साधारणत: सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या माझ्या सारख्या लोकाना आज मागे वळून पहाताना खरेच जाणवते की वाह ! वो दिन भी क्या दिन थे. एकुणातच समाजजीवन संथ अन खुप छान घडी दार होते. फारसे तरंग न उठणारे. शांत. कदाचित माझ्या सारख्या मध्यमवर्गीय आणि निमशहरी भागातील लोकाना तसे जाणवत होते की सगळ्यानाच हा प्रश्न मला राहुन राहून पडतो. नव्वदीच्या जागतिकीकरणामुळे झालेले हे बदल अतिशय झपाट्याने एखादा झंझावात यावा तसे समाजभर पसरले. पण आजचे पुन्हा गो टु रुटस ही जीवनशैली नव्याने उभारताना पाहून मनात असे वाटते हो ते त्या शांत चौकटीतले चौकट भर मनापासून जगणे होईल शक्य? की आमच्या वेळी असे होते हाच सूर मुलांसमोर आळवत बसावे लागेल. पण मनात कुठेतरी मुलांना पण ते जग उलगडून दाखवावे असे वाटते. ते शांत , संथ जगणे, आणि समाधानाने रहाणे म्हणजे काय हे कळावे असे वाटते. अर्थात हे अनुभव फक्त माझे एकटीचे होते की त्या काळातील सगळ्यांचेच हे आपण इथे गप्पा मारुन उजळून काढूया . जमल तर पुन्हा नव्याने तो भवताल तसा करुया. अगदी तसा नाही पण त्यातील चांगले चांगले मोती निवडुन छानसा हार तर गुंफता येईल...कदाचित त्या काळातले जीवन जगता येईल हा आशावाद मनात पालवेल.
सत्तर व ऐंशीच्या दशकातील जीवनशैली
Submitted by स्मिता द on 24 February, 2016 - 04:33
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मग आता आपण या अनुषंगाने चर्चा
मग आता आपण या अनुषंगाने चर्चा करू शकतो , विचार करू शकतो ना.. <<
नाही कारण तुम्ही तुमच्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ असलेल्याच पोस्टी फक्त महत्वाच्या धरून चालल्या आहात.
अनेकांना त्या पटल्याच नाहीयेत हे लक्षात येतंय का?
म्हणजे इतरांनी बोलायचे नाही!!
म्हणजे इतरांनी बोलायचे नाही!! चालू द्यात तुमचे "तेव्हाचेजीवन्कितस्संथनिवांताअणिमस्तहोते" यावर गतकालविव्हलता.
२०१६ चे तंत्रज्ञान वापरून १९७० साल किती छान होते यावर चर्चा करायच्या!!!!
मी गतकालविव्हल हा शब्द काढून
मी गतकालविव्हल हा शब्द काढून चूक केलीजा
आणि अजून एक आज मी जे रिड्युस,
आणि अजून एक आज मी जे रिड्युस, रिसायकल, रियुज हे तंत्र वापरते ते खरच माझ्या लहानपणी सर्रास वापरले जायचे. जसे गरजा अत्यावश्यक त्याच म्हणजे झाले रिड्युस, जुन्या गोष्टी वापरल्या जायच्या जसे मोठ्या बहिण भावांचे कपडे लहानांनी वापरणे, वैगरे करणे हे झाले रियुज आणि काही गोष्टी एकातून दुसर्या प्रकारे वापरले जायचे म्हणजे जुन्या कपड्यांचे पायपुसणे एवंच पर्यावरणस्नेही जीवनशैली सत्तरी आणि ऐंशीच्या दशकात होतीच. होती म्हणजे आपसुक जगले जायचे तसे. आज जाणीवपूर्वक या गोष्टी आपण अंगिकारायचा प्रयत्न करतो. म्हणजेच माझी नाळ त्या दशकाशी जोडली गेली होती , तेव्हा भवताली पाहिलेल्या गोष्टी मला जाणीवपूर्वक बदल करतानाच्या पर्यावरणस्नेही जीवनशैली मध्ये आढळते.
आपली जीवनशैली बद्दल चर्चा
आपली जीवनशैली बद्दल चर्चा खरेतर खूप माहितीपर झाली. अनेक कंगोरे लक्षात आले. अनेक बाबींचा विचारच कधी केला नव्हता ते ही भाग उजेडात आले. आजच्या लाईफ स्टाईल बद्दल कुरकुर नाहीचे कारण काळ बदलतो, काळ येतो अन जातो. काळानुसार विचार बदलतात, सुत्रे बदलतात नक्कीच. आणि कालप्रवाहाचे हेच गमक आहे.
