फुसके बार – २५ फेब्रुवारी २०१६ विनोदी प्रक्षोभक भाषण, मॅन ऑफ द डे, देशद्रोहाच्या व्याख्येचे दुखणे

Submitted by Rajesh Kulkarni on 24 February, 2016 - 14:40

फुसके बार – २५ फेब्रुवारी २०१६ विनोदी प्रक्षोभक भाषण, मॅन ऑफ द डे, देशद्रोहाच्या व्याख्येचे दुखणे
.

१) किमान तरी तारतम्य पाळा

कन्हैया काय किंवा काल पोलिसांसमोर हजर झालेले दोघे काय त्यांनी पोलिसांसमोर अनेक गोष्टी कबूल केल्याच्या बातम्या येत आहेत. हे सारे पोलिसांनी धाक दाखवल्यामुळेच होते असेही हे भुक्त लोक म्हणतील.
कन्हैयाला मारहाण झालीच नाही इथपासून ते कोर्टात नेईपर्यंत झाली असे प्रवाद आहेत. स्टिंग ऑपरेशनमध्ये वकिलांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी म्हणजे त्यांनी मारलेल्या निव्वळ बढाया आहेत हेही कळले आहे. कन्हैयाने स्वत: एनएचआरचीला दिलेल्या माहितीतही आधी तीन व नंतर तीन तास मारहाण झाल्याचा उल्लेख केलेला नाही. तरीही तीन तासांचा ढोल बडवला जात आहे. बडवा.

ज्याच्यावर आरोप आहेत त्यांनी घोषणा दिल्या न दिल्या (आजच्या बातम्यामंध्ये तर उलर खलिदने स्वत: देशविरोधी घोषणा दिल्याचे चौकशीत कबूल केल्याचे कळते) तरी अशा घोषणा देणा-यांच्या सहवासात राहणे, घोषणा देणा-यांना विरोध न करणे हे तरी इथल्या भुक्त लोकांना योग्य वाटते का? आधी अभाविपच्या विद्यर्थ्यांनीच हा सगळा बनाव घडवून आणल्याचा आरोप केल्यानंतर हे स्पष्ट झाले की त्यांनी या देशविरोधी घोषणा देणा-यांशी वाद घातला. ते देशद्रोही ‘तेरे कातील जिंदा है’ असे सर्वोच्च न्यायालयाला उद्देशून म्हणत होते तर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी ‘भारतीय कोर्ट जिंदाबाद’ अशा घोषणांनी त्याला प्रत्युत्तर दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. एवढे तरी या आरोपी विद्यार्थ्यानी केले का?

याच गरीब बिचा-या कम्युनिस्ट तरूणाने जेएनयुमधील एका प्राध्यापकाला ‘अमुक अमुक’ कार्यक्रम आयोजित करायचा आहे म्हणून त्यासाठी परवानगी मागितली. पण प्रत्यक्षात हा तर देशविरोधी लोकांचा कार्यक्रम असल्याचे म्हणजे यांचा भलताच अजेंडा असल्याचे लक्षात आल्यावर त्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. यावरून परवानगीसाठी शिफारस करणा-या प्राध्यापकांनी उमरला त्यावरून झापलेही. ज्या देशविरोधी विचारसरणीच्या लोकांना उमरने तेथे आमंत्रित केले व हा कार्यक्रम आयोजित केला त्यालाही भुक्त लोक निर्दोष समजतात ही खरे तर दुर्दैवाची गोष्ट आहे.

भाजपविरोध हा एककलमी कार्यक्रम असलेल्या या भुक्तांकडून दुसरी अपेक्षाच करता येत नाही. तेव्हा काय चांगले काय वाईट याबद्दल स्वत:चा असा स्वतंत्र विचार करण्याची क्षमताही या भुक्त लोकांनी गमावलेली आहे.

तिकडे हार्वर्ड विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाचे प्रमुख होमी भाभा यांनी जेनयुच्या कुलगुरूंना यांना एक इमेल पाठवली आहे व जेएनयुमध्ये फुटीरतावादी घोषणा देणा-यांचा कार्यक्रम होऊ द्यायला हवा होता असे म्हटले तसे न करता या मुलांच्या असहमतीला असे गुन्हेगारी स्वरूप देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. हे भाभा महाशय पद्मभूषण सन्मानित आहेत. त्यांना तेथे हार्वर्डमध्ये बसून उपदेश करायला काय जाते आहे? त्यांच्या विद्यापीठात कम्युनिस्टांना स्थान आहे का हे त्यांना विचारू. वर तेथे अमेरिकेचे तुकडेतुकडे करण्याचे किंवा अमेरिकी सैनिकांना मारणा-यांचे उघडउघड समर्थन करण्याचे, तेथील सर्वोच्च न्य़ायालयातील न्यायाधिशांना मारण्याचे समर्थन करण्याचे आंदोलन करू दे. मग याच प्रकारे डिसेंट म्हणून त्याचे भाभांना त्याचे समर्थन करू दे. मग तेथे काय अवस्था होते तेही पाहू. फुकटची डायलॉगबाजी करायला काय जाते?

