फुसके बार – २५ फेब्रुवारी २०१६ विनोदी प्रक्षोभक भाषण, मॅन ऑफ द डे, देशद्रोहाच्या व्याख्येचे दुखणे

Submitted by Rajesh Kulkarni on 24 February, 2016 - 14:40

फुसके बार – २५ फेब्रुवारी २०१६ विनोदी प्रक्षोभक भाषण, मॅन ऑफ द डे, देशद्रोहाच्या व्याख्येचे दुखणे
.

१) किमान तरी तारतम्य पाळा

कन्हैया काय किंवा काल पोलिसांसमोर हजर झालेले दोघे काय त्यांनी पोलिसांसमोर अनेक गोष्टी कबूल केल्याच्या बातम्या येत आहेत. हे सारे पोलिसांनी धाक दाखवल्यामुळेच होते असेही हे भुक्त लोक म्हणतील.
कन्हैयाला मारहाण झालीच नाही इथपासून ते कोर्टात नेईपर्यंत झाली असे प्रवाद आहेत. स्टिंग ऑपरेशनमध्ये वकिलांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी म्हणजे त्यांनी मारलेल्या निव्वळ बढाया आहेत हेही कळले आहे. कन्हैयाने स्वत: एनएचआरचीला दिलेल्या माहितीतही आधी तीन व नंतर तीन तास मारहाण झाल्याचा उल्लेख केलेला नाही. तरीही तीन तासांचा ढोल बडवला जात आहे. बडवा.

ज्याच्यावर आरोप आहेत त्यांनी घोषणा दिल्या न दिल्या (आजच्या बातम्यामंध्ये तर उलर खलिदने स्वत: देशविरोधी घोषणा दिल्याचे चौकशीत कबूल केल्याचे कळते) तरी अशा घोषणा देणा-यांच्या सहवासात राहणे, घोषणा देणा-यांना विरोध न करणे हे तरी इथल्या भुक्त लोकांना योग्य वाटते का? आधी अभाविपच्या विद्यर्थ्यांनीच हा सगळा बनाव घडवून आणल्याचा आरोप केल्यानंतर हे स्पष्ट झाले की त्यांनी या देशविरोधी घोषणा देणा-यांशी वाद घातला. ते देशद्रोही ‘तेरे कातील जिंदा है’ असे सर्वोच्च न्यायालयाला उद्देशून म्हणत होते तर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी ‘भारतीय कोर्ट जिंदाबाद’ अशा घोषणांनी त्याला प्रत्युत्तर दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. एवढे तरी या आरोपी विद्यार्थ्यानी केले का?

याच गरीब बिचा-या कम्युनिस्ट तरूणाने जेएनयुमधील एका प्राध्यापकाला ‘अमुक अमुक’ कार्यक्रम आयोजित करायचा आहे म्हणून त्यासाठी परवानगी मागितली. पण प्रत्यक्षात हा तर देशविरोधी लोकांचा कार्यक्रम असल्याचे म्हणजे यांचा भलताच अजेंडा असल्याचे लक्षात आल्यावर त्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. यावरून परवानगीसाठी शिफारस करणा-या प्राध्यापकांनी उमरला त्यावरून झापलेही. ज्या देशविरोधी विचारसरणीच्या लोकांना उमरने तेथे आमंत्रित केले व हा कार्यक्रम आयोजित केला त्यालाही भुक्त लोक निर्दोष समजतात ही खरे तर दुर्दैवाची गोष्ट आहे.

भाजपविरोध हा एककलमी कार्यक्रम असलेल्या या भुक्तांकडून दुसरी अपेक्षाच करता येत नाही. तेव्हा काय चांगले काय वाईट याबद्दल स्वत:चा असा स्वतंत्र विचार करण्याची क्षमताही या भुक्त लोकांनी गमावलेली आहे.

