मजवरी तयांचे प्रेम खरे! - प्रतिसाद बंद करत आहोत.

Submitted by संयोजक on 26 February, 2016 - 22:37

मराठी मातृभाषा असलेल्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही भारतातील चौथी आणि जगातील पंधरावी भाषा आहे.

आज मराठी माणूस जगाच्या पाठीवर ठिकठिकाणी पसरला आहे आणि जगात कुठेही असो, त्याचं आपल्या मायबोलीवर, मराठी भाषेवर नितांत प्रेम असतंच! माझं मराठी वर प्रेम नाही, असं म्हणणारा विरळाच! पण जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर बदललेल्या जीवनशैलीत आपण आपल्या मराठीवरील प्रेमप्रदर्शनात कमी तर पडत नाही ना, हे बघणं मनोरंजक ठरेल. तर बघूया खरोखरच आपलं मराठीवर किती प्रेम आहे?

कृपया खालील प्रश्नांची खरी Wink उत्तरं द्या -

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का?
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का?
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का?
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का?
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का?
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का?
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का?
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का?

उत्तरं 'हो', 'नाही' किंवा 'कधीकधी' यांपैकी एक असू द्या.

प्रतिसादांमध्ये प्रश्न आणि त्यापुढे उत्तरं लिहा.

आपलं उत्तर 'हो' असेल तर १० गुण
आपलं उत्तर 'नाही' असेल तर ० गुण
आपलं उत्तर 'कधीकधी' असेल तर ५ गुण

आपल्या एकूण गुणांची बेरीज करा.

आपले गुण -

५०पेक्षा कमी असतील, तर आपलं मुळी मराठीवर प्रेमच नाही. Wink
५० ते ६० गुण असतील तर आपण 'मराठी प्रेमी' आहात.
६० ते ७० गुण असतील तर आपण 'मराठी महाप्रेमी' आहात.
७० ते ८० गुण असतील तर आपण 'अट्ट्ल मराठी प्रेमी' आहात.
८० ते ९० गुण असतील तर आपण 'पराकोटीचे मराठी प्रेमी ' आहात. मुजरा स्वीकार करावा.
९० ते १०० गुण असतील तर आपण रशियन हेर आहात. Wink

तर मंडळी, ही प्रश्नावली एक गंमतखेळ म्हणुन टाकली आहे आणि मायबोलीकरांनी ती गंमतीत घेऊन मराठी भाषा दिवस उपक्रमाचा आनंद घ्यावा.

आपल्याला इथे किती का गुण मिळेनात, आम्हांला खात्री आहे आपलं मराठीवरचं प्रेम अगदी अस्सल शंभर नंबरी आहे.

पण जाता जाता, या तंत्रज्ञानयुगात मराठी भाषा जतन करायची असेल, तर नवीन काळातल्या बदलांशी सुसंगत असं अजून काय करता येईल, याचा मनाशी विचार नक्की करावा ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का?--- कधीकधी
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का?---हो
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का?हो
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का?---हो
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का?---नाही
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का?---हो
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?---फक्त मराठीच.
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?---- कधीकधी
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का?---हो
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का?--- नाही

छानच धागा Happy मराठी ही भारतातील चौथी आणि जगातील पंधरावी भाषा आहे हे वाचून आश्चर्य वाटले तसेच अभिमानहि वाटाला. संख्यात्मक बळ तर आहेच्चे, आता "रचनात्मक" बळ कायम असुदे.....

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? होय, बहुतेक सर्व वेळेस, अगदी कार्यालयीन संभाषणातही फोन कुणाचाही का असेना, नमस्कार अशीच सुरुवात करतो फार क्वचित हॅलो असे उच्चारले जाते.

२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? होय. मात्र वॉट्सॅप किंवा फेसबुक असेल, तर १००% देवनागरी व मराठीच वापरतो. एसेमेस असेल तर मात्र देवनागरी करता "दर" जास्त पडतो जसे की जो एसेमेस रोमन स्क्रिप्ट मधुन ८० पैशात जातो तो देवनागरीतुन दुप्पट अथवा तिप्पट दर आकारतो. सबब शक्यतो एसेमेस पाठवितच नाही. पाठविला तर रोमनमधुन मराठी, फार क्वचित कार्यालयिन कामात रोमन्/इंग्रजीचा वापर होतो.

३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? होय, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ व फाल्गुन.

