साधारणत: सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या माझ्या सारख्या लोकाना आज मागे वळून पहाताना खरेच जाणवते की वाह ! वो दिन भी क्या दिन थे. एकुणातच समाजजीवन संथ अन खुप छान घडी दार होते. फारसे तरंग न उठणारे. शांत. कदाचित माझ्या सारख्या मध्यमवर्गीय आणि निमशहरी भागातील लोकाना तसे जाणवत होते की सगळ्यानाच हा प्रश्न मला राहुन राहून पडतो. नव्वदीच्या जागतिकीकरणामुळे झालेले हे बदल अतिशय झपाट्याने एखादा झंझावात यावा तसे समाजभर पसरले. पण आजचे पुन्हा गो टु रुटस ही जीवनशैली नव्याने उभारताना पाहून मनात असे वाटते हो ते त्या शांत चौकटीतले चौकट भर मनापासून जगणे होईल शक्य? की आमच्या वेळी असे होते हाच सूर मुलांसमोर आळवत बसावे लागेल. पण मनात कुठेतरी मुलांना पण ते जग उलगडून दाखवावे असे वाटते. ते शांत , संथ जगणे, आणि समाधानाने रहाणे म्हणजे काय हे कळावे असे वाटते. अर्थात हे अनुभव फक्त माझे एकटीचे होते की त्या काळातील सगळ्यांचेच हे आपण इथे गप्पा मारुन उजळून काढूया . जमल तर पुन्हा नव्याने तो भवताल तसा करुया. अगदी तसा नाही पण त्यातील चांगले चांगले मोती निवडुन छानसा हार तर गुंफता येईल...कदाचित त्या काळातले जीवन जगता येईल हा आशावाद मनात पालवेल.
सत्तर व ऐंशीच्या दशकातील जीवनशैली
Submitted by स्मिता द on 24 February, 2016 - 04:33
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्मिता, मला जे म्हणायचं होतं
स्मिता, मला जे म्हणायचं होतं ते इथे इतरांनी म्हंटलेलंच आहे, वेगळे मुद्दे नसल्यामुळे परत परत तेच लिहीण्यात काहीच अर्थ नाही.
धन्यवाद रेव्यु , दिनेशदा,
धन्यवाद रेव्यु , दिनेशदा, लिन्बू, अमा
आता हे सर्वच फार तीव्र झालेय. फेब्रुवारीपासूनच उन्हाळा जाण्वतोय. पाऊस वेळेवर पडेल ना, अशी शंका आतापासूनच वाटायला लागलीय.आता जेवढ्या प्रमाणात प्लॅस्टीक वापरले जाते, तेवढ्या प्रमाणात वापरले जात नव्हते. कचराही कमी होता.>>> दिनेश दा अगदी अगदी
साधी अन विद्वान माण्से आता दिसत नाहीत, अनुभवता येत नाहीत.
रॅट रेस नव्हती असे नाही पण वेग कमी होता. आर्थिक आणि मटेरियलिस्टिक अपेक्षा फ्रिज्,स्कूटर पर्यंत मर्यादित होता, मोठे घर्/फ्लॅट म्हण्जे ८०० स्क्वे फूटापलिकडे नसायचा.
सभोवताली निओ रिच फारसे नव्हतेअन असले तरी त्यांच्या लाऊड वर्तनाने ते इतरांवर स्वतःस लादायचे नाहीत वा जाचक ठरत नसत.
तंत्र ज्ञानावर फारसे अवलंबून नहतो त्या मुळे कम्युनिकेशन मध्ये झालेल्या दिरंगाईने तणाव येत नसे. सुवाच्य अक्षर इ. कौतुकाच्या गोष्टी होत्या.
थोर गायक ,लेखक वगैरे आपल्या सारखेच होते.