तिकडे हार्वर्ड विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाचे प्रमुख होमी भाभा यांनी जेनयुच्या कुलगुरूंना यांना एक इमेल पाठवली आहे व जेएनयुमध्ये फुटीरतावादी घोषणा देणा-यांचा कार्यक्रम होऊ द्यायला हवा होता असे म्हटले तसे न करता या मुलांच्या असहमतीला असे गुन्हेगारी स्वरूप देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. हे भाभा महाशय पद्मभूषण सन्मानित आहेत. त्यांना तेथे हार्वर्डमध्ये बसून उपदेश करायला काय जाते आहे? त्यांच्या विद्यापीठात कम्युनिस्टांना स्थान आहे का हे त्यांना विचारू. वर तेथे अमेरिकेचे तुकडेतुकडे करण्याचे किंवा अमेरिकी सैनिकांना मारणा-यांचे उघडउघड समर्थन करण्याचे, तेथील सर्वोच्च न्य़ायालयातील न्यायाधिशांना मारण्याचे समर्थन करण्याचे आंदोलन करू दे. मग याच प्रकारे डिसेंट म्हणून त्याचे भाभांना त्याचे समर्थन करू दे. मग तेथे काय अवस्था होते तेही पाहू. फुकटची डायलॉगबाजी करायला काय जाते?

रोहित वेमुलाच्या व त्याच्या संघटनेतील सदस्यांच्या दलित असण्याचे, कन्हैयाच्या गरीब असल्याचे, उमर खालिदच्या मुस्लिम असण्याचे भांडवल केले जात आहे. असा घोषणा देणा-यांना साथ देणा-यांबद्दल गरीब बिचारे विद्यार्थी म्हणत त्यांच्याबद्दल कणव दाखवली जात आहे. इतका फरक न समजण्याएवढे या लोकांनी आपले डोके गहाण ठेवले आहे. जाणते-अजाणतेपणी हे लोक त्यांच्या भाजपद्वेषाच्या एककलमी अजेंड्यापायी या
देशविरोधी लोकांचेच समर्थन करत आहेत, यावरून यांना देशविरोधी वगैरे म्हणण्याची गरज नाही, पण वाईटाला वाईट म्हणण्याचे तारतम्य गमावल्याबद्दल सगळेच यांची कीव करत आहेत.

भाजपच्या अनेक संघटना असल्याचे आरोप केला जातो. त्याचप्रमाणे कम्युनिस्टांनी विविध संघटनांमार्फत जे जाळे उभारलेले आहे ते आता या प्रकरणामुळे उघड होत आहे. हे म्हणतील यांचे देशविरोधी घोषणांना समर्थन नाही, पण यांचेच जेएनयुमधले भाऊबंद अशा देशविरोधी लोकांचे कार्यक्रम आयोजित करण्यात मात्र पुढे असतात, माओवादी भाईबंद लोकांचे मुडदे पाडत आहेत. हे सगळे एकमेकांचे भाऊबंदच आहेत. कॉंग्रेसच्या राजवटीला याची इतकी वर्षे कल्पना असूनही त्यांच्याकडे गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष केले गेले व त्यामुळेच यांचे जाळे इतके फोफावलेले आहे. हे सगळे भाऊबंदच आहेत. आता सर्वांना यांचे षडयंत्र कळू लागले आहे. आणि खरे तर त्यामुळे यांची तंतरली आहे. त्यामुळे कधी दलितांचा, कधी कामगारांचा तर कधी मुस्लिमांचा कळवळा असल्याचे दाखवत तग धरण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे.

२) विनोदी प्रक्षोभक भाषण - कालची पुण्यातील दडपशाहीविरूद्धची सभा

काल विश्वंभर चौधरी यांच्या पोस्टवर वाचल्याप्रमाणे पुण्यामध्ये ‘शिक्षणसंस्था व पत्रकारांवरील दडपशाही आणि ‘देशद्रोहा’संबंधी कायद्याचा गैरवापर’ या विषयावर सभा होती.