४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? होय

५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? होय सर्वच ठिकाणी कायमस्वरुपी देवनागरीमधेच स्वाक्षरी आहे, मात्र ब्यान्का/करारमदार वगैरे ठिकाणी इंग्रजी खेरीज अन्य लिपित स्वाक्षरी असेल तर कायदेशीर कटकटी करतात (म्हणजे करारमदारातील इंग्रजी मजकुर समजलय वा नाही या मुद्यावरुन). पण तरीही माझी देवनागरीतील स्वाक्षरी देवनागरीमधेच आहे हे तरी त्या येडबाम्बु कारकुनांने कुठले कळायला? Proud त्यामुळे कधीच कुठेच अडचण आली नाही.

६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? होय पण निवडकच चित्रपट /मालिका बघतो. अन्यथा इंग्रजी चित्रपट वास्तव दर्शनामुळे पहायला जास्त आवडतात, जरि त्यतिल संभाषणातील एकही शब्द कळत का नसेना... Proud

७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? "होय" खरे तर सर्वच पुस्तके मराठीतीलच वाचतो. मला इंग्रजीचा गंधही नाही, व बाजुला शब्दकोष ठेवुन इंग्रजी पुस्तके वाचण्याचे कष्ट घेण्याइतपत बौद्धिक ताकद व वेळही नाही... Wink फार फार तर इंग्रजीतील कॉमिक्स्/कार्टुन्स बघत वाचू शकेन....

८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? "होय" बरेचदा भाग घेतला आहे. कवितास्पर्धेतही घेतला आहे व बक्षिसही मिळवले आहे Lol इनफॅक्ट कविता करुनच लिंबीलाही पटवली आहे..... Blush
१९८५ ते १९९० च्या दरम्यान कुणीतरि टिळकस्मारक मंदिरात "भ्रष्टाचाराच्या कथा ऐकवा" ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती, तेव्हा तेथिल टवाळ उपस्थितीतही "ठामपणे" उभा राहुन भाषण ठोकले होते व समान नागरी कायदा अस्तित्वात नसणे हाच सर्वात मोठा व घातक भ्रष्टाचार आहे यावर भाष्य केले होते, जे ऐकुल्यावर जवळपास महिन्याभराने बँक ऑफ इंडियाच्या तत्कालिन "कम्यिनिस्ट" युनियनच्या राज्य पातळीवरील एका अधिकार्‍याने ओळख दाखवुन कौतुकही केले होते व सांभाळून रहायचा सल्लाही दिला होता. Happy अन तो असेही म्हणला होता की तुम्ही "हिंदुत्ववादी" आहात हे माहिति आहे पण विचारातील स्पष्टता व ती जाहीर मांडण्याचॅ धाडस हे दोन गुण क्वचित आढळतात ते आहेत, पण सांभाळून करा. (याच व अशाच अनुभवाने/कारणाने माबोवर इतरत्र मी एक सूत्र मांडलय की जगभरातील भविष्यकालिन जिहादींबरोबरचा लढा हा जगभरातील कम्युनिस्टच लढतील, त्यांना लढावे लागेल, मात्र त्यावेळेस भारतातील कम्युनिस्ट मात्र त्यांच्या वैचारिक पांगळेपणामुळे व अडाणीपणामुळे भलतेच कैतरी करीत रहातील. असो विषयांतर नको. Happy

९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? "होय"

१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? ---- कविता? नाही... एक तर पाठांतरात कायमच "कच्चा/ढ" विद्यार्थी राहिलो आहे, शिवाय दुसर्यांनी केलेल्या कविता वाचुन पाठ करण्यात तितकासा रस नाही.... Proud
मात्र मराठीतील गाजलेली गाणी, अभंग, पसायदान, सावरकरांच्य काव्यातील धृवपदे इत्यादी चालिंसह तोंडपाठ असतात. व मराठी चित्रपटातील गाणी, भावगिते, अभंग, नाट्यगिते आवडीने ऐकतो, अर्थातच गुणगुणतोही..... त्या अर्थाने घेतले तर वयाच्या एकुण महिन्यांच्या संख्येइतकी गाणी कविता अभंग पाठ असतील नक्कीच....
तसेच "बाथरुम संगित एक्स्पर्ट" ( "स्नानगृह गायकी प्रविण" ??? Proud ) हा किताब मला नक्कीच मिळू शकेल....

