>>> छानच..:)
धन्यवाद...
धन्यवाद...
वा! पुर्ण आवडली !!
वा!
पुर्ण आवडली !!