आपण आहे त्या प्रवाहाबरोबर जातोय. पण कधी क्षणभर थांबून विचार केला ना की मग अनेक गतकालातील चांगले भाग ल्क्षात येतात. ज्याच्या कमतरतेमुळे आज आपले आयुष्य जरा विस्कटले आहे. हे विस्कटलेपण असे वेगात लक्षातच येत नाही पण जरा वेग कमी केला की जाणवते. जरा गंभीरपणे थांबुन विचार करायलाच हवा. आजच्या वेगाला घाबरुन उचलेले हे पाऊल नाही किंवा वेगात कुठे कमी पडतोय म्हणुन घाबरुन घेतलेली ही माघार ही नाही.इथे गतकाल विव्हलता तर मुळीच नाही . नवीन कालौघात खूप चांगल्या गोष्टी आल्या परंतु जुन्या उपयुक्त लुप्त झाल्या
आपण वाचनाने निश्चित समृद्ध होतो. मी माझ्या तुटपुंज्या वाचनात आलेल्या अनेक पुस्तकांचा, बाबीचा उल्लेख केला पण खेदाने म्हणावे लागेल त्याकडे कोणी वळालेच नाही. त्यांच्या वाचनात आलेल्या गोष्टी शेअर केल्या नाहीत. तर त्या शेअर कराव्यात.
हा नुसता विचार नाही तर आचरणात आणावे जाणीवपूर्वक ही जाणिव आहे असे मला वाटते. माझा अर्थ काहींना कळाला, काहीच्या लक्षात आला नाही. तिथे मी कमी पडले दोष त्यांचा नाही.आज आधुनिक काळात आपण जगतोय त्यातले अनेक भरीव आणि ठळक गोष्टी आहेत ज्या अत्यंत उपयुक्त आहे. तंत्रज्ञान, विज्ञान तर आवश्यक अन अविभाज्य गोष्टी आहे. पण त्या जोडीला काही गोष्टी ज्या मागच्या काळी म्हणजे ऐंशीच्या दशकात मी लहान असताना माझ्या चिमुकल्या जीवाने अनुभवलेल्या, त्या पुसट झाल्या आहे. कालमहिमा असाच असतो जुने टाकुन पुढे जायचे. पण टाकुन न देताना जे जुने खरोखर उत्तम आहे ते टाकुन न देता पुनरुज्जीवित करावे त्यावरील धुळ झटकावी अन आजच्या जगण्यात ते इन्क्युड करावे ज्याचा फायदा शारिरीक आणि पर्यायाने मानसिक आघाड्यांवर होईल.
आजच्या काळचे दुष्परिणाम आरोग्यावर होताना, समाज मानसिकतेवर होताना पाहून धस्स व्हायला होते .परवाच कुठे तरी व्हाट्सअपायटिस विकार म्हणून वाचले. हे कशाचे द्योतक आहे.सतत मोबाईलवर टाईप करत बसलयाने मज्जारज्जू वर ताण येऊन चक्कर येणे सुरु होते आणि झपाट्याने ह्याचे पेशंट वाढतायेत. त्यामुळे नव्या सुविधांचा अतिरेकी वापर पण टाळायला हवा. सायकल चे उदाहरण घ्या कार मध्ये बसून जिम मध्ये सायकल चालवायला जायचे त्याचे महिना पाच दहा हजार भरायचे वर हे टाळता येऊ शकते. आपण त्या ऐवजी सायकलिंग नाही का करू शकत.
जवळचे आप्त, मित्र मैत्रीणी या जीवनशैलीजन्य आजारांचे बळी पडताना पहातो तेव्हा मग अंतर्मुख होऊन विचार करायला लागते मन. याचा प्रवास सुरू झाला जवळची मैत्रीण कर्करोगाने अतिशय कमी वयात गेली तेव्हा. मग सजगपणे पहाताना अगदी जवळचे नातलग , आप्त या हृदयरोग. ब्लडप्रेशर, कर्करोग य रोगानी त्रस्त आहे. ते ही कमी वयात. मग हे कशाचे द्योतक आहे? बदलेल्या जीवनशैलीचेच ना. ताणतणावात जगताना ब्रेन हॅमरेज होऊन कधी कोसळु हे सागंता येणार नाही अशी भीती मात्र निश्चितपणे जाणवते.
आज माझ्या प्रंबधावर काम करताना बालमानस ही खूप मोठ्या प्रमाणावर बदलेय हे जाणवते, त्यांना खर तर आजच्या भाषेत वाट दाखवायला हवी. बदल आजच्या काळाशी सुसंगत पण घडायला हवे काही बाबतीत हे निश्चित.
अन म्हणुनच मग उत्तम गोष्टी पुन्हा आणू भले आजच्या युगाचा काळाचा झगा घालून आणु पण आणू हा आशावाद आहे मनात. त्यासाठी हा प्रपंच. असो पुनश्च आभार आणि या विचारांवर मंथन होण्याची अपेक्षा.
ज्या काळात आपले लहानपण होते
ज्या काळात आपले लहानपण होते तेंव्हा वयामुळे निश्चितच ताणतणाव कमी होते. आताच्या काळात नव्या सुविधांचा अतिरेकी वापर पण टाळायला हवा याबद्द्ल अनुमोदन.
