निळावंती- एक रहस्य

Submitted by संशोधक on 3 March, 2016 - 15:55

सुरूवातीला 'निळावंती' विषयी ऐकलं तेव्हा विश्वासच बसला नाही. (अजूनही नाही विश्वास यावर) जुण्या जाणत्या माणसांना विचारालं पण खात्रीशीर माहिती मिळाली नाही.
परंतु अंगची संशोधकवृत्ती गप्प बसू देईना. भेटेल त्याला मी त्या पुस्तकाविषयी विचारायचो. गुगल बाबालाही विचारलं. त्यानुसार 'निळावंती' हा एक प्राचीन ग्रंथ आहे. त्याच्या वाचकाला पशु-पक्षांची भाषा समजते व ते त्याला गुप्तधनाची माहिती देतात.
प्रत्येक प्राचीन गोष्टीला असते तशी काळी किनार या ग्रंथालाही आहे. असं म्हणतात की, ही विद्या जो कोणी मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याला एकतर यशप्राप्ती होते नाहीतर वैकुंठप्राप्ती होते.
खरे-खोटे त्या केशवालाच माहित!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाव नका काढु त्या बाबेल फिश ट्रांसलेशन साईट चे....अत्यंत वाईट भाषांतर करुन मिळते...Machine Translation... Wink अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व !! पण जसे चांभाराचे लक्ष खेटरात असते..तसे कुठे ही ट्रांसलेशन, भाषा वगैरे गोष्टी आल्यात की माझे कान टवकारल्या जातात Lol

प्रसन्न,
गुगल ट्रान्सलेटर बद्दल महिती होण्या आधी बाबेल फिश भरपूर वापरायचे. आता गुगल ट्रान्सलेटर पण काय दिवे लावतो हे आपल्याला अमितादीदी वरुन माहिती आहेच Happy
मानवी डोके आणि मानवी भाव भावना गुंतवलेल्या मानवी ट्रान्सलेटर ला पर्याय नाही.
सध्या एका ऑरगॅनिक व्हॉ अ‍ॅ ग्रुप साठी मानद मराठी ते इंग्लिश ट्रान्सलेशन्स करत आहे. त्यामुळे वेदना समजून आहे.

ओ सातीतै, मामांसारख्या नामांकित आयडी ने माझ्या प्रतिसादावर शिक्कामोर्तब केलंय म्हणजे तो खराच्चं असणार. आपल्या पारंपारिक ज्ञानावर उगाच दात काढून हसणाऱ्या तुमच्या सारख्या नक्षली, ब्रिगेडी, बुप्रवादी, कम्युनिस्ट लोकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली पाकिस्तानात पाठवायला हवं

नब्रिबुक म्हणा, पण पाकिस्तानात पाठवू नका हो!
बुरखा घेऊन रहावं लागेल.
Happy

मारुती चितमपल्लीच्या पुस्तकात वाचलेला संदर्भ आठवतोय..>>>> हो टीना.'पक्षी जाय दिगंतरा' यालेखसंग्रहात चितमपल्लीनी म्हटले आहे.जो ही निळावंती शिकतो त्याचा वंश बुडतो.

>>'निळावंती' हा एक प्राचीन ग्रंथ आहे. त्याच्या वाचकाला पशु-पक्षांची भाषा समजते व ते त्याला गुप्तधनाची माहिती देतात.
निळावंती भारी आहे!

आमची निळावंती हवामान रहस्य सांगते. ती ओली दिसली की पाऊस येऊन गेला (किंवा लॉनचा स्प्रिंकलर पाणी शिंपडून गेला), कोरडी दिसली की पाऊस पडला नाही, तिचा रंग उडाला की ऊन फार होतं, आणि तिला भेग गेल्यावर 'गारा पडून गेल्या' असं बरंच काही समजतं.

इथे बरेच जणं कसलीही शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवताना दिसताहेत. लोकांच्या धारणा पक्क्या होण्यापूर्वीच खुलासा केलेला बरा.

थोडक्यात म्हणजे माझा सुरुवातीचा प्रतिसाद चुकीचा होता.

नीळावंती हा मासा नाही. निळावंती ही एक अंधश्रद्धा आहे.

मासा नसल्याने त्याचा विष्णूच्या पहिल्या अवताराशी काहीही संबंध नाही.

शेकडो वर्षांपूर्वी नक्षली, ब्रिगेडी, कम्युनिस्ट अस्तित्वात नव्हते, त्यामुळे त्यांनी आपले पौराणिक ज्ञान नामशेष केले हे विधान एकदमच बिनबुडाचे आहे.

डग्लस अ‍ॅडम्स हा एक ब्रिटिश लेखक आहे. एक अतिशय उत्तम विनोदी लेखक आहे. त्याची "द हिचहायकर्स गाईड टू गॅलॅक्सि" ही भन्नाट, जबराट, अरभाट, काटा किर्रर्र मालिका प्रसिद्ध आहे. बाबेल फिश हा त्याच्या असीम कल्पनाशक्ती चा एक अगदी छोटासा आविष्कार आहे.
त्याला बायोफिजिक्सचे नोबेल मिळालेले नाही, त्याला साई बाबांबद्दल काहीही माहिती असण्याची शक्यता नाही.

उठसूट कुठल्याही विषयात खऱ्याखोट्याची भेसळ करून आपल्या प्राचीन सर्वज्ञ परंपरेचा उदोउदो करत नब्रिबुक लोकांना हाणायचा उद्योग सर्रास केला जातो. तो सब कॉन्शस पातळीवर कसा यशस्वी होतो हे आपण आता बघितलेच.

तेव्हा लोकहो, दिखावे पे ना जाओ, अपनी अकल लागओ.

रच्याकने, संस्कृतीरक्षक इथे नेहमीसारखी हुल्लडबाजी करायला आलेच तर त्यांना माझा पास.

हे नक्की काय भानगड आहे ... आणि जर कोणालाच या बद्दल काहीच माहित नाही तर ती मिथक अजून जिवंत कसे

निळावंती विषयी खात्रीशीर माहिती मलातरी मिळाली नाही. जे काही काही समजलं ते खरं वाटत नाही किंवा त्याचा कोणी पुरावा देऊ शकत नाही.

संशो, असल्या गोष्टींचा पुरावा देता येत नाही. पण त्या निव्वळ कवीकल्पनाच असतील असंही नाही. काही अगम्य, गुढ असूही शकेल...
माझ्या मते निळावंती हे पुस्तक म्हणजे मंत्रांकीत काव्य असावं.. कालौघात ते नष्ट झालं आणि उरल्या फक्त दंतकथा...

Pages