वेग ... जीवघेणा वेग अन आकांक्षांनी घायाळ केले नव्हते>>>> रेव्यु अगदी मनातले बोललात. हाच भाग मला सतत जाणवतो अन टोचतो सुध्दा मग मनाला प्रश्न पडतो काय मिळवले आपण. आज सगळे तंत्रज्ञान आहे. सुखे पायाशी लोळतायेत, कमतरता हा शब्द फारसा ठावूक नाही मग आता कमतरता कशाची आहे. कमतरता वाटतेय ती विचाराची, तत्त्वांची, काही कशाची बान्धिल असण्याची. रसिकतेने निवाण्तपणे जगण्याची
>> हे प्रिमाइसच चुकीचे आहे. तुम्हाला सामाजिक बदल घडवून जे तुमच्या नजरेतून सुखाचे ते परत आणायचे आहे का? तर आता असे आहे कि टु इच हिज्/हर ओन. व्हॉटेवर रॉक्स युअर बोट. जे तुम्हाला सुखाचे वाट्ते ते तुम्ही करा पण ते दुसर्यावर लादणे आता अवघड आहे. तुम्ही वैयक्तिक पॅकेज डिझाइन करून तसे जगू शकता व सुखी राहू शकता. >>>>> अमा तुमचे बरोबर आहेच. कारण हल्ली ही मानसिकताच झालीये आणि ती चूकीची आहे हे मी म्हणत नाही, माझे मत कोणवर लादणे किंवा जबरदस्ती करणे हे नाही. हा एक विचार आहे माझा. असो
दुसरी गोष्ट गो विथ द फ्लो असे बोधिसत्वाने सांगितले आहे( स्पीकिन्ग ट्री. ) तर तोच आमचा फंडा आहे. जुने परत आणता येत नाही.वेळ वाया घालवू नये.>>>>>> सल्ल्यासाठी धन्यवाद. पण मला कायम प्रवाहाबरोबर जाणे जमलेच नाही. तो माझा प्रॉब्लेम आहे. मी प्रवाहा बरोबर जाणार्याना पाठी फिरा हा सल्लाही देत नाही. मी माझे वैयक्तिक पॅकेज डिझाइन केलेले आहेच. पण तरीही इतर कोणाला त्यात अजून काही भर घालता येईल का त्यासाठी समविचारी लोकांशी बोलावे अधिक जाणुन घ्यावे असे वाटते. तुमच्या उत्तरा बद्दल धन्यवाद.
>>>>> आनंदात अडॉप्ट जालो
>>>>> आनंदात अडॉप्ट जालो <<<<<<
तेच ते... अहो तेव्हा काय आपल्याला कॉम्प्युटारची "अक्कल" आभाळातुन मिळाली होती का? अहो आमच्यातल्या असंख्यांना तर टायपिंगही येत नसायचे, एकेका बोटाने की बोर्ड टोचत बसायचे.... तरी ते समजुन घेत नोकरी जायची टांगति तलवार ठेवुन पण न घाबरता शिकत गेले, कित्येक त्यात एक्स्पर्ट/प्रविण बनले. मग हल्लीच्याच पिढीला इतके घाबरायला का होते?
मला वाटाते की ही संधी गमावायची भिती, दुसरे/तिसरे यायची भिती, आयुष्य सदा घायताडलेले व घड्याळ्याच्या तालावर नाचणारे... अति व्यक्तिकेंद्रीतता/आत्मकेंद्रितता, शेअरिंगच्या गुणाचा अभाव वगैरे बाबी प्रकर्षाने जाणव्तात....
चिमण...मला काही वेगळे
चिमण...मला काही वेगळे म्हणायचे नाही..:) छान
तुझ्या विनोदी लिखाणातून कधी वाटले काही म्हणावेसे तर निश्चित टाकशील..
मला वाटाते की ही संधी
मला वाटाते की ही संधी गमावायची भिती, दुसरे/तिसरे यायची भिती, आयुष्य सदा घायताडलेले व घड्याळ्याच्या तालावर नाचणारे... अति व्यक्तिकेंद्रीतता/आत्मकेंद्रितता, शेअरिंगच्या गुणाचा अभाव वगैरे बाबी प्रकर्षाने जाणव्तात....>>>>> यु सेड इट लिंबू... खरय हे अगदी आणि अचूक मांडलेस तू. आत्मकेंदितता आणि शेअरिंगचा अभाव तर प्रामु़ख्याने म्हणावा लागेल. घरातल्या घरात शेअरिंग कमी झालेय तर बाहेर करणे विरळाच. कप्पे करुन घेतलेय सगळ्यांनी. मग आता आपणच हा निराळा कप्पा करायचा का..तशी जीवनसरणी अन जीवनशैली आवडणार्या लोकांचा असा मनात विचार येतो. कप्पे , गट करायचेत ना मग असे करुयात. कुणावर ही काहीही न लादता स्वेच्छेने
स्मिता काही हरकत नाही
स्मिता काही हरकत नाही प्रवाहाबरोबर कायम जायला नाही जमलं तर, मलाही प्रत्येक वेळेला नाही जमत. फार मनाला लागतं कधी कधी, काही गोष्टी खटकतात नवीन काळातल्या पण त्या भावंडांशी बोलता येतात, त्यामुळे मन हलकं होतं. नेटशी मैत्री मात्र आवडतेय.
ती विचाराची, तत्त्वांची, काही
ती विचाराची, तत्त्वांची, काही कशाची बान्धिल असण्याची. रसिकतेने निवाण्तपणे जगण्याची
>> हे तेव्हाही केले होते व आताही करतोच आहोत. उलट विचार फार क्लीअर झालेत. लोक काय म्हणतील ह्याचा पुसट्साही बागुलबुवा जाणवतनाही जो त्याकाळी आयुष्ये उध्वस्त करत असे. सत्य अहिंसा, सहिष्णुता वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूल्यांना बांधिल तेव्हाही होतो आता जास्तच आहे.