नोकरी बद्द्ल म्ह्णायचे झाले तर जुन्या काळी बायका मोस्टली एकच नोकरी रिटायरमेंट पर्यंत करत त्यातही भरपूर सुट्या, कामाच्या अनुभवाने बढत्या, नवीन नवीन तंत्रज्ञान शिकायला न लागणे इत्यादी असल्यामुळे नोकरी अधिक सोपी होती. आता नुसतीच नोकरी नाही तर करिअर म्हणून जॉब केला जातो. नोकरी बदलामुळे नवीन ठिकाणी जुळवून घेणे, दर सहा महिन्यानी अॅप्रेजल, प्रमोशन्स साठी एक्स्ट्रा माइल जाणे, कधीही कामावरुन कमी करण्याची शक्यता यांमुळे ताण येतोच. पण म्ह्णून नोकरी सोडणे किंवा आजच्या काळातले सगळे नवीन तंत्रज्ञान वापरणे सोडून देणे म्ह्णजे अर्जुनासारखे शस्त्र टाकुन वनवासाला जाण्याची भाषा करण्यासारखे आहे. गीता आपल्याला उत्तम कर्म करायला सांगतेच. कितीही दगदगीचा जॉब असला तरी ध्यान आणि व्यायामाला वेळ काढला पाहिजे, त्यामुळे मानसिक शांतीचा अनुभव यायला सुरुवात होते. तुमचे मोबाइल्/टीव्ही यांचा वेळ कमी करणे, न लागणारी क्लटर कमी करणे, सायकल वापरणे हे प्रयोग आवडले. लहान मुलांचाही स्क्रीन टाइम कमी करुन मैदानी खेळ, पुस्तक वाचणे हे केले पाहिजे. आत्ता सुबत्तेमुळे सगळीकडे सगळं प्लेंटी झाल्यामुळे निसर्गापासुन दूर अशी जीवनशैली झाली आहे. दिव्यांच्या लखलखाटामुळे तारे दिसणे मुश्कील झालंय. त्यासाठी तंत्रज्ञान अजुन प्रगत होउन नैसर्गिक उर्जेचा अधिक वापर, खेडी प्रगत करणे, लोकसंख्या कमी करणे इत्यादी उपाय दिसतात.
संपूर्ण धागा आणि त्यावरील
संपूर्ण धागा आणि त्यावरील प्रतिसाद वाचले. धाग्याचा मुख्य उद्देश्य समजला मगच त्यावर माझे काही अनुभव आणि मत लिहावे म्हटले!
पारु यांच्या मताशी बराचसा सहमत!
कालानुरुप बदल होत जातात आणि ते बदल अपरिहार्य आणि आवश्यकही आहेत! पण हे बदल स्विकारत असताना काय स्विकारायला हवे आणि काय नको ह्याचे भान ठेवणेही आवश्यक! जुने ते सोने म्हणून भंगार साठविणे जेवढे अडचणीचे तेवढेच नविन आहे म्हणून कचकडे प्लास्टीकलाही भुलणे धोकादायक.
वरच्या एक प्रतिसाद सायकलचे उदाहरण वाचले... ''कार घेऊन जीम मध्ये सायकल चालवायला जाणे''.
मी रोह्याला असतान कंपनी ते घर एक दिड किमी अंतर. आधी सायकलवर जायचो बाईक घेतल्यावर मग ते १ किमी सायकल चालवणेही त्रास दायक वाटू लागले. ही लागलेली वाईट सवय आजही फर्लांगभर अंतरासाठी गाडी काढायची इच्छा होते ती ह्या सवयी मुळेच. आमचे वडील जे शेवटपर्यंत पायी चालणे आणि सायकल ह्यांचा वापर करीत होते. ते कुठल्याही शारिरिक व्याधी शिवाय ९० वर्ष होते...
त्यातील जे चांगले होते त्यांचे त्याचा अंगिकार करायचा हा निर्धार मी वडील गेले तेंव्हा केला. त्यामुळे वयाच्या ऐन पस्तिशीत सुरु झालेला रक्तदाब आज आटोक्यात ठेवू शकतोय जो नव्या काळातील सवयींनी माझ्यावर लादलेला.
आज आपण पाहतो सगळी कडे ऑरगॅनिक शेती त्याची उत्पादने ह्यावर भर दिला जाऊ लागलाय. रासायनिक खते, किटकनाशके ह्यामुळे पिके सुधारली पण पर्यावरण आणि मानवी जीवन ह्यावर त्याचे दूरगामी परिणाम आता जाणवू लागलेत. आणि मग आपण डोळे उघडले. तेंव्हा आताच्या काळातील जरी काही आकर्षक छान वाटणा-या बाबी असतील त्यांच्या दूरगामी परिणामचा विचार करणे आवश्यक आहे.
पण आज कुठे तरी ती बातमी पटली. तेंव्हा डोळ्याला चष्मा ही व्याधी समजली जायची आज फॅशन.. ५० % तरी १५ वर्षे वयाच्या आतील मुलांना चष्मे असतील... जे वाटते ते संगितले.
मला आठवतयं आमच्या कडे एक जुना दिवाळी अंक एकदा मला सापडला होता साधारण ७० च्या आसपासचा त्यात एक लेख होता ’ सावधान टी व्ही येतोय” मग त्यात टी व्ही पहताना घ्यायची काळजी वैगेरे होते. अर्थात आमच्या घरात टीव्ही याययला त्या नंतर १५ वर्षे जावे लगली.
