केंद्रिय अर्थसंकल्प २०१६

Submitted by साती on 1 March, 2016 - 01:52

शेवटी दरवर्षीप्रमाणे सगळे ज्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते तो केंद्रिय अर्थसंकल्प २०१६ आला.
यातल्या तरतूदी काय आहेत, सामान्यजनांच्या फायद्याचे काय आहे, तोट्याचे काय आहे इ. बाबींवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

मला तरी ग्रामिण भागासाठी विशेष तजवीज, ५० लाखापर्यंत गृहकर्जासाठी विशेष सूट, प्रथम घरखरेदीस विशेष सूट अश्या गोष्टी चांगल्या वाटतायत.
तर टॅक्सेशन स्लॅब न वाढविणे, दोन अतिरीक्त सेस लावणे, कर्मचार्‍यांच्या पी एफ च्या टॅक्सेशनचा घोळ या वाईट गोष्टी वाटतायत.

नव्या अर्थसंकल्पाचा नव्या आर्थिक वर्षात आपल्यावर आणि देशावर काय परिणाम होणार आहे ही चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.

कृपया राजकीय उणीदुणी / वैयक्तिक उणीदुणी काढण्यासाठी हा धागा वापरू नये. तसे प्रयत्न कुणी केल्यास धागाकर्ती म्हणून मी त्याची नैतिक जबाबदारी घेणार नाही. धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी टॅक्स विषयी किंवा जास्त भरलेल्या टॅक्सच्या रिफंडविषयी बोलत नाही. टॅक्स कधी आकारला जावा यावर बोलतोय. अ‍ॅड्व्हान्स टॅक्स म्हणजे काय? आपण फक्त १५ जून २०१६ घेऊ. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत मिळणार्‍या उत्पनावर जो कर असेल त्याच्या १५% कर मी १५ जून पूर्वी भरायचा. एक दिवस ऊशीर झाला तर त्यावर ३% व्याज लागते. १५ जून रोजी मला पुढील संपूर्ण वर्षात किती उत्पन्न मिळणार आहे ते कसे ठाऊक होईल? मग मी कर कसा काढू? आणि जर तो भरला नाही तर त्यावर व्याज का भरू? डिसेंबर अखेरपर्यंत मला वर्षाच्या उत्पन्नाची कल्पना येईल. मग मी कर भरायला पाहिजे.

विठ्ठ्ल, आधी ३ वेळा भरायचो; आता चार वेळा भरायला लागणार आहे. मी म्हणतो आम्हाला चार वेळा भरायला लावण्याऐवजी कंपन्यांना तीन वेळा भरायला सांगा ना. किंवा सगळ्यांना ३१ डिसेंबर (५०%) आणि ३१ मार्च (५० टक्के) भरायला लावा. सोप्पे आहे.

मायबाप, लोकप्रिय सरकार आले म्हणून लोकांना त्रास द्यायचा का? (बाय द वे, मी मोदी सरकारचा मोठ्ठा फॅन आहे)

किंवा सगळ्यांना ३१ डिसेंबर (५०%) आणि ३१ मार्च (५० टक्के) भरायला लावा. >> किंवा सप्टेंबर अखेरीस ( आर्थिक वर्षाचे ६ महिने झाले असतात आणि मार्च अखेरीस!

>>१५ जून रोजी मला पुढील संपूर्ण वर्षात किती उत्पन्न मिळणार आहे ते कसे ठाऊक होईल?<<

अ‍ॅड्वांस टॅक्स हा वार्षिक उत्पन्नाच्या अंदाजावर (प्रोजेक्शन) भरावा लागतो. कमी-जास्त झाल्यास वर्षाअखेरीस टोटल टॅक्स लायाबिलिटी मध्ये अ‍ॅड्जस्ट करता येतो किंवा रिफंड मिळवता येतो.

आता तुमच्याच वरच्या सुचने नुसार १५ डिसेंबरला जर उत्पन्नाचे आडाखे बांधता येत असतील तर थोड्याफार प्रमाणात १५ जुनला हि तसं करता येइल, नाहितरी वर्षाअखेरीस अ‍ॅड्जस्टमेंट करायचीच आहे...

Pages