तत्त्वासाठी स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट साठी जीव कुर्बान केला आहे. इट्स गुड ऑन द अदर साइड. बिलीव्ह मी.
रसिक निवांत तेव्हा पण. आता पण. स्कूटर वरून मोठ्याने गाणे गात भट़कणे, पंचतारांकित जेवणे किवंआ टपरीवर समोसा खाणे. ह्या क्षणात जगतो पुढे मागे काही नाही. काहीच नाही. कधीच नाही.
अंजू.. खरय..मला प्रवाहाबरोबर
अंजू..:) खरय..मला प्रवाहाबरोबर जायला जमत नाही ही खत नाहीये माझी. उलट मला लोटल जातय प्रवाहाबरोबर पण मला ते तसे लोंढे वहात जातात तसे जायला जमत नाही, आवडत त्याहून नाही . कुठेतरी वेगळा विचार येतोच ना.
नेटशी मैत्री आपली सगळ्याचीच आहे. आनि ती आही चुकीची नाहीये. उलट ते फार मोठे साधन आहे आपल्या हाती हवे ते साध्य करुन घेण्यासाठी,...:)
हम च्चोडेगा नई जी हम पकडके
हम च्चोडेगा नई जी
हम पकडके रक्केगा जी
अमा हे तुम्ही करताय. कदाचित
अमा हे तुम्ही करताय. कदाचित तुम्ही जरा थोड्या जवळच्या पिढीतल्या असाल. पण हल्लीची मुले लोक मानतात या गोष्टी जितक्या मोठ्या प्रमाणावर आम्ही मानायचो आमचे वडिलधारे मानायचे तितक्या प्रमाणात. माझे आई वडिल शिक्षक आहेत पण ते आयुष्यभर त्याच्या त्तवाशी अन मुल्याशी घट्ट राहिले आहे. पण आज मला माझ्या मुलाचे शिक्षकजाणवतात का तसे? . काही ही म्हणा ती बाब अगदी गेली असे नाही म्हणत मी पण कमी झाले, पुसट झाले हे निश्चित. हा भाग एक गोष्ट झाली पण एकुणातच सगळ्या मौलिक गोष्टी पुसट झाल्या हे नक्की. कालचा सकाळ सप्तरन्ग मधील वासलेकरांचा लेख वाचा. खरच मी अंतर्मुख झाले तो वाचून
हो खरं आहे पण काही
हो खरं आहे पण काही वर्षापूर्वी ह्या गोष्टी मला येतील का नाही हा आत्मविश्वास नव्हता मला, माझ्या नवऱ्याने शिकवलं आणि आत्मविश्वास दिला, तो सहज त्याच्या ऑफिसमध्ये संगणकीकरण झाल्यावर सामोरा गेला आनंदाने. मायबोली वाच तुला आवडेल, फेसबुकवर अकाऊंट काढ. मायबोलीवर मेंबर हो, हे पण त्यानेच सांगितलं. मी बरेच दिवस फक्त वाचक होते.
आता त्याच्यापेक्षा मीच उंडारत असते सगळीकडे.
अंजू.. मस्त..
अंजू..:) मस्त..
हा भाग एक गोष्ट झाली पण
हा भाग एक गोष्ट झाली पण एकुणातच सगळ्या मौलिक गोष्टी पुसट झाल्या हे नक्की. >> मूल्ये पुसट झालेली नाहीत. बदलली आहेत. म्हणून तुम्हाला तो डिसोनन्स जाणवतो आहे.. असे जनरलायझेशन तर फार चुकीचे आहे. पूर्वी दलित पददलितांना काय वागणूक दिली जात असे? रेसीझम फेमिनिझम काय परिस्थितीत होती त्या दशकांच्यात. आता निदान लोकांना असे वागवले जावू नये अशी जाणीव तरी इंटरनेट मुळे सीप होते आहे जनमानसात. वागणुकीतफारसा नसेल पण निदान हे चूक आहे असे तरी काहींना म्हणता येत आहे. चांगले शिक्षक अजून आहेत. उलट नेट वरून शिक्षण दूर पोहोचते आहे. पारदर्शकता फार झाली आहे ती झेपत नसेल तर त्यावर उपाय केला पाहिजे.
असेल कदाचित झेपत नसेल्ही
मूल्ये बदली हाच मोठा बदल जाणवतो. जुनी मुल्ल्ये वाईटच होती असेही नाही अन आजची मुल्लये सगळी वाईट असेच नाही. आताच बघा ना मी पहिल्यापासून पहातेय माझा विचार कदाचित मला नीटसा मांडता येत नसेल पण ल्गेच त्यावर कडाडून हल्ला होतो..:) सतत समोरच्याला धोपटणे हे ही बरोबर नाहीच ना. मला कुणाला शिकवायचे नाही, लादायचे तर त्याहून नाही. ही एक चर्चा आहे..एक विचार आहे इतकच असो
पण आज आहे ते सगळे वाईट आहे हा माझा सूर मुळीच नाहीये..फक्त जे निसटलय हातातून ते ही चांगले होते हा आहे.