मायबोलीवरच बघा ना सायकल चालविण्याचे धागे पारंपारीक पाककलेच्या रेसिपीज किती येतायेत. फास्ट फूड, जंक फ़ूड, प्रक्रिया केलेले अन्न घटक ह्या पासून आपण पुन्हा दूर जाण्याचा प्रयत्न करतोय जी नविन काळची पुन्हा गरज झालिये.
काळ झपाटाण्याने बदलत असताना जीवनाला गती येणे समजू शकते पण ती गती धारण करीत असताना होणारर्या दुष्परिणामाची काळजी घेणे आवश्यक वाटते.
का्माच्या ठिकाणी आपण मोठ्या मेहनतीने आपण तास न तास विचार मंथन आणि चर्चा करुन ’रिस्क असेसमेण्ट’ नावचा प्रकार करतो मग व्यक्तिगत जीवनात का नको? कुठलीही गोष्ट अंगिकारताना त्याच्या बर्यावाईटाचा विचार नक्कीच व्हायला हवा.
आधुनिक काळातील बाबी आवश्यक तेवढ्या आणि आवश्यक तिथे वापरावे जुन्या गोष्टीही तश्याच पुढे सुरु ठेवावे आणि काळाच्या ओघात लुप्त होऊ पहणार्या जर काही चांगल्या गोष्टी असतील तर त्यचे पुनरुत्थापन करावे असे माझे व्यक्तीगत मत.
आणि मला वाटते ह्यावर नुसती मते मांडण्यापेक्षा आपण काय काय करु शकू ह्याविषयी उहापोह होणे गरजेचे वाटते.
धन्यवाद पारू... तुम्ही
धन्यवाद पारू...
तुम्ही धाग्याचा उद्देश अगदी मस्त थोड्या शब्दात मांडला.
कितीही दगदगीचा जॉब असला तरी ध्यान आणि व्यायामाला वेळ काढला पाहिजे, त्यामुळे मानसिक शांतीचा अनुभव यायला सुरुवात होते>>>>>> या गोष्टीशी मी अगदी १००% सहमत. ध्यान आनि व्यायाम या दोन गोष्टी या ताणतणावासाठी आपल्याला स्वस्थ्य ठेवू शकतात. आणि वेळ तुलनेने फार नाही लागत थोडासाच लागतो पण आवर्जून काढायला हवाच. ध्यानाला किती वेळ लागतो फार तर अर्धातास..पण तो काळ मला माझ्या मानसिक शांततेसाठी अतिशय उपयुक्त ठरतो. मानसिक शांतता मग आपोआप शारिरीक स्वास्थ पण देतेच.
आता दुसरे तुम्ही म्हणता
>>>>लहान मुलांचाही स्क्रीन टाइम कमी करुन मैदानी खेळ, पुस्तक वाचणे हे केले पाहिजे. आत्ता सुबत्तेमुळे सगळीकडे सगळं प्लेंटी झाल्यामुळे निसर्गापासुन दूर अशी जीवनशैली झाली आहे. दिव्यांच्या लखलखाटामुळे तारे दिसणे मुश्कील झालंय. त्यासाठी तंत्रज्ञान अजुन प्रगत होउन नैसर्गिक उर्जेचा अधिक वापर, खेडी प्रगत करणे, लोकसंख्या कमी करणे इत्यादी उपाय दिसतात>>>> हो नक्कीच. मुलांसाठी या गोष्टी करायलाच हव्यात. कारण त्याचे भयावह परिणाम आत्ताच जाणवायला लागले आहेत. निसर्गापासून दूर जीवनशैली नकोच उलट निसर्ग पूरक जीवन शैली हवी. त्याची गरज आज मोठ्या प्रमाणावर निर्माण झालीये. नैसर्गिक उर्जेचा वापर व्हायलाच हवा. आपण तो कसा करू शकतो यावर उहापोह व्हायला हवा.
कोणी याबाबत अभ्यासू असेल तर त्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे . निदान या माध्यमातुन तरी आपण मुठभर लोक त्यावर विचार करतील अन काही तरी योग्य फलित येईल.
धन्यवाद कृष्णा.. खूपच
धन्यवाद कृष्णा..:) खूपच मार्गदर्शक प्रतिसाद.
कालानुरुप बदल होत जातात आणि ते बदल अपरिहार्य आणि आवश्यकही आहेत! पण हे बदल स्विकारत असताना काय स्विकारायला हवे आणि काय नको ह्याचे भान ठेवणेही आवश्यक! जुने ते सोने म्हणून भंगार साठविणे जेवढे अडचणीचे तेवढेच नविन आहे म्हणून कचकडे प्लास्टीक्लाही भुलणे धोकादायक.>>>>>>> हा मुद्दा म्हणजे या धाग्याचे झिस्ट म्हणता येईल.