९० गुण झाले......... म्हणजे मी रशियन हेर????? Uhoh

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? : प्रत्येक वेळी नमस्कार नाही. कोणाचा फोन आहे हे मोबाइलवर कळत असल्याने काही वेळा "बोला, काय म्हणताय" असं म्हटलं जातं . पण हॅलो हा सार्वभाषिक शब्द आहे असं मला वाटतं.
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? : हो
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? : हो
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? : हो
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? : नाही
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? : तपासावं लागेल. चित्रपट बघताना, तो मराठी आहे की हिंदी की इंग्रजी यापेक्षा तो कसा असेल/आहे याचा जास्त विचार होतो.
सध्या एकही मराठी मालिका पाहत नाही. फक्त इंग्रजी मालिकाच पाहतो. म्हणजे माझा मराठी बाणा कमी पडतो की काय?
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? : इथे मात्र हो.
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? : हो
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? : हो
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? : तपासावं लागेल. (हा प्रश्न माझ्या वयाच्या दृष्टीने अन्याय्य आहे. पण संपूर्ण कविता पाठ नसल्या तरी त्यांतल्या काही काही ओळी मनात ठसल्यात.
जर गाणी कवितांमध्ये बसत असतील, तर तो आकडा सहज पूर्ण होईल.

दोन प्रश्नांची उत्तरं नक्की नसल्याने ७०-८० गुण मि़ळतील.

आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? -- आमच्या घरात सगळेच श्रीराम म्हणुन सुरुवात करतात. नमस्कार नाही अर्थात.
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का?----- देवनागरी लिपी नाही पण मिंग्लिश मधून मेसेज लिहिते
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? ---- हो
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? ----- हो
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? ----- कधी कधी.
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? ---- जितके मराठी सिनेमाज येतात त्यातले ८०% बघितले जातात. हिंदीशी कंपेअर केल्ं तर हिंदी जास्त बघितले जातात कारण ग्रूप अमराठी आहे.
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? ------- ९०% पुस्तके मराठीच असतात.
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? ---- अनेक वेळा
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? ----- नातवंड लै लांब राहिलं ओ Proud मुलं झाली की ती बोलतील
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? ----- नसाव्यात बहुदा.

कृपया खालील प्रश्नांची खरी डोळा मारा उत्तरं द्या -

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का?

उत्तर : समोरुन फोन ओळखीच्या माणसाचा असेल तर "बोला काय म्हणता" अशी सुरुवात होते. अन्यथा हॅलो
गुण :- ५

२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का?

उत्तरः- समोरच्याकडे समस मधे मराठी दिसेलच असे गृहित धरता येत नाही. व्हॉट्सअप गृप मधे मराठी लिपी वापरली जाते
गुणः- ५

३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का?

उत्तर :- नाही. चैत्र, आषाढ, माघ हे महिने सोडल्यास बाकिचे महिने कधी येतात कधी जातात कळत नाही. त्यात ही गुढीपाढवा म्हणजे चैत्र, आषाढी एकादशी, आणि माघी गणपती हे मुख्य
गुणः- ०
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का?

उत्तरः- शाळेत होतो तेव्हाही शिक्षकांना तोंडावर कधीच उत्तर दिले नाही. "उलट बोलतोस" असे म्हणून बर्‍याचदा मार खाल्लेला. त्यामुळे असे घडाघडा बोलणे बंद केले
गुणः- ०

५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का?

उत्तर :- स्वाक्षरीचे पहिले अक्षर मराठी मधले वापरतो.
गुण- ५

६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का?

उत्तरः- दर्जेदार मराठी चित्रपट आवर्जुन बघितले जातात, परंतू सासरचे धोतर माहेरची साडी, बाजुवाल्याचा शर्ट असले टुक्कार सिनेमे बघून वेळ वाया घालवणे पसंद नाही.
गुणः- १०
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?

उत्तरः- निम्म्याहुन अधिक पुस्तक मराठी असतात. हॅरी पॉटर तर खास मराठी मधून मागवलेले.
गुणः- १०

८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?

उत्तर :- रोजच वकृत्व स्पर्धा ऑफिस मधे रंगते Wink
गुण :- १०

९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का?

उत्तरः- हो. किमान घरात तरी मराठी बोलतील. आता त्या वयात नव्या भाषा शिकणे आजोबांना आणि नातवंडांना सुध्दा जिकरीचे जाईल म्हणा. Happy
गुणः- १०

१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का?

उत्तरः- कविता नावाचा प्रकार शाळेत असताना सुध्दा समजला नाही. मग ते काव्य असो या मुलगी असो.
गुण :- ०

एकूण गुण - ५५

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? नमस्कार अशीच सुरुवात होत नाही, नंबर पाहून समोरच्या व्यक्तिचा अंदाज घेऊन 'बोला साहेब' किंवा 'बोला मालक' म्हणतो. याला 'नमस्कार' असंच समजून १० मार्क घेऊन टाकतो !
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? हो
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? हो
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? हो
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? नाही.
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? हो
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? हो
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? नाही
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? नातवंडांची खात्री नाही, सध्यातरी भारताबाहेर असूनही मुलगा (४ वर्षं) शुद्ध, स्पष्ट मराठी बोलतो. पुण्यात गेल्यावर त्याचं मराठी ऐकून लोकं विचारतात की तिकडे (मस्कत मधे) असूनही छान बोलतो, कौतुक आहे.
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? अजिबात नाही. कविता लहानपणापासून झेपत नाहीत फारश्या.