त्यांचीच दुसरी एक पोस्ट पाहिली तर त्यात या सभेच्या आमंत्रणात ‘साथी’ असा उल्लेख होता. परंतु मी ‘साथी’च काय, कोणीच नसल्याने जावे की नाही असा विचार केला. विषय ‘दडपशाही, गैरवापर होतोय का? असा नव्हता. त्यामुळे दिलीप पाडगावकर, सुहास पळशीकर असे चांगले वक्ते असल्यामुळे जावे म्हणले, तरी काय ऐकायला मिळणार आहे याची कल्पना होती.

या दोघा वक्त्यांनी फार डाव्या वळणाची भाषणे केली नाहीत. उलट सरकारे अशी का वागतात याचे विश्लेषण केले. त्याव्यतिरिक्त आताचा मोठा प्रश्न हा राष्ट्रवाद वा देशविरोध कशाला म्हणायचे यावरही त्यांनी खल केला.

सर्वात मोकळी भूमिका पळशीकरांची होती. शिक्षणसंस्थांमध्ये हस्तक्षेप आजच होत नाही, तो आधीपासूनच होत आलेला आहे, हवे तर आताचे सरकार तसे जोमाने करते आहे असे समजा असे ते म्हणाले. शिवाय एक विचारधारा या देशात सत्तेपासून वारंवार डावलली गेली आहे. आता (पूर्ण बहुमताची संधी) असल्यामुळे त्यांनी त्यांना हवे असलेल्या गोष्टी घडवून आणणे साहजिक असल्याचे ते म्हणाले.

त्याआधी पाडगावकरांनी विविध माध्यमांबद्दल सांगितले. राजकारण्यांनी टीव्ही वाहिन्याची मालकी घेण्याची पद्धत प्रथम आंध्रात रूढ झाली. त्यानंतर तीच लाट देशभर पसरली. त्याहीआधी अगदी जिल्हापातळीवर वर्तमानपत्रांची मालकी स्थानिक राजकारण्याकडे असण्याची परंपरा होतीच. त्यामुळे आताच्या माध्यमांकडून निष्पक्षपणाची अपेक्षा ठेवणेच गैर असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय चर्चांचे विषयदेखील भडक असतात, त्यात तुम्हाला एक कोणती तरी बाजू घ्यावीच लागते, अन्यथा प्रेक्षकांचे ‘मनोरंजन’ होत नाही असे ते म्हणाले. त्यामुळे बोलताना मुद्द्याच्या दोन्ही बाजू सांगू पाहणारा वक्ता त्यांच्या पसंतीस पडत नाही, या अर्थाने लोकही या स्थितीस जबाबदार आहे असे ते म्हणाले.

सगळीच भाषणे एकसुरी होऊ नयेत म्हणून असेल कदाचित, शेवटी स्त्रीवादी कार्यकर्त्या म्हणून परिचय करून दिलेल्या व सभेच्या अध्यक्षा डॉ. मनीषा गुप्ते यांचे भाषण ठेवले होते. ते भाषण अतिशय विनोदी होते. त्यांनी हिटलरच्या नाझी जर्मनीचा गाढा अभ्यास केल्याचे त्यांनी सांगितले. हिटलरचे गॅस चेंबर्स हे अनेक डॉक्टरांनी बनवले होते, तसेच रा. स्व. संघाच्या स्थापनेतही अनेक डॉक्टरांचा सहभाग होता अशी जबरदस्त तुलना त्यांनी केली. त्या भयगंडाने इतक्या त्रस्त झालेल्या वाटल्या की आता हे असे विनोदी पण प्रक्षोभक भाषण केल्यामुळे ते संपल्यावर मोदींचे सरकार त्यांना सुखरूप घरी तरी जाऊ देईल की नाही अशी शंका त्यांना वाटत असेल, अशा पद्धतीचे त्यांचे बोलणे होते. जर्मनीत माणसे मारण्याकरता विषारी औषधांची इन्जेक्शन्स देणे किंवा बंदुकीच्या गोळ्या वापरणे परवडण्यासारखे नसल्याने त्यापेक्षा सोपा उपाय म्हणजे विषारी गॅसचा वापरला गेला हे ज्ञानही त्यांनी वाटले. बाकी कम्युनिस्टांनी जगभर म्हणजे अगदी रशिया, चीन, कंबोडियपासून कशी व किती माणसे मारली याचा उल्लेख त्यांनी कदाचित ते डाव्या विचारांचे व्यासपीठ होते म्हणून केला नसेल कदाचित.