आज आपण पाहतो सगळी कडे ऑरगॅनिक शेती त्याची उत्पादने ह्यावर भर दिला जाऊ लागलाय. रासायनिक खते, किटकनाशके ह्यामुळे पिके सुधारली पण पर्यावरण आणि मानवी जीवन ह्यावर त्याचे दूरगामी परिणाम आता जाणवू लागलेत. आणि मग आपण डोळे उघडले. तेंव्हा आताच्या काळातील जरी काही आकर्षक छान वाटणा-या बाबी असतील त्यांच्या दूरगामी परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे>>>>>>>> अगदी अगदी..आज सेंद्रिय रशेतीकडे लोक वळायला लागले. त्यात झिरो बजेट शेतीचा ही अंगीकार लोक करायला लागलेत. ही गोष्ट स्वागतार्ह आहेच. उलट जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा बदल गेला पाहिजे. त्यासाठी मोठी फळी तयार झाली पाहिजे. निव्वळ रडत बसुण आणि काळजी करण्य पेक्षा यावर हे नवे पर्याय स्विकारले गेले पाहिजे अन त्या बदलांचे संवहन व संवर्धन झाले पाहिजे.
काळ झपाट्याने बदलत असताना जीवनाला गती येणे समजू शकते पण ती गती धारण करीत असताना होणार्या दुष्परिणामाचा काळजी घेणे आवश्यक वाटते.
का्माच्या ठिकाणी आपण मोठ्या मेहनतीने आपण तास न तास विचार मंथन आणि चर्चा करुन ’रिस्क असेसमेण्ट’ नावचा प्रकार करतो मग व्यक्तिगत जीवनात का नको? कुठलीही गोष्ट अंगिकारताना त्याच्या बर्यावाईटाचा विचार नक्कीच व्हायला हवा.>>>>>>>> यु सेड इट..मग आता आपण रिस्क असेसमेंट कशी करू शकतो रोजच्या जीवनात यावर खरेतर विचार यायला हवेत. बर्यावाईटाचा विचार व्हायलाच हवा. आजची महत्वाची गरज आहे ती.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे >>>> कोणी याबाबत अभ्यासू असेल तर त्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे . निदान या माध्यमातुन तरी आपण मुठभर लोक त्यावर विचार करतील अन काही तरी योग्य फलित येईल.....>>>>> मार्गदर्शनाच्या अपेक्षेत आहेच. धन्यवाद
. आणि अजुन एक या गोष्टीवर अनेक मायबोलीकर निश्चितच अभ्यासू आणि मार्गदर्शक आहेत त्यांना ही विनंती आहे
आता मी एक धागा वाचला ताणतणावा
आता मी एक धागा वाचला ताणतणावा संबंधी...
जीवनशैलीचा हा फार मोठा अन महत्वाचा भाग आहे. आज आपण ताणतणावातून जातोय सगळ्याच. या धाग्यावर त्याचे व्यवस्थापन कसे करता येईल असे बरेच छान प्रतिसाद येतायेत http://www.maayboli.com/node/57905
मला वाटते आज आपण जेव्हा जीवनशैली रिसेट करुयात का असा विचार करतो तेव्हा ताण तणावाचे व्यवस्थापन त्यातील महत्वाचा भाग असेल. जीवनशैलीची चौकट करताना आहार आणि विहार याबाबतीत पण विचार करायला हवा तसाच ताण तणावाचे व्यवस्थापन याबाबत ही.
अजून खूप शेअर करता येईल.
....स्सॉरी डबल पोस्ट!
....स्सॉरी डबल पोस्ट!
काल रविवार ६ मार्च२०१६
काल रविवार ६ मार्च२०१६ लोकसत्ताच्या रविवार वृतांत मध्ये एक लेख आहे, " आपल्या जगण्यातून भाषाच हरवतेय.." त्यात भारतीय संगीताच्या सुवर्णाकाळा विषयी विचार मांडलेले आहेत. त्यात जावेद अखतरांचे म्हणणे अधोरेखीत केले आहे ते म्हणतात" ऐंशीनंतरच्या चित्रपट संगीतात बीभत्सपणा, अश्लील सब्दांनी ठाण मांडले.जे आचार-विचार आर्थिक स्थैर्यबाबत सक्षम होते त्यांनी आपली भाषाच महत्वाची मानली नाही. अपवाद सगळ्याच परिस्थीत असतात. मात्र भाषेचे, साहित्याची जोपासना नेहमी मध्यमवर्गाकडूनच होत असते. आणि या समाजानेच भाषेचे बोट सोडुण दिल्याने शब्द, विचांरांच्या बाबतीत असलेली श्रीमंती आपण घालवून बसलो. त्याचेच प्रतिबिंब तेव्हाच्या चित्रपटांमधून, गाण्यांमधून उमटले. म्हणूनच चित्रपटांच्या बाबतेत हा काळ वाईटच होता"
म्हणजे एकुणच एंशी नम्तरचे आपले समाज्जीवन ढवळत राहिले. काई अगदी चांगले बदल घडत गेले पण त्या प्रवाहात काहीअमूय्ल्य गोष्टी पण आपण मागे सोडल्या. ज्या गोष्टी चाम्गल्या होत्या त्या निश्चितच पुअरुज्जीवित करायला हव्या असे प्रकर्षाने वाटते.
