मजवरी तयांचे प्रेम खरे! - प्रतिसाद बंद करत आहोत.

Submitted by संयोजक on 26 February, 2016 - 22:37

मराठी मातृभाषा असलेल्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही भारतातील चौथी आणि जगातील पंधरावी भाषा आहे.

आज मराठी माणूस जगाच्या पाठीवर ठिकठिकाणी पसरला आहे आणि जगात कुठेही असो, त्याचं आपल्या मायबोलीवर, मराठी भाषेवर नितांत प्रेम असतंच! माझं मराठी वर प्रेम नाही, असं म्हणणारा विरळाच! पण जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर बदललेल्या जीवनशैलीत आपण आपल्या मराठीवरील प्रेमप्रदर्शनात कमी तर पडत नाही ना, हे बघणं मनोरंजक ठरेल. तर बघूया खरोखरच आपलं मराठीवर किती प्रेम आहे?

कृपया खालील प्रश्नांची खरी Wink उत्तरं द्या -

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का?
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का?
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का?
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का?
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का?
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का?
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का?
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का?

उत्तरं 'हो', 'नाही' किंवा 'कधीकधी' यांपैकी एक असू द्या.

प्रतिसादांमध्ये प्रश्न आणि त्यापुढे उत्तरं लिहा.

आपलं उत्तर 'हो' असेल तर १० गुण
आपलं उत्तर 'नाही' असेल तर ० गुण
आपलं उत्तर 'कधीकधी' असेल तर ५ गुण

आपल्या एकूण गुणांची बेरीज करा.

आपले गुण -

५०पेक्षा कमी असतील, तर आपलं मुळी मराठीवर प्रेमच नाही. Wink
५० ते ६० गुण असतील तर आपण 'मराठी प्रेमी' आहात.
६० ते ७० गुण असतील तर आपण 'मराठी महाप्रेमी' आहात.
७० ते ८० गुण असतील तर आपण 'अट्ट्ल मराठी प्रेमी' आहात.
८० ते ९० गुण असतील तर आपण 'पराकोटीचे मराठी प्रेमी ' आहात. मुजरा स्वीकार करावा.
९० ते १०० गुण असतील तर आपण रशियन हेर आहात. Wink

तर मंडळी, ही प्रश्नावली एक गंमतखेळ म्हणुन टाकली आहे आणि मायबोलीकरांनी ती गंमतीत घेऊन मराठी भाषा दिवस उपक्रमाचा आनंद घ्यावा.

आपल्याला इथे किती का गुण मिळेनात, आम्हांला खात्री आहे आपलं मराठीवरचं प्रेम अगदी अस्सल शंभर नंबरी आहे.

पण जाता जाता, या तंत्रज्ञानयुगात मराठी भाषा जतन करायची असेल, तर नवीन काळातल्या बदलांशी सुसंगत असं अजून काय करता येईल, याचा मनाशी विचार नक्की करावा ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुण लिहिताना आकडे इंग्रजीत का?>>>> शोभा हे माझ्या पोस्टला उद्देशुन आहे का ? मोबाईलवरून टंकत असल्याने आकडे इंग्रजीत आलेत . संयोजकांना खटकल्यास तस स्पष्ट करावं . पोस्ट संपादित करेन . धन्यवाद

जाई, अग,मामोचे पण आहेत. सगळ्या सुंदर मराठीमधे ते जरा विचित्र दिसतात ना? म्हणून विचारलं. Happy

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का?
# घरच्या लोकांशी बोलताना हॅलो.
# वयोवृद्ध माणसांशी बोलताना नमस्कार. तरुण लोकांशी बोलताना हॅलो.
# ऑफीसमधील मराठी लोकांशी बोलताना हॅलो.

२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का?
# खरे तर देवनागरी लिपीतूनच संदेश पाठवावासा वाटतो पण प्रश्न आहे मी आय फोन वापरतो आणि प्रत्येक शब्द टाईप केल्यानंतर अ‍ॅटो करेक्षनमधे दुसराच शब्द उमटतो. शिवाय देवनागरी लिपीतून लिहायला वेळ लागतो. दर वेळी देवनागरी लिपितून लिहायला जमत नाही.
#३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का?
चैत्र, वैशाख, माघ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, कार्तिक, पौष, फाल्गुन -- इतकेच आठवत आहेत सध्या तरी आणि हे अनुक्रमे नाहीत. प्रयत्न केला आहे अनुक्रमे लिहायचा पण चुका आहेत हे माहिती आहे.

