मजवरी तयांचे प्रेम खरे! - प्रतिसाद बंद करत आहोत.

Submitted by संयोजक on 26 February, 2016 - 22:37

मराठी मातृभाषा असलेल्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही भारतातील चौथी आणि जगातील पंधरावी भाषा आहे.

आज मराठी माणूस जगाच्या पाठीवर ठिकठिकाणी पसरला आहे आणि जगात कुठेही असो, त्याचं आपल्या मायबोलीवर, मराठी भाषेवर नितांत प्रेम असतंच! माझं मराठी वर प्रेम नाही, असं म्हणणारा विरळाच! पण जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर बदललेल्या जीवनशैलीत आपण आपल्या मराठीवरील प्रेमप्रदर्शनात कमी तर पडत नाही ना, हे बघणं मनोरंजक ठरेल. तर बघूया खरोखरच आपलं मराठीवर किती प्रेम आहे?

कृपया खालील प्रश्नांची खरी Wink उत्तरं द्या -

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का?
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का?
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का?
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का?
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का?
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का?
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का?
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का?

उत्तरं 'हो', 'नाही' किंवा 'कधीकधी' यांपैकी एक असू द्या.

प्रतिसादांमध्ये प्रश्न आणि त्यापुढे उत्तरं लिहा.

आपलं उत्तर 'हो' असेल तर १० गुण
आपलं उत्तर 'नाही' असेल तर ० गुण
आपलं उत्तर 'कधीकधी' असेल तर ५ गुण

आपल्या एकूण गुणांची बेरीज करा.

आपले गुण -

५०पेक्षा कमी असतील, तर आपलं मुळी मराठीवर प्रेमच नाही. Wink
५० ते ६० गुण असतील तर आपण 'मराठी प्रेमी' आहात.
६० ते ७० गुण असतील तर आपण 'मराठी महाप्रेमी' आहात.
७० ते ८० गुण असतील तर आपण 'अट्ट्ल मराठी प्रेमी' आहात.
८० ते ९० गुण असतील तर आपण 'पराकोटीचे मराठी प्रेमी ' आहात. मुजरा स्वीकार करावा.
९० ते १०० गुण असतील तर आपण रशियन हेर आहात. Wink

तर मंडळी, ही प्रश्नावली एक गंमतखेळ म्हणुन टाकली आहे आणि मायबोलीकरांनी ती गंमतीत घेऊन मराठी भाषा दिवस उपक्रमाचा आनंद घ्यावा.

आपल्याला इथे किती का गुण मिळेनात, आम्हांला खात्री आहे आपलं मराठीवरचं प्रेम अगदी अस्सल शंभर नंबरी आहे.

पण जाता जाता, या तंत्रज्ञानयुगात मराठी भाषा जतन करायची असेल, तर नवीन काळातल्या बदलांशी सुसंगत असं अजून काय करता येईल, याचा मनाशी विचार नक्की करावा ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. 'हॅलो' 'नमस्कार' - कधीकधी ०५
२. लघुसंदेश - कधीकधी ०५
३. मराठी महिने - हो १०
४. बाराखडी ( मुळाक्षरे ) - हो १०
५. स्वाक्षरी - नाही ०
६. चित्रपट - यावर्षी हो १०
७. पुस्तकं - हो १०
८. मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा - नाही ०
९. नातवंडं मराठी भाषा - हो १०
१०. वयाइतक्या कविता - नाही ०
एकूण गुण - ६० - मराठी महाप्रेमी Happy

'हॅलो' 'नमस्कार' - कधीकधी ०५
२. लघुसंदेश - कधीकधी ०५
३. मराठी महिने - हो १०
४. बाराखडी ( मुळाक्षरे ) - हो १०
५. स्वाक्षरी - नाही ०
६. चित्रपट - हो १०
७. पुस्तकं - हो १०
८. मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा - नाही ०
९. नातवंडं मराठी भाषा - हो १०
१०. वयाइतक्या कविता - नाही ०