१९९० नन्तरच्या काळात
१९९० नन्तरच्या काळात मानसिकतेमधे अमूलाग्र बदल झालेले मला दिसतात
१. "साध्या" पेक्शा साधनान्चे महत्व वाढले. आणी आपल्या जीवनावर पाश्चिमात्य आक्रमण झाले उदाहरणार्थ
सन्गीतातले नैसर्गिक किन्वा पारम्पारिक वाद्यान्चे उच्चाटन होउन(सतार , सारन्गी,बासरी, violin इ. ) electronic आवाजान्चे तन्त्रप्रवीण सन्गीत आले. तेही पाश्चिमात्य सन्गीताच्या प्रभावा खाली ! उच्च्प्रतीच्या sound systems घरो घरी आल्या पण "सन्गीत" "गोन्गाटले"
तीच गत आपल्या खाण्या-पिण्याच्या आवडी न्ची झाली. पदार्थ बनवण्यान्च्या उपकरणानी स्वयम्पाकघरे भरली आणी पाष्चिमात्य पदार्थानी आपला आहार व्यापला.
मला तर हे सगळ्या क्षेत्रात झाले आहे असे वटते. त्या सन्दर्भात जुन्याचे वेड असणे स्वाभाविक आहे. या गोश्टीन्साठी मागच्या काळात रमले तर वावगे नाही पण नवीन सन्गीत सरसकट निक्रुश्ट आहे हे म्हणणे चुकी चेच आहे. त्याचाही आनन्द घेतलाच पाहिजे. नाहितर नुकसान आपले आहे.
२. नव्या जीवनपध्ध्तीत काही नव्या उपकरणाना आणी व्यवस्थेला पर्याय नाही उदा. mobile phone ; motorbyke / car ; त्याला तुम्ही सायकल किन्वा पत्र हा पर्याय ठेउ शकत नाही त्यामुळे हा दुराग्रह टाळावाच लागेल. त्यान्ची उप युक्तता वादातीतच आहे.
३. दोन पिढ्यान्मधले अन्तर वाढले. त्याचे कारण नवी पिढीला आधीच्या पिढिकडुन कुठ्ल्याच गोश्टीन्ची आवश्यकता राहिली नाही. पालकानीच सर्व सुखे(उपकरणे आणी सुखसाधने) मुलाना उपलब्ध करून दिली ; त्याना उच्चशि क्षित केले. मुले खरोखरच हुशार झाली.
पण नव्या जीवनशैलीत आणी समाजव्यवस्थेत "अनुभवाच्या बोलान्ची" गरजच सम्पली.
समस्या नव्या जीवनपध्ध्तीशी निगडीत असल्यामुळे त्यावरची solutions आधीच्या पिढीच्या अनुभवात सापडणार नाहित. त्यामुळे नवी पिढी समस्या सोडवण्यासठी आत्मनिर्भर झाली.त्यान्च्यात दुरावा आला तो इथे.
हा दुरावा आताच्या माध्यमातून सान्धण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या सन्दर्भात आजी आजोबा नातवन्डान्बरोबर पटकन जमवून घेतात असा माझा अनुभव आहे . मधली पिढीच ना इकडची ना तिकडची अशा स्थितीत फसली आहे. हीच sandwich पिढी.
त्यामुळे ही पिढी उगाचच nostalgia मधे जास्त रमू पाहते आहे.
नव्या माध्यमातून जुन्या आणी नव्या उत्तम गोष्टीन्चा आनन्द घेणे हे महत्वाचे.
पशुपती धन्यवाद .. नवी पिढी
पशुपती धन्यवाद ..:)
नवी पिढी समस्या सोडवण्यासाठी आत्मनिर्भर झाली.त्याच्यातच दुरावा आला तो इथे.
हा दुरावा आताच्या माध्यमातून सांधण्याच्या प्रयत्न केला पाहिजे. या सन्दर्भात आजी आजोबा नातवन्डान्बरोबर पटकन जमवून घेतात असा माझा अनुभव आहे . मधली पिढीच ना इकडची ना तिकडची अशा स्थितीत फसली आहे. हीच sandwich पिढी.>>>>> अगदी पटले तुमचे. खरय तुमचे..मधली पिढी
असो या धाग्यावर खूप जणांनी आपली मते मांडली..आणि खरोखर ती अतिशय उपयुक्त आणि समर्पक होती. जो सतत गोंधळ मनात..काय चांगले आणि काय वाईट या गोष्टी आता जास्त सजगपणे पहाता येतील. गोंधळाचा, धुक्याचा पडदा मिटला..