मग त्यांनी मार्टिन निम्योलर यांची खालील कविता त्यांनी ऐकवली.

When the Nazis came for the communists,
I remained silent;
I was not a communist.

When they locked up the social democrats,
I remained silent;
I was not a social democrat.

When they came for the trade unionists,
I did not speak out;
I was not a trade unionist.

When they came for the Jews,
I remained silent;
I wasn't a Jew.

When they came for me,
there was no one left to speak out.

या कवितेचा मराठी अनुवाद व त्याचे विविध व्हेरियंट्स सध्या व्हॉट्सअपवर फिरत असलेले तुमच्या पाहण्यात आले असतील. येथे कोणाला नागरिकांमध्ये साधी नागरी शिस्त बिंबवता आलेली नाही आणि या हा पाठ नागरिकांना पढवायला निघाल्या आहेत.

‘अतिशहाणे’ या सदरात मोडणा-या या बाई कोठेकोठे जाऊन असे विष कालवत असतील व भयगंड निर्माण करत असतील कोणास ठाऊक. खरे तर इतर वक्त्यांपेक्षा डाव्या विचारांच्या सभेत टाळीखाऊ भाषण त्यांचेच झाले, पण असे.
कार्यक्रम संपल्यानंतर तीन-चार कॉलेजवयीन मुले बाहेर पडत होती. त्यांच्यातला संवाद ऐकला. ‘आईला, आपल्याला ब्रेनवॉश करायला पाहतात हे लोक, पण तरीही मोदी हे काही हिटलर वगैरे आहेत हे पटत नाही यार. मॅडम वाटेल ते बोलत होत्या.’ हे ऐकले.

पळशीकराचे लेख एरवीही वाचू शकतो, पाडगावकरांचेही लेख असतात, ते ब-याचदा टीव्हीवर चर्चेतही असतात. पण गुप्तेबाईंच्या विचारधनाचा खजिना कोठे ऐकायला मिळाला नसता. तीच या कार्यक्रमाची खरी भेट. असे विनोदी विचारधन तुमच्यापर्यंत पोहोचायलाच हवे, यासाठी दोघा वक्त्यांबरोबरच गुप्तेबाईंच्याही भाषणाची लिंक खाली देत आहे. भरपूर मनोरंजनाची खात्री. विनोदी प्रक्षोभक असे भाषण वारंवार ऐकायला मिळत नाही वरचेवर. कोणाला वाटेल हा विनोदी प्रक्षोभक प्रकार काय असतो. ऐकल्यावर निश्चित कळेल.

अर्थात, आजही अगदी गडाबडा लोळावे इतके हसू येईल असा विनोद सकाळीच पप्पूने केला. गाडीत बसल्याबसल्या पत्रकारांना उद्देशून ‘मी संसदेत बोलणार आहे, पण ‘ते’ मला बोलू देणार नाहीत. कारण भाजपचे सरकार माझ्या भाषणाला घाबरते’ असे बोबडे बोल त्याने देशाला ऐकवले. हेच बोल पप्पूने इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये ऐकवले. त्यानंतर ‘जॉनी जॉनी’ हे बडबडगीत सुरू होईल का अशी भीती होती, पण पप्पूच्या ड्रायव्हरने गाडी पुढे नेल्यामुळे पप्पूची ती हौस पुरी झाली नाही.

पळशीकरांचे भाषण: https://youtu.be/9mVxKrz2iQk

पाडगावकराचे भाषण: https://youtu.be/bLBajo_aKgs

गुप्तेंचे भाषण: https://youtu.be/z7atRcF-C-Q

३) भेकड पप्प्पू व आजच्या मॅन ऑफ द डे – स्मृती इराणी

वर उल्लेख केलेल्या सभेत एका-दोघा वक्त्यांनी उपाहासाने विचारले की हे काय सरकार आहे जे विद्यापीठातल्या मुलांना घाबरते आहे.