एकूण गुण - ६० - मराठी महाप्रेमी

'हॅलो' 'नमस्कार' - कधीकधी ०५
२. लघुसंदेश - कधीकधी ०५
३. मराठी महिने - नाही ०
४. बाराखडी ( मुळाक्षरे ) - नाही ०
५. स्वाक्षरी - नाही ०
६. चित्रपट - हो १०
७. पुस्तकं - कधीकधी ५
८. मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा - नाही ०
९. नातवंडं मराठी भाषा - नातवण्ड यायला वेळ आहे मुलगी बोलते मराठी ती तिच्या मुलाना शिकवेल असं गृहीत धरून ५
१०. वयाइतक्या कविता - लहान मुलांच्या कविता पण चालतील असं धरून ५

३५ गुण फेल (रड़वेली बाहुली)

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? = नाही = ०
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? = नाही= ०
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? नाही= ०
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? हो= १०
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? नाही= ०
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? कधी कधी= ५
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? हो= १०
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? नाही= ०
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? नाही= ०
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? नाही= ०

एकूण गुण= २५
पण माझं मराठी भाषेवरचं प्रेम या गुणांवर अवलंबून नाहीये बर्का.. Happy

१. 'हॅलो' 'नमस्कार' - नाही -०
२. लघुसंदेश - नाही-०
३. मराठी महिने - हो १०
४. बाराखडी ( मुळाक्षरे ) - हो १०
५. स्वाक्षरी - नाही ०
६. चित्रपट - नाही -०
७. पुस्तकं - हो १०
८. मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा - हो १०
९. नातवंडं मराठी भाषा - नाही ०
१०. वयाइतक्या कविता - हो १०

५० टक्के मार्क्स आहेत.
Happy

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? हो
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? कधीकधी
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का?हो
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का?हो
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? नाही
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का?हो.
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?हो
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? हो
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? हो
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का?नाही.
८० गुण झाले.
( माझ्या वाया इतक्या म्हणजे ६८ कविता शोधण आणि मोजणहि कठीण)

१. 'हॅलो' 'नमस्कार' - कधीकधी ०५
२. लघुसंदेश - कधीकधी ०५
३. मराठी महिने - हो १०
४. बाराखडी ( मुळाक्षरे ) - हो १०
५. स्वाक्षरी - अर्धी इंग्रजी अर्धी मराठी आहे १०
६. चित्रपट - हो १०
७. पुस्तकं - हो १०
८. मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा - नाही ०
९. नातवंडं मराठी भाषा - हो १०
१०. वयाइतक्या कविता - हो १०
एकूण गुण - ८० - अट्टल मराठी प्रेमी

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? - साधारणपणे हॅलो ने सुरवात असते पण ओळखीचा मरठी माणूस असेल तर बोला असे म्हणते - ५
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? नाही - ०
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? हो - १० Happy
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? हो - १० Happy
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? नाही. - ०
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? - नाही - सो. साधारण पेणे. न्हणाजे टीव्ही वरचे धरून - ५
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? हो. फक्त मराठीच वाचते १० Happy
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? नाही - ०
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? - हो - १०:)
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? - नाही. शाळेत अभ्यास म्हणून पाठ केल्या येवढ्याच. - ०
५० गुण - मराठीप्रेमी

१. 'हॅलो' 'नमस्कार' - कधीकधी ०५ ( समोरून माराठीत सुरवात झाली तरच)
२. लघुसंदेश - नाही ०
३. मराठी महिने - हो १०
४. बाराखडी ( मुळाक्षरे ) - हो १०
५. स्वाक्षरी - हो १० ( अगदी कागदोपत्री सगळीकडे Happy )
६. चित्रपट - हो १०
७. पुस्तकं - बर्‍याचदा ०५
८. मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा - नाही ०
९. नातवंडं मराठी भाषा - माहित नाही . माझा लेक मराठी बोलतो पण विचार इंग्रजीतून करतो Sad
१०. वयाइतक्या कविता - नाही ०
एकूण गुण - ५० - काठावर पास

. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? - नाही
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? - कधि कधी
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? - नाही
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? - हो
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? - स्वाक्षरीतले पहिले अक्षर मराठी आहे.
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? - हो
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? - हो
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? - हो
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? - हो
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? - नाही

Pages