४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का?
# आम्हाला शाळेत असताना बाराखडी ए बी सी डी सारखी घडाघडा म्हणता येईल अशा पद्धतीने शिकवली नाही की कधी वदवून घेतलेली नाही. अचूक म्हणता बोलता लिहिता येणार नाही.

५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का?
# कधीच नाही

६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का?

# अलिकडे मराठी सिनेमांछी रेलचेल वाढली आहे. चांगला असेल तर नक्कीच बघितला जातो. आपण मराठी आहोत म्हणून फक्त मराठीच सिनेमे अधिक बघावेत हे मनाला पटत नाही. मी आणि तमिळ नाही Happy

७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?
# पुर्वी अनेक मराठी पुस्तकांचे वाचन केले आहे हल्ली चांगले लिहिणारे लेखक आढळत नाही. तरी सुद्धा नेट वर जे काही वाचतो ते बहुतकरुन मराठीच असत.

८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?
# अनेकवेळा मी अशा स्पर्धांमधे भाग घेतला आहे आणि अनेकदा प्रथम क्रमांकाचे बक्षिस सुद्धा मिळवलेले आहे.

९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का?
# मला नातवंड नाहीत. बहिणभावांची मुले मराठीतून बोलतात. ईग्रजी येत नाही चांगली त्यांना ह्याचे उलट वाईट वाटते. आम्ही विदर्भातले त्यातही खेडी गावे. मग ईंग्रजी कशी येणार?!!! प्रयत्न केले तर येईल हे नक्की पण तरीही पोषक असे वातावरण कमी पडते घरात आणि बाहेर.

१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का?
# हा वयाचा आणि कवितेचा अन्वय आवडलेला नाही! भरपुर कविता पाठ आहेत.

# खरे तर देवनागरी लिपीतूनच संदेश पाठवावासा वाटतो पण प्रश्न आहे मी आय फोन वापरतो आणि प्रत्येक शब्द टाईप केल्यानंतर अ‍ॅटो करेक्षनमधे दुसराच शब्द उमटतो.

बी माझापण आयफोन आहे. भाषा निवडताना, मराठी लिप्यांतरण / हिंदी लिप्यांतरण असे निवडल्या गेले असेल तर "Auto correction" होते. लिप्यांतरण न वापरता भाषा मराठी / हिंदी निवडली की "Auto correction" होत नाही.

मराठीत अ‍ॅ आहे, ऑ नाही. ऑ हे हिंदीतच येते. तेव्हा तो वापरायचा असल्यास एकतर नाद सोडून आ /ओ ठेवणे अथवा भाषा हिंदी करुन ऑ वापरणे. मी दुसरा पर्याय वापरतो.

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? - कधीकधी ५

२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? - नाही ०

३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? - होय १०

४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? - होय १०

५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? - प्रयत्न केला. जमल नाही. ०

६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? - होय १०

७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? - फक्त मराठीच वाचते.. १०

८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? - नाही! ०

९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? - रिया म्हणते तस नातवंड लैच लांब आहेत, पण मुल बोलतील याची खात्री आहे. १०

१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? - नाही ब्वा. ०

५५ Happy

६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? - होय ०

>>
इथे १० गुण मिळतील ना. एकूण गुण ५५ होत आहेत

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? - कधीकधी -५ गुण

२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? - कधीकधी - ५ गुण

३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का?गुणहो - १० गुण

४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? -बहुतेक - ५ गुण

५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? - नाही -० गुण

६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? - कधीकधी - ५ गुण

७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? - हो - १० गुण

८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? हो १० गुण

९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? हो नक्कीच १० गुण

१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? - नाही, कारण वय वाढतंच आहे पण कविता पाठ केलेली संख्या स्थिर आहे. ०गुण

एकूण गुण - ६० - मराठी महाप्रेमी

. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का?>> नमस्कार नसलं तरी सुरूवात मराठीमधूनच होते. अगदी "बोला" या मनमोकळ्या शब्दांनी.
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का?<< हो. देवनागरी मोबाईलवर शक्य होत नाही. पण संदेश मराठी भाषेत असतोच.
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का?<< हो. नुकतेच लेकीला शिकवलेत/
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का?>> हो. हेही लेकीला शिकवलंय.
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का?.>> बँकेत वगैरे नाही, पण पुस्तकांवर नक्कीच देवनागरीमध्ये.
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का?>> हो.
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?>>हो. खरंतर निम्म्याहून जास्त.
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?>> हो. मायबोलीवरच. बक्षीस पण मिळालं होतं.
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का?>>> माहित नाही. माझ्या आज्जाला मी मराठी बोलेन आणि माझ्या वडलांना त्यांचं नातवंड तमिळ बोलेल असं कधी वाटलं तरी होतं का?
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का?>> बदबडगीतं कवितांमधेय धरता आल्या तर नक्कीच पाठ आहेत.