रोहित वेमुलाच्या व त्याच्या संघटनेतील सदस्यांच्या दलित असण्याचे, कन्हैयाच्या गरीब असल्याचे, उमर खालिदच्या मुस्लिम असण्याचे भांडवल केले जात आहे. असा घोषणा देणा-यांना साथ देणा-यांबद्दल गरीब बिचारे विद्यार्थी म्हणत त्यांच्याबद्दल कणव दाखवली जात आहे. इतका फरक न समजण्याएवढे या लोकांनी आपले डोके गहाण ठेवले आहे. जाणते-अजाणतेपणी हे लोक त्यांच्या भाजपद्वेषाच्या एककलमी अजेंड्यापायी या
देशविरोधी लोकांचेच समर्थन करत आहेत, यावरून यांना देशविरोधी वगैरे म्हणण्याची गरज नाही, पण वाईटाला वाईट म्हणण्याचे तारतम्य गमावल्याबद्दल सगळेच यांची कीव करत आहेत.

भाजपच्या अनेक संघटना असल्याचे आरोप केला जातो. त्याचप्रमाणे कम्युनिस्टांनी विविध संघटनांमार्फत जे जाळे उभारलेले आहे ते आता या प्रकरणामुळे उघड होत आहे. हे म्हणतील यांचे देशविरोधी घोषणांना समर्थन नाही, पण यांचेच जेएनयुमधले भाऊबंद अशा देशविरोधी लोकांचे कार्यक्रम आयोजित करण्यात मात्र पुढे असतात, माओवादी भाईबंद लोकांचे मुडदे पाडत आहेत. हे सगळे एकमेकांचे भाऊबंदच आहेत. कॉंग्रेसच्या राजवटीला याची इतकी वर्षे कल्पना असूनही त्यांच्याकडे गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष केले गेले व त्यामुळेच यांचे जाळे इतके फोफावलेले आहे. हे सगळे भाऊबंदच आहेत. आता सर्वांना यांचे षडयंत्र कळू लागले आहे. आणि खरे तर त्यामुळे यांची तंतरली आहे. त्यामुळे कधी दलितांचा, कधी कामगारांचा तर कधी मुस्लिमांचा कळवळा असल्याचे दाखवत तग धरण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे.

२) विनोदी प्रक्षोभक भाषण - कालची पुण्यातील दडपशाहीविरूद्धची सभा

काल विश्वंभर चौधरी यांच्या पोस्टवर वाचल्याप्रमाणे पुण्यामध्ये ‘शिक्षणसंस्था व पत्रकारांवरील दडपशाही आणि ‘देशद्रोहा’संबंधी कायद्याचा गैरवापर’ या विषयावर सभा होती.

त्यांचीच दुसरी एक पोस्ट पाहिली तर त्यात या सभेच्या आमंत्रणात ‘साथी’ असा उल्लेख होता. परंतु मी ‘साथी’च काय, कोणीच नसल्याने जावे की नाही असा विचार केला. विषय ‘दडपशाही, गैरवापर होतोय का? असा नव्हता. त्यामुळे दिलीप पाडगावकर, सुहास पळशीकर असे चांगले वक्ते असल्यामुळे जावे म्हणले, तरी काय ऐकायला मिळणार आहे याची कल्पना होती.

या दोघा वक्त्यांनी फार डाव्या वळणाची भाषणे केली नाहीत. उलट सरकारे अशी का वागतात याचे विश्लेषण केले. त्याव्यतिरिक्त आताचा मोठा प्रश्न हा राष्ट्रवाद वा देशविरोध कशाला म्हणायचे यावरही त्यांनी खल केला.

सर्वात मोकळी भूमिका पळशीकरांची होती. शिक्षणसंस्थांमध्ये हस्तक्षेप आजच होत नाही, तो आधीपासूनच होत आलेला आहे, हवे तर आताचे सरकार तसे जोमाने करते आहे असे समजा असे ते म्हणाले. शिवाय एक विचारधारा या देशात सत्तेपासून वारंवार डावलली गेली आहे. आता (पूर्ण बहुमताची संधी) असल्यामुळे त्यांनी त्यांना हवे असलेल्या गोष्टी घडवून आणणे साहजिक असल्याचे ते म्हणाले.