.. मी अट्टल !!!

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? - कधीकधी
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? - होय
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? - होय
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? - होय
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? - होय
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? - होय
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? - होय
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? - आठवत नाही! बहुतेक नाही!
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? - होय
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? - होय Happy

रशियन हेर नाही पण आहे हे चांगले आहे Wink

हो शाळेमुळे आणि स्वतःच्या आवडीमुळे Happy अर्थात ही वयाची अट लक्षात ठेऊन दरवर्षी एकतरी नवीन कविता पाठ करायला हवी म्हणजे उत्तर कायम हो राहील!

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? - अनोळखी कॉल असेल तर आपसुकच हॅलो येतं. समोर कोण बोलतंय हे माहित असेल तर नमस्कार.
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? - होय
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? - होय
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? - होय
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? - कधी कधी
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? - नाही. सगळेच मराठी सिनेमे बघत नाही. एकाददुसरा चांगला आला तर. नाहीतर हिंदीच.
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? - निम्म्यापेक्षा जास्तच. ९०%.
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? - खुप वेळा.
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? - होय
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? - कल्पना नाही. पुर्ण कविता पाठ नसल्या तरी काही कवितेतल्या ओळी आहेत लक्षात. गाणी कवितां मधे धरली तर खुप पाठ आहेत.

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? - कधीकधी

२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? - हो

३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? - हो

४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? - हो

५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? - कधीकधी

६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? - हो

७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? - हो

८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? - नाही (लेखनस्पर्धेत भाग घेतला आहे, पण ती निबंधस्पर्धा नव्हती. त्यामुळे ० गुण Sad )

९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? - हो

१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? - नाही Proud

एकूण गुण ७०. अट्टल मराठी प्रेमी smiley-happy093.gif

खरी खरी उत्तरे देत आहे
१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? - समोरचा मराथी भास्।इक असेल तर नक्किच
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? - हो
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का?- हो
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का?- हो
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का?- नाही
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का?- हो
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?- हो. फक्त मरात्।ई वाचते
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?- हो. कैक वेळा
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का?- हो.
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का?- नाही.

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? - कधी कधी.

२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? - कधी कधी

३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? - नाही.

४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? - नाही.

५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? - कधी कधी.

६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? - होय.

७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? - होय.

८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? - होय. Happy

९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? - कधी कधी

१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? - होय. Happy

एकुण गुण - ६० म्हणजेच 'मराठी प्रेमी' Happy

मी माझ्या ओळखीतल्या मायबोलीकरांना फोन करून ते पहिला शब्द काय उच्चारतात ते बघतोय. Wink
पहिला फोन मायबोलीशीर्षकगीतकाराला केला. त्यांनी खणखणीत नमस्कार म्हटलं. पण फोन कट झाल्याने पुन्हा केला तेव्हा हॅलो म्हणाले.
------
जिप्सी, मराठी महिने आणि मुळाक्षरे चटकन पाठ करून २० गुण वाढवा बरं.

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का?>>>>>>>>>.कधी कधी.
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? >>>>.>>>>>>होय. वित्तसंस्थेत, अर्ज लिहीला तोही पूर्ण मराठी शब्द वापरून. Happy
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का?>>>>>>>>>>>..हो. चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन.
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का?>>>>>>...हो. म्हणू का? Happy
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का?>>>>>>>कधी कधी.
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का?>>>>>>>हो. जास्त मराठीच असतात.

७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? >>>>>.हो. जास्त मराठीच असतात.
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?>>>>>>>>>>.हो. निबंध स्पर्धेत बक्षिसही मिळालं होतं.
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का?>>>>>>>>.हो.
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का?>>>>>>>>>हो. निदान संपूर्ण नसतील तरी अर्ध्या अर्ध्या तरी आठवतायत.