आमच्या वेळी नव्हते हो असे -
आमच्या वेळी नव्हते हो असे - तसे... हे जे जे ज्ये.ना. (काना) म्हणतात कंटाळा येतो अगदी. साचलेले डबके वाटाते अगदे.. हे माझे वै. मत.
आता पिढी-दर-पिढी चांगले-वाईट बदल होत रहाणार्च... व्हेडर यू लाईक इत ऑर नॉत.
पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे पूढे पूढे जात रहावे असे मला वाटाते. नवीन टेक्नॉलॉजीशी दोस्ती कराविशी वाटते, आप्ल्या मुला-नातवांबरोबर चालावेसे वाटाते.
सिंहावलोकन ठी़कै, पण तो काळ जगावा (जे शक्य नाहीय) कल्पनेत सुद्धा असे मला खरोखर वाटत नाही. हामाबुदो असावा
पूर्वी दलित पददलितांना काय
पूर्वी दलित पददलितांना काय वागणूक दिली जात असे? रेसीझम फेमिनिझम काय परिस्थितीत होती त्या दशकांच्यात. आता निदान लोकांना असे वागवले जावू नये अशी जाणीव तरी इंटरनेट मुळे सीप होते आहे जनमानसात. वागणुकीतफारसा नसेल पण निदान हे चूक आहे असे तरी काहींना म्हणता येत आहे. चांगले शिक्षक अजून आहेत. उलट नेट वरून शिक्षण दूर पोहोचते आहे. >> +१.
अमा हे तुम्ही करताय. कदाचित तुम्ही जरा थोड्या जवळच्या पिढीतल्या असाल.>> अमा कायमच एव्हरग्रीन आहात.
स्मिता, तुम्ही मागे फ्रीज वर्षभर बंद ठेवला असे लिहिले आहे. तो परत चालू करण्यामागे काय कारण होते ते सांगू शकाल का? तसेच, तुम्ही टीव्ही बघण्याचा वेळ कमी केला असंही लिहिलंय. म्हणजे पूर्वी तुम्ही साधारण किती वेळ टीव्ही पाहत होता?
तिसरी गोष्ट म्हणजे किचन मधल्या वस्तू. ज्याचा फारसा अपयोग होत नाही. त्याही अट्टाहासाने घेतलेल्या अन सांभाळलेल्या. त्याना ही फाटा दिला.<<< नक्की काय वस्तूंना फाटा दिला?
नन्दिनी फ्रिज चालू ठेवणे अथवा
नन्दिनी फ्रिज चालू ठेवणे अथवा बन्द ठेवणे या पाठी खास कारण नव्हते असे तो माझ्या सतत चाललेल्या प्रयोगाचा भाग होता. की कितपत गरज आहे या गोष्टीन्ची हे पहाणे.कारण कळतय अस फ्रिज हा घरात असतोच हे माझे विचार होते. असो आणि चालू केला म्हणजे पहा ह माझा फ्रिज मोठा होता आधी डबल डोअर वैगरे मग मी हा प्रयोग करुन छोटा फ्रिज घेतला त्यामागील एकमेव कारण म्हणजे लेकीला आवडणारे आईसक्रिम अन लेकाला आवडणारे गार फृट सलाड..या पलिकडचं फारसा ,उपयोग आताही मी फ्रिजचा करत नाही. भाज्या दोन चार दिवसानी आणायची सवय मला त्या काळात लागली फ्रिज नसण्याच्या ती अजुनही आहे. म्हणजे पूर्वी मी ८-१० दिवस पुरतील इतक्या भाज्या आणुन टाकायचे. तयार मसाले ही सतत असायचे. बर्याचदा शीळे अन्न जास्त वेळा रहायचे ते असायचे. आता त्या माझ्या प्रयोगाने माझ्यातच एक शिस्त आली हवे तेव्हडे करायचे उआगाच जास्तीचे करायचे नाही, वाया घालवायचे नाही इ, इ. हे माझे त्या प्रयोगाचे फलित आहे..:)
किचन मधल्या वस्तू म्हणजे भरमसाठ भान्डी, अतिशय मोठय प्रमाणावर भांडी होती. गरज लागत नाही अशा अनेक विध गोष्टी होत्या जसे मिक्सर आणि फूड प्रो..त्यात मी मिक्सर काढून टाकला. अनेक सेट होते डिनर सेट ते काढून टाकले..मोजकेच सेट ठेवले घरात. लागत लागत आनि हवय म्हणुन नको नको त्या बारिकसारिक गोष्टीना फाटा दिला. गॅसच्या जवळपास दोन बर्नर, तीन बर्नर चार बर्नर अशा शेगड्या होत्या. वापर नसताना उआगाच ठेवलेल्या) आता मी एकच शेगडी ठेवली. ओव्हन होता मग मावे घेतला..मग ओव्हन काढून टाकला. अशा अनेक गोष्टी आहेत त्यावर लिहिनच
कुठे टाकला? मला हवाय ओव्हन
कुठे टाकला? मला हवाय ओव्हन पाव बनवायला. मी उचलून आणते.