पुनश्च धन्यवाद सगळ्यांनी मनापासून...:)
आता नव्या जीवनशैलीची बैठक बसवताना फार गोंधळ उडणार नाही..:)
https://www.facebook.com/dsur
https://www.facebook.com/dsuryvanshi/videos/964475236923508/
अरे मस्त.... मी किती मिसलंय
अरे मस्त.... मी किती मिसलंय हे .... सगळ्यांचे विचार अनुभव ह्यांच्यशी सहमत, स्मिता एक नंबर
मंदार, पल्ली धन्यवाद पलले
मंदार, पल्ली धन्यवाद
पलले किती दिवसांनी दर्शन.... तुझी प्रतिक्रिया मिस करत होते...,:) लिही आणि तू ही यावर
७०/८० च्या दशकात जर तुम्ही
७०/८० च्या दशकात जर तुम्ही शाळेत किंवा महाविद्यालयात असाल तर तेव्हाच आयुष्य तुम्हाला आत्ताच्या तुलनेत stress free वाटणारच. त्याचा काळाशी, gadgets शी संबंध का बरं जोडावा? लहान असल्याने तेव्हाच्या काळातले stresses आपल्याला जाणवले नाहीत. पण आपल्या आई-बाबांना ते जाणवले असणार आणि त्यांना त्यांच्या लहानपणीचा काळ (४०/५० चं दशक) जास्त सुखाचा वाटला असेल.
सोहा प्रथम धन्यवाद.. मी 70
सोहा प्रथम धन्यवाद.. मी 70 च्या दशकात शाळेत नव्हतेच , कदाचित 80 च्या दशकात शाळेत जायला सुरुवात केली. असो तो भाग वेगळाच..तुमचा म्हणणं रास्तच आहे... पण मी ऐकलंय वाचलंय आणि आता अनुभवतेय ,.... आणि जाणवते आज आपण कुठल्या न कुठल्या प्रकारे स्ट्रेस खाली आहोत, एक भीती सगळ्यांच्या मनात असते प्रचंड तणावाचे आयुष्य आज बहुसंशयाचे झालय....
मला काय म्हणायचंय यात प्रचंड गोंधळ होतोय कदाचित मी स्वतः ते नीट मांडू शकले नसेल माझा राग गेजगेत वर नाही किंवा आज विनाकारण तरुण पिढी इतकी आहारी गेलीये की उपयोग आणि गरज यातील सीमारेषा ओलांडून चैन किंवा मौज या प्रकाराकडे गेलीये... आपण सगळेच,... मी ही त्यात आलेच... या वेगात आपण मासिक पातळीवर अस्थिरता अनुभवतोय हे जाणवतेय आणि मग सजग पाने विचार केला तर हा या वेगाचा परिणाम आहे हे कळाले, मग काय करावे लागेल , किंवा आपल्या आई बाबाच्या पिढीत हे ताण तुलनेने कमी होते.
मी स्वतः इंजिनियर आहे , नवीन टेक्नॉलॉजीचा भाग आहे. त्यामुळे मी कुरकुरणाऱ्या लोकांसारखी पक्त कुर कुर करत नाही तर जाणवले ते आपण योग्य तर्हेने वापरायला हवे.
कुठेतरी सुवर्ण मध्य करायला हवा,. जसे नाशिक मध्ये काही कुटुंब दिवसातले रात्री अर्धाता वीज बंद ठेवतात पण वीज वाचता बरोबर मुले खेळणे एकत्र येऊन गप्पा मारणे हे ही फायदे होतात तर आपण सगळ्यांनी आता असा विचार करायला हवा,.
खूप काही लिहायचे होते अजून पण
खूप काही लिहायचे होते अजून पण कमी वेळ होता हाताशी त्यामुळे राहून गेले
आपण सत्तरीत जगायचे तिच जीवनशैली योग्य असे म्हणण्याचा माझा सूर नाही,.. फक्त ज्यावेळेस जे काही खरेच योग्य होते त्याचे पुनरुज्जीवन करायला हवे ना. फक्त काळा आणि पांढरा या दोनच छटा नसतात ,. एका चांगले आहे म्हणजे दुसरे वाईट असे नाही,. जे योग्य होते आणि आपल्या हवामान ,आपले वातावरण त्याच प्रमाणे मानसिक शांतता, स्थैर्य यासाठी आवश्यक आज ते आपण आजचा मुलामा देऊन का होईना पण नव्याने अंमलात आणावयास हवे ही प्रामाणिक इच्छा इतकेच,. ही सोशल नेटवर्किंग साईट आहे त्यामुळे यात अजून खूप काही भर घालणारी मंडळी आपले विचार मांडतील या हेतू ने लिहिले,.खूप जणांनी फार छान विचार मांडले सगळ्यांना धन्यवाद
तरीही केवळ विचार नको तर कृती हवी असे वाटते, जीवनशैलीची ही चळवळ व्हावी, आपण त्या दृष्टीने प्रयत्न करूयात, हा मोठा प्लॅटफॉर्म आहे तर तो जोमाने वृध्दिंगत व्हावा.
आज लोकसत्तेत दूरदर्शनच्या
आज लोकसत्तेत दूरदर्शनच्या जुन्या मालिकांना उजाळा दिलाय.
http://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1302729/as-doordars...
अर्थात या मालिका ऐंशीच्या दशकातल्या नसून बहुतांश नव्वदच्या दशकातील आहेत. ऐंशीच्या दशकात दूरदर्शनचं वेळापत्रक कुणाला आठवतंय का?