त्याआधी पाडगावकरांनी विविध माध्यमांबद्दल सांगितले. राजकारण्यांनी टीव्ही वाहिन्याची मालकी घेण्याची पद्धत प्रथम आंध्रात रूढ झाली. त्यानंतर तीच लाट देशभर पसरली. त्याहीआधी अगदी जिल्हापातळीवर वर्तमानपत्रांची मालकी स्थानिक राजकारण्याकडे असण्याची परंपरा होतीच. त्यामुळे आताच्या माध्यमांकडून निष्पक्षपणाची अपेक्षा ठेवणेच गैर असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय चर्चांचे विषयदेखील भडक असतात, त्यात तुम्हाला एक कोणती तरी बाजू घ्यावीच लागते, अन्यथा प्रेक्षकांचे ‘मनोरंजन’ होत नाही असे ते म्हणाले. त्यामुळे बोलताना मुद्द्याच्या दोन्ही बाजू सांगू पाहणारा वक्ता त्यांच्या पसंतीस पडत नाही, या अर्थाने लोकही या स्थितीस जबाबदार आहे असे ते म्हणाले.

सगळीच भाषणे एकसुरी होऊ नयेत म्हणून असेल कदाचित, शेवटी स्त्रीवादी कार्यकर्त्या म्हणून परिचय करून दिलेल्या व सभेच्या अध्यक्षा डॉ. मनीषा गुप्ते यांचे भाषण ठेवले होते. ते भाषण अतिशय विनोदी होते. त्यांनी हिटलरच्या नाझी जर्मनीचा गाढा अभ्यास केल्याचे त्यांनी सांगितले. हिटलरचे गॅस चेंबर्स हे अनेक डॉक्टरांनी बनवले होते, तसेच रा. स्व. संघाच्या स्थापनेतही अनेक डॉक्टरांचा सहभाग होता अशी जबरदस्त तुलना त्यांनी केली. त्या भयगंडाने इतक्या त्रस्त झालेल्या वाटल्या की आता हे असे विनोदी पण प्रक्षोभक भाषण केल्यामुळे ते संपल्यावर मोदींचे सरकार त्यांना सुखरूप घरी तरी जाऊ देईल की नाही अशी शंका त्यांना वाटत असेल, अशा पद्धतीचे त्यांचे बोलणे होते. जर्मनीत माणसे मारण्याकरता विषारी औषधांची इन्जेक्शन्स देणे किंवा बंदुकीच्या गोळ्या वापरणे परवडण्यासारखे नसल्याने त्यापेक्षा सोपा उपाय म्हणजे विषारी गॅसचा वापरला गेला हे ज्ञानही त्यांनी वाटले. बाकी कम्युनिस्टांनी जगभर म्हणजे अगदी रशिया, चीन, कंबोडियपासून कशी व किती माणसे मारली याचा उल्लेख त्यांनी कदाचित ते डाव्या विचारांचे व्यासपीठ होते म्हणून केला नसेल कदाचित.

मग त्यांनी मार्टिन निम्योलर यांची खालील कविता त्यांनी ऐकवली.

When the Nazis came for the communists,
I remained silent;
I was not a communist.

When they locked up the social democrats,
I remained silent;
I was not a social democrat.

When they came for the trade unionists,
I did not speak out;
I was not a trade unionist.

When they came for the Jews,
I remained silent;
I wasn't a Jew.

When they came for me,
there was no one left to speak out.

या कवितेचा मराठी अनुवाद व त्याचे विविध व्हेरियंट्स सध्या व्हॉट्सअपवर फिरत असलेले तुमच्या पाहण्यात आले असतील. येथे कोणाला नागरिकांमध्ये साधी नागरी शिस्त बिंबवता आलेली नाही आणि या हा पाठ नागरिकांना पढवायला निघाल्या आहेत.

‘अतिशहाणे’ या सदरात मोडणा-या या बाई कोठेकोठे जाऊन असे विष कालवत असतील व भयगंड निर्माण करत असतील कोणास ठाऊक. खरे तर इतर वक्त्यांपेक्षा डाव्या विचारांच्या सभेत टाळीखाऊ भाषण त्यांचेच झाले, पण असे.
कार्यक्रम संपल्यानंतर तीन-चार कॉलेजवयीन मुले बाहेर पडत होती. त्यांच्यातला संवाद ऐकला. ‘आईला, आपल्याला ब्रेनवॉश करायला पाहतात हे लोक, पण तरीही मोदी हे काही हिटलर वगैरे आहेत हे पटत नाही यार. मॅडम वाटेल ते बोलत होत्या.’ हे ऐकले.

पळशीकराचे लेख एरवीही वाचू शकतो, पाडगावकरांचेही लेख असतात, ते ब-याचदा टीव्हीवर चर्चेतही असतात. पण गुप्तेबाईंच्या विचारधनाचा खजिना कोठे ऐकायला मिळाला नसता. तीच या कार्यक्रमाची खरी भेट. असे विनोदी विचारधन तुमच्यापर्यंत पोहोचायलाच हवे, यासाठी दोघा वक्त्यांबरोबरच गुप्तेबाईंच्याही भाषणाची लिंक खाली देत आहे. भरपूर मनोरंजनाची खात्री. विनोदी प्रक्षोभक असे भाषण वारंवार ऐकायला मिळत नाही वरचेवर. कोणाला वाटेल हा विनोदी प्रक्षोभक प्रकार काय असतो. ऐकल्यावर निश्चित कळेल.