मूल्ये बदलली? कशी काय ती?
मूल्ये बदलली? कशी काय ती? इतक्या सहजतेने १५-२० वर्षात बदलली जाऊ शकत असतील तर असली तकलादू मुल्ये बदलली तेच उत्तम.
बाकी ही मूल्यांची उठाठेव आणि संथ-शांत-साधे-जिव्हाळ्याचे इ.इ.इ, आयुष्य बदल्याची खंत वाटण्याचे मुख्य कारण समाजाच्या केंद्रस्थानातून बाहेर फेकले जाणे, आपल्या मताला कोणी किंमत न देणे आणि 'आपल्या' लोकांपेक्षा परिघावरच्या 'इतर' लोकांची मक्तेदारी वाढणे हे आहे.
कुठे टाकला? मला हवाय ओव्हन
कुठे टाकला? मला हवाय ओव्हन पाव बनवायला. मी उचलून आणते.<< मी अनु, काही लोकं वस्तू टाकून देतात. आमच्यासरखे गरीब लोकं त्या वस्तू एक्स्चेंजमध्ये टाकून नवीन वस्तू घेतात.
बाकी, ही भरमसाठ वस्तू विकत घेण्याची सवयच मुळात कधीपासून लागली? वर नमूद केलेल्या बर्याच वस्तू ७०-८० च्या दशकात होत्याच. त्यामुळे ही सवय मोडण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयोगांचे कौतुक आहे. गरजा मिनिमम करणे याबाबतीत दुमत नाहीच. ते मी आधीपासून करतेय. अर्ध्या रात्री सांगितल्यावरही किचनचा सर्व पसारा तीन ते चार खोक्यांत घालून मी तयार होइन.
भाज्या मी आता २०१६ साली रोजच्या रोज ताज्या विकत घेते. शक्य होइल तितक्या भाज्या माझ्या घरच्या आंगणात पिकवते. ज्या एक्झॉटिक भाज्या माझ्या घराच्या परिसरात मिळत नाहीत त्या फक्त मी आठवड्यांतून एकदा आणते.
माझा मुद्दा या गोष्टीचा ७०-८० च्या जीवनशैलीशी जोडण्यासंदर्भामध्ये आहे. तेव्हाही लोकं भरमसाठ वस्तू विकत घेत होतेच.
बाकी ही मूल्यांची उठाठेव आणि
बाकी ही मूल्यांची उठाठेव आणि संथ-शांत-साधे-जिव्हाळ्याचे इ.इ.इ, आयुष्य बदल्याची खंत वाटण्याचे मुख्य कारण समाजाच्या केंद्रस्थानातून बाहेर फेकले जाणे, आपल्या मताला कोणी किंमत न देणे आणि 'आपल्या' लोकांपेक्षा परिघावरच्या 'इतर' लोकांची मक्तेदारी वाढणे हे आहे.<>>> हे पहा, अशापद्धतीने स्पष्ट बोलायचं नसतं हे तुम्हाला कधी समजणार? अजून शंभरेक पोस्ट्स "त्याकाळामध्ये" च्या गुणगानासाठी पडायच्या आहेत.
गतकालविव्हल हाच परफेक्ट शब्द यासाठी!!!!
स्मिता२०१६, तुमच्या धाग्यावर
स्मिता२०१६, तुमच्या धाग्यावर दोन प्रकारचे प्रतिसाद येत आहेत एक म्हणजे स्मरणरंजनाचे आणि दुसरे जुन्या आणि नव्या जीवनशैली विषयी सकारात्मक/नकारात्मक भाष्य करणारे. पण तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे? कारण ह्या साऱ्या गोष्टी इतक्या वेळा सांगितल्या गेल्या असतील की ह्या कशातच काही नवीन नाही.