आज लोकसभेतल्या आपल्या भाषणामध्ये मंत्री स्मृती इराणींनी या प्रश्नाचे उत्तर दिले व अतिशय परिणामकारकपणे दिले. की हे सरकार या विद्यार्थ्यांचा हत्यारासारखा वापर करत आहे.

हे सरकार माझ्या भाषणाला घाबरते असे विनोदी व तेवढेच मूर्खपणाचे विधान सकाळी करणारा पप्पू मात्र त्याच्या भाषणाच्या वेळी भेकडासारखा सभात्यागाचा बहाणा करून पळाला. कमीत कमी भाषणाची तयरी कशी करावी, आत्मविश्वास म्हणजे काय असते याची मोफत शिकवणी इराणींकडून घेण्यासाठी एकट्या पप्पूने तरी सभागृहात थांबायला हवे होते.

इराणी यांनी Marcus Tullius Cicero यांचे खालील वचन उद्धृत केले.

"A nation can survive its fools, and even the ambitious. But it cannot survive treason from within. An enemy at the gates is less formidable, for he is known and carries his banner openly. But the traitor moves amongst those within the gate freely, his sly whispers rustling through all the alleys, heard in the very halls of government itself. For the traitor appears not a traitor; he speaks in accents familiar to his victims, and he wears their face and their arguments, he appeals to the baseness that lies deep in the hearts of all men. He rots the soul of a nation, he works secretly and unknown in the night to undermine the pillars of the city, he infects the body politic so that it can no longer resist. A murderer is less to fear. The traitor is the plague."

कालच्याच फुसके बारमध्ये मी या विद्यर्थ्यांना कम्युनिस्ट नेत्यांचा उघड पाठिंबा असल्याचे मी म्हटले होते. तेव्हा हे अंतर्गत शत्रू कोण आहेत हे कळणे आता सोपे होऊ लागले आहे.

आताच्या सरकारचे मुख्य विरोधक असलेले कॉंग्रेस व कम्युनिस्ट यांचे याबाबतीतले लागेबांधे आता उघड होऊ लागले आहेत. हे संबंध आता सातत्याने व परिणामकारकपणे जनतेपुढे आणण्याची गरज आहे.

इराणी यांनी सकाळी राज्यसभेत उगाच सभागृहाचा वेळ वाया घालवणा-या मायावती यांनाही चांगलेच सुनावले. मायावतींनी राज्यसभेचा जवळजवळ अर्ध्या दिवसापेक्षा अधिक वेळ का वाया घालवला, हे त्यांचे त्यांना तरी कळत होते की नाही कोणास ठाऊक!

४) देशद्रोहाचा कायदा हे दुखणे की देशद्रोहाची व्याख्या ठरवणे?

देशद्रोहाचा कायदाच बदलावा अशी मागणी काहीजण करताना दिसत आहेत. आताचा कायदा हा मुळात ब्रिटिशांच्या काळात झालेला आहे व नंतर त्यात काही बदलही झालेले आहेत. तेव्हा स्वतंत्र भारतात या कायद्याची गरजच काय (यातील ‘च’वरील भर लक्षात घ्यावा) असा बुद्धीभेद केला जात आहे.

एकत्र येऊन देशविरोधी घोषणा करण्यावर काय, केवळ कोणाची झोपमोड झाली किंवा वाहतुकीला अडथळा झाला या कारणांसाठी गुन्हा दाखल करायचा? एवढेच काय, जाट आंदोलनामध्ये झालेल्या प्रचंड हिंसाचाराच्या प्रकरणातही हरयाणाचे माजी मुख्यमंत्री हुडा यांचे राजकीय सल्लागार प्रा. वीरेंदर यांच्याविरूद्धही एका स्टिंग ऑपरेशनमधून मिळालेल्या पुराव्यांवरून याच देशद्रोहाच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. तेव्हा देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची मागणी पूर्णपणे गैर आहे.