अर्थात, आजही अगदी गडाबडा लोळावे इतके हसू येईल असा विनोद सकाळीच पप्पूने केला. गाडीत बसल्याबसल्या पत्रकारांना उद्देशून ‘मी संसदेत बोलणार आहे, पण ‘ते’ मला बोलू देणार नाहीत. कारण भाजपचे सरकार माझ्या भाषणाला घाबरते’ असे बोबडे बोल त्याने देशाला ऐकवले. हेच बोल पप्पूने इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये ऐकवले. त्यानंतर ‘जॉनी जॉनी’ हे बडबडगीत सुरू होईल का अशी भीती होती, पण पप्पूच्या ड्रायव्हरने गाडी पुढे नेल्यामुळे पप्पूची ती हौस पुरी झाली नाही.

पळशीकरांचे भाषण: https://youtu.be/9mVxKrz2iQk

पाडगावकराचे भाषण: https://youtu.be/bLBajo_aKgs

गुप्तेंचे भाषण: https://youtu.be/z7atRcF-C-Q

३) भेकड पप्प्पू व आजच्या मॅन ऑफ द डे – स्मृती इराणी

वर उल्लेख केलेल्या सभेत एका-दोघा वक्त्यांनी उपाहासाने विचारले की हे काय सरकार आहे जे विद्यापीठातल्या मुलांना घाबरते आहे.

आज लोकसभेतल्या आपल्या भाषणामध्ये मंत्री स्मृती इराणींनी या प्रश्नाचे उत्तर दिले व अतिशय परिणामकारकपणे दिले. की हे सरकार या विद्यार्थ्यांचा हत्यारासारखा वापर करत आहे.

हे सरकार माझ्या भाषणाला घाबरते असे विनोदी व तेवढेच मूर्खपणाचे विधान सकाळी करणारा पप्पू मात्र त्याच्या भाषणाच्या वेळी भेकडासारखा सभात्यागाचा बहाणा करून पळाला. कमीत कमी भाषणाची तयरी कशी करावी, आत्मविश्वास म्हणजे काय असते याची मोफत शिकवणी इराणींकडून घेण्यासाठी एकट्या पप्पूने तरी सभागृहात थांबायला हवे होते.

इराणी यांनी Marcus Tullius Cicero यांचे खालील वचन उद्धृत केले.

"A nation can survive its fools, and even the ambitious. But it cannot survive treason from within. An enemy at the gates is less formidable, for he is known and carries his banner openly. But the traitor moves amongst those within the gate freely, his sly whispers rustling through all the alleys, heard in the very halls of government itself. For the traitor appears not a traitor; he speaks in accents familiar to his victims, and he wears their face and their arguments, he appeals to the baseness that lies deep in the hearts of all men. He rots the soul of a nation, he works secretly and unknown in the night to undermine the pillars of the city, he infects the body politic so that it can no longer resist. A murderer is less to fear. The traitor is the plague."

कालच्याच फुसके बारमध्ये मी या विद्यर्थ्यांना कम्युनिस्ट नेत्यांचा उघड पाठिंबा असल्याचे मी म्हटले होते. तेव्हा हे अंतर्गत शत्रू कोण आहेत हे कळणे आता सोपे होऊ लागले आहे.

आताच्या सरकारचे मुख्य विरोधक असलेले कॉंग्रेस व कम्युनिस्ट यांचे याबाबतीतले लागेबांधे आता उघड होऊ लागले आहेत. हे संबंध आता सातत्याने व परिणामकारकपणे जनतेपुढे आणण्याची गरज आहे.

इराणी यांनी सकाळी राज्यसभेत उगाच सभागृहाचा वेळ वाया घालवणा-या मायावती यांनाही चांगलेच सुनावले. मायावतींनी राज्यसभेचा जवळजवळ अर्ध्या दिवसापेक्षा अधिक वेळ का वाया घालवला, हे त्यांचे त्यांना तरी कळत होते की नाही कोणास ठाऊक!

४) देशद्रोहाचा कायदा हे दुखणे की देशद्रोहाची व्याख्या ठरवणे?

देशद्रोहाचा कायदाच बदलावा अशी मागणी काहीजण करताना दिसत आहेत. आताचा कायदा हा मुळात ब्रिटिशांच्या काळात झालेला आहे व नंतर त्यात काही बदलही झालेले आहेत. तेव्हा स्वतंत्र भारतात या कायद्याची गरजच काय (यातील ‘च’वरील भर लक्षात घ्यावा) असा बुद्धीभेद केला जात आहे.

