हमामा जाहला - शर्मिष्ठा भोसलेंचा लेख

Submitted by घायल on 7 February, 2016 - 13:50

आजघडीला प्रबोधनाच्या प्रासंगिक व दीर्घकालीन लढाया लढणारे लोक मला आजूबाजूला दिसतात. मात्र विषमता आणि लिंगभेदाचं मूळ असणाऱ्या धर्मव्यवस्थेबाबत त्यातल्या बहुतेकांची भूमिका निसरडी आणि अस्पष्ट आहे. एकतर धर्माला अनुल्लेखानं मारत सतत एका युटोपियन जगाबाबत बोलणं, कडवी धर्मविरोधी भूमिका घेत केवळ स्वत:चं सर्वोच्च क्रांतिकारकत्व सिद्ध करणं, ही दोन टोकं कित्येकांना भुलवताना दिसतात. परिणामी मुळातच अल्प जनाधार असलेली प्रबोधन चळवळ ‘कन्व्हिन्सिंग द कन्व्हिन्स्ड’च्या चक्रव्यूहात अडकत अधिकाधिक मर्यादित होत राहते.

http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-sharmishtha-bhosle-rasik-articl...
दिव्यमराठी या दैनिकात प्रकाशित झालेल्या या लेखात लेखिका शर्मिष्ठा भोसले यांनी हा मुद्दा पुढे केला आहे. चर्चा अपेक्षित आहे.

लेखात म्हटल्याप्रमाणे विषय शनी शिंगणापूर, शबरीमला किंवा हाजीअली येथील महिलांच्या प्रवेशबंदीने सुरूवात होत असली तरी लेखाचा विषय तो नाही हे लक्षात येतं. एकंदरीतच कांद्याचे पदर सोलावेत त्याप्रमाणे कुठल्याही प्रश्नाला किती पदर असतात हे उस्फूर्त प्रतिक्रिया देताना लक्षात येत नाही.

आवर्जून वाचावा असा लेख. लेखिका समाज संस्कृती या विषयातील तरूण पिढीच्या प्रतिनिधी आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख वाचला, छोटासाच आहे.
मला स्वतःला धर्म म्हणजे काय आणि तो कशाला लागतो, ते कधी कळलेच नाही.. आणि खरे तर त्यावाचून माझे काही अडलेही नाही.
केवळ कागदोपत्री मी एखाद्या धर्माचा आहे म्हणून मला आजवर कसलाही लाभ झालेला नाही का त्याचा वापर करुन कुठला प्र्श्न सुटेल ( अर्थात माझा ) असा कधी विश्वास वाटला.

धर्माच्या नावावर ज्या चर्चा आणि वाद होतात, त्याबद्दल मला नेहमीच अचंबा वाटत आलाय. खराच धर्म एवढा महत्वाचा आणि सार्वजनिक आहे का ? असावा का ?
त्या बाबतीत जे प्रश्न ऐरणीवर येतात ते खरेच इतके महत्वाचे असतात, त्याहून मह्त्वाचे प्रश्नच नाहीत का ? का त्या प्रश्नाना भिडण्याची आपली तयारी नाही, म्हणून एक आड म्हणून त्याची ढाल करुन इतका काथ्याकूट केला जातोय ?

आता इथेही घणाघाती चर्चा होईल.. कदाचित माझ्यावरही हल्ला होईल.. काय फरक पडतो म्हणा त्याने !

दिनेशदा, तुम्ही जे लिहिले आहे तसा विचार केल्याने लेखात म्हटल्याप्रमाणे convincing the convinced एवढेच साध्य होते. If one sticks to the 2% minority of non believers he/she will never be able to reach out to the 98% majority. We need to be in that 98% population to steer the change. Beautiful thinking! I'm very impressed.

स्त्रीला तिचं धर्माशी काळानुरूप बदलत असलेलं नातं सर्वात आधी स्वत:शी स्पष्ट करावं लागेल. >> Happy ही तर खूप लांबची गोष्ट झाली.
स्त्रीला तिचं स्वतःशी काळानुरूप बदलेलं नातं आधी ओळखावं लागेल. उदा: लेखिकेनेच दिलेल्या चुलत बहिणीच्या उदाहरणात स्वतःची स्वतःशी ओळख "बेबी मेकिंग मशीन" अशी असेल, तेवढीच आयुष्याची इतिकर्तव्यता मानली असेल तर इतर कोण काय करणार!

मलाही धर्म हा व्यक्तिगत विषय आहे असे वाटत होते. पण थोडाफार इतिहास वाचला, आपलाच नाही तर वेगवेगळ्या देशांचा, तर लक्षात येते कि मानवी राज्यात धर्माचे स्थान उच्च आहे, लोकांनी प्रसंगी जीव गमावणे पत्करले पण धर्म सोडला नाही, रानावनात देव लपवताना आपल्या देवांना असे का लपवावे लागते, ते स्वतः समर्थ नाहीत का हा विचार डोक्यातही आणला नाही. धर्माचे स्थान सर्वोच्च आहे. त्याच्यापुढे लोकांना दुसरे काहीही दिसत नाही.

एकूण मानवी जीवनात धर्म हा प्रकार इतका श्रेष्ठ का? कोणाचा कायमस्वरूपी फायदा झालाय या संकल्पनेतून? ज्यांनी त्याला अफूची गोळी म्हणून फेकले त्यांना काय फायदा झाला? त्यांनीही कालांतराने परत उचलून घेतले का धर्माला?