प्रत्येक वेळी अशा खटल्यांच्या संदर्भात खलिस्तान चळवळीच्या वेळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याचा संदर्भ दिला जातो. केन्द्र सरकारने याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊन त्याबाबत सुधारित आदेश किंवा त्या निकालाचा अर्थ आणखी स्पष्ट करावा अशी मागणी करावी. कारण या निकालाप्रमाणे एखाद्या कृतीतून हिंसाचार घदत नसेल तर तो देशद्रोह ठरत नाही. सर्वोच्च न्यायालयाला हे सांगितले पाहिजे की असा अन्वयार्थ लावण्यामुळे प्रत्यक्ष हिंसाचार घडेपर्यंत बराच उशीर झालेला असू शकतो व त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू शकतो.

सरकार या कायद्याचा दुरूपयोग करेल अशी भीती कोणाला वाटत असेल, तर त्याबाबातचा निर्णय प्रत्येक केसमध्ये सर्वोच्च न्यायालय घेईल. पण तेवढ्या कारणावरून हा कायदाच रद्द करणे व त्याऐवजी अगदी वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे पर्यायी कायद्याच्या आधारावर गुन्हे दाखल करणे हे अगदी चुकीचे ठरेल. देशद्रोही कोण हे कसे ठरवता येत नाही किंवा ते ठरवण्यात अडचण येते, म्हणून कायदा रद्द करणे योग्य आहे की देशद्रोहाची व्याख्या ठरवण्याचा प्रयत्न करणे?

#फुसके_बार

#Phusake_Bar

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला राकुन्ची कमाल वाटते मी रोज सकाळी सात वाजता उठून कॉफी पीतपीत भारतीय व्रुत्तपत्रे नेटवर वाचतो. आमचे घड्याळ भारताच्या पाच तास पुढे आहे. म्हणजे राकुन्ना किति लवकर उठुन हे सदर लिहावे लगत असेल याची कल्पना येते. त्यान्च्या मताविषयि तुम्हि सहमत असाल अथवा नसाल पण त्यान्चे कष्ट तरी कबुल करावे लागतीलच.

Proud

संताजी धनाजी दिसून मोघलाना झ्पो येत नव्हती म्हणे.

तसे राहुल गांधी व काँ या नावाने त्यांची झोप उडत असणार !

राकु मोड ऑन .....

अरे मुर्ख नासिर , तू स्वतः बाटगा नाव घेउन बसला आहेस. आणि मला अक्कल शिकवतोस ? तुझी कोल्हेकुइ बंद कर अन्यथा मी तुला इग्नोर करीन.

राकु मोड ऑफ.

...

मीच स्वतःला झापले. राकुंचे श्रम वाचवले.

मानव संसाधन विकास मंत्री स्मृति ईरानी ने देश का पवित्र स्थल संसद भवन में कहा कि जेएनयू में महिषासुर दिवस मनाया जाता है, यह देशद्रोही हरकत हैं.

मै माननीया मंत्री महोदया को अवगत कराना चाहता हूँ कि देश के मूलवासी आदिवासी समुदाय गोंड, संथाल, असुर, उरांव, बैगा के आलावा कई दलित-ओबीसी जातियां महिषासुर को अपना पूर्वज मानती हैं. ये लोग हर साल महिषासुर का शहादत दिवस मनाते हैं.

मै माननीय मंत्री महोदया से पूछना चाहता हूँ - क्या ये आदिवासी, दलित-ओबीसी लोग देशद्रोही हैं, जो अपने महानायक का शहादत दिवस मना रहे हैं.

मै माननीया मंत्री महोदया से विनम्र आग्रह करना चाहता हूँ की अपने सोच को संतुलित करें. आप देश के मूलवासियों-आदिवासियों के भावनाओं के साथ खिलवाड़ न करें. आप एक जिम्मेदार पद पर बैठ कर देश के मूलवासियों-आदिवासियों का अपमान कर रहीं हैं, मूलवासियों-आदिवासियों के पूर्वजों-महानायकों का अपमान कर रही है, देश के मूलवासियों-आदिवासियों का अपमान है.