एकत्र येऊन देशविरोधी घोषणा करण्यावर काय, केवळ कोणाची झोपमोड झाली किंवा वाहतुकीला अडथळा झाला या कारणांसाठी गुन्हा दाखल करायचा? एवढेच काय, जाट आंदोलनामध्ये झालेल्या प्रचंड हिंसाचाराच्या प्रकरणातही हरयाणाचे माजी मुख्यमंत्री हुडा यांचे राजकीय सल्लागार प्रा. वीरेंदर यांच्याविरूद्धही एका स्टिंग ऑपरेशनमधून मिळालेल्या पुराव्यांवरून याच देशद्रोहाच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. तेव्हा देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची मागणी पूर्णपणे गैर आहे.

प्रत्येक वेळी अशा खटल्यांच्या संदर्भात खलिस्तान चळवळीच्या वेळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याचा संदर्भ दिला जातो. केन्द्र सरकारने याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊन त्याबाबत सुधारित आदेश किंवा त्या निकालाचा अर्थ आणखी स्पष्ट करावा अशी मागणी करावी. कारण या निकालाप्रमाणे एखाद्या कृतीतून हिंसाचार घदत नसेल तर तो देशद्रोह ठरत नाही. सर्वोच्च न्यायालयाला हे सांगितले पाहिजे की असा अन्वयार्थ लावण्यामुळे प्रत्यक्ष हिंसाचार घडेपर्यंत बराच उशीर झालेला असू शकतो व त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू शकतो.

सरकार या कायद्याचा दुरूपयोग करेल अशी भीती कोणाला वाटत असेल, तर त्याबाबातचा निर्णय प्रत्येक केसमध्ये सर्वोच्च न्यायालय घेईल. पण तेवढ्या कारणावरून हा कायदाच रद्द करणे व त्याऐवजी अगदी वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे पर्यायी कायद्याच्या आधारावर गुन्हे दाखल करणे हे अगदी चुकीचे ठरेल. देशद्रोही कोण हे कसे ठरवता येत नाही किंवा ते ठरवण्यात अडचण येते, म्हणून कायदा रद्द करणे योग्य आहे की देशद्रोहाची व्याख्या ठरवण्याचा प्रयत्न करणे?

#फुसके_बार

#Phusake_Bar

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy एक स्त्री इतक्या पोटतिडकीने देशभक्ती वर बोलते, याचा अभिमानच असायला पाहीजे, आणी पुरुष मंड्ळी शभक्ती सोडुन जातीचे गचाळ राजकारण करतात. किती विरोधाभास.

भारत माता की जय.

पप्पु पळला ही सभ्य भाषा होती का?
>>>
नाही .. ती सुध्दा असभ्यच Happy याचा अर्थ आपण पण असभ्य भाषा वापरावी असा नाही.

एक स्त्री इतक्या पोटतिडकीने देशभक्ती वर बोलते, याचा अभिमानच असायला पाहीजे, >> आणि मोदी 'मौन की बात करतांत.'

भारतदेश की जय!

Smriti Zubin Irani मौज कीजिए कि आप मीडिया और भारत के भक्ति काल में मंत्री बनी हैं। लेकिन रोहित वेमुला के मामले पर चीख कर अपनी जाति बताने की चुनौती किसी और को दीजिए। देश की जिस नब्ज को आप टटोल रही हैं, वो वाजपेयी पहले ही टटोल चुुके हैं। आपको कॉपी करने भी नहीं आता। रोहित वेमुला के साथ हुए शोषण को डायलूट कर झूठ न छिपाइए। आप से हो नहीं सकेगा।

दूसरी बात, दूर्गा और महिषासुर का पाठ करने के लिए संसद नहीं है। उसके लिए समाज है। संसद को धर्म का अखाड़ा बनाना आपकी पार्टी को सूट करता है आप करिए। ये सच भी देश देख ही रहा है।

रही बात सिफारिशों की, तो मैडम देश को इसपर जवाब चाहिए भी नहीं। देश ही सिफारिशों पर चल रहा है। अस्पताल में सिफारिश, विश्वविद्यालय में सिफारिश, रेल में सिफारिश, नौकरी में सिफारिश, प्रमोशन में सिफारिश, हर जगह सिफारिश।

तो मैडम, हमें सफाई चाहिए आपके संघी अभियान पर, फर्जी विडियो के नाम पर छात्रों को फंसाने पर, रोहित वेमुला के सूइसाइड पर, पटियाला हाउस कोर्ट में वकीलों की गुंडई पर। इसपर बोलिए कुछ।

और हां, इस देश की मीडिया मायावती को आपकी तुलना में नहीं दिखाएगा, लेकिन हमने देखा है। मायावती अपने सवाल पर अड़ी रहीं, लेकिन उसका जवाब आपसे नहीं दिया गया। क्योंकि कटघरे में आप ही हैं मैडम।

जाऊद्याहो राजेश्वर... माणुस शेवटी शब्द उच्चारतो वा लिहितो ते "दुसर्‍याच्या लायकीप्रमाणे" नव्हे, तर स्वतःच्याच असल्यानसल्या बुद्धीच्या "लायकी प्रमाणे" लिहितो/बोलतो/व्यक्त होतो..... नै का?