काही लोकांच्या फायद्यासाठी धर्म उदयाला आला असे जरी म्हटले तरी ते लोक जाऊनही हजारो शतके उलटली. तरीही धर्म आहे हे कसे? You cannot fool all the people all the time असे म्हटले जाते. मग नास्तिक ज्याला काही ठराविक लोकांनी उरलेल्या लोकांना मूर्ख बनवण्यासाठी शोधलेले साधन म्हणतात त्या साधनाने जगभराच्या लोकांना आजही भूल का घातलीय? आणि ती भूल दिवसेंदिवस का वाढत चाललीय?

लेख छान आहे.

धर्म म्हणजे काय? हे जो पर्यन्त समजुन घेअतले जात नाही तो पर्यन्त हे असे मत-भेत,मत मतांतर राहणारच आहेत.

धर्म म्हणजे काय? हा प्रश्न स्वता:लाच अंतर्मुख होऊन विचारावा व उत्तर शोधावे.

विचार करण्यासाठी एकच अट - मनातली आधीच्या संस्काराची पाटी घासुन पुसुन कोरीकरकरित करता आली पाहिजे.

जिज्ञासा आभार.

या लेखातले काही विचार विस्कळीत आहेत. मात्र जागृतांनी आपले विचार एका मर्यादीत वर्तुळात ठेवण्याबाबत अनेकदा प्रश्न पडलेले होते. शर्मिष्ठा भोसले यांनी ते चांगल्या पद्धतीने शब्दबद्ध केले आहे. आपल्या स्वतःपुरतं समृद्ध होणं म्हणजे काय हे सुद्धा अनेकदा समजत नव्हतं. आजूबाजूचा समाज तसाच ठेवून आपण वैचारीक रित्या समृद्ध होऊ शकू, पण त्या विचारांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं काय ? असा समाज तुम्हाला ती मुभा देऊ शकेल का ? जोपर्यंत उर्वरीत समाजात जागृतीची लागण होत नाही तोपर्यंत बदलाची अपेक्षा ठेवणे किंवा त्याच त्याच घटनांबद्दल चिडचिड व्यक्त होणे हे सर्व निरर्थक आहे असं नेहमी वाटत आलंय.

शनी शिंगणापूरच्या मंदीर प्रवेशाबाबत ते आंदोलन करणारे कोण होते, कुठल्या इश्यूवरून लक्ष हटवण्याचा तो प्रयत्न होता का हे सर्व बाजूला ठेवूनही काही प्रश्न मनात उभे राहतात. शनी शिंगणापूरच्या धाग्यावर लिहीलेलं आहे ते. प्रवेश करायचा की नाही हे स्त्रिया ठरवतील, पण त्यांना प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय परस्पर रित्या इतरांना (पुरूषांना) असणे हे पुरूषसत्ताक समाजाचं मूळ आहे. अशा प्रथा वर्चस्व प्रस्थापित करत असतात. त्यामुळे त्याच्यावर घाव घालणारे आंदोलन, मग ते कुठल्याही हेतूने केलेले असो, महत्वाचे वाटते.

धर्म व शास्त्र,विज्ञान विरोधी हैं।
---------------------------
आईये फर्क देखिए

1. विज्ञान व भूगोल:-
गंगा हिमालय के गंगोत्री हिमनद (ग्लेशियर) से निकलती है।

जबकि धर्म व शास्त्र:-
गंगा शिवजी की जटा से निकलती है और भगीरथ इसे स्वर्ग से धरती पे लाया।

2. विज्ञान व भूगोल:-
जल वाष्प भरे बादल जब ठंडी हवाओं के सम्पर्क में आते हैं तो वर्षा होती है

जबकि धर्म व शास्त्र:-
वर्षा इंद्र देवता कराते हैं।

3.विज्ञान व भूगोल:-
पृथ्वी अपने धुरी पर 23 डिग्री झुकी हुई है। जब दो tectonic plates आपस में टकराती हैं, भूकंप आता है।

जबकि धर्म व शास्त्र:-
पृथ्वी शेषनाग के फन पे टिकी हुई है और जब वो करवट बदलता है तो भूकम्प आता हैं।

4.विज्ञान व भूगोल:-
पृथ्वी और चन्द्रमा परिक्रमा करते हुवे जब पृथ्वी सूर्य और चंद्रमा के मध्य आ जाती है तो चंद्र ग्रहण होता है।
जबकि धर्म व शास्त्र:-
चंद्र ग्रहण के समय राहु चन्द्रमा को खा जाता है।

5.विज्ञान:-
हवाई जहाज के माध्यम से मानव हवाई सैर करता है।

जबकि धर्म व शास्त्र:-
बिना किसी माध्यम के कथित देवी देवता और राक्षस हवा में उड सकते थे।

6.विज्ञान:-
यहां कौसो दूर भी दूरसंचार के माध्यम से मानव एक दूसरे से मन की बात कर सकते हैं।

जबकि धर्म व शास्त्र:-
केवल साधु- संत बिना किसी माध्यम के ही मन की बात उन्हीं के बनाये ईश्वर से कर लिया करते थे।

अब फैसला आपका?
आप अपने बच्चों का बौद्धिक विकास करने के लिए उन्हें विज्ञान पढ़ाते हैं या धर्म व शास्त्र।

इथे धर्म व शास्त्र मधले पात्रं व नाव धर्म्,पंथ नुसार वेगवेगळी असु शकतात.

दिनेशदा

तुम्ही म्हणता तो अँगल आहेच. पण पुन्हा ते एका विशिष्ट वर्तुळापुरतं मर्यादीत राहतं हे लेखिकेचे म्हणणे इथेही लागू पडतंय.