प्रत्येक काळात बऱ्या वाईट गोष्टी असतातच. जी मुल्ये चिरंतन असतात ती सर्वकालीन असतात. काळ बदलला तरी मुल्ये बदलत नाहीत. काळाला मागे परतवणे हे कोणालाच शक्य नाही. आजच्या काळाला नावे ठेवण्यापेक्षा कालसुसंगत विचार का करू नयेत?(जो मला वाटतं तुम्ही करताच आहात..जरी तुम्हाला वाटलं नाही तरी)
आगाऊ +१००
आगाऊ +१००
You have decluttered your
You have decluttered your kitchen. I have seen people not owning more than 3 vessels no electricity few clothes. In that age and even today. Cutting out the excess in ones own life and trying to bring about social change through nostalgia are two totally different things. It will not work because life always moves ahead. Also we felt secure and safe happy because we were young and sheltered by our parents. A homogeneous society.but even in those times people have suffered.
तुम्ही आयुष्य जरा जास्तच
तुम्ही आयुष्य जरा जास्तच गंभीरपणे घेताय असं वाटायला लागलं.
प्रत्येक काळात बऱ्या वाईट
प्रत्येक काळात बऱ्या वाईट गोष्टी असतातच. जी मुल्ये चिरंतन असतात ती सर्वकालीन असतात. काळ बदलला तरी मुल्ये बदलत नाहीत. जिज्ञासा हे आवडलं.
प्रत्येक काळात बऱ्या वाईट
प्रत्येक काळात बऱ्या वाईट गोष्टी असतातच. जी मुल्ये चिरंतन असतात ती सर्वकालीन असतात. काळ बदलला तरी मुल्ये बदलत नाहीत. काळाला मागे परतवणे हे कोणालाच शक्य नाही. आजच्या काळाला नावे ठेवण्यापेक्षा कालसुसंगत विचार का करू नयेत?(जो मला वाटतं तुम्ही करताच आहात..जरी तुम्हाला वाटलं नाही तरी)>>>>> जिज्ञासा , अगदी बरोबर..मी सुरुवातीपासूनच मी काही नवीन सांगतेय असा आव आणलाच नव्हता. मी काही बदल केले माझ्या आयुष्यात ते खरेच मला तरी फायदेशीर आहेत हे सांगते अर्थात कोणाला उद्देशून वैगरे असे काही नाही. खूपदा चर्चा होतेच पण आपण खरेच ती मनावर घेतो का? म्हणजे स्वानुभव असा आहे की स्वतः करुन पाहिल्या शिवाय त्या गोष्टीचे महत्त्व कळत नाहीये.
"जुने जाऊ द्या मरणा लागूनी" या कवितेतील विचार मला बर्याच अंशी पटतात, भावतात आणि " जुने ते सोने " या उक्तीवरही बराचसा विश्वास आहे. प्रत्येक काळ बदलतो, तो कोणी थांबवू शकत नाही, आणि तसा थांबवायचा प्रयत्नही करायचा नसतो.
एक समविचारी ( विचारी) लोकांशी बोलावे ही हेतू..कोणाला शिकवणे, नवीन काही घडवणे हा हेतू नाही. आपल्या माबो वरच्या शर्मिला फडके यांचा लोकमत मधील लेख वाचा आवश्यक अडगळ या विषयाशी सुसंगत आहे.
मी आजच्या काळाला नावे ठेवत नाही हो. कारण मी ही याच काळत जगते. नेट मी नाही तर माझी आजी हीए मोठ्या प्रयासाने आमच्या कडून शिकू पहातेय. आईच ऑप्रेशन झाले तेव्हा तिची पहिली डिमांड माझ्या फोनवर तेव्हड व्हॉटस अप द्या डाऊन लोड करुन ही होती. तेव्हा मी जुन्या काळातली अन " गतकालविव्हल"
वैगरे नाही. पण जुने जे खरच चांगले होते ते पुन्हा आपल्याला अजमावता येईल का या विचारात आहे. असो
जुन्या वस्तू मी हे टाकून दिल्या नाहीत तर त्या बाजुला केल्या. गरजूना त्या दिल्या. अन काही खरच टाकावू असतील त्या स्कॅप केल्या.
हो सत्तर किन्वा ऐन्शीचा कालावधी का तर यावर मी काही कालअभ्यासक नाही तर मला कळु लागले त्या काळात असे नव्हते असे माझे मन सांगते म्हणून बाकी काही नाही.
मुल्ल्ये बदलली नाही असे म्हणता तुम्ही..मुल्ल्ये बदलत नाहीच पण त्या मुल्यावरच आज किती जण आहेत . जे मुल्यावरच अधिकाधिक असणारे होते आपले आजोबा पणजोबा तितकी आहेत का लोक आज..मुल्यांमध्ये बदलत नाही शाश्वत असतात पण त्त्याचा अन्गिकार करणार्याचे प्रमाण निश्चित कमी झाले .
>> मी जुन्या काळातली अन "
>> मी जुन्या काळातली अन " गतकालविव्हल" स्मित वैगरे नाही. पण जुने जे खरच चांगले होते ते पुन्हा आपल्याला अजमावता येईल का या विचारात आहे.