>>>>

दुर्दैवाने

मै राकु की बहोत आभारी हुं मेरी सब पोस्ट संभाल के रखने के लिये रोज एक धाग मुहैया कराते है

धन्यवाद राकु.

विरोधी मताचा आदर करायला काय कमी पणा वाटतो? वाद मुद्द्यान्शी घाला...

राहुल गान्धी यान्च्या सारख्या राजकारणाच्या मर्यादा असणार्‍या नेत्यापासुन भाजपाला कसली एव्हढी भिती वाटते आहे? का दिवस रात्र ते आणि त्यान्चे पाठिराखे राहुल गान्धी आणि दमलेल्या कॉन्ग्रेसला टारगेट करत असतात?

भाजपाकडे कुठल्याही मुद्द्यावर उत्तर नाही आहे. मग काय करणार बिचारे? एक तर त्यांना सत्तेचा अनुभव नाही सतत विरोधी पक्षात बसुन त्यांची मानसिकता इतरांवर आरोप करण्याची झाली आहे. अश्यावेळी भाजपा तेच करत आहे. स्वतःची नाकामी लपवण्याकरीता विरोधकांवर आरोप लावणे हा एकच मार्ग भाजपाकडे आहे.

काल इराणीबाईला कोणी जात विचारलेली का? नाही तरी बिनडोकासारखे डायलॉग मारत होती. "मेरा नाम स्मृती इराणी है कोणी मेरी जात बता सकता है?" या वाक्याचा अर्थ काय घ्यावा? कालचे भाषण हा उत्तम विदुषकी नमुना होता. भारतीय संसदिय इतिहासात एक अतिकेविलवाणे हास्यास्पद भाषण म्हणून उल्लेख होईल.

अगदी अगदी भारतातील एकमेव देशभक्तीने ओतप्रोत भरलेली पार्टी आहे तिच्या विरुध्द निर्देशने म्हणजे खुद्द भारत माता विरुध्द निर्देशने आहे.

>>>>>>> तिच्या विरुध्द निर्देशने म्हणजे खुद्द भारत माता विरुध्द निर्देशने आहे. <<<<<<
१९७३ सारखी आन्णिबाणि जाहिर झालि का? Wink

आदरणीय
स्मृति ईरानी
मानव संसाधन विकास मंत्री
भारत सरकार

कल संसद में आपने जिन सवालों के जवाब मांगे मेरे पास वो जबाव हैं। आपके तेवर और विपक्ष की चुप्पी का राज मैं समझता हूं। इसलिए यह पत्र लिख रहा हूं। कल संसद में जो कुछ भी हुआ वह एक जनांदोलन को दफनाने जैसा था... वो आंदोलना जो डॉ रोहित ने खड़ा किया है। रोहित की वजह से कई सवालों के जवाब तलाशने की कवायत शुरू हो चुकी थी.... पर ब्राह्मणवादी सत्ता और विपक्ष की मीलभगत ने इसे कमजोर किया है। यह जनांदोलन सड़कों पर जिस वैचारिक तेजी और जोश के साथ लड़ा जा रहा है... उतना ही कमजोर पड़ गया संसद में। शर्म आती है ऐसे विपक्ष पर जो आपके (मनु स्मृति) कुछ भावुक लाइनों का जवाब नहीं दे पाई .... क्यों किसी ने आपसे से ये नहीं पूछा कि क्या आपका दर्द रोहित की माँ से ज्यादे है, जो जिंदगी भर मजदूरी करके, कपड़े सील कर अपने बेटे को पढ़ा रही थी,
जब आप चिल्ला रही थी तब क्यों नहीं आपसे ये कहा गया कि आपके ये फिल्मी आंसू रोहित की माँ के जैसे नहीं हैं.... जब आप सांसदों की चिट्ठियाँ दिखा कर कहा रही थी कि मैंने आप लोगों के कहने पर एडमिशन किया है तो आपसे क्यों नहीं पूछा गया कि आपने किसका हक मार कर ये नाजायज एडमिशन क्या है.... क्यों आप ने किसी होनहार की सीट एक सिफारिसी को दे दी। रोहित इसी के खिलाफ तो लड़ रहा था।
जब आप ने चिल्लाकर कहा कि अगर मुझपर जातीवाद का आरोप सिद्ध हो जाए तो मैं राजनीति छोड़ दूँगी ..... तो आपसे पूछना चाहिए था कि आजादी के 67 साल के बाद भी विश्वविद्यालयों में आरक्षण लागू नहीं किया जा रहा, दलित और ओबीसी छात्रों की छात्रवृति क्यों रोकी जा रही है, नौकरियों में दलित , ओबीसी और अल्पसंख्यकों के अधिकांश पद क्यों खाली हैं, देश के हजारों विश्वविद्यालयों में में गिने चुने ही दलित , ओबीसी और अल्पसंख्यक कुलपति क्यों हैं ..... ये सब आपकी नाक के नीचे चल रहा है और आप कह रही हो मैं जातिवादी नहीं हूं..... आप छोड़ दो राजनीति क्योंकि मुझे पता है आओकी राजनीति हमें हाशिये पर पहुँचने के लिए है।आप अगर आंसुओं की जगह एमफिल -पीएचडी में मिलने वाली छात्रवृति की बात करती तो मैं उसे राजनीति कहता पर आप जो कर रही हो वह राजनीति नहीं ड्रामा है। आप को इसलिए अपनी जाती पर अभिमान है क्योंकि आपने जाती का वह दंश नहीं झेला जो रोहित की माँ और इस देश की लाखों माँएं इस समाज में और बेटे-बेटियाँ विश्वविद्यालयों में रोज झेलते हैं। यह साजिश है आपकी और आपके टीम बी यानी कॉंग्रेस की जो नहीं चाहते की हम इस लायक बने की अपनी राजनीति खुद कर सकें। मुझे दुख हुआ है पर मैं निराश नहीं हूं क्योंकि रोहित ने बहुत हिम्मत दिया है। यह लड़ने के लिए, अपना अधिकार पाने के लिए काफी है।
रुद्रभानु