मंत्री महोदया, आपसे निवेदन है कृपया मूलवासियों-आदिवासियों पर मनुवादी विचारधारा न थोपें.

साभार-फेबु

कुलकर्णी,

आजच्या सकाळमध्येही हेच आलेले आहे. राहुल गांधींचा व त्यांच्यामुळे त्यांच्या पक्षाचा काल ऐतिहासिक पोपट झालेला आहे.

खरे तर आपल्याला काय झाप पडेल ह्याची अंधुक कल्पना असल्याने हे युवानेते सभागृहातून पळून गेलेले होते, पण गिरे तो भी टांग उपर ह्या उक्तीनुसार आता म्हणत आहेत की मी बोललो असतो तर भाजपचाच प्रॉब्लेम झाला असता.

संसदेत लिंबूटिंबू चालतात असे दिसून येत आहे. कमाल वाटते काँग्रेससारख्या जुन्या पक्षाची! अजूनही ह्याच घराण्याला नेतेपद देणार का तुम्ही?

.>>>>>> संसदेत लिंबूटिंबू चालतात असे दिसून येत आहे. कमाल वाटते काँग्रेससारख्या जुन्या पक्षाची! अजूनही ह्याच घराण्याला नेतेपद देणार का तुम्ही? <<<<<
अहो नाही हो.... इकडे मायबोलीवरही या "लिंबुटिंबुला' जराही खपवुन घेतले जात नाही..... संसदेत कुठले खपवुन घ्यायला? Wink
इकडे पण सारखे बहुतेकजण या "लिंबुटिंबुला' हाडहूड तरी करतात वा "अनुल्लेख" तरी करतात........ Proud Biggrin

Proud

मै आपना सिर आपके चरणो मे अर्पित कर दुंगी

अरे रिकामे खोके घेऊन काय करायचे आहे. ??? काल संसद मधे कभी सांस भी कभी बहू थी चा एपिसोड रंगलेला प्रश्नांची उत्तरे तर दुर कैच्याकै डायलॉग लिहून दिल्यासारखे बोलत होती. हीला परत सिरीअल करू द्या.

भाजपाचे भक्तांना तर कोणी काहीही बोलले तरी डोक्यावर बसून नाचणारच होते जसे राजेश सध्या नाचत आहे.

तो अनुराग ठाकूर देशभक्तीवर बोलत होता काय विदुषकगिरी होती. हाच अनुराग कालपरवा पर्यंत भारत पाकिस्तान मॅच व्हावी म्हणून पाय घासत प्रयत्न करत होता. तेव्हा याची देशभक्ती पैश्यांच्या थैल्यांमधे भरून ठेवली होती का? याबद्दल धागाकर्ता कधी काही बोलनार नाही कारण भक्तांना भाजपाचे सगळे छान वाटते.

राकु, मला सिरीयसली 'विनोदी प्रक्षोभक भाषण' हा भाग तुम्ही स्मृती इराणीच्या कालच्या डायलॉगबाजीबद्दल लिहिला असाल असं वाटलं होतं.
पण नाही!
Happy

तुम्हाला ते भाषण फारच आवडलेलं दिसतंय.
कमाल आहे.

<<एक प्र्श्न-

अपना सिर कलम कर लेंगी, तो किसी के भी पैर पर कैसे रखेंगी. ?>>
------ सकुरा, आधी पायावर पडणार आणि मग तिथे सिर कापण्याचा कार्यक्रम रन्गवणार... Happy

मानव संसाधन विकास मंत्री स्मृति ईरानी ने काल राज्यसभा मधे एक वाक्य बोलल्या जे त्यांची मध्य कालिन मानसिकता दर्शवनारे आहे

कि अगर आप और आपकी पार्टी के नेता जवाब से संतुंष्ट न हुए तो सिर क़लम करके चरणों में रख दूँगी।

हा ड्रामा आहे का मगर मध्यकालीन मानसिकता आहे ?
ना कोणी आपले सिर मागितले आहे ना आपण सिर कापुन देणार आहात, ना शिर कापुन द्यायला पाहिजे.