गुण वगैरे मोजायचे धाडस नाही.

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का?

नाही. पण समोरचा माणुस मराठी असेल तर पुढचे सगळे मात्र मराठीत.

मार्क ०

२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का?

हो.

मार्क १०

३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का?

हो

मार्क १०

४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का?

हो

मर्क १०

५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का?

नाही.

मार्क ०

६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का>?

एकुणच चित्रपट खुप कमी बघते त्यामुळे उत्तर हो

मार्क १०

७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?

बहुतेक सगळी मराठीच असतात.

मार्क १०

८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?

नाही.

मार्क ०

९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का?

हो. कारण घोडामैदान फारसे दुर नाही आणि मुलगी कट्टर मराठीप्रेमी आहे.

मार्क १०

१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का?

पुर्ण पाठ नाहीयेत पण खुप कविता माहित आहे, त्यातल्या दोनचार ओळी आठवताहेत.

मार्क ५

६५ मार्क !!!!!! 'मराठी महाप्रेमी' जोर्दार टाळ्या होऊन जाऊ द्या.....

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का?

नाही. ० मार्क

२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का?

नाही. ० मार्क.

३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का?

हो . महिने आणि ऋतुही येतात. १० मार्क

४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का?

हो १० मार्क

५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का?

हो. इयत्ता ९ वी पासुन. अगदी पासपोर्टवर पण मराठीतच सही आहे. लहान स्वाक्षरी (इनिशिअल्स) पण मराठीतच. १० मार्क.

६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का?

हो. कारण चित्रपट कमीच पाहते. १० मार्क

७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?

हो. १० मार्क.

८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?

अजुन शिक्षण चालु आहे. मार्क १० (घेतेय भाग आजही)

९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का?

माझी मांजरे मराठीत बोलत नाहीत. मार्क ०

१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का?

भरपुर कविता येतात पण काहीच तोंडपाठ आहेत. मार्क ५

मार्क ६५....... महा मराठीप्रेमी.

--

जर्बेरा((माझा पासवर्ड मायबोलीकडुन रिसेट करुन मिळत नाहीये. Sad )

जर्बेरा((माझा पासवर्ड मायबोलीकडुन रिसेट करुन मिळत नाहीये. अरेरे )>>>>>>>>>..अग, हे सुरुवातीला पण लिहीना. हा.का.ना.का. नाहीतर साधनानेच दोनदा लिहीलेय, असं वाटतयं. Happy

उपक्रम अफाट आवडला Happy

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का?
शून्य गुण

२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का?
निम्म्यापेक्षा जास्त नाही तर प्रत्येक वेळी मराठीच म्हणून वीस गुण

३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का?
अनुक्रमे नाही येणार, आणि बाराच्या जागी कुठलेही दहाच आठवतील म्हणून २.५ गुण

४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का?
हे सोप्पयं तरीही अचूकतेची कल्पना नाही पण घडाघडा नक्कीच म्हणून ७.५ गुण

५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का?
नाही एवढे धाडस. लाज वाटते. Happy शून्य गुण

६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का?
मराठी चित्रपटांची संख्याच तुलनेत कमी असते. मात्र थिएटरला निम्यापेक्षा जास्त मराठीच बघतो. म्हणून इथे दहा गुण घ्यायला हरकत नाही.

अवांतर - शाहरूख खान मराठी असता तर इथे मी पंधरा गुण पटकावले असते. तुर्तास त्याची तहान स्वप्निल जोशीवर भागवतोय.

७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?
नक्कीच. कारण ईंग्रजी भाषेत फक्त ईंजिनीअरींगचीच पुस्तके वाचलीत. इथे दहा गुण

८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?
मायबोली वरच्या स्पर्धा यात धरायला हरकत नसेल तर येस्स Happy दहा गुण

९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का?
हो. मी त्यांना शिकवणारच. आणि मायबोलीचा रस्ताही दाखवणार. अन्यथा माझे एवढे अफाट लिखाण वाचणार कोण Wink
त्यांना मायबोलीवरही आणायचे पाच गुण जास्तेचे पकडून पंधरा गुण घेतो

१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का?
लईच कठीण प्रश्न आहे. किती कविता पाठ आहेत ते बघा. मग किती पुर्ण किती अर्ध्या. त्यात बडबडगीते आणि बालबालगीते घ्यायचे की नाहीत. जमल्यास चारोळ्याहे. आणि मग या सर्वांचा आपल्या वयाशी हिशोब लावा जे शेवटचा वाढदिवस मी कधी आणि कितवा साजरा केला आठवतही नाही.. चला तरी पाच गुण घेतो

>>>>

एकूण,
० + २० +२.५ + ७.५ + ० + १० +१० +१० +१५ +५ = ८० गुण
पटकावत मी पराकोटीचा मायबोलीप्रेमी झालो आहे. Happy

माझी मांजरे मराठीत बोलत नाहीत. मार्क ०>>>>>>>>>>>..आक्षेप! मँव हे मराठीच आहे. मी येऊ? चा अपभ्रंश तुम्ही ऐकता. जर्बेरा Light 1 घेच.