नंतर मराठीत भाषांतर करते तो पर्यन्त इथे सेव केले आहे.

सकुरा,
आपले सगळे मतभेद एकीकडे आणि हे नुसते हिंदी कॉपी पेस्ट करणे एकीकडे.
अहो मराठी साईट आहे. मराठीत लिहा. स्वतःचे लिहा. तुमचे मत काय ते लिहा. स्वतःचे मुद्दे मांडा.

हेच जर वाचायचे तर माबोबंद करुन हिंदी न्युजपेपरवर जातो ना आम्ही? हे हिंदी पहिल्या अर्धा सेकंदात डीटेक्ट करुन पुर्ण स्किप करत आहे.

>>कार्यक्रम संपल्यानंतर तीन-चार कॉलेजवयीन मुले बाहेर पडत होती. त्यांच्यातला संवाद ऐकला. ‘आईला, आपल्याला ब्रेनवॉश करायला पाहतात हे लोक, पण तरीही मोदी हे काही हिटलर वगैरे आहेत हे पटत नाही यार. मॅडम वाटेल ते बोलत होत्या.’ हे ऐकले.<<
राकु मी पण हे ऐकले. बा़की काही असले तरी पाडगावकर व पळशीकरांची भाषणे उत्तम झाली.देशद्रोह ही संकल्पना सातत्याने तपासून घेतली पाहिजे.देशात चाललेल्या न पटणार्‍या घटनांविषयी बोलणे म्हणजे देशद्रोह का? देशद्रोहाच्या कायद्या विषयी प्रा. नितेश नवसागरे यांनी चांगली मांडणी केली.तात्विक पातळीवर देशद्रोहाचा कायदा आता रद्द झाला पाहिजे हे पटले तरी व्यावहारिक पातळीवर जनमानस अद्याप तेवढे प्रगल्भ नाही.

घाटपांडेसाहेब,
नवसागरे यांनीही या कायद्याचा इतिहास चांगल्या पद्धतीने सागितला. तुम्ही म्हणता तशी पाडगावकर व पळशीकरांची भाषणेही चांगली झाली.
केवळ व्यावहारिक पातळीवर जनमानस अद्याप तेवढे प्रगल्भ नाही, म्हणून नव्हे, तर आजची आव्हाने वेगळी व वेगवेगळ्या स्वरूपातली आहेत. देशविरोधी कारवाया कोणत्या स्वरूपात होतील याचा नेम नाही. त्यामानाने देशविरोधी घोषणा देणे हा तर बराच जुना प्रकार झाला.

>>>> त्यामानाने देशविरोधी घोषणा देणे हा तर बराच जुना प्रकार झाला. <<<<
होय, प्रकार जुना व बराचसा निरुपद्रवी वाटत असला, तरी खरे तर दुर्लक्ष केल्यास सगळ्यात घातक आहे तो.
हे असे सारखे चालत राहिले, तर वर उल्लेखिलेल्या मुलांचे बुद्धिभेद होतात, पहिल्यांदा नाही झाले, दुसर्यांदा नाही झाले तरी सातत्याने देशविघातक विचारांचा मारा होत राहिल्यास बुद्धिभेद होतात व हीच लोक, बुद्धिभेद झाल्यावर अगदी "जिहादी" / "नक्षली" वगैरे नाहि बनली तरी त्यांच्या मदतीकरताची शहरा/गावातील सहानुभुतीधारक स्लिपिंगसेल्स नक्कीच बनु शकतात. मोर्चा/निदर्शने/बंद/जाळपोळ/तोडफोड/लुटालुटा वगैरे करताही अशा प्रकारे बुद्धिभेद केलेली जन्ताच वापरली जाते. अन म्हणूनच, ही विषवल्ली वेळीच ठेचुन उपटुन टाकावी लागते. अन्यथा, मग अगदी "काहीही म्हणा हं, पन त्या अजमल कसाब वगैरेंचे डॅरिंग मानले पाहिजेल" वगैरे जाणुन बुजुन पेरलेल्या वल्गना सर्वदूर प्रसिद्ध होऊन ऐकायला मिळू लागतात.

