ही पण अगदी साधी व सोपीच रेसिपी. पण जुन्या पुण्यात व जुन्याच पुणेकरांमधे अतिप्रिय. जनसेवात मिळायचा हा सांजा, तेव्हा चवीढवीचे जे. ना येऊन मजेत खाताना दिसायचे. दुर्दैवाने जनसेवा आता बंद झाले.
पण आमच्या आज्जींची व त्यांची चव अगदी सेम.
साधारणत: खूप मोठ्या पावसाच्या आळशी संध्याकाळी,आजारी व तोंडाला चव नसलेल्या नातवंडांना खाउ घालायचा पदार्थ. अतिशय कमी सामानात चविष्ट व पटकन होणारा पदार्थ.
साहित्य -
बाआआआ री इ इ इ क रवा १ वाटी, हो, त्याशिवाय हवा तस्स्सा रेशमी पोत येत नाही सांज्याला.
कढिपत्ता - ताजा १ टाळं- हिरवी पाने असलेला. काळी पाने नकोतच.
कोथिंबीर - मूठभर- हिरवी गाआआर हवी शक्यतो.
गोडं तेल
मोहोरी, घरचा हिंग, हळद,
सुके खोबरे किसणीवर किसलेले - जरास्से वरून शिवरायला
लिंबू १-२
किसलेले आले १ चमचा
जिरं, १ हिरवी तिखट मिरची
उगीच आपला नावाला - घातला न घातला असं - तीळ व ओवा ( चिमूट-चिमूट)
उकळलेले पाणी - ३ वाट्या.
साजूक तूप - १ मोठा चमचा.
हा पण लोखंडी कढईतच करायचा.
ला आआआ ल भाजलेला रवा घ्यायचा. तो असतोच घरी कायम. भाजलेला असला तरीही कढईत जरा गरम होउ द्यायचा.
तोवर बारीइइइक चिरलेली तिखट हि. मिरची व मिठ पोळपाटावर तर कढिपत्ता हातानेच चुरून घ्यायचा. तीळ व ओवाही लाटण्यानं जरास्से दुखवून घ्यायचे. पदार्थ जरा जुना असला ना, तरी असं केल्यानं त्याची अंगची चव जरा सुधारते.
एकीकडे दुसर्या गॅसवर ३ वाट्या पाणी उकळायला ठेवायचं
मग तेलाची फोडणी करायची. मोहोरी व थोडे जिरे, अर्धा चमचा हिंग, तीळ व ओवा असे घालून फोडणी करायची. हळद फार नाही घालायची. जर्द पिवळ्या रंगाचा सांजा चांगला दिसत नाही. हळद जरा बेतानंच घालायची, कढीपत्ता, आलं, मिरची तेही फोडणीत जरा चरचरीत होईतो परतायचे व वरून फोडणीत २ वाट्या गरम पाणी घालायचं. चांगलं खळखळून उकळलं की मग साखर व मिठ जरा चढंच घालायचं. पाण्याची चव बघायची. आणि मग एका कड असलेल्या पातेल्यात रवा भरून एका धारेत एका हातानं रवा फोडणीतल्या उकळत्या पाण्यात ओतायचा व दुसर्या हाताने ढवळायचं. आयत्या वेळेस सांजा कोरडा वाटला तर अजून थोडं गरम पाणी घालायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. ३-४ मिनिटांनी एक दणदणीत वाफ आली की झाकण काढून त्यात एक चमचाभर तूप घालायचे ( वरून तूप घातले की पदार्थ चमकतो), १ आख्खे लिंबू पिळायचे व लगेचच गॅस बंद करून सांजा दूसर्या वाढायच्या पातेल्यात काढून ठेवायचा. लिंबाने लोखंडातला पदार्थ कळकतो त्यामुळे ही काळजी घ्यायची. मग सांज्यावर कोथिंबीर व किसलेले खोबरे शिवरायचे. बरोबर खायला मिरगुंडं तळून द्यायची.
आंबट, गोड, तिखट व मिठ ह्या सर्व चवी बरोब्बर साधल्या की हे अद्भुत रसायन तयार होते.
मस्त मस्त रेस्प्या.. ते बाआआआ
मस्त मस्त रेस्प्या..
ते बाआआआ री इ इ इ क ..ला आआआ ल मस्त लिहिलय
दटावणी कम दम आठवला
ते बाआआआ री इ इ इ क .>>>>>>
ते बाआआआ री इ इ इ क .>>>>>> हे आवडलंच.
अगदी डोळ्यांसमोर आली मस्त
अगदी डोळ्यांसमोर आली मस्त वाफभरल्या साजूक तुपानी चमकणारी सांज्याची डिश!
शब्दप्रयोगही मस्त, दुखावलेले तीळ, ओवा वगैरे!
लिहिण्याची स्टाईल फारच मस्त
लिहिण्याची स्टाईल फारच मस्त आहे.
लहानपणी हा पदार्थ आवडत नसे, पण हल्ली परत आवडायला लागलाय, त्यामुळे नक्कीच करून बघण्यात येईल
आणि ते म्हणताना हाताने
आणि ते म्हणताना हाताने अॅक्शन व डोळे बाआआरीक करायचे
अगदी डोळ्यांसमोर आली मस्त
अगदी डोळ्यांसमोर आली मस्त वाफभरल्या साजूक तुपानी चमकणारी सांज्याची डिश! >> +१
छान पाकृ! लिहिण्याची स्टाइल आवडली.