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का?-- कधीकधी पण सहसा नाही. कारण घरचे सोडले तर मराठी माणसांना फोन होत नाहीत.

२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? - कधीकधी - देवनागरी वापरणे अजूनही थोडे किचकट वाटते.
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? - हो
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? - हो ( बाराखडी कि वर्णमाला ? दोन्ही येतात )
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? - नाही..
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? हो, पण सिडी उपलब्ध असल्या तरच.
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?- हो. मूळात पुस्तक वाचन कमी आहे. पण जे वाचतो ते मराठीच असते.
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?- नाही.. खरं तर कुठल्याच स्पर्धेत भाग घेतला नाही.
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? - अजिबात नाही, मुलगा आणि लेकही मुष्किलीने मराठी बोलतात.
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का?- त्यापेक्षा अनेक पटीने.. कविताच नव्हे तर गाणीही. अर्थात ती गाणी म्हणजे कविताच आहेत.

सुंदर प्रश्नावली. पण एवढ्यावरून मराठी भाषेवरच्या प्रेमाचे मोजमाप होईल असे वाटत नाही. मायबोलीवर सतत वावरत असतो, एवढे पुरेसे आहे की !!!!

मजवरी तयांचे प्रेम खरे, हे संशयकल्लोळ नाटकातील पद आहे ( बघा, माझे किती प्रेम आहे ते ) पण त्यातल्या पुढील ओळींचा ( कसास लावूनी अंत पाहिला वगैरे ) चा इथे संदर्भ नाही.

दिनेशदा, खरं तर एक उतारा द्यायला पाहिजे होता. जे शब्द हल्ली नेहमी इंग्रजी वापरले जाताता ते जास्त घेऊन. संपुर्ण मराठीत लिहून दाखवायचा. एकही शब्द इंग्रजी, हिंदी, उर्दू, वगैरे...वगैरे असता नये. मज्जा आली असती. Happy

शोभा१, आजच सुरुवात झाली आहे.अजुन विविध कार्यक्रम येतील. तुम्हि सर्वजण त्यात नक्की सहभाग घ्याल,आणि तुम्हाला नक्की मज्जा येइल. Happy

१. 'हॅलो' 'नमस्कार' - बरेचदा नमस्कार नाही तर हालू Happy - ५
२. लघुसंदेश - कधीकधी - ५
३. मराठी महिने - हो - १०
४. बाराखडी ( मुळाक्षरे ) - हो - १०
५. स्वाक्षरी - नाही - ०
६. चित्रपट - नाही - ०
७. पुस्तकं - नाही - ०
८. मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा - नाही - ०
९. नातवंडं मराठी भाषा - हो - १०
१०. वयाइतक्या कविता - हो - १०

बेरीज ५० .. काठावर पास. खरंतर नापासच कारण नातवंडं कधीकधीच मराठी बोलतील असं वाटतय. प्रथम भाषा मराठी असल्यासारखी अस्खलीत नाही बोलणार बहूदा.

लोकहो, ही थोडक्यातली वाक्ये वापराल का? पूर्ण लिहील्याने प्रतिसाद लांबताहेत.

हो शोभा.. पण आपण ज्यांना मराठी समजतो असे बरेचसे शब्द परकीय भाषेतून आलेत Happy पीवर मराठी असे आता उरलेच नाही !!!

सोनू - आभार Happy

१. 'हॅलो' 'नमस्कार' - हो १०
२. लघुसंदेश - हो १०
३. मराठी महिने - हो १०
४. बाराखडी ( मुळाक्षरे ) - कधीकधी क्रम चुकतो ०५
५. स्वाक्षरी - नाही ०
६. चित्रपट - यावर्षी हो १०
७. पुस्तकं - हो १०
८. मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा - हो १०
९. नातवंडं मराठी भाषा - हो १०
१०. वयाइतक्या कविता - नाही ०

एकूण गुण ७५ 'अट्टल मराठी प्रेमी' शाबास हर्षद Happy

Pages