माझ्या आठवणीप्रमाणे सायंकाळी
साडेपाचला - ज्ञानदीप
सहाला - किलबिल
सातला - आमची माती आमची माणसं
साडेसातला - बातम्या (मराठी)
७:४० ते ८:१० : मराठी कार्यक्रम / मालिका
८:१० ते ८:४० : मराठी कार्यक्रम / मालिका
८:४० ते ९:०० : बातम्या (हिंदी)
९:०० ते ९:३० : हिंदी मालिका
९:३० ते ९:५० : बातम्या (इंग्रजी)
९:५० ते १०:२० : कार्यक्रम / मालिका (हिंदी / इंग्रजी)
१०:२० ते ११:०० : कार्यक्रम / मालिका (हिंदी / इंग्रजी)
११:०० ते ११:३० : नृत्य का / संगीत अखिल भारतीय कार्यक्रम
रात्री ९ ला हमलोग, बुनियाद, खानदान, चुनौती, मिस्टर अँड मिसेस, अपने पराये, पंखोंसे पंजो तक, नकाब अशा हिंदी मालिका तर रात्री ९:५० किंवा १०:२० ला धीरजकुमारची अदालत किंवा पंकज कपूरची करमचंद या रहस्यमय मालिका, द वर्ल्ड दिस वीक (बहुदा प्रणव रॉय), करंट अफेअर्स, फोकस असे इंग्रजी कार्यक्रम आणि एक विनोदी इंग्रजी मालिका (नाव आठवत नाही) पाहिल्याचे स्मरते. रविवारी दिवसा अनेक कार्यक्रम / मालिका असत पण त्यावेळी मला नेमकी गुरुवारी सुटी असल्याने पाहता येत नसत.
अगदी अगदी , जरा वेळा साठी
अगदी अगदी , जरा वेळा साठी त्या सगळ्या मालिका तरळून गेल्या,... आज 24x7 रतीब घालणाऱ्या मालिकां पेक्षा तेव्हा टीव्ही सुखावह होता नक्कीच, ...:)
अर्थात हे माझे मत , नाहीतर लगेच काय हे करून धावून यायचे लोक
@बिपीन चन्द्र, आपण ऐंशीच्या
@बिपीन चन्द्र, आपण ऐंशीच्या दशकातलं दूरदर्शनचं वेळापत्रक अगदी व्यवस्थित दिलंय. आवडलं. तुमच्या स्मरणशक्तीचं कौतुक वाटतंय. छान!
शनिवारी दुपारी बारा ते दोन
शनिवारी दुपारी बारा ते दोन च्या आसपास परदेशी चित्रपट लागायचे दुरदर्शनला किंवा डीडी मेट्रोला बहुतेक.
एखादं दुसरा जापनीज व युरोपिअन चित्रपट आठवतोय.
कुणाला अजून काही जास्त माहिती?
स्मिता, सचिन - तेव्हा ती
स्मिता, सचिन - तेव्हा ती एकमेव करमणूक होती. अगदी आतुरतेने वाट पाह्यली जायची या कार्यक्रमांची.
फिल्मी - मेट्रो चॅनेल ९० च्या दशकातलं, सत्तर व ऐंशीत नव्हतं.
ओह. सॉरी. धन्यवाद चूक लक्षात
ओह. सॉरी.
धन्यवाद चूक लक्षात आणून दिल्याबद्दल.
छान होते ते दूरदर्शनचे दिवस.
छान होते ते दूरदर्शनचे दिवस. रविवारी दुपारी प्रादेशिक चित्रपट पण आवडीने बघायचो. भाषा कळली नाही तरी. साउथचे चांगले असायचे काही. रागिणी, सुहासिनी, मामुंटी, मोहनलाल हे सर्व ओळखीचे झाले तेव्हा.
किलबिल, सांता कुकडी, बालचित्रवाणी ते ओल्ड फॉक्स, शेरलॉक होम्स सगळं बघायचो घरी टीव्ही आला तेव्हा. दुसरीकडे विशीष्ट प्रोग्रॅम बघायचो फक्त.
ज्ञानदिप - आकाशानंद किलबिल-
ज्ञानदिप - आकाशानंद
किलबिल- नाईक
आमची माती, आमची माणसं - मावा आणि तुडतुडे यावर उपाय
बातम्या - भक्ती बर्वे, प्रदीप भिडे
समाचार - सरीन, सलमा सुलतान
एक विनोदी इंग्रजी मालिका (नाव आठवत नाही) पाहिल्याचे स्मरते. >>>> Here's lucy तर नव्हे?
I Love Lucy ... You Tube वर
I Love Lucy ... You Tube वर उपलब्ध आहे.
आपण याना पाहिलेत का? हा पण चांगला कार्यक्रम होता.
एक फिल्म डिव्हिजनची फिल्म
एक फिल्म डिव्हिजनची फिल्म लागायची ज्यात एक संवाद होता " .... ह्या भाज्या कच्च्या खा" फार आवडायचं ऐकायला.
Pages