अहाहा! अगदी डोळ्यासमोर पदार्थ
अहाहा! अगदी डोळ्यासमोर पदार्थ आला, 'बिनदात का मेवा'
वा, मस्त. साधीच आणि स्वतःच्या
वा, मस्त. साधीच आणि स्वतःच्या हातची एरवी बोरिंग वाटणारी रेसिपी दुसर्याने लिहिलेली वाचताना छानच वाटते.
टीपा मस्त आहेत एकदम. फोटो हवाच पण.
मस्त आणि सोपी वाटते
मस्त आणि सोपी वाटते आहे.
आंबट, गोड, तिखट व मिठ ह्या सर्व चवी बरोब्बर साधल्या की हे अद्भुत रसायन तयार होते. >>> यात चवीलाही साखर नाहीये पण
अरे मस्तच! मी सांजा
अरे मस्तच!
मी सांजा खाल्ल्याला आता हजारेक वर्षे झालीत.
कोंकण सोडल्यापासून नाहीच.
आता करून बघते जरासा.
आजीच्या भाषेतंच लिहिली आहे
आजीच्या भाषेतंच लिहिली आहे काय रेसिपी ? फारच गोड
मस्त. आजी तिक्खटा-मिठाचा
मस्त.
आजी तिक्खटा-मिठाचा सांजा म्हणायची.
मेधावि.. पुन्हा अजून एक
मेधावि.. पुन्हा अजून एक चविष्ट रेसिपी... तुझी स्टाईल भारीच आहे.. चुरचुरीत फोडणीचा खमंग वास इथपर्यन्त आला आणी चक्क सांज्याची चव ही जिभेवर अवतरली..
___/\___
सांजा , विस्मृतीत गेलेला होता गेली दोन दशके अगदी.. आता खायची इच्छा परत उफाळून आलीये या रेसिपीमुळे
वा !! मस्त रेसिपी
वा !! मस्त रेसिपी
आहा, तिखटमिठाचा
आहा, तिखटमिठाचा सांजा..
<<<चांगलं खळखळून उकळलं की मग साखर व मिठ जरा चढंच घालायचं. >>> माधव, आहे कि साखर
साजुक नि सोप्पी रेसिपी आहे ही
साजुक नि सोप्पी रेसिपी आहे ही पण
तुझी लिहायची स्टाईल भारी हं!
तिखटा-मीठाचा सांजा मस्तच.
तिखटा-मीठाचा सांजा मस्तच. स्टाईल भारी लिहीण्याची आणि आज्जी उभ्या राहील्याच इथेही डोळ्यासमोर.
आई आम्ही लहान असतांना बरेचदा दुपारच्या खाण्यासाठी करायची.
मस्त! स्टाईल भारी लिहीण्याची
मस्त!
स्टाईल भारी लिहीण्याची !!
अगदीअसाच तिक्खटा-मिठाचा सांजा माझी आई करत असे.
मी केला तरी तसा जमलाच नाही कधी. कधी रेसिपी म्हणून बघितलाच नाही ना. त्यामुळे नक्की किती प्रमाणात कोणता पदार्थ घालावा हे माहितच नाही
आता तुझ्या रेसिपीने करून बघते.
घरच्या हिंगाचा वास - तुझ्यामुळे आता खडा हिंग आणावा लागणार अस दिसतंय
मस्त एकदम. पण उपमा पण जवळपास
मस्त एकदम.
पण उपमा पण जवळपास याच पद्धतीने करतात ना?
वाह... मस्त!!
वाह... मस्त!!
खुप मस्त लिहिलय...सगळे
खुप मस्त लिहिलय...सगळे शब्दप्रयोग "जरासं दुखवायचं ", "साखर व मिठ जरा चढंच" आवडले..
छान. उपमा आणि उप्पीट पण असेच
छान. उपमा आणि उप्पीट पण असेच करतात ना?
Jabaree! Aaj kinva udya
Jabaree! Aaj kinva udya nakkee karaNet yeil!
मस्त सांजा जनसेवाचा सांजा
मस्त सांजा
जनसेवाचा सांजा का बंद झाल जनसेवा
बी उपम्यात ताक असते अन हळद नसते.
आई तिखट मिठाचा सांजा करताना
आई तिखट मिठाचा सांजा करताना रवा थेट फोडणीतच भाजून घेते. म्हणजे दुकानातून आणलेला रवा थोडा शेकवून ठेवते खराब नको व्हायला म्हणून. पण पूर्ण भाजलेला नसतो. नेहमीची फोडणी करून त्यात हा रवा घालून अगदी मंद आंचेवर भाजायचं सगळं. त्यामुळे तो रवा फोडणीत मुरतो आणि छान भाजला जातो. मग बाकी सामान घालायचं. असा फोडणीतला रवा नीट भाजला गेलाय हे समजणं माझ्या मते सुगरणपणाचं लक्षण, त्यामुळे मी त्या वाटेला जात नाही. आयता खाते आईकडे गेल्यावर
ही रेस्पीपण छान आणि लिहिलीये पण मस्त!
मस्त रेसिपी.. प्र, माझ्या
मस्त रेसिपी..
प्र, माझ्या लेखी तू ही सुगरण च आहेस
>>बी उपम्यात ताक असते अन हळद
>>बी उपम्यात ताक असते अन हळद नसते.>> लंपन, नाही. असंच काही नाही. आंबटपणाकरता लिंबू घालतात.
सांजा हा सकाळी नाही करत का?
सांजा हा सकाळी नाही करत का?
माझी आई अजुनही अगदी असाच
माझी आई अजुनही अगदी असाच बनवते.
नाही. तिन्हीसांजा बनवतात
नाही. तिन्हीसांजा बनवतात म्हणून तर तो सांजा.
Pages