भाजपाई आहात तर नाटक ज़रूर करा पण एका आधुनिक भारतीय स्त्रीप्रमाणे तरी करायचे ना कारण आपण देशाच्या मानव संसाधन मंत्री आहात

पुढच्या पिढिने तुमच्या कडुन काय आदर्श घ्यायचा

स्मृति ईरानी रोने-धोने से न्याय नहीं मिलता। रोहित वेमुला के मामले में यह कहना कि हैदराबाद यूनिवर्सिटी के सारे अधिकारी कांग्रेस सरकार में नियुक्त गये थे। यह सरासर जवाबदेही से भागना है और यह कितना टुच्चा और शर्मनाक तर्क है!! आखिर वे अभी भी कांग्रेस के निर्देशों पर तो नहीं चल रहे थे न?? उन्हें चला कौन रहा था?? रोहित को यूनिवर्सिटी से निकालने का फैसला आपकी मर्जी बगैर हो ही नहीं सकता?? शर्मनाक कि आप कांग्रेस के मत्थे मढ़कर अब भी पद पर बनी हुई हैं। एक टैलेंट से भरे, मानवीयता प्रेमी गरीब छात्र की मौत पर आप ऐक्टिंग कर बचने की कोशिश कर रही हैं?? आपको एक मिनट भी सार्वजनिक पद पर बने रहने का हक नहीं और न ही यूनिवर्सिटी के जिम्मेदार अधिकारियों का।

जेव्हा स्वत:च्या चुकीमुळे गोष्ट हातातून निसटून जाते, केलेल्या चुकांवर बोलायला मुद्दे नसतात, सर्वबाजूंनी कोंडी होत असेल तेव्हा भाजपाची नेतेलोक घळाघळा रडायला लागतात
फार आधीपासुनचा इतिहास आहे.

च्यामारी, कापोचेरावांनी दिलेल्या लिंक मधल्या चारसाडेचारशे नावात एकही "मराठी" नाव असु नये? एकही पेठी पुणेरी नाव असू नये? Wink असे का व्हावे बरे? Proud

अगर में गलत हुई तो अपनी गरदन काटकर आपके कदमों में रख दूंगी.. -स्मृति ईरानी
.
मुझे सौ दिन दे दो अगर काला धन वापस न आये तो फांसी दे दो.. - नरेन्द्र मोदी
‪#‎SmritiTurnsTulsi

Atal ji ne kaha tha... Bharat koi bhoomi ka tukda nahi hai.. jeeta jaagta rashtra purush hai... Hum jiyenge toh is Bharat ke liye aur marenge is toh Bharat ke liye.. aur marne ke baad bhi Ganga Jal me behti hui hamari asthiya koi kaan lagake sunega toh ek hi awaz ayegi.. Bharat Mata Ki Jai, HRD Minister Smriti Irani in Parliament
---

हेच ते विनोदी भाषणातला अत्यंत हास्यास्पद वाक्य.
अहो बाई आधी ठरवा भारत माता आहे की जिता जागता राष्ट्र पुरुष आहे ? जेव्हा स्वातंत्र्यप्राप्तीची लढाई चालू होती तेव्हा हे अटल यांनी काय केले होते याची माहीती इराणीबाई कडे नाही आहे असे वाटत आहे. म्हणे अस्थियो को कान लगा के आवाज आयेगी . काय डायलॉग मारला आहे. बस कर पगली रुलायेगी क्या ??

वेळ होती का बोलायची? काल ज्योतिराजे सिंधिया बोलत असताना मोदी पळून गेलेला हे विसरलात का?

>>> असभ्य भाषा, <<<<<
जाऊद्याहो राजेश्वर... माणुस शेवटी शब्द उच्चारतो वा लिहितो ते "दुसर्‍याच्या लायकीप्रमाणे" नव्हे, तर स्वतःच्याच असल्यानसल्या बुद्धीच्या "लायकी प्रमाणे" लिहितो/बोलतो/व्यक्त होतो..... नै का? Proud Biggrin

Pages