माझे एकूण गुण = ९० . Lol

bliss.gif

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? - कधीकधी
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? - कधीकधी
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? - होय
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? - होय
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? - नाही
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? - हो. जास्त मराठीच असतात, सिनेमागृहात आणि नेटवरसुदधा. आताही आपली मराठीवर 'तु हि रे' बघतेय. Happy
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? - होय. मी फक्त मराठी पुस्तच वाचते.
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? - नाही
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? - होय
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? -नाही

माझे ६० गुण. मी मराठीप्रेमी Happy

११. तुम्ही मायबोलीवर पडीक असता का? / तुम्हाला मायबोलीचे व्यसन अहे का? >>> अगदी अगदी... आणि ९९% लोक हो म्हणतील

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? -नाही. ० गुण

२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? - कधी कधी.५ गुण

३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? - हो, १० गुण

४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का?-हो, १० गुण

५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का?- हो, पण अर्धी मराठी,अर्धी इंग्रजी. ५ गुण

६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? - हो, १० गुण

७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?-हो, १० गुण

८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?- हो, खुप वेळा. १० गुण

९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? - कदाचित, ५ गुण

१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? - हो, नक्कीच. १० गुण

१. आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का? नाही. (हॅलो काका!, नमस्कार, अशी होते). दोन्ही येतात तेव्हा ५ गुण.
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का? हो.
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? हो.
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? हो.
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का? नाही
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का? नाही
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का? हो.
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का? हो. (कथा लिहा स्पर्धेत एकदा घेतला होता, म्हणुन हो.)
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का? हो
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? नाही.

६५ गुण.

आपण मराठी माणसासोबत फोनवरच्या संभाषणाची सुरुवात 'हॅलो' म्हणून न करता 'नमस्कार' म्हणून करता का?>>>> नाही . हॅलो म्हणून करते = 0 गुण
२. आपण मराठी माणसाला फोनवरून लघुसंदेश पाठवताना निम्म्यापेक्षा जास्त वेळा मराठी भाषा / देवनागरी लिपी वापरता का?>>>> नेहमीच मराठीतून लिहिते . माबोकर साक्षी आहेत = 10 गुण
३. आपल्याला बारा मराठी महिने कोणते आहेत ते अनुक्रमे सांगता येतात का? >>>> हो = 10 गुण
४. आपण सगळी बाराखडी घडाघडा व अचूक म्हणू शकता का? >>>> >>> होय = 10 गुण
५. आपली स्वाक्षरी देवनागरी लिपी वापरून करता का?>>> नाही = 0 गुण
६. आपल्याकडून बघितल्या जाणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी निदान निम्मे चित्रपट मराठी असतात का?>> ते चित्रपटाच्या दर्जावर अवलंबून आहे . दर्जेदार मराठी चित्रपट आवर्जून पाहिले जातात = 10 गुण
७. आपल्याकडून वाचल्या जाणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी निम्मी पुस्तकं मराठी असतात का?>>> इंग्रजी मराठी पुस्तक सारखीच वाचली जातात >>> 10 गुण
८. आपण शिक्षणोत्तर आयुष्यात किमान एकदातरी मराठी वक्तृत्वस्पर्धा किंवा निबंधस्पर्धा यांमध्ये भाग घेतला आहे का?>>> होय >>> 10 गुण
९. आपली नातवंडं मराठी भाषा बोलतील अशी खात्री आपल्याला वाटते का?>>>>> अर्थातच . ही आजी तशी सोडणार नाही त्यांना Wink पण वर रियाने वर म्हटलं आहे तस ही जssssरा लांबची गोष्ट आहे. पण स्वतःच्या मुलांना नक्कीच शिकवू = 10 गुण
१०.आपल्याला किमान आपल्या वयाइतक्या संख्येच्या कविता पाठ आहेत का? >>>> वयाइतकी नाही पण बऱ्यापैकी आहेत . पुन्हा एकदा ते कविता आवडण्यावर अवलंबून आहे == 05 गुण

हुश्श !!!! आता वळूया एकूण गुणसंख्येकडे

तर 75 गुण मिळून अट्टल मराठी प्रेमी ठरलेय Happy

अरे वाह, मजा येत्ये वाचायला.
लिंटी सोडून रशियन हेर कोणीच नाही का? Wink

रच्याकने ज्या कोणा संयोजकाच्या डोक्यात ह्या खेळाची कल्पना आली असेल त्याला लाल सलाम
( लाल सलाम कारण दोन कम्युनिस्ट एकमेकांना भेटल्यावर लाल सलाम म्हणतात अस वाचलंय . Wink Lol )

हर्पेन , बहुतेक जण फोनवर हॅलो आणि देवनागरी स्वाक्षरी मराठी नसल्यामुळं रशियन हेराचा किताब मिळवू शकले नाहीत अस दिसतेय Wink

Pages