मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पालेकर. हि माझ्या आत्याची -- आवडाबाईची गोष्ट.
तशी माझी आत्या काही शिकलेली नव्हती फारशी. पण वाचू शकत होती ती. आयुर्वेदाची तर फार औषधे माहिती होती तिला. तर्हेतर्हेची औषधे ती सांगायची. वेळोवेळी आम्हाला बरे करायची औषधे देऊन. औषधाबरोबर काहीतरी मंत्र पठन चालायचे तिचे -- जरा कोडेच होते आम्हाला. तिच्या अनेक गोष्टी आहेत पण प्रामुख्याने मला जिने विचार करायला लावला तीही गोष्ट.
एकदा काय झाले कि -- माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न होते. आणि नेमका जोरदार पाउस सुरु झाला लग्नाच्या आदल्या दिवसापासून. आता प्रश्न पडला लग्न होईल कि नाही. धो-धो पाऊस. कार्यालयात हि कसे जावे असा प्रश्न. कार्यालयात सामान तरी कसे न्यायचे आत्ता? सगळ्यांना भीती पडली. वरात तरी येईल कि नाही आशा धारेत?
सगळे डोके धरून बसले. तर माझी आत्त्या समोर आली. म्हणाली थांबा. मी ऎक उपाय करते त्याच्यावर. तर तिने काय केले -- परत आंघोळ केली आणि देवापाशी बसली. देवापाशी तिने काय केले तर आपला पाटा-वरवंटा आसतो ना, त्या वरवंटाला ऎक छान असे फडके गुंडालले. आणि एका पटावरती त्याची स्थापना केली.
आणि मग म्हटले तिने -- काय तिचे मंत्र वगैरे होते -- आम्हला कल्पना नाही -- पण होते तिचे फार पठन. पण तिने मंत्र म्हणून पूजा केली त्या वरवंटाची. हळद कुंकू आगदी नेवेध्य दाखवून. सगळी व्यवस्थित पूजा केली. आणि सांगितले मी हे उचले पर्यंत या ठिकाणी पाऊस पडता कामा नये.
तर आम्हा सगळ्यांना हेच वाटले कि असे कसे होऊ शकेल? आमच्या काही गोष्टी हरवल्या तर मंत्र वगैरे म्हणायची ती पण पाऊस ला पडू नये म्हणणे काय? आम्ही सगळे चकित होतो. आम्ही ऐकले होते फक्त आशा गोष्टी. पण हे आत्याचे काही आसे असेल हि कल्पनाच काही डोक्यात आली नव्हती कधी.
तिने ती पूजा-बिजा केली आणि आश्चर्य म्हणजे काय दहा मिनिटात इतके कोरडे झाले आभाळ कि कुठे पाऊस नाही कि पावसाचा थेंब नाही कुठे. पण काही जास्त विचार न करता आम्ही पळालो कार्यालयात.
झाले सगळे सामान नेले. सगळे झाले. लग्न झाले, बहिण सासरी गेली. मग दुसऱ्या दिवशी माझे वडील तिला म्हणाले -- जरा विनोदानेच -- आवडाबाई आत्ता उचला ते तुमचे नाहीतर लोक आपलाल्या म्हणतील आमचा पाऊस तुम्ही बंद केला.
बरे, आवडाबाई म्हणाली. मग तिने काय केले -- अंघोळ केली आणि आतमधून गुळ आणला. जवळ जवळ सव्वा किलो गुळ. तिने त्या गुळाचा नेवैध्य दाखविला आणि सांगितलेकी मी आत्ता हे उचलते आहे आणि आत्ता तुम्ही पाऊस पडू द्या.
परत आशर्याची बाब -- तिने ते नेवैद्य दाखवून, पूजा करून उचलले आणि इतका जोरात पाऊस सुरु झाला लगेच.
सगळ्यांना फारच नवल वाटले. मीही काही वेळा विचार करते कि कसे झाले असेल ते? तेव्हा ना वेधशाळा होत्या ना काही मार्ग होता पाऊसा बद्दल माहिती काढण्यास. पण एक गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी बघितली -- तिने आस्थान मांडले आणि पाऊस बंद. उठवले आणि पाऊस सुरु. आणि हे सगळे सांगून कि मी पाऊसा चा उपाय करते ताबडतोब.
तुम्ही योगायोग म्हणा कि सिद्धि म्हणा. गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.
छान! छान आहे गोष्ट! तुम्ही
छान!
छान आहे गोष्ट!
तुम्ही छान सांगितलीही आहे.
छान छान ! जुने दिवस
छान छान !
जुने दिवस आठवले.
आमच्या काळी गोष्टीवेल्हाळ ज्येष्ठ असायचे त्यांची आठवण झाली.
खुपच छान आहे गोष्ट!
खुपच छान आहे गोष्ट!
गोष्ट आवडली!
गोष्ट आवडली!
छान आहे गोष्ट काश.. अशी कोणी
छान आहे गोष्ट
काश.. अशी कोणी आवडाबाई असती आणि दुष्काळग्रस्तांना मदत करती.
आवडली गोष्ट ! अजून लिहा
आवडली गोष्ट !
अजून लिहा !
मायबोलीवर स्वागत _/\_
अगदी मजेशीर आहे गोष्ट... फार
अगदी मजेशीर आहे गोष्ट...
फार छान शब्दांत मांडलेली आहे...
असे लोक पूर्वी होते. काही घटना वाचल्या आहेत अशा.
छान शब्दात मांडलीय
छान शब्दात मांडलीय गोष्ट..
आवडली.
फारच छान गोष्ट आहे
फारच छान गोष्ट आहे ..........
आताच्या काळात तुमच्या या आवडाबाई आत्यांची मदत झाली असती सर्वाना
महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे तर पाऊस पाडण्यासाठी , आणि चेन्नई मध्ये पूर आला होता त्यावेळी पाऊस थांबवण्यासाठी ....................
खूप छान !! साधी सुंदर
खूप छान !!
साधी सुंदर
लिहिण्याची शैली आवडली !
लिहिण्याची शैली आवडली !
आवडलच. छान आहे.
आवडलच. छान आहे.
मस्तच
मस्तच
खुपच छान गोष्टही आणि
खुपच छान गोष्टही आणि सांगण्याची पद्धत देखिल!
सकुरा | 3 February, 2016 -
सकुरा | 3 February, 2016 - 22:51 नवीन
छान आहे गोष्ट
काश.. अशी कोणी आवडाबाई असती आणि दुष्काळग्रस्तांना मदत करती.
<<<< खरंच, आज अश्या आवडाबाईची खूप गरज आहे.
आजी खूप छान आहेत तुमच्या
आजी खूप छान आहेत तुमच्या गोष्टी, वाचून माझ्या आजी गोष्टी सांगायची त्या आठवल्या.
आजी खूप छान आहेत तुमच्या
आजी खूप छान आहेत तुमच्या गोष्टी, वाचून माझ्या आजी गोष्टी सांगायची त्या आठवल्या.+११
छान सुंदर
छान सुंदर
लिहिण्याची शैली आवडली !,,,,,,
लिहिण्याची शैली आवडली !,,,,,,,,+1
छान!
छान!
छान.
छान.
पद्मआजी आहेत कोठे???
पद्मआजी आहेत कोठे???