सेम प्रकार हिंदुद्वेष्टॅपणा/ ब्राह्मणद्वेष्टेपणा निर्माण करण्याकरता १९८५ पासुन वापरला जात आहे. व तिकडे तो यशस्वी होतोय, नादान/नाठाळ कॉन्गी राज्यकर्ते व सिस्टीम्स काही करत नाहीत म्हणल्यावर आता देशाच्याच राजधानीत देशाच्याच विरोधी घोषणा देण्याची मजल गेलीये.

सेम प्रकार हिंदुद्वेष्टॅपणा/ ब्राह्मणद्वेष्टेपणा निर्माण करण्याकरता १९८५ पासुन वापरला जात आहे. व तिकडे तो यशस्वी होतोय, नादान/नाठाळ कॉन्गी राज्यकर्ते व सिस्टीम्स काही करत नाहीत म्हणल्यावर आता देशाच्याच राजधानीत देशाच्याच विरोधी घोषणा देण्याची मजल गेलीये.>>>>
>>>>>>>>>>>>
अगदी खरे आहे, यांची भाषा नेहमी जातीवरून शिव्या, केवळ ब्राम्हण जातीला लक्ष करणे हेच आहे. त्यासाठी ते काहीही करतील.

काल लोकसभेत झालेल्या चर्चे मध्ये भाजप ला झुकते माप दिले गेले . तेथे अध्यक्षांनी भाजप व्यतिरिक्त इतर कोणालाही व्यवस्थीत बोलू दिले नाही . भाजपला कोंडित पकडलेले एकही दृश्य दाखविले गेले नाही . तसेच टीव्ही वरील प्रक्षेपण सुद्धा भाजपला अपेक्षित असे करण्यात आले . आज वेगवेगळ्या निपक्षपाति न्यूज़ पेपर मध्ये कालच्या चर्चेचे वृत्तांत आले आहे ज्यामध्ये सर्वांनी एकमताने स्मृती इराणी लोकसभेत खोट्या बोलल्या असा निर्वाळा दिला आहे .

स्मृती इराणी आज पर्यंत या प्रकरणात जे खोट्या बोलल्या त्याचा वृत्तांत .

एक खोटे लपवण्यासाठी इराणी तीन वेळा खोटे बोलल्या, स्मृती इराणी यांच्या दाव्यानुसार प्रोक्टेरिअल मंडळाने हैदराबाद केंद्रीय विद्यापीठास सोपवलेल्या अहवालात दलित विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेतले होते. तो अहवाल ‘एक्स पार्टी’ होता. परंतु स्मृती इराणी यांचा दावा खोटा आहे. कारण मंडळाने सर्व तथ्यांची शहानिशा करूनच विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द केले होते. मंडळाने स्वतचा निर्णय बरोब्बर पंधरा दिवसांनी अर्थात ३१ ऑगस्ट २०१५ रोजी बदलला. त्यासाठी इराणी यांनी दबाव आणला होता. त्यांनी वारंवार विद्यापीठास पत्रे लिहिली होती हे सर्वांना माहितच आहे .

कार्यकारी परिषदेचे नाव घेऊन स्मृति इराणी दुसऱ्यांदा खोटे बोलल्या . परिषदेने पीएचडी करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचे निलंबन योग्य ठरवले होते. या परिषदेचे अध्यक्ष दलित असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या होत्या. विद्यापीठाच्या एससी-एसटी फोरमने स्मृती इराणी यांचा दावा खोटा ठरवला आहे. स्मृती इराणी यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे व कटाचा भाग आहे.

तिसऱ्यांदादेखील स्मृती इराणी खोटे बोलल्या. वसतिगृहाच्या प्रमुखांनी (वॉर्डन) त्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून निलंबित केले होते. हे प्रमुख दलित असल्याचा दावा स्मृती इराणी यांनी करून निलंबनाचे समर्थन केले. परंतु वसतिगृह प्रमुख स्वत निर्णय घेत नाही. ते केवळ कुलगुरूंच्या निर्णयाची अंमलबजावणी करतात.

काल लोकसभेत हे प्रश्न स्मृती इराणी यांना विचारण्यात आले परंतु स्मृती इराणी आणि भाजप सदस्यांना याची उत्तरे देता आली नाहीत .

काल फ़क्त स्मृती इराणी यांचे खोटे बोलणारे आक्रस्ताळी भाषण दाखविन्यात आले . भाजपचे मुद्दे खोडून काढणारे प्रक्षेपण दाखविन्यात आले नाही .

आता भारतीयांनो तुम्हीच समजून जा की भाजप कसा रडीचा डाव खेळत आहे .

Pages