अनुमोदन!
मला वैयक्तिकरित्या ८० ते ९० चे दशक "अस्वस्थ दशक" वाटते. का कुणास ठावूक पण ८० पर्यंत लोक समाधानी होते पण ८० नंतर समाजात असमाधान आणि असंतोष वाढला असे राहून राहून वाटते (वरती कुणीतरी उल्लेख केल्याप्रमाणे रॉकेल, गॅस, फोन च्या रांगा, परमिट राज इत्यादी). कला आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा पाहिले तर हे जाणवते. संगीतातल्या रफी, मुकेश, जयकिशन (शंकर-जयकिशन मधले), मदन मोहन, सी रामचंद्र यासारख्या एकापेक्षा एक दिग्गजांचे मृत्यू ८० पर्यंत झाले. जे हयात होते त्यांची सद्दी संपली होती. एकप्रकारची मरगळ व उदासीनता आली होती. त्यानंतर मान डोलायला लावणारे सोज्वळ संगीत जाऊन त्यात सुद्धा उथळ कर्कश्शपणा येऊ लागला. अभिनयात राज-देव-दिलीप यांच्या वर्चस्वाला घरघर लागली होती. अमिताभचा झंझावात डोक्यात राख घालून घेतलेल्या अस्वस्थ तरुणाईचेच प्रतिनिधित्व करत होता. ढिश्श्यूम ढिश्श्यूम करून रक्तबंबाळ करणारे हिरो सामाजिक आदर्श झाले. राजकीय क्षेत्रात सुद्धा ८० नंतर उलथापालथ झाली. पंजाब प्रश्न, काश्मीर धगधगू लागले. देशात महागाई बेरोजगारी बेकारीचे प्रमाण खूप वाढले होते. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या नितीमुल्ये जपणाऱ्या नेत्यांची सद्दी संपली होती. त्यातच इंदिराजींची हत्या झाली.
९१ नंतर मात्र मुक्त अर्थ व्यवस्थेचे वारे वाहू लागले. माहिती-तंत्रज्ञानची क्रांती सुरु झाली. तसे यात हळू हळू फरक पडत गेला.
मला वैयक्तिकरित्या ८० ते ९०
मला वैयक्तिकरित्या ८० ते ९० चे दशक "अस्वस्थ दशक" वाटते. का कुणास ठावूक पण ८० पर्यंत लोक समाधानी होते पण ८० नंतर समाजात असमाधान आणि असंतोष वाढला असे राहून राहून वाटते >>>>> अतुल आपल्या मतांशी सहमत आहे मी..मला ही या गोष्टी सात अस्वस्थ करतात.
मी हा विषय सुरू केला अनेक
मी हा विषय सुरू केला अनेक प्रतिक्रिया आल्या त्याबद्दल प्रथम सगळ्यांचे आभार. माझे मत कुणाला एकमार्गी वाटले कुणाला आततायी वाटले किंवा स्वतःचे म्हणणे कुणावर लादणारे वाटले. पण लोक हो माझा तो एक विचार होता, हट्ट नव्हता. मी त्या काळात तशी लहान असल्याने मला आकळलेला तो काळ इतरांच्या नजरेतून तसाच असेल का हे बघण्याचा तो प्रयत्न होता. दिनेशदा, साहिल यांनी रांगा, रेडिओचे लायसन्स, ७२ चा दुष्काळ या गोष्टी सांगितल्या ज्या मी अनुभवल्या नव्हत्या..:) सो मला निश्चितच तो एक फायदा झाला ..जुनी गोष्ट नव्याने कळण्याचा ...तेव्हा पुनश्च धन्यवाद:
मी स्वतः अशी जीवनशैली स्विकारताना मला हळू हळु त्यातील अधिक चांगल्या बाजू जास्त जाणवू लागलया मग त्यावर अधिक संवाद साधावा या हेतूने ते विचार मांडलेले.. खूप काही प्रतिसाद आले खुप मंथन घडलेही..उलट सुलट विचारांच्या मंथनातून माझ्या हाती गवसलेले मोती. ( म्हणजे मला पटलेल्या अन अजून काही वेगळे जाणवून दिलेल्या म्हणजेच पोस्ट)आपण इथे एकत्रित करुया..आपल्या विचाराचा प्रवाह अशा दिशेला वळवु या..चर्चेचा कल असा ठेवू या.
