कविता हा तसा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कवितेशी आपली ओळख आपल्या जन्मापासूनच होत असावी. बाळाला झोपवायला घेतलं की, आपोआप आई काहीतरी गुणगुणू लागते आणि आईच्या तोंडाकडे पाहत, ते गुणगुणणं ऐकत बाळ कधी झोपतं ते आईलाही कळत नाही.
शाळेत गेल्यावरही पहिली ओळख होते ती बडबडगीतांशी. बहुतेक सगळ्या लहान मुलांना 'मग शाळेत काय काय कविता, पोएम्स्, शिकवल्या तुला?' या प्रश्नाचा सामना करावा लागलेला आहे. मग काही धीट मुलं धडाधड कविता म्हणून दाखवतात, तर काही आईमागे लपून प्रश्नकर्ता कधी जातोय, याची वाट पाहतात.
कविता अशा जन्मापासूनच आपल्या सोबत असल्यामुळे की काय, अगदी पहिलीत वाचलेली कविताही आपल्याला वयाच्या पन्नाशीत जशीच्या तशी आठवत असते.
तर अशाच काही कविता, ज्यांच्याबरोबर आपण वाढलो, आज आम्ही इथे सादर करतोय, पण प्रकाशचित्रांमधून. कवितेच्या आशयाला समर्पक अशी काही प्रकाशचित्रे आम्ही देऊ, ज्यातून चाणाक्ष मायबोलीकर ती कविता ओळखतील.
हा एक खेळ आहे, आपल्याला भावलेल्या कविता प्रकाशचित्रांच्या माध्यमातून परत एकदा अनुभवण्याचा.
मंडळी, गुगलबाबाची मदत न घेता, केवळ स्मृतीवर विसंबुन कविता ओळखता येतात का हा शोध घ्यायला किती गंमत येईल ना? गुगलबाबावर तर रोबोसुद्धा कविता शोधेल, पण त्या शोधाला स्मृतींचा गंध असेल का?
प्रकाशचित्रांवरुन आठवणीत वसलेली कविता शोधायची गंमत अनुभवताना कदाचित असेही होईल की नंतर कधीतरी कवितेला परत भेट देताना इथले एखादे प्रकाशचित्र लख्खकन डोळ्यासमोर चमकुन जाईल. तेव्हा गुगलची मदत न घेता आपल्याला किती आठवतेय याचा अनुभव आणि आनंद एकदा नक्कीच घेऊन बघा.
कविता क्र. १ - 'पानगळ' - इंदिरा संत - विजेती- रैना
कविता क्र. २ - 'कणा' - कुसुमाग्रज - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ३ - 'कोलंबसाचे गर्वगीत' - कुसुमाग्रज - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ४ - 'गवतफुला' - इंदिरा संत - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ५ - 'सांगा कसे जगायचे' - मंगेश पाडगावकर - विजेती- सोनू.
कविता क्र. ६ - 'तुतारी '- केशवसुत - विजेते - गजानन
कविता क्र. ७ - 'श्रावणमासी हर्ष मानसी'- बालकवी - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ८ - 'जोगिया'- ग .दि .माडगुळकर - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ९ - 'पैठणी'- शांता शेळके - विजेते - शब्दाली
कविता क्र. १०- 'देणा-याचे हात घ्यावे. '- विंदा करंदीकर - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ११- 'मराठी असे आमुची मायबोली '- माधव ज्युलियन - विजेते - रैना
कविता क्र. १२- 'धरित्रीच्या कुशीमध्ये '- बहिणाबाई चौधरी - विजेते - मानव पृथ्वीकर
कविता क्र. १३- 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले'- बा.भ. बोरकर - विजेते - स्निग्धा
भरत, टाळ्या!
भरत, टाळ्या!
हायला भरत हार्दीक
हायला भरत हार्दीक अभिनंदन
अचूक लागलाय तीर
ही कविता पण आम्हाला नव्हती!
ही कविता पण आम्हाला नव्हती! >>> आम्हाला होती पण तरीही नाही ओळखु शकले
कविता क्र. ४ खूण - १
कविता क्र. ४
खूण - १
भरत अभिनंदन! (उरले फक्त
भरत अभिनंदन! (उरले फक्त अभिनंदन करण्यापूर्ती. :फिदी:)
अजून बर्याच कविता ओळखायच्या
अजून बर्याच कविता ओळखायच्या आहेत..
शोभा, प्रयत्नांती परमेश्वर
मी ओळखे पर्यंत काव्यचित्रे
मी ओळखे पर्यंत काव्यचित्रे देत रहा
मित्र आणि गवताळ माळ रान
मित्र आणि गवताळ माळ रान त्यावरुन 'गवतफुला रे गवतफुला, असा कसा रे सांग लागला, तुझा लळा' वाटतेय
वाह! एकाच खूणेवरून
वाह! एकाच खूणेवरून ओळखलीसुद्धा!
अभिनंदन स्निग्धा!!
आपल्या शोधक नजरेसाठी, हे घ्या कोंदण!
व्वा! स्निग्धा, अभिनंदन! एकही
व्वा! स्निग्धा, अभिनंदन!
एकही फुल नाही फोटोत
अरे वा
अरे वा
शोभा, पण गवत भरपूर आहे
शोभा, पण गवत भरपूर आहे
अगं फुल नसल तरी गवताळ माळ आहे
अगं फुल नसल तरी गवताळ माळ आहे ना?
कविता क्र. ५ खूण - १
कविता क्र. ५
खूण - १
मालवून टाक दीप?
मालवून टाक दीप?
(No subject)
नाही..
नाही..
हि घ्या पुढची खूण..
हि घ्या पुढची खूण..
शतका नंतर आज पाहिली पहिली
शतका नंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट ??
नाही..
नाही..
पुढची खूण हवी आहे का?
पुढची खूण हवी आहे का?
उषःकाल होता होता.... ???
उषःकाल होता होता.... ???
हि घ्या अजून एक खूण..
हि घ्या अजून एक खूण..
आर्यातै, आय गेस तुझं उत्तर
आर्यातै, आय गेस तुझं उत्तर बरोबर आहे.
नाही.. आठवा, आठवा.. खूप गोड
नाही..
आठवा, आठवा.. खूप गोड कविता आहे..
तिमिरातूनी तेजाकडे, प्रभु
तिमिरातूनी तेजाकडे, प्रभु आमुच्या ने जीवना.
शोभा, विचार बरोबर आहेत.
शोभा, विचार बरोबर आहेत. याचीच साथ धरुन आगेकुच करत राहा. अगदी सुंदर आणि प्रसिद्ध कविता आहे.
यावेळेस बक्षिस तुम्हीच घेऊन जाणार आहात.
गगन सदन तेजोमय
गगन सदन तेजोमय
ती गेली तेव्हा ....
ती गेली तेव्हा ....
गगन सदन तेजोमय तिमिर हरुन
गगन सदन तेजोमय
तिमिर हरुन करुणाकर
दे प्रकाश, देई अभय
Pages