आता पर्यंतच्या भावलेल्या, विचार प्रवृत्त करणार्या पोस्ट
आज जीवाला जितकी अशातंता आहे खास करुन मोठ्या शहरात तितकी अशातंता पुर्वी कधीच नव्हती. असे अनेक जण आहेत जी लोक सुर्योदय आणि सुर्यास्त हे दोन्ही पाहत नाही. कधीही झोपतात कधीही उठतात. कधीही खातात कधीही पितात. वेळेचे नियम राहिले नाही. भारतीय लोक तर फार फार उशीर रात्री जेवण करतात जे की एकदम चुकीचे आहे. आपल्या गरजा इतक्या वाढल्या आहेत की त्या पुर्ण करायला रोजचे २४ तास कमी पडतात आणि मग धावपळ आणि तगमग ह्यातून जावे लागते. ह्याचा एक हताश असा सराव होतो पण जोवर आयुष्य एका सुरक्षित ठिकाणी पोचलेले असते तोवर आपण आपली जी ससेहोलपट केलेली असते त्याचे परिणाम मग दिसायला लागतात>>>>>>>>.बी
प्रत्येक काळात चांगल्या वाईट गोष्टी/वृत्ती असतात. मुळात काळ बदलतो म्हणजे फक्त उपकरणे आणि सुवीधा बदलत नाहीत. माणसांची वृत्तीची बदलते. ८० ह्या दशकात लोकांच्या वृत्तीबाबत मला स्वत:ला जाणवलेली साधेपणा हि जशी सकारात्मक गोष्ट तशी नकारात्मक गोष्ट म्हणजे लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप गंभीर असत. भावनावश होत. म्हणजे प्रमाण जास्त होते. आजच्या इतकी "इझी गोइंग" वृत्ती नव्हती. आयुष्याच्या ठराविक चाकोरीच्या कल्पना होत्या. अमुक चांगले. तमुक वाईट. इत्यादी. नवीन गोष्टी सहज स्वीकारल्या जात नसत. नवनवीन मार्ग चोखाळणे इतके मंजूर नव्हते. त्याबाबत आजचा काळ जास्त सकारात्मक आहे असे वाटते. Atul
आपल्याकडे पैसा असतो पण आपण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. पुर्वी रोज सकाळची रात्रीचे जेवण गरम मिळायचे आता तसे मिळत नाही. आता जेवण म्हणजे काहीतरी तडजोड झाली आहे. म्हणजे मुलभुत गरज पुर्ण होत नाही आहे सगळे काही असूनसुद्धा>>>>>>> बी.
१. माझ्या मते शहरात मुलांना मैदानं राहिली नाहीत.
२. ताण वाढला. वंध्यत्वाच्या क्लिनिकपुढे रांगा वाढल्या. तरूण वयात टक्कल हे अंगवळणी पडत चाललंय. स्त्रियांचे छोटे होत चाललेले केस (कापल्याने नाही) हे सुद्धा दिसून येतंय.
३. प्रदूषण वाढले, त्याचे घातक परिणाम दिसून येऊ लागले आहेत.
४. अन्नातली भेसळ वाढत चालली आहे. दूधाच्या भेसळीने होणा-या दुष्परिणामांवर मायबोलीवर चांहली माहिती आहे.
५. हॉटेलिंग ही चैन राहिली नाही. >>>>कापोचे
आऊटडेटेड होण्याची भिती' हा एक मोठा बदल मला या दशकातल्या पिढीत जाणवतोय. जी सत्तर ऐंशी नव्वद वा दोन हजारच्या दशकातही तितकीशी नव्हती.>>> ऋन्मेष
तशी साधी अन विद्वान माण्से आता दिसत नाहीत, अनुभवता येत नाहीत.
रॅट रेस नव्हती असे नाही पण वेग कमी होता. आर्थिक आणि मटेरियलिस्टिक अपेक्षा फ्रिज्,स्कूटर पर्यंत मर्यादित होता, मोठे घर्/फ्लॅट म्हण्जे ८०० स्क्वे फूटापलिकडे नसायचा.
सभोवताली निओ रिच फारसे नव्हतेअन असले तरी त्यांच्या लाऊड वर्तनाने ते इतरांवर स्वतःस लादायचे नाहीत वा जाचक ठरत नसत.
तंत्र ज्ञानावर फारसे अवलंबून नहतो त्या मुळे कम्युनिकेशन मध्ये झालेल्या दिरंगाईने तणाव येत नसे. सुवाच्य अक्षर इ. कौतुकाच्या गोष्टी होत्या.
थोर गायक ,लेखक वगैरे आपल्या सारखेच होते.
वेग ... जीवघेणा वेग अन आकांक्षांनी घायाळ केले नव्हते>>> रेव्यू
मला वैयक्तिकरित्या ८० ते ९० चे दशक "अस्वस्थ दशक" वाटते. का कुणास ठावूक पण ८० पर्यंत लोक समाधानी होते पण ८० नंतर समाजात असमाधान आणि असंतोष वाढला असे राहून राहून वाटते>>> अतुल
मग आता आपण या अनुषंगाने चर्चा करू शकतो , विचार करू शकतो ना..:)
Pages